माझी ‘पहाडा’सारखी लेक
मुखपृष्ठ >> लेख >> माझी ‘पहाडा’सारखी लेक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

माझी ‘पहाडा’सारखी लेक Bookmark and Share Print E-mail

इंदुमती सिनकर ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

निवृत्तीनंतर आमचं २१/२२ वर्षांचं आयुष्य पुण्याजवळील तळेगावसारख्या शांत, थंड ठिकाणी अगदी सुखासमाधानात गेलं. नंतर वयोपरत्वे बंगल्याची उस्तवार होईना आणि मुलंही या वयात एकटं राहू नका म्हणून मागे लागल्यामुळे ते टुमदार घर विकलं खरं, पण तळेगावची नाळ काही तुटता तुटेना. शेवटी त्याच परिसरात एक छोटासा ब्लॉक म्हणजेच हक्काची मठी घेतली तेव्हा कुठं जीव शांत झाला.
मुंबईला मुलाकडे सर्व सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या, पण तळेगावची, जीव लावणाऱ्या तिथल्या शेजाऱ्यांची सारखी आठवण येई. आम्हा दोघांचं वय तसं जास्त होतं (८२ व ९१) तरी प्रकृती उत्तम असल्यामुळे मधून-मधून तिकडं जाऊन राहायचं आम्ही ठरवून टाकलं. गेल्या गेल्या घरातलं सगळं काम पोळ्यांसकट करील, अशा शोधात असताना, माझ्या भावासमान असणारे चंदूकाका म्हणाले, ‘काही काळजी करू नका. आमची सरीता करील तुमचं काम.’
थोडय़ा वेळाने ती आली आणि मी हबकलेच. ६ फूट उंची, चेहऱ्याची पुरुषी ठेवण, राकट हात, घोगरा आवाज.. मन आधी नको म्हणालं, पण मला बाईची आत्यंतिक गरज होती. थोडा विचार केला.. ती काय आपल्याकडे राहणार आहे थोडीच? येणार आणि काम करून जाणार आणि जर अशी एखादी व्यक्ती कष्ट करून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपणही नको का हात पुढे करायला? या विचाराने सरशी केली आणि त्या दिवसापासून सरीता व तिची आई दोघी माझ्याकडे कामाला येऊ लागल्या. पण तिच्याशी माझे खरे बंध जुळले ते मी दुसऱ्या खेपेस तळेगावला आले तेव्हा..
त्या वेळी आम्ही दोघांनीच तिकडं जाणं हे एक धाडसच होतं. नव्वदी ओलांडलेले माझे यजमान जिवावरच्या दुखण्यातून, अक्षरश: वरती हात लावून नुकतेच परतले होते. त्यांनाही हवाबदल आवश्यक होता, म्हणून ८/१५ दिवसांसाठी आम्ही तळेगावला जायचं ठरवलं आणि सरीताला तसा फोन केला. त्या वेळी ती जर नसती तर आम्हाला आल्या पावली परत फिरावं लागलं असतं. परिस्थितीच तशी होती..
आम्ही येण्याच्या आदल्या दिवशी तिने साफसफाईसाठी दार उघडलं तेव्हा उंदरांच्या सेनेने ड्रेनेज पाइपमधून आत शिरून घरात अक्षरश: हैदोस मांडला होता. शेल्फवरची खोबरेल तेलाची मोठी बाटली कुरतडून खाली ढकलून दिली होती. पाठोपाठ डब्याची रांग घरंगळल्याने फरशीवर वाहणाऱ्या तेलात डाळी, तांदूळ, कडधान्यं सुखेनैव पोहत होती. गाद्यांची कव्हरं फाडून, कापूस पिंजल्याने कापसाच्या म्हाताऱ्यांनी घरभर फेर धरला होता. जागोजागी शिंतडलेल्या लेंडय़ांनी तर पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती आणि कहर म्हणजे त्या मूषकराजांनी (की राण्यांनी) आमच्या टी.व्ही.ची बाळंतिणीची खोली बनवल्याने आत खेळणाऱ्या त्यांच्या युवराजांनी सर्व वायर्सची चक्क खेळणी बनवून टाकली होती. दार उघडताना जर मी तिथं असते तर मला तिथल्या तिथं हार्ट अ‍ॅटॅक आला असता, पण या मुलीने आईला बरोबर घेऊन तीन-चार तास खपून सगळं निस्तरलं. घर स्वच्छ धुवून काढलं. मी आल्यावर टी.व्ही.सुद्धा डोक्यावरून नेऊन दुरुस्तीला टाकला. खरंच ती नसती तर त्या दिवशी माझं काय झालं असतं? त्या दिवसापासून ती माझी लेक झाली.
ही माझी मुलगी आता माझ्याकडे येताना कधी अळुवडी लावून आणते तर कधी शिरा-पोहे, इडली-सांबार यांपैकी काही ना काही घेऊन येते. नको म्हटलं तर तिच्या डोळ्यात पाणी येतं. माझ्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर त्यासाठी मी तिला दुपारी १२ वाजता किंवा रात्री ८ ला गरम चपात्या-भाकऱ्या करायला बोलवलं तरी आनंदाने येणार. कोणतंही काम सांगा, कपाळावर कधीही आठी नाही. माझी पतवंडं आली की, हळूच त्यांच्या हातावर एखादा बिस्किटचा पुडा नाही तर गोळ्यांचं पाकीट ठेवणार म्हणजे ठेवणार.
माझे पैसे वाचले पाहिजेत याकडे तिचा कटाक्ष. त्यासाठी बाजारातून जिन्नस आणताना, दोन-चार दुकानं धुंडाळून जिथं कुठं स्वस्त मिळतं तिथूनच आणणार. कधी दिलेल्या पैशापेक्षा दोन-चार रुपये जास्त पडले तर सांगणार नाही. खोदून विचारलं तर म्हणेल, ‘आईकडे कधी हिशेब करतात होय?’
सरीता अतिशय कष्टाळू मुलगी आहे. सकाळी चहाबरोबर पोळी खाऊन या मायलेकी निघतात त्या आठ घरची कामं निपटून दुपारी ३ ला घरी जाईपर्यंत कोणाकडे चहासुद्धा घेत नाहीत. घरी जाऊन चार घास पोटात गेल्या गेल्या तिचं शिवणकाम सुरू होतं. ब्लाऊज शिवणं, साडय़ांना फॉल पिको करणं, गोधडय़ा शिवणे चालू. रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत तिचा हात चालू असतो आणि समोर टी.व्ही. म्हणूनच, ‘सुनीधी चौहान, ती आता जज्जच्या खुर्चीवर बसलीय ना, ती आता आतापर्यंत स्वत:च स्पर्धक होती’, असं माझं जनरल नॉलेजही ती मधून-मधून वाढवीत असते.
रात्रंदिवस कष्ट करून तिने फ्रिज, टी.व्ही., मिक्सर, शिवणाचं, पिकोचं मशीन. अशा अनेक वस्तू जमविल्या आहेत. ती जिथं काम करते तिथली माणसं बऱ्याचदा नवं काही घेताना जुनं हिला देऊन टाकतात. अशा वस्तू ती सरळ डोक्यावरून घरी घेऊन येते, अगदी कपाट, भरलेला गॅस सिलेंडरही. एकदा तिला असाच कुणी तरी दिलेला ‘रिलायन्सचा सिलेंडर’ मी खपवून दिला तर त्यातले १०० रुपये तुम्ही काही तरी मागवून खा म्हणून जबरदस्तीने माझ्या हातात ठेवून गेली.
स्वामी समर्थावर तिची प्रचंड श्रद्धा. दररोज आंघोळ झाल्यावर त्यांचं स्तवन वाचून पूजा केल्याशिवाय बाहेर पडायची नाही. दर गुरुपौर्णिमेला हिची अक्कलकोटची वारी ठरलेली. जाताना ५ किलो जिलबी घेऊन जाणार. स्वामींपाशी तिचं एकच मागणं.. ‘पापी विचारांपासून मला दूर ठेव.’
बोलता बोलता तिची जन्मतारीख कळली तेव्हा मी त्या दिवशी तिची ओटी भरली आणि औक्षणं केलं तेव्हा मात्र तिला भडभडून आलं. म्हणाली, एवढय़ा ४३ वर्षांच्या आयुष्यात एक आई सोडली तर माझ्यावर एवढं प्रेम कुणीही केलं नाही. जन्मदात्या बापानेही नाही. एकदा मी तिला जवळ बसवून बचतीचं महत्त्व समजावून सांगितलं आणि जवळच्या बँकेत तिचं खातंही उघडून दिलं. तेव्हा तर जणू स्वर्गाचं द्वार उघडल्यासारखा तिला आनंद झाला. बँकेत जायच्या दिवशी नवं लुगडं नेसून सर्व कागदपत्रं (पॅनकार्डसह) घेऊन ती बँक उघडायच्या आधीच तिथं हजर होती. तिने पैसे भरायचा/ काढायचा फॉर्म कसा भरतात तेही शिकून घेतलं. तशी ती ९ वीपर्यंत शिकलीय म्हणा. आता तिला एकच नाद लागलाय, ५०/१०० रुपये साठवायचे आणि बँकेत भरायचे. लवकरात लवकर १०,००० रु. साठवून त्याची ‘मुदत ठेव पावती’ घेण्याचं तिचं स्वप्न आहे.
या मुलीमुळे माझा तळेगावचा मुक्काम वाढलाय. रात्री १२ वाजता हाक मारलीत तरी धावत येईन, असं म्हणत ती आमच्यामागे पहाडासारखी उभी आहे. मागच्या जन्मी ती माझी कोणी होती का ते मला ठाऊक नाही, पण पुढच्या जन्मी माझ्या पोटी येण्याची तिची तीव्र इच्छा आहे आणि माझंही मन म्हणतंय ‘तथास्तु’..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो