उत्तुंग झेप ‘निर्माणा’ची
मुखपृष्ठ >> लेख >> उत्तुंग झेप ‘निर्माणा’ची
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

उत्तुंग झेप ‘निर्माणा’ची Bookmark and Share Print E-mail

 

शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
(फुजीरा येथील फाइव्ह स्टार हॉटेल अल आका मेरिडिअनचं हे लँडस्केपिंग.)

‘कन्झ्युमर शॉपी’तर्फे दुबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनासाठी मोलाचा सहभाग असणाऱ्या वास्तुरचनाकार आरती कोरगावकर. नव्याने वसत असलेल्या दुबईत या क्षेत्रातल्या अमाप संधी लक्षात घेऊन तिथे गेल्या. फुजीरा येथील फाइव्ह स्टार हॉटेल अल आका मेरिडिअनच्या लँडस्केपिंगचे काम त्यांच्या आयुष्याला वेग देणारं ठरलं.  ‘ग्रीन लेक टॉवर्स’सारख्या अनेक उंच इमारतींच्या कामाचं आव्हान आपल्या ‘आर्च ग्रुप’सह लीलया पेलणाऱ्या आरती कोरगावकर यांच्याशी गप्पा.

आर्किटेक्चरच्या व्यवसायात पंचवीस-तीस वर्षांपूर्वी पुरुषांच्या बरोबरीने पाऊल टाकून आज यशाचे नवनवीन आयाम निर्माण करणाऱ्या, दुबईत वास्तव्यास असणाऱ्या आरती कोरगावकर यांना भेटण्याची संधी नुकतीच चालून आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्या गौरी गणपतीच्या निमित्ताने मुंबईत आल्या होत्या. त्यांच्याशी त्यांच्या व्यवसायाबद्दल, करिअरबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलताना जाणवलं की जगविख्यात वास्तुरचनाकार म्हणून त्यांची कामगिरी उत्तुंग आणि प्रेरणादायी तर आहे शिवाय त्यांची या क्षेत्रातल्या पायाभरणीपासूनची वाटचालही रंजक आहे.
अनेक मोठमोठाले, जगप्रसिद्ध प्रकल्प त्यांनी लीलया हाताळले आहेत आणि बघणाऱ्यांनी अवाक् व्हावं अशी त्यांच्या गुणवत्तेची उंची आहे. त्यांच्याशी बोलताना या यशस्वी स्त्रीच्या भाव-वास्तूची दालने एकामागोमाग एक उघडत गेली..आणि त्यातून दिसले ते त्या यशामागे दडलेले अफाट कष्ट, धाडस, नावीन्याची सतत असणारी ओढ, परिपूर्णतेची आस आणि.. बरेच काही!
alt

तीस-एक वर्षांपूर्वीच्या म्हणजेच १९८०-८२ दरम्यानच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील आठवणींनी या मुलाखतीची सुरुवात झाली..
‘‘मी माहेरची आरती वैद्य, सेंट कोलंबा या शाळेत शिकले. नंतर ‘रचना संसद’ या आíकटेक्चरसाठीच्या सुप्रसिद्ध संस्थेत मला प्रवेश मिळाला. या व्यवसायाकडे वळण्याचे मुलींचे प्रमाण अत्यल्प म्हणजे साधारणपणे ५० मुले तर जेमतेम ५-६ मुली असे होते. अशोक (कोरगावकर) आणि मी एकत्रच शिकत होतो. हळूहळू मत्री झाली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला, परंतु प्रेमविवाहाला इतक्या सहजपणे मान्यता मिळण्याची शक्यता नव्हतीच. माझ्या घरून खूपच विरोध होता. मी एका सुखवस्तू कुटुंबात वाढलेली आणि अशोकच्या घराची परिस्थिती त्या मानाने एवढी संपन्न नव्हती. त्यातून आम्ही दोघांनी जेमतेम पदव्या घेतलेल्या होत्या. कोण काय नेमके करणार हे माहीत नाही, भविष्याबद्दल कुठल्याही ठोस योजना नाहीत आणि आम्ही दोघे लग्न करायला निघालो होतो. पण आम्ही कुणाच्याच विरोधाला जुमानले नाही आणि विवाहबद्ध झालो..’’
‘‘त्या काळात आखाती देशांमध्ये बांधकाम व्यवसाय अतिशय तेजीत होता. आम्ही तिथे जायचे ठरवले होतेच..त्याप्रमाणे नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले.बहारीनला ‘जे एस डे कॉर’ या कंपनीत आम्हाला दोघांनाही नोकरी मिळाली आणि आमचे सहजीवन सुरु झाले. ’’
‘‘मग स्वत:च्या व्यवसायाबद्दल केव्हा विचार केला?
‘‘बहारीनला आम्ही ८१ साली गेलो. तिथे तीन वष्रे नोकरी केल्यानंतर ८४ साली दुबईला गेलो. तिथे काम करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वातावरण होते आणि संधी अमाप होत्या. होल्फोर्ड असोसिएट्स या हॉटेल चेन असलेल्या दुबईस्थित ब्रिटिश आर्किटेक्चर कंपनीत मला नोकरी मिळाली. अशोक आणि मी दोघेही आपापल्या करिअरमध्ये अधिकाधिक व्यस्त होत चाललो होतो. दोघांच्याही कामाच्या जबाबदाऱ्या वाढत चालल्या होत्या..यात जवळजवळ दहा वष्रे निघून गेली..खूप काही नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या..याच दरम्यान आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळे अपत्य झाले.’’
पण आरतीताईंचे असे ‘प्रॉमिसिंग’ करिअर बघता त्यांनी मुलांसाठी बराच काळपर्यंत घरी थांबून राहणे त्यांच्या हिताचे नव्हते. या दहा वर्षांच्या काळात आरतीताईंच्या माहेरच्यांचा विरोध बराच निवळला होता.म्हणतात ना..दुधापेक्षाही दुधावरची साय अधिक प्रिय असते मग आरतीताईंच्या आई नातवंडांच्या देखभालीसाठी दुबईत हजार झाल्या. आईकडून मिळालेला हा खूप मोठा आधार होता, त्या सांगतात.
‘‘माझ्या आईने केवळ मुलांसाठी इथे येऊन राहावे आणि आपल्या सर्व प्राधान्याक्रमांना तिलांजली द्यावी हे मला पटण्यासारखे नव्हते..आई मुंबईला एका मूकबधिर मुलांच्या शाळेत शिकवत होती. तशाच प्रकारचे तिला मनापासून आवडणारे हे काम तिला इथेही करता यावे म्हणून आम्ही चाचपणी सुरू केली आणि आमच्या घराजवळच असलेल्या एका ‘स्पेशल नीड स्कूल’मध्ये तिने शिक्षिका म्हणून कम सुरू केले. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून सामाजिक जाणिवाही जपण्याचे असे संस्कार आईकडून आम्हाला मिळत राहिले आहेत.’’  त्या अभिमानाने सांगतात.
‘‘असे सर्व स्थिरस्थावर झाल्यानंतर अशोकने स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला..मी माझी नोकरी सुरू ठेवावी..हळू हळू स्वत:च्या कंपनीच्या कामाकडे वळावे आणि व्यवसाय नीट सुरू झाला की नोकरी सोडून पूर्ण वेळ आपल्या कंपनीत यावे असे नियोजन आम्ही केले.. आणि आमच्या ‘आर्च ग्रुप कन्सल्टन्ट्स’ या कंपनीचा शुभारंभ झाला.’’
आरतीताईंचे स्वत:चे असे करियर या दरम्यानच्या काळात प्रामुख्याने आकार घेऊ लागले होते. त्यांच्या कंपनीकडून त्यांना अनेक मोठय़ा प्रोजेक्ट्सच्या लँडस्केिपग, इंटेरिअर आदींची महत्त्वपूर्ण कामे करण्याची संधी मिळाली. त्यांचे पती अशोक कोरगावकर यांच्या ‘आर्च ग्रुप’ची घोडदौड ही तेवढय़ाच धडाक्याने सुरू होती.
‘१९९९ मध्ये मी होल्फोर्ड असोसिएट्समध्ये असताना लॉइड्स बँकेचे संपूर्ण डिझाइन करण्याची संधी मिळाली. या कामाची खूप प्रशंसा झाली. ‘एम.आर’ या सुप्रसिद्ध कंपनीचे अध्यक्ष महम्मद अल अब्बार  यांच्या कार्यालयातून ‘हे डिझाइन कुणी केले’ अशी विचारणा झाली. त्यांना माझे काम खूप आवडले. त्यांनी पुढे सुप्रसिद्ध हॉटेल चेन्स ‘जे. डब्लू. मेरिअट’, ‘वेस्ट ईन’ सारख्या सन्माननीय उपक्रमात आम्हाला (‘आर्च ग्रुप’ला ) सहभागी करून घेतले.’ आरती सांगतात.
एक काळ तर असा आला की आर्च ग्रुप आणि आरतीताई जिथे काम करीत त्या कंपनीत स्पर्धा सुरू झाली. मग त्यांनी ‘होल्फोर्ड’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
‘‘अशा वेळी वैयक्तिक अहंकारापासून स्वत:ला दूर ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असते. ‘मी’ ऐवजी ‘आम्ही’ हा माझ्या जीवनाचा मूलमंत्र होता. अशोकच्या म्हणजेच आमच्या स्वत:च्या ‘आर्च ग्रुप’च्या आणि मी जिथे नोकरी करत होते त्या ‘होल्फोर्ड असोसिएट्स’ कंपनीत स्पध्रेमुळे तणाव निर्माण होणे स्वाभाविक होते. अशा वेळी त्या कंपनीत अधिकाराच्या पदावर नोकरी करीत राहणे मला योग्य वाटले नाही. आणि मी पूर्ण वेळ आमच्या स्वत:च्याच कंपनीसाठी म्हणजे आर्च ग्रुपसाठी काम करण्याचा निर्णय घेतला.
या दरम्यान दुबईपासून १०० किमी अंतरावर असलेल्या अल आका मेरिडिअन, फुजीराच्या लँडस्केिपगचे अत्यंत महत्त्वाचे काम आम्हाला मिळाले. हे मी स्वतंत्रपणे पूर्ण केले. हे अति महत्त्वाचे यासाठी होते की आमची पंचतारांकित करियरची सुरुवात इथून सुरू झाली. ‘फाइव्ह स्टार’  हॉटेल्सचे पहिलेवाहिले काम हा अतिशय रोमांचित करणारा, आत्मविश्वास जागवणारा आणि भविष्यातील वाटेकडे अंगुलीनिर्देश करणारा असा हा अनुभव होता!
या दरम्यान ‘आर्च ग्रुप’ने दुबईतील तीन सर्वात उंच इमारतींचे आíकटेक्चर पूर्णपणे केले होते. त्यापकी ‘ग्रीन लेक टॉवर्स’ असे अत्यंत प्रतिष्ठित काम पूर्ण केले. या हॉटेलच्या रिसेप्शन, लॉबी, स्पा, जिम, पब्लिक अमेनिटीजचे इंटेरिअरचे काम आरतीताईंनी स्वतंत्रपणे पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे ‘आर्च ग्रुप’च्या कार्यालयाचे संपूर्ण इंटेरिअर देखील त्यांनी स्वत: केलेले आहे.
 आपल्या करियरच्या प्रवासातली एक अतिशय ह्रद्य आठवण त्यांनी सांगितली. ‘‘माझा चाळिसावा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमचे बरेच नातलग घरी जमले होते. त्या दरम्यान आमची ‘एम.आर.’ कंपनीच्या कामाच्या कॉन्ट्रॅक्टसंबंधी बोलणी सुरू होती. या क्षेत्रातील सर्व दिग्गज त्यासाठी आपापले नशीब अजमावून बघण्यासाठी जिवाचे रान करीत होते. आमच्यासारख्या मराठमोळ्या जोडप्याला कितपत संधी मिळेल याबाबत आम्ही साशंक होतो. वरवर जरी हसत खिदळत असलो तरी त्या दिवशी आम्ही अत्यंत बेचन अवस्थेत संपूर्ण दिवस घालवला. आपल्या हातची ही संधी गेली तर ..आदी विचारांचे मळभ मनावर दाटून राहिले होते. संध्याकाळ होत आली तसे माझे मन निराश होऊ लागले. आणि अगदी एखाद्या सिनेमात क्लायमॅक्सच्या क्षणी काहीतरी छान घडावे तसे घडले.. अचानक आमचा फोन खणखणला.. महमद अल अब्बार यांच्या स्वीय सचिव यांनी ‘‘ते काम तुम्हाला देण्याचे ठरवले असून भेटीचे आमंत्रण देण्यासाठी फोन केला,’’ असे सांगितले. हा माझा वाढदिवस आमच्या सर्वाच्याच सदैव स्मरणात राहील.. यानंतर मात्र अनेक उत्तमोत्तम प्रकल्पांचे काम आर्च ग्रुपकडे चालत आले. ग्रोवनर हाउस हॉटेल्स, वेस्ट इन हॉटेल्स इं. एका मागोमाग एक..
आरतीताई, तुमच्या करियरचा श्रीगणेशा परदेशात झाला. भारतातही असे यश मिळवणे शक्य झाले असते का याबद्दल काय सांगाल?
‘‘अशी तुलना करणे योग्य होणार नाही. आम्ही ज्या वेळी तिथे गेलो तो त्या देशांसाठी बांधकाम व्यवसायातील सर्वात उत्तम काळ होता..अमाप संधी तिथे उपलब्ध होत्या.. अर्थात संधीचे सोने करणे आपल्या हाती असते.. नियतीच तुम्हाला अशा वेळी सुयोग्य ठिकाणी नेऊन ठेवत असली पाहिजे..माझ्या पतीची, आईची, पुढे मुलांची आणि इतरही अनेक कुटुंबीयांची आम्हाला जी साथ मिळाली त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे आमचे काम करू शकलो. एवढे मोठे यश हे एकटय़ा दुकटय़ाचे नसतेच..आमचा संपूर्ण स्टाफ आमच्या कंपनीसाठी दिवसरात्र राबत असतो. त्यांचेही योगदान खूप मोठे आहे.
एक स्त्री म्हणून परदेशात आपले करियर सुरू करताना काय अडचणी जाणवल्या?
‘‘इकडे त्या वेळी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता हे सर्वश्रुत आहे.. त्यामुळे ही बाई काय काम करणार? असा एक नकारात्मक भाव बहुतेकांच्या नजरेत असायचा.. नंतरही साइट्सवर गेल्यानंतर बहुतेक फोरमन, सुपरवायझर्स, मजूर जरी बहुसंख्येने भारतीय असायचे..तरी त्यांचीही विचारसरणी थोडय़ाफार फरकाने अशीच होती..सुरुवातीला मला कोणी फार गंभीरपणे घेत नसत..पण हळू हळू कामाप्रती असलेली माझी आस्था बघून तेही साथ देऊ लागले. आता चित्र बऱ्यापकी बदलले आहे. अनेक स्त्रिया धडाडीने आपापले व्यवसाय सुरू करताहेत..यशस्वी होताहेत..इथे पूर्णत: व्यावसायिक वातावरण असल्याने स्त्रियांसाठी अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत..जसे महिलांची सुरक्षितता वगरे..!  
‘आर्च ग्रुप’ने आता भारतातही आपला व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आहे. पुणे व मुंबई येथे त्यांनी कार्यालय स्थापन केले आहे. भारतातील कुशल मनुष्यबळ आउटसोर्स करण्याचा आमचा मानस आहे.’’
आपल्या या जीवनप्रवासाकडे बघताना सर्वाधिक समाधान कुठल्या गोष्टीचे वाटते? असे विचारले तेव्हा आत्तापर्यंत केवळ करियरपलीकडे काहीही न बोलणाऱ्या आरतीताईंचे मातृत्वाच्या भावनेने रसरसलेले असे निराळेच रूप लक्षात आले.
त्या सांगतात,  ‘‘खरं सांगू, तुम्ही कितीही उत्तुंग यश मिळवले, देश-विदेशात आपल्या कर्तृत्वाचे झेंडे उभालेत तरीही आपल्या पुढील पिढीसाठी कुठला वारसा तुम्ही मागे ठेवता यावर आपले यश जोखले गेले पाहिजे.. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा शिक्षणाशिवाय कुठलीही पुंजी आमच्याकडे नव्हती.. ज्ञान होते म्हणून कामे करायची संधी मिळत गेली..अमिताभ बच्चन म्हणतात तसं, ‘‘सिर्फ ग्यानहि आपको आपका हक दिलाता है..’’ अगदी खरं आहे..माझ्या मुलांनी खूप चांगलं शिकून उच्चशिक्षित होऊन असंच काहीतरी छान काम करावं असं मला नेहमी वाटत आलं आहे. माझी मुलगी सायली हॉर्वर्ड विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे तर मुलगा संकेत हा बर्कली विद्यापीठात फायनान्समध्ये पीएच.डी. करीत आहे.’’
आपल्या करियरचे उत्तुंग टॉवर्स आभाळाशी स्पर्धा करीत असतानादेखील ज्यांचे पाय मात्र पूर्णत: जमिनीवर आहेत अशी ही विलक्षण माणसे..जेवढी मोठी ..तेवढीच साधीसुधी..अगदी मराठमोळी..!!!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो