बुक-अप : लक्ष्मीरथाचे सारथी
मुखपृष्ठ >> बुक-अप! >> बुक-अप : लक्ष्मीरथाचे सारथी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बुक-अप : लक्ष्मीरथाचे सारथी Bookmark and Share Print E-mail

 

गिरीश कुबेर - शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

फेडचे सध्याचे प्रमुख बेन बर्नाके पुढच्या आठवडय़ात  मुंबईत येत आहेत. ‘फेड’चं काय एवढं?
चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बरोबर याच काळातली. २००८ सालातल्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत लेहमन ब्रदर्स ही बलाढय़ बँक बुडाली. जवळपास १७० वर्षांची जुनी बँक. जास्तीत जास्त व्यवसाय वाढवण्याच्या नादात ज्यांना झेपणार नाही, ज्यांना मासिक उत्पन्नाची हमी नाही त्यांना अमेरिकेत अनेक बँकांनी र्कज देऊन ठेवली होती. त्यामुळे अगदी तळाचा कर्ज परतफेड करणारा गटांगळ्या खायला लागल्यावर वरच्या या बँकांच्या तोंडातही पाणी जायला लागलं.

असं पाणी जाऊन हकनाक बुडालेल्यांतली सर्वात मोठी लेहमन ब्रदर्स. इतकी मोठी बँक बुडतीये म्हटल्यावर जगाच्या अर्थव्यवस्थेलाच घाम फुटला. बाजार कोसळले. ही तर मोठय़ा मंदीची नांदी म्हणून तज्ज्ञ सांगू लागले आणि एकंदर पुढची काही र्वष शोकमग्न अवस्थेत काढायची आहेत म्हणून वातावरणनिर्मिती सुरू झाली.
आर्थिक हुच्चपणा करण्यात आपल्याकडचीही एक खासगी बँक त्या वेळी आघाडीवर होती. स्टेट बँकेला मागे टाकायचं, एचडीएफसीला झोपवायचं.. एवढंच त्या बँकेच्या प्रवर्तकांचं उद्दिष्ट. मोठं व्हायचं. पण मोठं होऊन करायचं काय, याचा अंदाज नाही. त्यामुळे नवश्रीमंताला जशी श्रीमंतीची हाव अधिक असते, तशीच हाव या बँकेला सुटली होती. लेहमन ब्रदर्सप्रमाणे ज्या कर्ज घेणाऱ्यांची कसलीच हमी नाही अशा अशाश्वत आणि धोकादायक बाजारपेठेत या बँकेने बरेच उद्योग केलेले. ते अंगाशी येणार हे अगदी स्पष्ट झालं आणि लेहमनच जिथे कोसळते तिथं आपलं काय, या प्रश्नानं ही आपली बँक बेजार झाली. उच्चपदस्थांपेक्षा तळाच्या माणसाला वरच्या धोक्याचा पहिल्यांदा वास येतो. तसाच तो याबाबतही आला. साध्या साध्या गुंतवणूकदारांनी त्यामुळे या बँकेतून आपले पैसे, ठेवी वगैरे काढायला सुरुवात केली. या अशा बातम्या वणव्यासारख्या पसरतात. तशाच त्या पसरल्या. त्यामुळे या बँकेतून आपल्या खात्यांचं चंबूगवाळं आवरण्यासाठी अक्षरश: रांगा लागल्या. बरं आपल्याकडचं खासगीकरणही तसं अर्धवट असल्यामुळे अमेरिकेच्या सरकारसारखी बुडतीये तर बुडू दे.. असं या बँकेच्या बाबतीत म्हणायची हिंमत कुठे आपल्यात? त्यामुळे देशाच्या अर्थमंत्र्यासकट अनेक लुंगेसुंगे ही बँक बुडाली तर काय होईल, ही चिंता व्यक्त करण्याच्या मिषाने माध्यमांत चमकून घेत होते. वास्तविक एखादी बँक.. मग ती कितीही मोठी असो.. बुडाली म्हणजे काही देश बुडाला नाही. तेव्हा याबाबत आपल्या सरकारनंही तसंच म्हणायला हवं होतं. पण आपण सगळेच दुतोंडय़ांच्या देशात राहत असल्यानं याबाबतही तसंच झालं. एरवी सरकारी हस्तक्षेपाला विरोध करायचा, आमची स्वायत्तता सगळ्यात महत्त्वाची. असं सीआयआय, फिकी वगैरेंच्या गोतावळ्यात कॅमेऱ्यांसमोर बडबडायचं आणि वेळ आल्यावर सरकारसमोर जाऊन आपल्याला वाचवा, असा गळा काढायचा.. याची आपल्याला सवय झालेली.
  आपल्याकडची ही जी बँक संकटात होती तिच्या प्रमुखांचा आग्रह होता अमेरिकी बँकांसारखंच आपल्याला वागू द्यावं म्हणून. त्यामुळे ही बँक व्यवसायविस्ताराच्या नावानं काहीही करत होती. क्रेडिट कार्ड वगैरे तर जबरदस्तीनं गळ्यातच मारायची. बाकीही बरंच काय काय त्या बँकेला करायचं होतं, पण त्याला आडकाठी केली रिझव्‍‌र्ह बँकेचे तेव्हाचे गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांनी. रेड्डी इतर खासगी बँकप्रमुखांच्या तुलनेत साधे. दिसायला जुनाट. गणिताच्या निवृत्त प्राध्यापकासारखे. शिवाय खासगी बँकवाल्यांना प्रसारमाध्यमांचा मोठा आधार असायचा. तेव्हा त्याच्या जोरावर खासगी बँकवाल्यांनी रेड्डी यांच्या बँकिंग नियमन संकल्पना किती कालबाह्य़ झाल्या आहेत, वाय. व्ही. रेड्डी हेच बँक व्यवसाय प्रसाराला कसा अडथळा आहेत, असं सांगायला सुरुवात केली होती. अनेकांना ते खरंच वाटू लागलं होतं. खासगी बँकवाल्यांची लॉबिंगची ताकद मोठी. बँकिंग  वर्तुळात त्यामुळे असंही बोललं जात होतं की, अर्थमंत्रीच त्यांच्यावर तितकेसे खूश नाहीत. पण असंही सांगितलं जात होतं की, त्यांना थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाच पाठिंबा आहे.
त्या काळात मी ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये होतो. त्यामुळे हे सगळं नाटय़ अगदी जवळून पाहायला मिळत होतं. फारच मजा येत होती ते समजून घ्यायला. आपली भांडवलशाही, अर्थव्यवस्था बालपावलं टाकतीये.. तेव्हा हे असंच होणार.. असंही सांगितलं जात होतं. तसं असेल तर प्रश्न पडला की, मग अमेरिकेसारख्या पूर्ण वाढलेल्या, वयात आलेल्या भांडवलशाही व्यवस्थेत काय काय होतं असेल? ते ऐकल्यावर तेव्हाचा माझा संपादक राजऋषी सिंघल (तोपर्यंत संपादक वाचणारे आणि लिहिणारे असावेत, अशी प्रथा होती. असो.) दुसऱ्या दिवशी घरनं येताना एक जाडजूड पुस्तक घेऊन आला. हे वाच.. बरंच काही कळेल तुला.. म्हणाला.
    ते पुस्तक होतं ‘द फेड : द इनसाइड स्टोरी हाऊ वर्ल्ड्स मोस्ट फायनान्शियल इन्स्टिटय़ूट ड्राइव्हज मार्केट्स.’ लेखक- मार्टिन मेयर्स. हे मेयर्स भलतेच तगडे. इतके की तब्बल ३५ ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. सगळेच्या सगळे हे असे गंभीर, ललितेतर विषयांचे. बँका डब्यात कशा गेल्या, उद्योगांची वाताहत का झाली.. असं काय काय सांगणारे. तेव्हा विषय त्यांच्या आवडीचा आणि हुकमी. त्यामुळे हे पुस्तकही त्याच माळेतलं. फेड म्हणजे अमेरिकेची रिझव्‍‌र्ह बँक. फेडरल रिझव्‍‌र्ह. तिचं लाडकं लघुरूप म्हणजे फेड. ती जन्माला आली १९१३ ला. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या तोंडावर. पहिल्या महायुद्धाविषयी थोरले फोर्ड म्हणाल्याचं आठवत होतं की, हे युद्ध बँकर्स मंडळींनी घडवून आणलेलं आहे म्हणून. तेव्हा बँकर्स इतकं काही करू शकत असतील तर बँकर्सचा बँकर असलेल्या फेडचा प्रमुख काय काय करू शकत असेल. हे जाणून घ्यायचं होतं. कमालीची उत्सुकता होती त्या संदर्भात.
फेड ही सरकारी व्यवस्था असली तरी पूर्णपणे स्वायत्त असते. आपल्या रिझव्‍‌र्ह बँकेसारखीच. म्हणजे सरकार काय करतंय, सरकारला आवडेल की नाही.. असले कोणतेही प्रश्न न पडता ही यंत्रणा आपले निर्णय घेत असते. अर्थव्यवस्थेसाठी जे काही करायचंय ते पूर्णपणे करायची मुभा आणि अधिकार या फेडप्रमुखाला असतात. त्याचमुळे आपल्याकडे नाही का रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव मध्यंतरी दणादण व्याजदर वाढवत सुटले होते. अमेरिकेच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था ती केवढी. तेव्हा आपल्यापेक्षा कित्येक पटींनी प्रचंड असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हा फेडप्रमुख कसा हाकलत असेल हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायला हवं. परंतु अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आवाका रोमन साम्राज्याच्या इतिहासाएवढा. तो लिहायचा म्हटलं तरी कसं, किती आणि काय काय लिहायचं. हा प्रश्न पडतो. तसा तो मेयर्स यांना पडला असावा. ते पुस्तकातनं जाणवतं. कारण इतका मोठा इतिहास सरळसोटपणे मांडता येत नाही. प्रत्येक कथानकाला असंख्य उपकथानकं असतात. त्यातली काही तर मूळ कथानकापेक्षा रसदार असतात. तेव्हा काय सांगायचं हा प्रश्न पडतो. या प्रश्नानं मेयर्स यांना चांगलंच सतावलं असणार हे पदोपदी जाणवतं. त्यामुळे मेयर्स एका मुद्दय़ावर येतात. मग त्याचं उपकथानक त्यांना खुणावतं. ते थांबतात, ते उपकथानक आपल्यापुढे मांडतात. आणि मग ते वाचून पुन्हा आपण मूळ मुद्दय़ावर यायचं. असं पुस्तकभर चालू असतं. पण हे असं होणं अपरिहार्यही असावं.
इतकी मोठी सत्ता काही विनासायास स्थिरावली नसणार. ग्रेट ब्रिटनवर जेव्हा सूर्य मावळत नव्हता आणि तो मावळण्याची शक्यताही नव्हती तेव्हा ब्रिटनच्या रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रमुख बॅरन रॉथशिल्ड यांची एक दपरेक्ती या कामाचं महत्त्व सांगणारी आहे, ती हे पुस्तक वाचताना आठवली. रॉथशिल्ड म्हणाले होते, पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर कोणतीही कठपुतळी बसली तरी हरकत नाही.. साम्राज्य न मावळणाऱ्या सत्तेची खरी सूत्रं असतात पैशाचा पुरवठा नियंत्रित करणाऱ्याकडे.. सध्या ती माझ्याकडे आहेत. तेव्हा फेडच्या बाबतीतही असे अनेक प्रसंग घडले. त्यातले बरेचसे मेयर्स यांच्या पुस्तकात आढळतात. म्हणजे एकदा असं झालं की, फेडच्या अधिकाऱ्यांचा विरोध होता अमेरिकी सरकारनं रोखे काढायला. तेव्हा फेड आणि सरकार यांच्यात संबंध काही सौहार्दाचे नव्हते. त्यामुळे फेडचा विरोध न जुमानता सरकारनं ठरवलं रोखे काढायचे. त्यांनी ते जाहीर केलेही. परंतु फेडचे अधिकारी इतके सव्वाशेर की त्यांनी ते आपसातच खरेदी करून टाकले. म्हणजे रोखे प्रसृत करूनही प्रसृत झालेच नाहीत. ही दुसऱ्या महायुद्धानंतरची गोष्ट.
तेव्हा हा सगळा लक्ष्मीचा खेळ चालतो तरी कसा हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक कष्टप्रद वाटलं तरी वाचायला हवं.
त्या वेळी ते वाचण्याचे कष्ट घ्यावे लागले त्यामागचं कारण होतं अ‍ॅलन ग्रीनस्पॅन. हे माजी फेडप्रमुख. एखादय़ा रॉकस्टारला मिळावी तशी लोकप्रियता त्यांना होती त्या वेळी. ग्रीनस्पॅन काय म्हणतायत, काय लिहितायत. याकडे साऱ्या जगाच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष असायचं. ग्रीनस्पॅन माणूसही रसिक. ते मजा घ्यायचे या सगळ्याची. जवळपास २० र्वष त्यांना फेडच्या प्रमुखपदी राहायला मिळालं. नेमणूक केली रोनाल्ड रेगन यांनी. नंतर थोरले जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि धाकटे जॉर्ज बुश हे सगळे त्यांना मुदतवाढ देत गेले. त्यामुळेही असेल ग्रीनस्पॅन यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा आकार इतका वाढला की विचारायची सोय नाही. त्यात त्यांच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकी अर्थव्यवस्था प्रचंड वेगात वाढली. सगळीकडे नुसता सुकाळ होता. पैसाच पैसा. त्यात व्याजदर वगैरे आणखीनच उतरवून ग्रीनस्पॅन यांनी अर्थव्यवस्थेला भलतीच फुंकर घातली. खरेदी करा.. पैसे उडवा.. हा जणू मंत्रच बनला त्यांच्या काळात. पैसे संपले की अधिक पैसे मिळवा आणि एक कर्ज फेडायला पैसे हवे असतील तर दुसरं कर्ज काढून ते मिळवा.. हाच संदेश होता त्यांच्या काळाचा.
    २००६ सालच्या जानेवारीत ते निवृत्त झाले आणि दोनच वर्षांत अर्थव्यवस्थेचा मोठाच्या मोठा तयार झालेला अगडबंब बुडबुडा फुटला. अनेकांनी त्याबद्दल ग्रीनस्पॅन यांना जबाबदार धरलं. ‘टाइम’ साप्ताहिकानं तर त्या अर्थसंकटास जबाबदार असणाऱ्या पंचविसांची क्रमवारीच दिली. त्यात ग्रीनस्पॅन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (पहिल्या क्रमांकावर अँजेलो मोझिलो आणि फिल ग्रॅम हे होते. मोझिलो एका वित्त कंपनीचा प्रवर्तक, तर ग्रॅम अमेरिकी सेनेटच्या बँकिंग समितीचे प्रमुख. स्वस्त व्याजदराचे खंदे पुरस्कर्ते)
तर पुढच्याच वर्षी या ग्रीनस्पॅन यांचं पुस्तक आलं. ‘द एज ऑफ टब्र्युलन्स: अ‍ॅडव्हेंचर्स इन अ न्यू वर्ल्ड.’ या पुस्तकाविषयी कमालीची उत्सुकता होती. एक तर ग्रीनस्पॅन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आकार. भारतात त्यांना एका संस्थेनं निवृत्त झाल्यावर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भाषण करायचं निमंत्रण दिलं होतं. परंतु त्यांच्या मानधनाचा केवळ आकडाच ऐकून आपल्याकडच्या दोनपाच बँकांचा श्वास अडकला. असो. त्याच्या आधी तीन र्वष इराकवरच्या र्निबधांच्या काळात त्यांच्याशी चोरटे व्यवहार करणाऱ्यांची चौकशी करणाऱ्या पॉल व्होल्कर यांचाही अहवाल आला होता. या व्होल्कर यांनी संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांच्या चिरंजीवापासून ते आपल्या के. नटवरसिंग अशा अनेकांचं बखोट धरून त्यांना दोषी ठरवलं होतं. तेल आणि वायू क्षेत्रातल्या आपल्याकडच्या एका बलाढय़ कंपनीवरही त्यांनी आरोप केला होता. तेही प्रकरण शमलं नव्हतं. तर हे व्होल्कर हेही माजी फेडप्रमुख. त्यामुळे अशी बलदंड व्यक्तिमत्त्वं देणाऱ्या फेडविषयही भलतंच प्रेम निर्माण झालं होतं. ग्रीनस्पॅन यांच्या पुस्तकानं ते अधिकच वाढलं.
हा माणूस मोठा रगेल आणि रंगेलही. पुस्तक त्यांनी लिहिलं कुठे? तर बाथटबमध्ये. त्या बाथटबमध्ये मी शिरलो की आर्किमिडिजपेक्षाही मला अधिक आनंद होतो, असं तेच सांगतात. अख्खं पुस्तक त्यांनी असं हातानी लिहिलंय. बाहेर त्यांचा सचिव आणि कर्मचारी. म्हणजे हे महाशय एकेक कागद लिहिणार. मग कर्मचारी तो मजकूर टंकलिखित करणार. आपल्याला असंच लिहिता यावं म्हणून त्यांनी पाण्याला दाद न देणारी शाईदेखील मिळवली.
    ग्रीनस्पॅन विचारांनी आयन रॅण्ड हिचे पट्टशिष्य. पुस्तकाचा पहिला भाग तिच्या विचारप्रभावाविषयी आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणीविषयी आहे. ते समजून घेणंही तसं ठीकच. खरं नाटय़ आहे ते दुसऱ्या भागात. आपली आर्थिक मांडणी, सरकारी सेवाकाळात काय काय घडलं, आपण त्या त्या वेळी काय आणि का तसे निर्णय घेतले या सगळ्याचा ऊहापोह ग्रीनस्पॅन करतात. अमेरिकेचे अर्धा डझनभर अध्यक्ष त्यांना जवळून पाहायला मिळाले. जेराल्ड फोर्ड यांच्याविषयी त्यांना आदर आहे. पण ते कधी निवडूनच आले नाहीत, असंही लगेच ते म्हणतात आणि दुसरं कौतुक आहे त्यांना ते बिल क्िंलटन यांच्याविषयी. अर्थव्यवस्थेचा फार दूपर्यंत विचार करणारा अध्यक्ष असं त्यांचं ते वर्णन करतात. आपण अमेरिकेचे अध्यक्ष आहोत ही जाणीव त्यांना सतत असायची, असंही ते म्हणतात.
तेव्हा जगाचं राजकारण आणि या राजकारणाला इंजिन देणारं अर्थकारण समजून घ्यायचं असेल तर किमान ही दोन पुस्तकं वाचायला हवीतच. माणसं किती उंचीवर पोहोचतात आणि तिथं पोहोचल्यावर कसा विचार करतात, त्यांच्या विचारांचा आपल्यावर कसा कसा परिणाम होत असतो.. हे जाणून घ्यायची जिज्ञासा असेल तर ही पुस्तकं वाचणं गरजेचंच आहे यात तिळमात्र शंका नाही.
या पुस्तकांची शिफारस करायला एक तात्कालिक कारणदेखील आहे. ते म्हणजे फेडचे सध्याचे प्रमुख बेन बर्नाके पुढच्याच आठवडय़ात भारतात येणार आहेत. मुंबईतही येणार आहेत ते. या भेटीत ते आपल्या फेडचे प्रमुख रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांना भेटणार आहेत.
तेव्हा आपल्या आणि जगाच्याही लक्ष्मीच्या रथाचे सारथी असणाऱ्या या दोघांच्या भेटीचं महत्त्व आपल्याला कळावं म्हणून हा प्रपंच.
द एज ऑफ टब्र्युलन्स:
अ‍ॅडव्हेंचर्स इन अ न्यू वर्ल्ड
- अ‍ॅलन ग्रीनस्पॅन
प्रकाशक : पेंग्विन
पृ. ५७६; किं: ११.२० डॉलर

द फेड : द इनसाइड स्टोरी हाऊ वर्ल्ड्स मोस्ट फायनान्शियल इन्स्टिटय़ूट ड्राइव्हज् मार्केट्स
 - मार्टिन मेयर
प्रकाशक : प्लम
पृ. ३५२; किंमत : ४.९ डॉलर

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो