आठवणीतलं घर : घर.. मनातलं आणि मनासारखं
मुखपृष्ठ >> लेख >> आठवणीतलं घर : घर.. मनातलं आणि मनासारखं
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आठवणीतलं घर : घर.. मनातलं आणि मनासारखं Bookmark and Share Print E-mail

वासुदेव कामत ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आयुष्याची चार दशकं चाळीतल्या भाडय़ाच्या खोलीत राहिल्यामुळे आपलं स्वत:चं घर असावं, याची स्वप्नं मी अनेक वेळा रंगविली. याचा अर्थ मी चाळीतल्या जीवनाला कंटाळलो होतो, असा अजिबात नाही. उलट तिथंसुद्धा मी आनंदात आणि गुण्यागोविंदाने राहिलो आहे. केवळ आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीच नव्हे, तर चाळीतल्या अन्य बिऱ्हाडांतल्या व्यक्तीदेखील आपल्याच कुटुंबाचे घटक असल्यासारखे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध मी अनुभवले. चाळीतल्या १०x१२ च्या खोलीत स्वयंपाकघर, बेडरूम, हॉल अशी व्यवस्था नव्हती. नाश्ता-भोजन घेताना ती डायनिंग रूम असायची, एकत्र बसून गप्पा मारताना तीच खोली लिव्हिंग रूम होत असे. आणि रात्री सतरंज्या पसरल्या की तीच खोली बेडरूम बनून डाराडूर झोपायची!
आता स्वत:चं घर आहे, चांगला परिसर आहे, तरी स्वप्न किंवा अपेक्षा रंगविण्याचा ‘मोह’ अजूनही सुटलेला नाही, हे मी प्रांजळपणे कबूल करतो. ‘घराचं स्वप्न केवळ कागदावर!’ अशा अर्थाचं एक चित्र मी १९९० च्या सुमारास रंगविलं होतं. फार पूर्वी मी शाळेत शिकत असताना आमच्या नगरातल्या गणेशोत्सवात एका नाटकाच्या सेटवर सुंदर अंतरंगाचं घर पाहिलं होतं. नाटकातील प्रसंगापेक्षा त्या घराची रंगरंगोटी, फर्निचर आणि मोठय़ा खिडक्या आणि इतर सरंजाम मला जास्त भावला होता. नाटक संपल्यावर ते घर जवळून पाहावं म्हणून बॅकस्टेजने आत जाऊन त्या सेटच्या भिंतीची मागची बाजू मी पाहिली आणि सारा उत्साह खळ्ळकन मावळला. तो का, हे त्या वेळी कदाचित मी शब्दांत मांडू शकलो नसतो, पण केवळ आपल्या मनाच्या भिंती उभारणं म्हणजे या नाटकाच्या सेटसारखं तर नाही ना, असं वाटू लागलं. कारण अपेक्षांना कुठं अंतच नसतो. या स्वप्नातील घरांना ‘स्काय इज द लिमिट’ आणि परिसराला अथांग पसरलेलं क्षितिज. त्यामुळे स्वत:चं घर घेताना आपल्या अपेक्षा आणि क्षमता यांची सांगड घालत पुढे सरकू लागलो. मनातलं मिळविण्यापेक्षा मिळालेल्या गोष्टींवर मन जडविता आलं म्हणजे निर्जीव भिंती आणि परिसरातदेखील चैतन्य जागृत होतं असा माझा अनुभव. आणि मग जे आहे ते आपलंसं, आपल्या मनासारखं वाटू लागतं. खरं तर आपलं राहतं घर मनासारखं घडविण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. स्वच्छता, सौंदर्य (नीटनेटकेपणा) आणि समाधान!
आताचं घर बंगलेवजा रो-हाऊसच्या रांगेतलं. एकमेकांच्या बगलेला बिलगून असलेली जणू चाळच. तेव्हा इथं चाळीच्या जीवनशैलीपासून फार लांब जातोय असं जाणवणार नव्हतं. या ग्राऊंड प्लस वनच्या बंगल्याला मी आवडीनं स्वीकारलं आणि मनातलं घरपण देऊ केलं.
एक चित्रकार म्हणून बाहेरच्या निसर्गाइतकीच चार भिंतींच्या स्टुडिओच्या गाभाऱ्यावर श्रद्धा ठेवणं हा माझा स्वभाव! या घरात कलासाधना अविरत चालावी या अपेक्षेने ‘तपस्या’ हे सार्थ नामकरण आम्हा सर्वाना पटलं. भरपूर सूर्यप्रकाश देणाऱ्या खिडक्या आणि माझी चित्रं प्रदर्शित करता येतील अशा सौभाग्यशाली भिंती हे माझं प्रमुख आकर्षण होतं. वर-खाली मिळून सहा खोल्या असल्याने एक खोली देवघर म्हणून राखावी असं काहींनी सुचवलं. त्याला मी प्रेमळ नकार दिला. म्हणजे मी ‘नास्तिक’ आहे असं कुणाला वाटेल, पण तसं नाही. मी पूर्णपणे विश्वात्मक देवावर श्रद्धा ठेवणारा आहे. देवघर हे आपल्या खोल्यांमधून वेगळं न काढता जिथं घराचा उंबरठा ओलांडून आपण आत येतो, ते संपूर्ण घर देवघर म्हणून मानावं अशी माझी धारणा आहे. म्हणूनच या घरात सुख, शांती आणि समाधानाची त्रिवेणी प्रवाहित होते.
घराच्या मागे-पुढे थोडीशी अंगणाची आणि परसाची जमीन. त्यात हिरवा स्पर्श देणारी छोटीशी बाग. रोज सुस्वागताचा गंध पसरविणारी फुलं, नेमाने कमलपुष्प देणारा, पानांनी पांघरलेला कुंडीतल्या पाण्याचा छोटासा डोह, त्यात चकाकणाऱ्या माशांची रांगोळी, मधुर फळे देणारा चिकू आणि सुवर्ण कांतीची वेलची केळी, पोपईची झाडं, असं किती म्हणून सांगू. सारं कसं मनासारखं फुलणारं आणि फळणारं. झाडांवर प्रेम केलं की तीदेखील प्रेमात बहरून येतात असं ऐकलं होतं. परसात लावलेली पांढऱ्या फुलांची रातराणी (?) की ब्रह्मकमळाने कधी कधी २० ते २५ फुलं एकाच वेळी दिली आहेत. तो मंद सुगंध देणाऱ्या फुलांचं स्वागत करायला रात्री ११-१२ वाजतादेखील मागचा दरवाजा उघडून आम्ही बसायचो. घरासमोरच्या अंगणातली एक वेल छपरापर्यंत पसरून जणू तोरणच धरून होती. त्यातल्या काही पानांची शिवणी करून एका पिवळ्या फुलटोच्या पक्ष्याने घरटं बांधलं होतं. त्यात अंडं घालून झालेल्या पिलाला पंख फुटेपर्यंतचा संसार त्याने थाटला होता.
मनासारखं सजलेलं घर आपल्या नातेवाईकांना आणि मित्र-परिवाराला दाखवणं हा एक आनंद सोहळा. त्यात एखाद्-दोन व्यक्ती अशा असतात की, ज्यांचा विश्वास किंवा कमी-अधिक अभ्यास आपल्याला वास्तुशास्त्राची टिपणं देऊ लागतो. घरातली व्यवस्था आणि अष्टदिशा यांची सांगड आणि विसंगती आपल्या मनात गुंता करून राहते. तशी आपल्याकडे देशी-विदेशी अनेक शास्त्रं आहेत, पण माफी असावी, अशा प्रकारच्या विद्या मानवी मनाला कमकुवत आणि कमजोर बनवतात असं मला वाटत असतं. सुख-दु:खाचे चढउतार आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येत असतात, त्याचा स्वीकार करायला मन तयार असलं म्हणजे दु:खाची तीव्रता कमी होते; परंतु या संकटांचं खापर घराच्या निष्पाप भिंतींवर, दारं-खिडक्यांवर आणि मागे-पुढे लावलेल्या झाडांवर फोडावं असं निदान मला तरी वाटत नाही. आपल्या मनाला शिकवण देणं, वळण लावणं आणि कणखर बनवणं अधिक महत्त्वाचं आहे. या ताकदीच्या जोरावरच मी माझ्या घरावर आणि इथल्या वातावरणावर प्रेम करीत आलो.
फार पूर्वी ‘वास्तुपुरुष’ म्हणून मी एक पेंटिंग केलं होतं. आपल्याकडे पारंपरिक आणि शास्त्रीय वास्तुपुरुषांची संकल्पना आहे. त्याविषयी अधिक खोलात न जाता मीच मनाशी विचार केला की, वास्तू ही पंचमहाभूतांनी बनते. दगड, विटा, रेती, लाकूड, लोह इत्यादी पृथ्वीधातू-जलधातूंच्या स्नेहाने एकत्र येतात आणि प्राणवायूचा हवेशीर अवकाश व्यापून टाकतात. दारं-खिडक्यांच्या कवाडांतून आलेल्या प्रकाशाने ती वास्तू उजळून निघते. जेव्हा या वास्तूत आपण कुटुंब, मित्र-परिवारासमवेत वावरू लागतो तेव्हा आपल्या पुरुषार्थाने इथं जीवन प्रवाहित होऊ लागतं. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या सहकार्याने आणि त्यागाने कुटुंब चालतं. घरातल्या अष्टदिशांकडे तोंड करून वावरण्यापेक्षा बहू विचारांच्या दिशा एकमताने केंद्रात एकवटल्या की घर आणि कुटुंब एकसंध राहतं. तेव्हा घरातील यजमान व्यक्ती त्या घराची वास्तुपुरुष ठरते, असा सरळ-साधा अर्थ मी चित्रातून प्रकट केला.
चित्रकार म्हटल्यावर तो एकांतप्रिय असतो (एकलकोंडा नव्हे), तो फारसा बोलत नाही, त्याला कुणी डिस्टर्ब केलेलं चालत नाही, तो ‘मूडी’ असतो, इथपासून त्याला कोणतं ना कोणतं व्यसन असतंच असा समज आणि गैरसमज लोकांच्या मनात कलाकारांनीच निर्माण करून ठेवला आहे. त्यात भरीस भर म्हणजे त्याचा स्टुडिओ अस्ताव्यस्त साधनांनी पसरलेला असतो किंवा असावा, अशी त्याच्या घराची स्थिती असते. या अवस्थेला साक्ष देणारे अनेक कलाकारांचे स्टुडिओ पूर्वी आणि आजही आहेत. मला मात्र स्टुडिओ हा कॅनव्हासच्या फ्रेम केलेल्या पेंटिंगसारखाच नीटनेटका आणि सुंदर अंतरंगाचा असावा, असं नेहमी वाटत आलं आहे. वेळोवेळी स्वच्छ केलेली रंगांची पॅलेट, फुलोऱ्यासारखी रचना धारण केलेलं ब्रशेसचं भांडं, रंगांची मांडणी, दिमाखात उभा असलेला इझल, व्यवस्थित मांडलेलं कॅनव्हास आणि भिंतींवर प्रदर्शित केलेली पेंटिंग्ज; सारं कसं छान वातावरण आणि कलासाधनेला प्रेरित करणारी संगीताची पाश्र्वभूमी. अशा वातावरणात कोणत्या कलाकाराला आनंद वाटणार नाही?
स्टुडिओच्या भिंतींवर चित्रं दिसावीत तसंच आपली बौद्धिक संपत्ती दर्शवणारी पुस्तकांनी गच्च भरलेली काचेची कपाटं हेही माझ्या इंटीरियरचं मुख्य आकर्षण आहे. घरी आलेले पाहुणे ज्या कुतूहलाने चित्रं पाहतात त्याच उमेदीने कपाटातली पुस्तकं पाहण्यात त्यांना विशेष आनंद वाटत असतो. या प्रत्येक पुस्तकात माझा जीव अडकलेला असतो. एखादं पुस्तक कुणाला काही कारणाकरिता दिलं तरी मला घराची ‘वीट’ निखळल्यासारखं वाटत असतं. माझ्या अनेक व्यक्तिचित्रणाच्या पाश्र्वभूमीवर या पुस्तकांच्या कपाटाची रचना चित्रित झालेली आहे. माझ्या घरात स्वयंपाकघरालाही स्टुडिओइतकंच मानाचं स्थान आहे. गृहिणीच्या हातून तयार होणाऱ्या भोजनाचा सुगंध मला फार आवडतो. एखाद्या पदार्थावर पडलेली झणझणीत फोडणी आणि वेलची-केशराचा सुगंध देणारा शिरा किंवा तत्सम गोड पदार्थ हा पेंटिंगइतकाच आनंद देणारा! तेव्हा व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवलेलं स्वयंपाकघर हीदेखील घरात वावरणाऱ्या अन्नपूर्णा गृहिणीची पहचान असते.
घर हे फक्त निवारा देणारं नसतं, तिथं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख देणारी, इतिहास सांगणारी ती एक वास्तू असते. तिथल्या प्रत्येक वस्तूशी आपलं सकारण नातं जुळलेलं असतं. हे नातं तुटलं की त्या घराचं खंडहर होऊन जातं.
आपल्यामधला आत्मा जसा अदृश्य असतो तसंच या घरातलं संजीवन अदृश्य असलं तरी जाणवणारं असतं. माझ्या मनातलं घर हे असं माझ्या मनासारखं आणि आम्ही सर्व त्या घरासारखे अतूट राहावेत, अशी इच्छा त्या विश्वदेवाच्या चरणी मी नित्यनेमाने प्रकट करीत असतो.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो