जमिनीची धूप माथेरानच्या मुळावर
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> जमिनीची धूप माथेरानच्या मुळावर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

जमिनीची धूप माथेरानच्या मुळावर Bookmark and Share Print E-mail

हर्षद कशाळकर ,अलिबाग

जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे केंद्र असणाऱ्या माथेरानचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जमिनीची मोठय़ा प्रमाणात होणारी धूप माथेरानच्या मुळावर उठली आहे. या सॉईल इरोजनच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न निकामी ठरले आहेत. जमिनीची धूप थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत तर माथेरानची वैभवशाली वनसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
हिरव्यागार वनराईत वसलेले माथेरान आजवर देशविदेशातील पर्यटकांच्या पसंतीला उतरत आले आहे. डोंगरमाथ्यावर असणारे रान ही माथेरानची खरी ओळख आहे, पण माथेरानची ही ओळख आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

याला कारण ठरते आहे ती माथेरानची सॉईल इरोजनची समस्या. अर्थात जमिनीची होणारी धूप. माथेरानमध्ये दर वर्षी सरासरी साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. या पावसामुळे इथल्या जमिनीची मोठय़ा प्रमाणात धूप होते.
या समस्येची पहिल्यांदा दाहकता जुलै २००५ मध्ये माथेरानकरांना अनुभवायला मिळाली. पावसामुळे माथेरानच्या वेगवेगळ्या भागांत भूस्खलन होण्यास सुरुवात झाली. यात सुमारे पाच हजार झाडे नष्ट झाली, तर काही पर्यटनस्थळे कायमची नष्ट झाली. लॉर्ड पॉइंटकडून वन ट्री हिल पॉइंटकडे जाणारा रस्ता नाहीसा झाला. डेंजर पाथ रस्ता पर्यटकांसाठी कायमचा बंद झाला, तर राजस्थान बंगला परिसरातील १० एकरचा परिसर नष्ट झाला. सखाराम तुकाराम पॉइंटचे अस्तित्वही धोक्यात आले. त्याचबरोबर फाऊंटन लॉजजवळील दोन एकर परिसर नष्ट झाला. माथेरानच्या रेल्वेलाही या भूस्खलनाचा फटका सोसावा लागला. माथेरानला पाणीपुरवठा करणाऱ्या शालरेट लेकवरही याच समस्येचा परिणाम झाल्याचे दिसून आले. सॉईल इरोजनमुळे शालरेट लेक गाळाने भरत गेले. परिणामी या तलावाची साठवण क्षमता कमी होत गेली.
जमिनीची होणारी धूप ही एक नैसर्गिक समस्या आहे. मात्र तरीही इथल्या मानवी जीवनानेही या समस्येत हातभार लावण्याचे काम केलेय. माथेरानमध्ये ५४ किलोमीटर लांबीचे कच्चे रस्ते आहेत. हे रस्ते माती आणि दगडांचा वापर करून  बनवले जातात. मात्र पावसाळ्यात हे रस्ते पुन्हा वाहून जातात. दर वर्षी हजारो टन मातीचा वापर करून रस्ते नव्याने बनवले जातात. ही माती वनक्षेत्रातून काढली जाते. याचा परिणाम इथल्या वनसंपत्तीवर होतो. माती काढल्याने झाडांची मुळे उघडी पडतात. परिणामी ही झाडे कालांतराने कोलमडून पडतात.
माथेरानमधील घोडेदेखील या समस्येत भर घालत असल्याचे जाणकार सांगतायत. घोडय़ांच्या लीदमध्ये असणारे घातक घटक मातीवर रासायनिक प्रक्रिया करतात, त्यामुळे मातीची घट्ट चिकटून राहण्याची क्षमता कमी होते. याचा परिणाम थोडय़ा पावसातही माती वाहून जाण्यास सुरुवात होत असल्याचे पर्यावरणवादी सांगतात.
जमिनीची धूप रोखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. माथेरानमधील वाहून जाणारी माती रोखण्यासाठी छोटे बंधारे उभारणे गरजेचे आहे. मातीच्या रस्त्यांऐवजी पेव्हर ब्लॉक्सचा वापर करून रस्त्यांची निर्मिती करणे गरजेचे आहे, तर भूस्खलन होणाऱ्या ठिकाणांवर रीटेनिंग वॉल्स उभ्या करणे गरजेचे आहे. त्यासाठी वनविभागाला १२ ते १५ कोटींचा खर्च येणार आहे. माथेरानचे पर्यावरणीयदृष्टय़ा असलेले महत्त्व जाणून याबाबतीत तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. यासाठी माथेरानसाठी विशेष निधीची गरज लागणार आहे, अन्यथा पर्यटकांच्या आवडत्या माथेरानचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. माथेरानच्या अस्तित्वाच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर आहे. याकडे नगरपालिका आणि राज्य सरकारने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र माथेरान इकोसेन्सिटिव्ह झोन असल्याने यातही अडचणी येत आहेत. माथेरानमधील सॉईल इरोजनचे घातक परिणाम नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावरही होणार आहे, तर यापुढच्या काळात माथेरानमधील रस्ते पेव्हर ब्लॉक्स अथवा त्यासारख्या घटकांपासून बनवले गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी दिलीय.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो