अनघड अवघड : मूल्य अमूल्य..
मुखपृष्ठ >> अनघड.. अवघड >> अनघड अवघड : मूल्य अमूल्य..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अनघड अवघड : मूल्य अमूल्य.. Bookmark and Share Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी , शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

पालकांच्या मागच्या काही पिढय़ा थोडय़ा गोंधळलेल्या, त्रस्त दिसतात. त्यांनी अंगीकारलेली मूल्यव्यवस्था आणि पुढच्या पिढय़ांना मान्य असणारी मूल्यव्यवस्था यात त्यांना खूप तफावत दिसत असते. यात आर्थिक, सामाजिक पैलू तर आहेतच, पण लैंगिकतेविषयीचेही काही पैलू यात ठसठशीतपणे पुढे येताहेत. अशा वेळी पालक म्हणून आपण नेमकी काय मूल्यं मानतो आहोत आणि मुलांपर्यंत काय पोहोचवतो आहोत, हे एकदा तपासून पाहणं खूप आवश्यक ठरतं.
प्रत्येक आईबाबा त्यांच्या दृष्टीने योग्य ते संस्कार आणि मूल्यव्यवस्था, मुलांच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे नेहमीच प्रयत्न करत असतात. हे पिढय़ान्पिढय़ा चालत आलेलं आहे. यातून समाज म्हणून बऱ्या-वाईटाबद्दल आपली सगळ्यांची एक बैठक तयार होत असते. पिढीगणिक काही नव्या गोष्टी पुढे येतात, जुन्या मागे पडतात. हे कायमच होत आलं आहे. भौगोलिक आणि जातिव्यवस्थेतली दरी कमी होणं, व्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना, स्त्रियांचं शिक्षण, त्यांनी अर्थार्जन करणं- गेल्या अध्र्या शतकात ठळकपणे समोर आलेले हे काही सामाजिक बदल मुलांपर्यंत पोहोचणाऱ्या मूल्यव्यवस्थेत या बदलांचं प्रतिबिंब स्वाभाविकपणे उमटत असतं.
पालकांच्या मागच्या काही पिढय़ा मात्र याबाबत थोडय़ा गोंधळलेल्या त्रस्त दिसतात. त्यांनी अंगीकारलेली मूल्यव्यवस्था आणि पुढच्या पिढय़ांना मान्य असणारी मूल्यव्यवस्था यात त्यांना खूप तफावत दिसत असते. यात आर्थिक, सामाजिक पैलू तर आहेतच, पण लैंगिकतेविषयीचेही काही पैलू यात ठसठशीतपणे पुढे येताहेत. अशा वेळी पालक म्हणून आपण नेमकी काय मूल्यं मानतो आहोत आणि मुलांपर्यंत काय पोहोचवतो आहोत, हे एकदा तपासून पाहणं खूप आवश्यक ठरतं. वरकरणी अगदी साधे वाटणारे प्रसंग याबाबत खूप बोलके ठरू शकतात.
अक्षय आणि रोहन दोघंही नववीत आहेत. रोहनची चण थोडी लहानखुरी आहे. वर्गातल्या बाकी मुलांच्या चेहऱ्यावर लव येऊ लागली आहे आणि त्यांचे आवाजही बदलले आहेत, पण ही लक्षणं रोहनमध्ये अजून दिसत नाहीत. त्यामुळे वर्गात वादावादीचे प्रसंग आले, की रोहनचा उल्लेख हमखास ‘बायल्या’ असा होतो. अक्षय आईला रोहनबद्दल काही तरी सांगतानाही त्याचा उल्लेख ‘तो बायल्या रोहन’ असाच करतो.
अशा वेळी आईच्या वेगवेगळ्या काय प्रतिक्रिया असू शकतात?
* तीही त्या बायल्या शब्दाला हसते
* आईला तो शब्द खटकतो, पण त्यावर काय आणि कसं बोलायचं हे सुचत नाही म्हणून ती गप्प राहते.
* ‘असं बोलायचं नाही’, म्हणून ती अक्षयला समजावून सांगू पाहते.
* ‘मला हे खटकतं आहे’, असं ती अक्षयला सांगते.
* ‘मित्र त्याला चिडवतात तेव्हा काय वाटत असेल रे रोहनला?’ असं ती अक्षयला विचारते.
इथे स्त्री-पुरुषांची विशिष्ट लिंगभूमिका (जेण्डर रोल) अक्षय गृहीत धरतो आहे. स्त्रीने अमुकच प्रकारे आणि पुरुषाने तमुकच प्रकारे असलं पाहिजे, असा एक ठाम भाव त्यामागे आहेच, पण पौगंडावस्थेची लक्षणं बाह्य़त: अद्याप दिसत नाहीत, म्हणजे तो ‘बायल्या’, असं त्याचं एक सरधोपट, झापडबंद मत तयार झालं आहे. आज आई अक्षयबरोबर ‘बायल्या’ या शब्दाला हसते, तेव्हा ती अप्रत्यक्षपणे ही भूमिका उचलून धरत असते. ‘रडतोस काय मुलीसारखा?’ असं मुलाला म्हटलं जातं, तेव्हाही हीच भूमिका मुलामध्ये रुजवली जात असते.
दुसऱ्या पर्यायात अवघडलेपणामुळे आई काही बोलत नाही. त्यामुळे त्यात काही खटकण्यासारखं आहे, हे अक्षयपर्यंत पोहोचतच नाही. प्रत्येकासाठी वाढीचा वेग वेगळा असू शकतो, त्यामुळे त्यांचं दिसणं वेगवेगळं असू शकतं आणि हे असं वेगवेगळं दिसणं नॉर्मल आहे, याचं नीटसं भान नसल्यामुळे अक्षयच्याही पौरुषत्वाच्या आणि स्त्रीत्वाच्या अयोग्य कल्पना बनताहेत. भविष्यातल्या त्याच्या निकोप वाढीसाठी त्यांचं निराकरण होणंही फार गरजेचं आहे. आपण प्रौढ माणसं मुलांशी अशा विषयावर बोलायला टाळतो तेव्हा बऱ्याचदा मुलांचा ‘तथाकथित ज्ञानाचा’ उगम त्यांच्यापेक्षा वयाने आगेमागे असणारी आणि त्यांच्या इतकीच गोंधळलेली मुलं हा असू शकतो. हे फार गंभीर आहे. आज टीनएजर्सच्या अनेक पिढय़ांनी काही विचित्र अवाजवी कल्पनांचा ताण सोसला आहे. याचं खास उदाहरण म्हणजे मुलांच्या लिंगाचा आकार, त्याच्याशी संबंधित पौरुषत्वाच्या अनाठायी कल्पना.
अवघड विषय टाळणं, त्यांना बगल देणं, यातून मुलांपर्यंत काय पोहोचतं? अनेकदा मुलांना त्रस्त करणाऱ्या, पोखरणाऱ्या विषयांवर मुलं आईबाबांकडे बोलतच नाहीत असं दिसतं. अशा वेळी पालक बोलून जातात, ‘‘अरे आम्हाला नाही का सांगायचं त्याने!’’ कठीण विषयावर बोलण्याचाही एक संस्कार घरात असावा लागतो. तो मुलांना लहानपणापासून दिसावा लागतो. दुर्दैवाने आता टीनएजर मुलांचे आईबाबा असलेल्या पिढीवर असे संस्कार झाल्याचे चित्र दुर्मिळ. त्यामुळे आईबाबांच्या सध्याच्या पिढीला त्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात.
तिसऱ्या पर्यायात ‘असं बोलायचं नाही’, असं आई मुलाला सांगते तेव्हा मुळात तिला हे खटकलेलं असतंच. पण असं बोलायचं नाही, यातून आईला नेमकं काय म्हणायचं आहे, हे रोहनला कळणं फार आवश्यक आहे. ते जर स्पष्ट झालं नाही तर रोहनच्या मनात काय येऊ शकतं? ‘बाकीची मुलं बोलतातच की हे, मग त्यांना का नाही त्यांचे आईबाबा ओरडत? मलाच ओरडतात.’ किंवा ‘काही बोललं की झालं आईचं लेक्चर सुरू!’ मुळात कोणत्याही मुद्दय़ाचं सरसकटीकरण (जनरलायझेशन) केलं, की या वयातल्या मुलांना त्यात लेक्चरिंगचा वास येतो आणि त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टीची परिणामकारकता कमी होते.
‘मला हे खटकतं आहे’, असं आईने स्पष्ट आणि नेमकेपणाने सांगितल्यावर मुलापर्यंत थेट पोहोचतं. टीनएजर्सच्या वाढत्या वयात त्यांच्या मेंदूत सतत प्रचंड घडामोडी होत असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर बोलताना त्यांना समजलं असेल किंवा त्यांनी समजून घेतलं असेल, असं दर वेळी गृहीत धरता येत नाही. म्हणून हा नेमकेपणा आवश्यक असतो आणि त्यापुढे जाऊन त्याबद्दलची योग्य ती माहिती देणं ही सुकर होतं.
‘मित्र चिडवतात तेव्हा काय वाटत असेल रे रोहनला?’ असं आई विचारते तेव्हा संवादाची याच्या पुढची आणि जास्त सशक्त पायरी आई गाठते आहे. यात मुलाला बोलायला, आपलं मत मांडायला वाव आहे. यातून ती मुलाला दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार करायलाही प्रोत्साहन देते आहे. यात मुलगा काही सुसूत्र उत्तर देईलच असं नाही, कदाचित पूर्ण गप्पच बसेल, पण त्यातून संवादाची दारं उघडली जाताहेत. हे बोलणं मग व्याख्यान किंवा केवळ समजावणं राहत नाही. थोडं वेगळं असणं किंवा दिसणं, ही नॉर्मल गोष्ट आहे, ही अतिशय महत्त्वाची माहिती त्यातून उलगडत जाऊ शकते आणि तीही अक्षयच्या गतीने आणि त्याच्या सहभागातून.
हाच प्रकार शिव्यांच्या बाबतीत होतो. पिढय़ान्पिढय़ा आपल्याकडे शिव्या रुजल्या आहेत. पराकोटीचा संताप आणि त्यातून आपण दुसरं काहीच करू शकत नाही, अशी वाटणारी असहाय्य भावना शिव्यांच्या मुळाशी असते. टीनएजर्सची मन:स्थिती बऱ्याचदा अशा प्रकारची असते आणि त्यांच्या बंडखोर जगात शिव्यांना एक पीअर प्रेशरचा पैलूही असतो. त्यामुळे टीनएजर्स मुलांच्या जगात शिव्यांना खास वलय असतं.
मुलांच्या तोंडून शिव्या ऐकल्या की, आईबाबा बहुतेक वेळा हादरतात. ‘आपल्या घरात शिव्या चालणार नाहीत’, असं मुलांना ठणकावलं जातं किंवा ‘असे शब्द तू बोलूच कसा शकतोस?’ असं प्रचंड अस्वस्थ होऊन विचारतात. आधीच्या प्रसंगात आपण पाहिले तशाच धर्तीवर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचे पर्याय इथेही शक्य असतात. इथेही शिव्यांबाबतची तीव्र नापसंती स्पष्टपणे सांगायला हवी. त्याबद्दल नेमकं काय खटकतं तेही सांगावं. एखाद्याने दुसऱ्याला शिव्या दिल्याचा किस्सा मुलाने सांगितला, तर मग ही चांगली संधी असते, ऐकणाऱ्याला काय वाटलं असेल विचारून संवादाची दारं उघडण्याची.
शिव्यांबाबत त्यांचे शब्दश: अर्थ अनेकांना माहीत नसतात. काही तरी बरंच वाईट किंवा अपमानास्पद असं ते असावं अशा अनेकांचा कयास असतो. बहुतांश शिव्यांमधले गर्भित अर्थ लैंगिकतेशी संबंधित आहेत. समोरच्याचा सणसणीत पाणउतारा करण्यासाठी वापरले जावेत इतके तीव्र आहेत. मुलांना याची जाणीव होणं फार महत्त्वाचं आहे. खरोखरच त्यांना असं म्हणायचं आहे का, याचा त्यांचा त्यांना विचार करायला लावणं शिव्यांच्या संदर्भात फार जरुरीचं ठरतं. केवळ शिव्या देऊ नकोस असं सांगितल्याने शिव्या देणं थांबत नाही.
एकाच प्रसंगावरच्या या (आणि अशा अनेक) प्रतिक्रिया वेगवेगळी मूल्य अधोरेखित करतात. त्यातून परिस्थितीला तोंड द्यायचे वेगवेगळे संस्कार मुलांवर होत राहतात. आपल्या मुलावर त्यातले कोणते संस्कार होणार आहेत, हे आपल्या कृतीतून ठरत असतं.
मूल्यव्यवस्थेबाबत हा पैलू लक्षातच आला नव्हता, असं प्रांजळपणे सांगणारे आणि लक्षात आल्यावर त्या दृष्टीने आपल्या वागण्यात बदल करणारे, करू पाहणारे अनेक आईबाबा गेल्या काही वर्षांमध्ये मला भेटले आहेत.
एका बाबांनी त्यांचा अनुभव सांगितला, ‘‘अहो फार वजन आलं होतं मला मुलाशी असल्या विषयावर बोलायचं, पण धीर केला आणि जमलं. नंतर एकदा आम्ही आईस्क्रीम खायला गेलो असताना पुन्हा त्या विषयाचा संदर्भ आला, तेव्हा सहज म्हणून गेलो, ‘‘अरे काय टेन्शन आलं होतं मला तुझ्याशी बोलण्याचं! माहीत नाही नीट जमलं का!’’
मुलगा आईस्क्रीम खाता खाता थांबला आणि म्हणाला, ‘‘यू डिड वेल बाबा!’’
बोलताना बाबांचा सूर ओला, हळवा झाला होता.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो