स्त्री समर्थ : आक्का
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : आक्का
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : आक्का Bookmark and Share Print E-mail

वृषाली मगदूम ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

विमलआक्का अर्थात विमल इंगळे. दारूडय़ा नवऱ्याने संसाराचा विचका केला. कचरा वेचत दिवस ढकलणाऱ्या विमलआक्का आज ‘काटेवाला’होऊन कचरावेचकांना ‘सावकारी’तून मुक्त करत आहेत. वस्तीतल्या माणसांसाठी धडपडणाऱ्या, प्रसंगी दबदबा निर्माण करणाऱ्या या समर्थ स्त्रीविषयी-
क चरावेचक ते ‘काटेवाला’ हा विमलआक्काचा प्रवास त्यांच्यातील नेतृत्वगुण, धडाडी, जिद्द, चिकाटी, भगिनीभाव अन् भल्यासाठी ‘दादागिरी’ याचं प्रत्यय देणारा आहे. बाई ‘काटेवाला’ झाल्याचं ऐकिवात नाही. विमलआक्कानी ‘काटेवाला’ होऊन कचरावेचक बायांची त्या सावकारीतून सुटका केली. काटेवाला  हा व्यक्ती बाईचा किती कचरामाल उचलला, त्याचे किती पैसे झाले, त्याचा कधीच हिशोब देत नाही. बायांशी भांडणे, दादागिरी करणे हे नेहमीच चालते. त्यामुळेच विमलआक्कानी स्वत:च काटेवाला व्हायचं ठरविलं. लाखो रुपयांतल्या उलाढालीचं आव्हान समर्थपणे पेललं. अन् आज वस्तीतल्या व बाहेरच्या बायकांना विमलआक्का आधार वाटतात. (काटेवाला म्हणजे कचरावेचक बाईचा कचरा दोन रुपये किलोनं विकत घेऊन दहा रुपये किलोनं विकणारा शोषणकर्ता, सावकारच होय. कचरावेचक बाईच्या कष्टावर तो गब्बर होतो. पण तरीही तिला उपकाराखाली दबवतो. कारण या बाया अडीनडीला काटेवाल्याकडूनच आगाऊ पैसे उचलतात. )
विमल इंगळे अकोला जिल्ह्य़ातील खरप गावच्या. आई शेतमजूर. वडिलांनी कधीच काम केले नाही. विमल घरात सगळ्यात मोठी. तिच्यानंतर नऊ बहिणी व दोन भाऊ. वयाच्या अकराव्या वर्षी खरप गावातच रंगाऱ्याचं काम करणाऱ्या दारूडय़ाशी आईनं लग्न लावून दिलं. नवरा संशयी होता. सकाळी नऊला घराला बाहेरून कुलूप लावून विमलला आत कोंडून जायचा ते संध्याकाळी दारू पिऊन येऊन मगच दार उघडायचा. सासूला विमलचं फार प्रेम होतं. पण सासऱ्यांपुढे काही चालायचं नाही. मग सासू हळूच संडासच्या बहाण्यानं संडासच्या तांब्यातच कालवण आणि नऊवारी साडीच्या घोळात भाकरी लपवून  बुटक्या कौलारू घराचं कौल काढून आत विमलकडे  सरकवायची. असे विमलचे दिवस सुरु होते, पुढे तिला मुलगी झाली. मुलगी सव्वा महिन्याची असताना दारूला पैसे हवेत म्हणून नवरा नसबंदी शिबिरात जाऊन शस्त्रक्रिया करून आला व दुसऱ्या दिवशी विमलनाही आता तूही शस्त्रक्रिया केली पाहिजे म्हणून जबरदस्ती केली. नसबंदी शिबिरात ५१२ रुपये मिळाल्यानंतर विमलला तिथेच टाकून त्याने पोबारा केला. रात्री बारा वाजता शिबिरात एकटय़ाच बेडवर पडलेल्या विमलआक्कांना डॉक्टरांनी जीपमधून गावात आणून सोडले तेव्हा नवरा दारूच्या गुत्त्यावर मुलीला घेऊन दारू पीत बसला होता.
पुढे अंगावरच्या कपडय़ानिशी नवरा त्यांना भांडुपला घेऊन आला. तिथेही तो किडूकमिडूक कामच करायचा. दारू पिऊन मारझोड रोजचीच होती. एकदा तर इतके बेदम मारले की, डावा हातच मोडला. आठ-आठ दिवस घरातून गायब व्हायचा. भांडुपला जमेना म्हणून घाटकोपरच्या झोपडपट्टीत घेऊन आला. तिथून एक दिवस भांडून मुलीला घेऊन गायबच झाला. हातात पाच पैसे नाहीत, पोटात भुकेचा डोंब उसळलेला. मुलीवाचून सैरभैर झालेल्या विमल विनातिकीट गावी आल्या. पण मुलगी व नवरा सापडले नाहीत. मुंबईतच असेल म्हणून परत मुंबईत आल्या. फिरत फिरत तुर्भे नाक्याला आल्या. गटार साफ करायचे काम करून दहा रुपये मिळाले. अक्षरश: हाताची सालटी निघाली. आठ आण्याचं पीठ, दहा पैशाचं गोडेतेल व चार आण्याची भाजी आणली. एका बाईच्या झोपडीबाहेर उभी राहून इथं राहू का विचारलं. त्यावर ५० रुपये भाडं द्यावं लागेल, असं तिनं सांगितलं. कशी तरी ती रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी तुर्भे नाक्यावर बायका कचरा वेचत होत्या. विमलनी एक गोणी घेतली व कचरा वेचू लागल्या. मुलीची आठवण यायची. दुधाची कणकण यायची. मग दिवसभर विमलआक्का भिरभिर फिरायच्या. मग कामात लक्ष केंद्रित केलं. दिवसाला १० वरून ५०, ५०वरून १०० रुपये कमाई होऊ लागली. तुर्भेच्या झोपडपट्टीला आग लागली. मग त्या वाशी सेक्टर दहाच्या मैदानात असलेल्या झोपडपट्टीत आल्या. छोटंसं झोपडं बांधलं. सिडकोनं झोपडय़ा पाडल्या. मग पेट्रोलपंपाजवळ सेक्टर १७ ला आल्या. मग सारस्वत बँकेजवळ नंतर सेंटर वनजवळील झोपडपट्टीत असं करत करत आज जुहू गावात चांगल्या सोसायटीत स्वत:चं घर त्यांनी घेतलंय. प्रचंड कष्टाचा हा प्रवास होता..
आजही विमलआक्कांचा दिवस पहाटे तीनला सुरू होतो. सेक्टर १० ते सेक्टर १७ वाशी या भागातल्या पेपर विक्रेत्यांची रद्दी त्या ५ रुपये किलोनं विकत घेतात व ८ रुपयांनी विकतात. या भागात आता त्यांचीच मक्तेदारी चालते. इतर कोणी शिरकाव करू शकत नाही. काही पेपर विक्रेते तर त्यांना ही रद्दी फुकट देऊन टाकतात. सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारत त्यांचा दिवस सलोख्यात सुरू होतो. आठ वाजता त्या घरी येतात व त्यांचा ‘काटा’ सुरू होतो. प्लॅस्टिक, फुगा, पुठ्ठे, बाटल्या, भंगार असा सर्व कचरा त्या विकत घेतात. नगद पैसा देतात. हा सारा कचरा वस्तीत एका जागी जमा होतो. त्याची प्रतवारी केली जाते. आठवडय़ातून एकदा मानखुर्द, बैंगनवाडी, तुर्भे या तीन ठिकाणी हा माल टेम्पोनं जातो. माल घेताना त्या छोटय़ा काटय़ावर वजन करतात. पण विकताना मोठय़ा काटय़ावर माल जातो. म्हणजे अख्खा टेम्पोमधील माल काटय़ावर चढतो.
ही ६५ घरांची वस्ती आहे. अख्ख्या वस्तीचा माल विमलआक्का घेतात. पण बाहेरूनही काही कचरावेचक विमलआक्कांकडे माल टाकतात. संपूर्ण वस्तीचं नेतृत्व विमलआक्का करतात. दहा वर्षांपूर्वी ‘स्त्री मुक्ती संघटने’नं वस्तीचं सव्‍‌र्हेक्षण केलं. महिलांचे बचत गट केले. वस्तीला रेशनकार्ड मिळवून दिले. वस्तीत बालवाडी, महात्मा फुले वर्ग सुरू केले. मुलांना महापालिकेच्या शाळेत टाकले. या साऱ्यात विमलआक्कांचा पुढाकार होता. आजही असतो. त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून संघटनेनं त्यांना ‘परिसर सखी विकास संघ फेडरेशन’चे अध्यक्ष केले. विमलआक्का दिल्लीला रेशनिंग परिषदेला जाऊन मोर्चात सहभागी झाल्या. पुण्याला स्वच्छ संस्थेनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भाषण ठोकले. कोल्हापूरला स्नेहजा रूपवतेनं आयोजित महिला साहित्य संमेलनात साहित्यिक मंचावर अनुभवकथन करून त्या संमेलनाच्या ‘हीरो’ बनल्या. कोकण मराठी साहित्य परिषदेचं संमेलनही त्यांनी असेच ‘हलवून’ सोडले.
हे सगळं एकीकडे सुरु होतंच, पण मुलीची आठवण गप्प बसू देत नव्हती. मुलीच्या शोधात विमलआक्का गावी गेल्या की, नवरा पळून जायचा. मुलगी पाच वर्षांची असताना नवऱ्यानं मुलीला विमलआक्कांकडून पाचशे रुपये घेऊन एक दिवसासाठी दिले. मुलगी १२ वर्षांची झाल्यानंतर सासूनंच मुलीला विमलआक्कांकडे आणून सोडलं. त्यानंतर विमलआक्कांनी तिला चौथीपर्यंत शिकवलं. मुलीसाठी बीडचं स्थळ आलं. मुलगा बैंगनवाडीला राहात होता. नवऱ्याच्या भीतीनं गडबडीनं लग्न केलं. मुलगा पायानं अधू आहे. त्याला टी.बी. आहे, हे लग्नानंतर कळलं. मुलीला सासरी त्रासही होता. विमलआक्कांनी फारकत घेऊन मुलीला घरी आणले. नणंदेचा मुलगा वसतिगृहात राहून इंजिनीअर झाला होता. हा मुलगा आक्काच्या मुलीशी लग्न करायला तयार झाला. विमलआक्कांना जावयाचा फार अभिमान आहे. तोही त्यांना मानतो. अंगठेबहाद्दर विमलआक्कांची नात इंग्रजी शाळेत सातवीत शिकत आहे..
विमलआक्कांचा ‘काटय़ा’चा उद्योग तेजीत आहे. लाखो रुपये कमावतात व तेवढेच ‘उडवूनही’ टाकतात. वस्तीच्या व आता साऱ्यांच्याच त्या आक्का आहेत. विमलआक्का आल्याशिवाय बायका मीटिंगला येत नाहीत. वस्तीवर त्यांचा दबदबा आहे. तीन वर्षांच्या आई-वडील नसलेल्या हमीदाला त्यांनी मुलीसारखे वाढवले. शंकर नावाच्या मुलानं वस्तीत येऊन हमीदाला फसविलं व पळून गेला. तिथे जाऊन त्याला पकडून आणून पोलीस केस करून त्यांचे लग्न करून दिले. दुसरी भ्रमिष्ट सरिता पाच दिवसांच्या पोराला घेऊन वस्तीत आली. विमलआक्कांनी तिला आश्रय दिला. ठाण्याला मनोरुग्णालयात ठेवले. आता ती बरी आहे.
वस्तीतलं लग्न लावणं हे तर नेहमीचंच आहे. बस्ता, मंगळसूत्र, भांडी असा दहा हजापर्यंत त्या स्वत: खर्च करतात. बेबी खान, रंजना अशा अनेक जणींची लग्नं लावून दिली आहेत. वस्तीत कोणी वारलं की, पुढाकार यांचाच असतो. बाळंतपणाला मुलगी अडली की हॉस्पिटलात सर्वात पुढे आवाज चढवून मुलीला दाखल करून घ्यायला त्या लावणारच.
स्वत:च्या पैशानं महिलांच्या पॉलिसी काढतात. याच वस्तीत त्यांनी साखर, साबण, चहाचं दुकान टाकलं. ‘काटा’ लावत लावत हेही काम चालू असते. वस्तीत दारू, जुगार, पत्ते चालू नयेत म्हणून सतत लोकांना सांगत असतात. काही वेळा त्यांच्या दंडुक्याचा प्रसादही लोकांना बसतो.
एकदा निवडणुकीच्या काळात विमलआक्कांचे मत ज्याला, त्यालाच पुरी वस्ती मत देणार हे माहीत असलेल्या उमेदवारानं त्यांना पळवून दिवसभर कोंडून ठेवले. विमलआक्कांच्या शोधात पुरी वस्ती बाहेर पडली. यातून भांडणं व मारामारीही झाली. विमलआक्कांच्या पुढाकारानं वस्तीत गणपती बसतो. झेंडावंदनही होते. विमलआक्का हे साऱ्यांच्या भल्यासाठीच करतात. यावर विश्वास असलेली वस्ती त्यांना मानते.
वस्ती सुधारली पाहिजे. व्यसनं कमी झाली पाहिजेत. मुली शिकल्या पाहिजेत. झोपडपट्टीतील असुरक्षितता, बेभरवशाचं जगणं संपून प्रत्येकीला घर मिळालं पाहिजे, हे विमलआक्कांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण होताना त्या पहात आहेत ..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो