‘‘करिअरस्टि मी’’ : हिरव्या वाटा
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> ‘‘करिअरस्टि मी’’ : हिरव्या वाटा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘‘करिअरस्टि मी’’ : हिरव्या वाटा Bookmark and Share Print E-mail

मैत्रेयी जोशी ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अंजना देवस्थळी, आपल्या निसर्गप्रेमाला करिअरचं रूप देणाऱ्या. उद्यान विद्याशास्त्र अर्थात हॉर्टिकल्चरमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या, माळरानावर नंदनवन फुलविणाऱ्या आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पर्यावरणाचे धडे देणाऱ्या. करिअर म्हणून हिरवी वाट स्वीकारणाऱ्या अंजना ताई यांच्या करियरविषयी..
‘‘रविवारची सुट्टी आली की कधी एकदा सोमवार उजाडतोय आणि मी साइटवर जातीये असं मला होऊन जातं’’ असं सांगणाऱ्या अंजना देवस्थळी माझ्या माहितीतल्या एकमेव. मुंबईच्या विलक्षण गतिमान आणि धकाधकीच्या जीवनात ‘मंडे मॉर्निग ब्लूज’ झटकण्याचा प्रयत्न करीत कामाला जाणारा मुंबईकर- या चिरपरिचित प्रतिमेला तिच्या या उद्गारांनी कुठेतरी तडा जातो. अर्थात, अंजनाताईंच्या या उत्साहाचं कारणही तसंच आगळंवेगळं आहे. नर्सरीतल्या एखाद्या भुईतून वर आलेल्या अंकुराला पान फुटलं असेल का? शनिवारी पानांच्या आडून हळूच डोकावून पाहणाऱ्या एखाद्या लाजऱ्या कळीचं फुलात रूपांतर झालं असेल का? हे बघायची अपार उत्सुकता मनी दाटलेली असते. आज ‘उद्यान विद्याशास्त्र’ (हॉर्टिकल्चर) या क्षेत्रात इतकी वर्षे कार्यरत असूनही त्यांचा उत्साह उणावला नाहीये. कारण अर्थातच स्पष्ट आहे. त्या सतत ‘नित्यनूतन’ निसर्गाच्या सहवासात असतात. वृक्ष-वेली, पानं-फुलं यांच्याशी त्यांचा सतत संबंध येतो. (मी कायम बागेतच फिरत असते- इति अंजनाताई). आणि ही हिरवाई जपणं आणि तिचं संवर्धन करणं हा त्यांचा दिनक्रम असतो.
करिअरची ही हिरवी वाट त्यांनी निवडली ती याच सृष्टिमैत्रातून. बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर)मध्ये सुवर्णपदकाच्या मानकरी ठरलेल्या अंजनाताईंना एम.एस्सी. करण्यासाठी ''Indian Counsel for Agricultural Research'' या दिल्लीस्थित अत्यंत प्रतिष्ठित संस्थेतर्फे ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ मिळाली होती.
सध्या उद्यान विद्याशास्त्र सल्लागार म्हणून एका मोठय़ा बांधकाम कंपनीमध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांच्या या कामामध्ये लँडस्केप्स, अर्बन फॉरेस्ट, थीम-बेस्ड प्लँटेशन यांचा समावेश होतो. कामानिमित्त महिन्यातून तीन-चार वेळा बाहेरगावी जावं लागतं आणि त्या वेळी घरच्यांची ‘सपोर्ट सिस्टीम’ कामाला लागते असं त्या आवर्जून सांगतात. इथे मला खास सांगावंसं वाटतं की, अंजनाताईंचं एकत्र कुटुंब आहे- अगदी गुण्यागोविंदानं नांदणारं.’’
‘थीम-बेस्ड प्लँटेशन’चं उदाहरण देताना अंजनाताई सांगत होत्या, ‘‘शहापूरला आम्ही ‘नक्षत्रवन’ फुलवले असून, आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची लागवड केलीये. उदा. कांचनगल्ली नाव असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा आम्ही कांचनवृक्ष लावलेत.’’ याव्यतिरिक्त अंजनाताई ठाणे कॉलेजमधील अॅडव्हान्स्ड स्टडी सेंटरमध्ये ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर’ या कोर्समध्ये ‘फ्लॉरीकल्चर’ या विषयाच्या व्याख्यात्या आहेत.
‘पर्यावरण दक्षता मंच’शीसुद्धा त्या संलग्न असून मंचातर्फे ‘वृक्ष लागवडीचे तंत्र’ या विषयावर त्यांची मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित झाली आहे. तसेच घरातील बगीचा (नंदनवन स्पर्धा)चे परीक्षण, ‘आपलं पर्यावरण’ मासिकातून फुलांची ओळख करून देणारं ‘फुलवा’ हे सदर लेखन अशा विविध माध्यमांतून त्या आपल्याला ‘गो ग्रीन’चा जणू संदेशच देत असतात. ‘अर्बन फार्मिग’, ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘हॉर्टिकल्चर थेरपी’ अशा वैविध्यपूर्ण विषयांवर त्या कार्यशाळा घेत असतात. येऊर, ठाणे येथील जंगलात वर्षांतल्या सर्व ऋतूत नेचर ट्रेक्स आयोजित करून निसर्गाच्या पानगळ, बहर या चक्राची ओळखही करून देत असतात.
CSR- Corporate Social Responsibility हे क्षेत्र आज कॉर्पोरेट जगताचं एक अविभाज्य अंग बनलंय. ‘वृक्षांची लागवड आणि घनकचरा व्यवस्थापन’ या अंतर्गत अंजनाताई कॉर्पोरेट विश्वाला मदत करीत असतात. इतकंच नाही तर मुलांमध्येही पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्या प्रयत्न करतात. राहटोली, या बदलापूरजवळच्या एका खेडय़ात त्या महिन्यातून एकदा ‘ग्रीन टीचर’ म्हणून शिकवायला जातात. आजूबाजूच्या पाडय़ांवरची मुलं या नगरपालिकेच्या शाळेत शिकायला येतात. या मुलांचा उत्साह अगदी दांडगा असतो. रोल प्ले मेथड, चित्रपट, नाटकं, गाणी अशा विविध उपक्रमांतून ही मुलं आनंदाने पर्यावरणाचे धडे गिरवीत असतात. त्यांचा सहभाग लक्षणीय असतो. अंजनाताई सांगतात, ‘‘मी या मुलांना भूमीवरल्या ‘हिरव्या संस्कृती’चा परिचय करून देते’’, पण असं नमूद करतानाच शहरी मुलांचा प्रतिसाद मात्र इतका उत्साहवर्धक नसतो, असंही निरीक्षण नोंदवतात.
अंजनाताई सध्या हा ‘ग्रीन टीचर’चा एका वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत करताहेत. अहमदाबाद येथील सेंटर फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन या प्रसिद्ध संस्थेकडून हा कोर्स घेतला जातो. याशिवाय त्यांचा स्वत:चा ‘बोन्साय’चा मोठा संग्रह आहे. ‘बोन्साय’वरती त्यांनी कार्यशाळाही घेतल्या आहेत. आणि आय.टी.सी. (इंडियन टोबॅको कॉर्पो.)तर्फे त्यांच्या ‘बोन्साय’संबंधी केलेल्या कार्याला ‘विल्स ट्रॉफी फॉर एक्सलन्स’ मिळाली आहे.
खरंच, स्वत:चा असा छंद आपल्या चरितार्थाचे, करिअरचे साधन बनणं ही गोष्ट फारच थोडय़ा लोकांच्या वाटय़ाला येते. अंजनाताई अशा थोडय़ा भाग्यवंतांमध्ये आहेत. मात्र यामागे आपल्या आईवडिलांनी ८० च्या दशकात आपल्याला दिलेला पाठिंबा, आपल्याला मिळालेलं निर्णयस्वातंत्र्य या गोष्टींचा त्या कृतज्ञतेने उल्लेख करतात. त्या काळी (१९८० च्या दशकात) अॅग्रीकल्चर / हॉर्टिकल्चर या शाखांमध्ये मुली अभावानेच आढळायच्या. अशा काळात बालपणापासून झाडांच्या संगतीत वाढलेल्या अंजनाताईंनी बी.डी.एस.ला मिळत असलेला प्रवेश नाकारून हॉर्टिकल्चरमध्ये शिक्षण घेतलं, यात नवल ते काय?
आपल्या वडिलांची एक आठवण त्या सांगतात : ‘‘माझे बाबा एअरफोर्समध्ये होते. त्यामुळे बदल्या अनिवार्य. दर तीन वर्षांनी मुक्काम हलवायची वेळ आली की, घरातले ‘हरित सभासद’ आम्हां मुलांच्या आधी गाडीत जाऊन बसत. कुणीतरी यावरून त्यांना छेडलं तेव्हा बाबा म्हणाले, ‘एक वेळ मी माझ्या मुलांना विसरून जाईन इथेच, पण या कुंडीतल्या बाळांना कधीच विसरणार नाही.’ त्यांच्या या उद्गारांतून या भावंडांच्या करिअरची बीजं दडली असावीत. आपल्याबरोबर मुलांनाही ते रानावनात भटकंतीला न्यायचे. हरित सोयऱ्यांची ओळख करून द्यायचे. अंजनाताईंचं सृष्टीशी सख्य जुळलं ते तेव्हापासूनच. त्यामुळे ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे..’ हे नुसतं संदर्भापुरतं नाही राहिलं. संस्काराचाच तो एक भाग बनला. आणि अंजनाताई आपसूकच या रानवाटांकडे वळल्या. भटकंती, निसर्गवाचन हे त्यांचे छंदच बनले.’’
मजेची गोष्ट अशी की, अंजनाताई निसर्गप्रेमापायी हॉर्टिकल्चरकडे वळल्या तर त्यांच्या भावाने ‘पग मार्क’ नावाची संस्था पुण्यात काढली. बेट द्वारका, ताडोबाचं अभयारण्य इथपासून ते पार अंदमानपर्यंत ही संस्था मुलांना ट्रेकिंगला घेऊन जाते आणि उमलत्या पिढीवर सह-अधिवासाचे (को-हॅबिटॅट) संस्कार कळत-नकळत घडून येतात. पृथ्वी किंवा ही सृष्टी माणसाच्या मालकीची नाही तर पशू, पक्षी, कीटक, झाडे, वेली या सर्व सोबत्यांना एकत्र घेऊन माणसाने आनंदाने राहावे. नव्हे त्यातच त्याचे भले आहे, असा संदेश लहान मुलांच्या मनावर कोरला जातो. ही संस्था आज खूपच नावारूपाला आली असून, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी तिच्या शाखा आहेत.
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीनुसार या भावंडांच्या या आवडीचं रूपांतर व्यवसायात झालं ते कॉलेज जीवनातच. अंजनाताई आणि त्यांच्या भावाने ‘लँडस्केपर’ नावाची फर्म काढली. रिसॉर्ट्स, ऑफिस परिसर, हॉटेल्स, बंगले यांचे परिसर त्यांनी आपल्या सुंदर लँडस्केप्सने सजवले. इतक्या लहान वयात ग्राहकांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास त्यांच्या कर्तृत्वाविषयी बरेच काही सांगून जातो.
सुखद आठवणींचा खजिनाच अंजनाताईंजवळ आहे, पण एक विशेष आठवण त्या सांगतात, ‘‘एकदा आम्ही एका रूक्ष, उजाड माळरानावर गेलो होतो. तिथे सावलीलासुद्धा एकही झाड नव्हतं. आम्ही तिथे वृक्षारोपण केलं. तीन वर्षांनी तिथे गेल्यावर दिसलं, त्या वैराण भूमीचं घनदाट जंगलात रूपांतर झालं होतं. त्या जंगलातून फिरत असताना अवचित एका पक्ष्याची मधुर शीळ कानी आली आणि मी मोहरले. पक्षी, फुलपाखरे, कीटक तिथे नांदायला आले होते. ते नुसतंच भूमीचं सौंदर्यीकरण नव्हतं, तिथे आता पाखरं वस्तीला आली होती आणि या सृजनात आपला वाटा आहे, या जाणीवेनं मला एका दिव्य आनंदाची अनुभूती आली. त्या क्षणी ‘आनंदु परिमळे’ अशी अवस्था झाली माझी.’’ अंजनाताईंचा तो आनंद नुसत्या कल्पनेने मी लुटत होते.
करिअरच्या आरंभी मार्केटिंग बोर्डच्या उपविभागात ‘फ्लॉरिकल्चर डेव्हलपमेंट बोर्ड’मध्ये वर्षभर ट्रेनी मॅनेजर या पदावर असताना आपण निर्मिलेली आणि बहरलेली ती फूलशेती पाहणं हाही मोठा नवनवलनयनोत्सव असायचा. पॉली हाऊसमध्ये फुललेले ते गुलाब, ऑर्किड्स आणि कार्नेशन्स पाहून मनोमन
खात्री पटायची : ‘द अर्थ लाफ्स इन फ्लॉवर्स’.
अंजनाताईंच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सस्टेनेबल हॉर्टिकल्चरला महत्त्व असतं. म्हणजे असं की, त्या त्या गावच्या हवेला, मातीला अनुरूप अशा वृक्षांची लागवड त्या करतात. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवणे, फळझाडं लावणं, फुलशेती करणं या साऱ्या गोष्टींत सल्लागार म्हणून काम करताना त्या सांगतात, ‘‘मला जाणीव होत असते, निसर्ग आपल्याला किती भरभरून देत असतो! पक्ष्यांचं कूजन, पावसाची रिमझिम, झऱ्यांचं गाणं, वृक्षांची शीतल छाया, फुलांचे आकर्षक रंग-गंध हे सारं अनुभवत असताना मन विस्मित होत असतं. आपण लावलेल्या झाडांना फळे आली आणि त्या फूलसंभाराने झाडं वाकली की, ते फळ न चाखताच जिभेवर अवीट गोडी उतरते. आपणच फुलवलेल्या फुलशेतीतली ती हसरी, रंगीबेरंगी फुलं परिसरात आनंदाची उधळण करीत असतात आणि मग मनात येतं, सृष्टीचं हे वैभव आपण टिकवायलाच हवं. मी स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवत नाही, कारण पर्यावरणवादी म्हटलं की त्याच्याकडे बघितलं जातं ते विकासाच्या कामात अडथळा आणणारा माणूस, पण तसं मुळीच नाहीये. मी निसर्गप्रेमी आहे आणि पर्यावरण व विकास या दोहोंचा समतोल साधून प्रगती करणं अशक्य नाही, असं माझं मत आहे. पाहिजे फक्त इच्छाशक्ती.
उन्हांचा तडाखा सोसत, पावसाच्या धारा झेलत, मातीत हात घालून, चिखलात उभं राहून काम करणं ज्यांना मनापासून आवडतं अशा स्त्रिया-मुलींसाठी करिअरची ही ‘हिरवी वाट’ अगदी छान आहे. त्याच त्या मळलेल्या पायवाटेवरून चालण्यापेक्षा ही वेगळी वाट अंजनाताईंनी निवडली, कारण इथे त्या मनापासून रमतात. ‘‘इथे तुम्ही टप्प्याटप्प्यानी पुढे जाऊ शकता. फ्री-लान्सिंग, पार्टटाइम आणि मुलं मोठी झाली की पूर्णवेळ काम करू शकता. शिवाय इथे कसलीच जीवघेणी स्पर्धा नाही, हेवेदावे नाहीत, तणावपूर्ण डेडलाइन्स नाहीत. आहे तो फक्त निर्मळ आनंद. सृजनाचा आनंद. सृष्टिदेवतेचं लोपत चाललेलं हरितवैभव तिला परत मिळवून देण्याचा आनंद.
जिथे गवताचं पातंही उगवत नव्हतं, अशा भूमीवर रोपं डोलू लागली, सृष्टी सौंदर्यशालिनी झाली; की त्या प्रसन्न हिरवाईने नेत्र निवतात. प्रगाढ शांती अनुभवाला येते आणि आपण घेतलेल्या कष्टांचं सार्थक झालंसं वाटतं.’’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो