मुंबई ते दुबई
मुखपृष्ठ >> लेख >> मुंबई ते दुबई
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई ते दुबई Bookmark and Share Print E-mail

 

शर्वरी जोशी ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt दुबई येथे भरविण्यात आलेल्या पहिल्या कन्झ्युमर शॉपी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी.

मराठी माणसाला उद्योग जमत नाही, असं म्हटलं गेलं. साहजिकच त्यातल्या मराठी स्त्रीचा विचारच कुणी केला नसेलच, पण आजची स्त्री उद्योग क्षेत्रात अगदी खाण्याच्या वस्तूंपासून यंत्राच्या उत्पादनांपर्यंत आपला ठसा उमटवत आहे. येत्या २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान दुबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ‘कन्झ्युमर शॉपी’ प्रदर्शन भरवीत आहे.  त्यानिमित्ताने मराठी उद्योगिनींचा हा प्रवास.. याशिवाय शिक्षणाच्या जोरावर दुबईतल्या उंच इमारती बांधणीत सहभाग असणाऱ्या आर्किटेक्ट आरती कोरगांवकर आणि धुळ्यामधल्या पार्लरनंतर थेट परदेशात स्पा उघडणाऱ्या रेखा चौधरी या उद्योगिनींच्या मुलाखती..


‘डेल वुमेन्स ग्लोबल आंत्रप्रनरशिप स्टडी’मध्ये अमेरिका, इंग्लंडआणि भारतातील ४५० उद्योजिनी महिलांचे अभ्यास व निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. भारतीय महिला आपल्या व्यवसायाची पुढील पाच वर्षांतील वृद्धी ९० टक्क्यांहून अधिक असावी, अशी अपेक्षा करतात. त्या मानाने इंग्लंड आणि अमेरिकेतील स्त्रिया अनुक्रमे २५ टक्के आणि ५० टक्के अशी सावकाश वृद्धीची अपेक्षा ठेवतात. बहुतेक भारतीय उद्योजिका महिलांना  त्यांच्या कुटुंबाकडून बरेच प्रोत्साहन मिळते. पुरुषांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात भारतीय स्त्रियांची भरारी कौतुकास्पद आहे, असेही एक निरीक्षण ‘डेल’ने नोंदवले आहे, पण तरीही जगभरातील इतर मोठय़ा देशांच्या मानाने भारतातील स्त्रियांची उद्योगविश्वातील टक्केवारी अगदीच सुमार आहे. अमेरिकेत एक चतुर्थाश, कॅनडात एकतृतीयांश, फ्रान्समध्ये एकपंचमांश आहे, पण भारतात अजून एक दशांश एवढेही प्रमाण गाठले गेले नाही. आता हे प्रमाण हळूहळू वाढत चाललेले दिसते आहे हे मात्र आशादायक चित्र आहे.
कुटुंबव्यवस्थेचा कणा असलेली भारतीय स्त्री उद्योजकतेमध्ये थोडी मागे पडताना दिसते त्याची अनेक कारणेही आहेत. अनेक महिला सुशिक्षित असूनही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे किंवा अन्य काही कारणामुळे अगदी तरुण वयात नोकरी करू शकत नाहीत. वय वाढत गेले की नंतर नोकरी मिळण्याची शक्यताच नसते, परंतु जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर त्यांनाही स्वत:ला काही तरी करावेसे वाटते, आपला स्वत:चा एखादा व्यवसाय असावा, स्वत:चे उत्पन्न असणे गरजेचे वाटते किंवा कित्येकदा केवळ स्वत:चे अस्तित्व जपावेसे व खुलवावेसे वाटते. नोकरी करणे हा पर्याय सर्वानाच शक्य होत नाही. मग ज्यात आपल्यातील कलागुण, आपले छंद, आवड याला वाव मिळेल असा एखादा व्यवसाय निवडण्यामागे त्यांचा कल असतो, पण उत्पादन सुरू केले तरी ते घेणार कोण, जाहिरात, विपणन यावरचा खर्च कसा झेपणार, असे अनेक प्रश्न पुढे असतात. व्यवसायासाठी लागणाऱ्या ओळखीपाळखी, कौशल्य प्रशिक्षण आदी बाबींसाठी त्यांना मदतीची गरज भासते.  अनेक स्त्रियांचा सामाजिक वावरही यथातथाच असल्याने या अडचणींची तीव्रता त्यांना अधिक प्रमाणात भासते.
मग अशा वेळी मीनल मोहाडीकरांची ‘कन्झ्युमर शॉपी’ त्यांच्यासाठी ‘वरदान’ बनून येते. छोटे उद्योग, महिला गृह उद्योग, बचत गट संस्थांमधून केले जाणारे व्यवसाय अशा सर्व प्रकारच्या व्यवसायांचे ‘प्रदर्शन’ भरवण्याची संकल्पनाच खरे तर त्यांनी प्रथम महाराष्ट्रात १९९० साली राबवली. महाराष्ट्राबरोबरच आता परदेशातही या स्त्रिया पाऊल टाकत आहेत. येत्या २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान दुबई येथे ‘कन्झ्युमर शॉपी’तर्फे हे प्रदर्शन भरवले जात आहे. त्यांच्या स्वत:च्या आणि इतर अनेक व्यावसायिक स्त्रियांच्या ‘उद्योजकतेकडून  स्वयंपूर्णतेकडे’ सुरू असलेल्या उत्साहवर्धक वाटचालीत दुबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील हे प्रदर्शन म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या काही उद्योजिका.. आणि त्यांना जोडणारा एक सक्षम दुवा मीनल मोहाडीकर यांच्याशी या गप्पा..!
alt

 बारामतीची अर्पिता लाड ही कमíशयल आर्टिस्ट आहे. पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून जी डी आर्ट्स केल्यानंतर तिने ‘मार्स २०००’ ही स्वत:ची जाहिरात संस्था सुरू केली.. पण विवाहानंतर मालेगावात स्थायिक झाल्याने ती चालू ठेवणे शक्य झाले नाही. व्यक्त होण्याची गरज सच्च्या कलाकाराला स्वस्थ बसू देत नाही. यानुसार अर्पिताने साडय़ांवर पेंटिंग करून देण्याचा छोटेखानी व्यवसाय मालेगावातच सुरू केला. तिला छान प्रतिसाद मिळाला आणि तिचे मनोबल उंचावले. पुढे साडय़ांव्यतिरिक्त सलवार कमीज, कुर्ती, दुपट्टे, स्टोल आदी अनेक उत्पादने तिने महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि आता दुबई येथील प्रदर्शनांतून बाजारात आणली. ‘आर्ट फॉर वॉर्डरोब’ अशी व्यावसायिक थीम घेऊन भारतातील विविध कलाप्रकारांचा कपडय़ांद्वारा जगभर प्रसार करण्याचे अर्पिताचे प्रयत्न आहेत. ‘कन्झुमर शॉपी’च्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून ती दुबई येथील प्रदर्शनातदेखील आपली उत्पादने ठेवत आहे. आज ‘अर्पिता लाड’ हा तिचा ब्रँड इतका प्रसिद्ध झाला आहे की, केवळ तिच्या नावावर ग्राहक खरेदी करतात.
रुपाली ही उत्तम वारली पेंटिंग्ज बनवते.. सुरुवातीला ती केवळ ‘कन्झ्युमर शॉपी’च्या प्रदर्शनांतून आपली कला लोकांपुढे आणत असे. आता मात्र आपले स्वतंत्र प्रदर्शन भरवण्याइतका आत्मविश्वास तिच्या ठायी आला आहे.  
गौरी वढावकर या खरे तर योगायोगाने उद्योगिनी बनल्या. त्यांच्या पतीचा स्वत:चा  पॅकेजिंग मशिनरी बनवण्याचा व्यवसाय alt
होता. त्यांच्यासोबतच फॅक्टरीमध्ये त्या हजेरी लावू लागल्या आणि तिथल्या सर्व मशिनरीचा अभ्यास सुरू केला. हळूहळू बिघडलेली कुठलीही मशिन दुरुस्त करणे त्यांना जमू लागले. पुढे सिंगापूर येथील ‘प्रोपॅक एशिया’ या पॅकेजिंग मशिनरीच्या प्रदर्शनात त्यांनी ज्या ज्या नवीन मशिन्स तिथे बघितल्या त्या सर्व आपण स्वत: भारतात तयार करू शकतो असा विश्वास वाटला. भारतात परतल्यावर त्यांनी स्वत: मशीन्सची डिझाइन्स बनवली. तोपर्यंत त्या सर्वार्थाने हा व्यवसाय स्वत: बघू लागल्या होत्या. नवीन बदलांना स्वीकारण्याची वृत्ती आणि बदलत्या गरजांनुसार सतत नवनवीन मशिन्स तयार करत राहण्यामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला. खाद्यपदार्थाच्या पाऊच पॅकेजिंगची संकल्पना त्यांनीच प्रथम रुजवली. त्यांना चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कारदेखील  मिळाला आहे. इतकेच नव्हे, तर एसएनडीटी मुंबईला त्या ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून जातात.
‘‘हे  क्षेत्र माझे नाही’ वगरे कल्पना स्त्रियांनी मनातून काढून टाकायला हव्यात. माझा अनुभव सांगायचा तर माझ्या व्यवसायात मी स्त्री आहे म्हणून मागे खेचण्याचे अनेक प्रकार झाले, पण पुरुषांचे वर्चस्व आपण एक आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे,’’ असे त्यांनी सांगितले. दुबई येथील प्रदर्शनात यंदाही त्यांची उत्पादने अर्थातच असणार आहेतच.
गीता कुलकर्णी या खरे तर आर्किटेक्ट, पण उत्तम हस्तशिल्पे बनवतात. त्या आर्थिकदृष्टय़ाही संपन्न कुटुंबातल्या. अनेकदा कुटुंबीयांसोबत परदेश दौरे केलेले, पण स्वत:च्या व्यवसायासाठी जेव्हा परदेशात एकटं जायची वेळ आली तेव्हा एका वेगळ्याच आत्मविश्वासाने झळाळून गेल्या.. ‘‘माझ्याकडे आपल्या व्यवसायाची बाराखडी गिरवणाऱ्या या महिलांना असे उंच आकाशात झेपावताना पाहिले की खूप आनंद वाटतो.,’’ मीनलताई मोहाडीकर कृतार्थतेने सांगतात.
‘कन्झ्युमर शॉपी’च्या आयोजनासाठी आपण इतर कुठल्या संघटनांची मदत घेता का, असे विचारले तेव्हा मीनलताई मोहाडीकर म्हणाल्या, ‘‘हो, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल, चेंबर ऑफ कॉमर्स, दुबई गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम आदींची आम्हाला मदत होते आहे. दुबई-इंडिया ट्रेडमधल्या आमच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. गेली तीन वर्षे हे प्रदर्शन भरते आहे आणि त्याला तिथल्या लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. दुबईमध्ये आम्ही अगदी ‘भारतीय माहोल’ निर्माण केलाय. दिवाळीच्या तोंडावर हे प्रदर्शन असल्याने साहजिकच त्याचा प्रभाव या प्रदर्शनावर पडतोच. दिव्यांच्या माळा, आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या आदी गोष्टी दुबईतील भारतीयांना तर आवडल्याच पण इतरांनाही खूप आवडले. तिथल्या आर्किटेक्ट आरती कोरगावकर, ए टु झी इव्हेंट्सचे विवेक कोल्हटकर, संजय पठणकर या दुबईतील मराठी मंडळींनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले आहे.’’
‘कन्झ्युमर शॉपी’च्या प्रदर्शनात भारतातील अमराठी महिलांचादेखील सहभाग आहे. ‘सुंदरम’ची उत्पादने पंजाबी महिलेची आहेत, ‘ओलीव्हिया’ची उत्पादने आमची एक मुस्लीम महिला बनवते. काही मारवाडी आणि गुजराती महिला, तसेच मूकबधिर महिलादेखील आपापली उत्पादने घेऊन येत आहेत.
दुबईमध्ये जाऊन आपल्या उत्पादनांची विक्री करणे हा यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक उद्योगिनीसाठी वेगळा अनुभव ठरतो. तुम्हाला दुबईच्या प्रदर्शनातून नेमके काय मिळते, असे विचारल्यावर अर्पिता लाड सांगते, ‘‘इथे केवळ देशविदेशातल्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी कोणी जाते असे नाही. आपले उत्पादन कुठल्या दर्जाचे आहे, त्यात काय काय सुधारणा करायला हव्यात, इतर संस्कृतींतील मंडळी आपल्या उत्पादनांकडे कसे बघतात, आपले ‘प्रमोशन’ कसे केले पाहिजे, स्पर्धा म्हणजे नेमके काय, अशा असंख्य गोष्टी इथे शिकायला मिळतात.’’
गेली कित्येक वर्षे ‘शॉपी’ भरवणाऱ्या मीनलताईंकडे तर शून्यातून स्वर्ग निर्माण करणाऱ्या अनेक उद्योगिनींच्या सुरस कथा आहेतच. त्यांच्या म्हणण्यानुसार बाईमध्ये ती ताकद असतेच, फक्त तिला योग्य दिशा मिळणे गरजेचे असते. आपले काही हृद्य अनुभव त्यांनी यानिमित्ताने सांगितले. ‘‘एक मूकबधिर मुलगी पंधरा वर्षांपासून माझ्याकडे स्टॉल लावते. तिचा व्यवसाय आता चांगलाच वाढला आहे. आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही अपंग, अंध, मूकबधिर यांच्याकडून स्टॉलचं भाडं घेत नाही, पण आता तिचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. ती मला म्हणाली की, माझ्याऐवजी आता तुम्ही दुसऱ्या कोण्या अंध अपंग व्यक्तीला हा स्टॉल मोफत द्या व माझ्याकडून इतरांसारखेच चार्जेस घेत जा.. आपल्याप्रमाणेच दुसऱ्या कोणाला मदतीचा हात मिळायला हवा यासाठीची तिची धडपड कौतुकास्पद आहे.’’
‘‘नाशिकच्या एक बाई उखळातल्या चटण्या बनवतात. त्यांच्या चटण्या ‘कन्झ्युमर शॉपी’त खूप लोकप्रिय झाल्या आणि या बाईंचा व्यवसाय उत्तम सुरू झाला. अगदी गरीब अशी ही महिला जेव्हा ‘तुमच्यामुळे आज माझे स्वत:चे घर बनू शकले,’ असे म्हणते तेव्हा हिचे स्वत:चे घर बनलेले बघता बघता आपलेही आयुष्य सफल झाल्याची सुखद भावना मनात भरून राहते..’’
‘‘मीनलताई, तुमच्यातल्या उद्योजकतेची पाश्र्वभूमी सांगाल?’’
‘‘माझ्या बाबतीत म्हणाल तर उद्योजकतेचे बाळकडू मला घरातून मिळालेले होतेच..माझे वडील पद्माकर ढमढेरे यांचा सुगंधाच्या कच्च्या मालाचा व्यवसाय होता. आई घरगुती खाद्यपदार्थाचा व्यवसाय करायची. माझे मामा देसाई बंधू आंबेवाले यांचा आदर्श तर माझ्यापुढे होताच! परंतु, हे माझ्यापुरते झाले. ज्यांच्याकडे कुठलाही व्यावसायिक वारसा नाही अशा किती तरी स्त्रिया आज स्वबळावर आपले व्यवसाय उभारताहेत आणि यशस्वी होताहेत.’’
एक उद्योगिनी म्हणून आपल्या आयुष्याचे गणित कसे मांडाल, असे विचारले तेव्हा त्या म्हणतात, ‘‘माणसे अधिक माणसे गुणिले विश्वास बरोबर यश आणि सर्वाचे प्रेम असे साधे सोपे गणित आहे. कुठलाही व्यवसाय हा नेटवर्किंगवर चालतो. आम्ही माणसे जोडत गेलो. व्यवसाय वाढत गेला. पसा तर काय. अनेक जण कमावतात. आम्ही माणसेदेखील कमावली आहेत. म्हणून स्वत:ला ‘यशस्वी आहे’ असे म्हणावेसे वाटते.’’
तेव्हा मैत्रिणींनो, हे आहे निमित्त तुमच्यातली उद्यमशीलता जागवण्याचे. आजपर्यंत असंख्य स्त्रियांनी आपले उद्योग सुरू करून या क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे, कारण अशक्य असं काहीच नसतं. हवा असतो तो आत्मविश्वास आणि कष्टाची तयारी..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो