गोदावरी खोऱ्यात राष्ट्रवादीने खेळला डाव
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गोदावरी खोऱ्यात राष्ट्रवादीने खेळला डाव
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गोदावरी खोऱ्यात राष्ट्रवादीने खेळला डाव Bookmark and Share Print E-mail

नगर-नाशिक विरूद्ध औरंगाबाद वादातून पेटविले पाणी
अशोक तुपे, श्रीरामपूर

नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणी जायकवाडी धरणात सोडताना सर्व सहमतीने निर्णय होणे अपेक्षित असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी भर पावसाळ्यात काडी टाकून पाणी पेटविले. त्यामुळे धरणांच्या लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या कालवा सल्लागार समित्या बाधित झाल्या. त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असून नगर-नाशिक विरुद्ध औरंगाबाद असा वाद लावण्याचा डाव खेळला गेला आहे. जलसंपदा विभागातील गैरप्रकारांचा मुद्दा राज्यात गाजत असतानाच आता पाणी-प्रश्नावर भावनिक वातावरण तयार करून प्रादेशिक वाद आणखी वाढवला जात आहे. लोकांच्या रोषाचा भडका उडाला, त्यातून आंदोलने उभी राहिली की तापलेल्या तव्यावर राजकारण्यांची पोळी भाजली जाईल पण, शेतकऱ्यांची त्यात होरपळ होईल हे बघितले गेले नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही वादात ओढून पुढे त्यांची मजा पाहता येईल, असे डावपेच या राजकारणामागे आहे. राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी तालुक्या तालुक्यात तयार झालेला पाणी- संघर्ष मोठय़ा कौशल्याने सोडविला. त्यांच्याच संकल्पनेतून कालवा सल्लागार समित्या उदयाला आल्या. त्यांचे अस्तित्व राष्ट्रवादीचेच मंत्री जयदत्त क्षीरसागर व छगन भुजबळ हे नाकारू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्याही आमदारांची कुचंबणा सुरू झाली आहे.
जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा अवघा पावनेदोन टीएमसी एवढा आहे. औरंगाबाद शहराला वर्षभर पाणी पुरवण्यासाठी दहा हजार दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीत सोडण्याचा प्रस्ताव औरंगाबादच्या आयुक्तांनी दिला. निळवंडे व भंडारदरा धरणाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादीचे आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत झाली. निळवंडे धरणातून ४ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडावे लागेल, असे थोरात यांनी सांगितले. पिण्यासाठी पाणी देण्यास सदस्यांनी विरोध केला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्णय करण्यापूर्वी कालवा सल्लागार समितीला विश्वासात घ्यावे असा ठराव करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या  बैठकीत मंत्री क्षीरसागर यांनी जायकवाडीत पाणी सोडण्यावरून वाद घातला. धरणातील पाण्यावर कुणाचा अधिकार, असा मुद्दा उपस्थित केला. भुजबळ यांनी त्यांची री ओढली. राष्ट्रवादी राजकारण करीत असताना औरंगाबादचे पालकमंत्री असल्याने थोरात स्वस्थ बसले. विखे यांची कोंडी झाली. एकमेकांना शह देण्याचा देत असला तरी, त्यामुळे नगर जिल्ह्यात मात्र असंतोषाचा भडका उडेल याचे भान कुणालाच राहिले नाही.
निळवंडे धरणातून ४ टीएमसी, मुळा धरणातून ३ टीएमसी व दारणा, गंगापूर धरणातून प्रत्येकी ३ टीएमसी असे १० टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. वास्तविक औरंगाबाद शहराला पाण्याची किती गरज आहे, मुळातून नगरला, दारणा-गंगापूरमधून शिर्डी, कोपरगाव तसेच नाशिकला, भंडारदरातून संगमनेर, श्रीरामपूर या शहरांना वर्षभराकरिता पिण्यासाठी किती पाणी राखीव ठेवायचे, शेतीकरिता या धरणातून किती आवर्तने द्यावयाचे याचा अहवाल नाशिक व औरंगाबादचे आयुक्त, तसेच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी मुख्य सचिवाला सादर करून त्यानंतर कालवा सल्लागार समितीला विश्वासात घेऊन पाणी कधी व केव्हा सोडायचे याचा निर्णय करणे अपेक्षित होते. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर सर्वसहमतीने पाणी सोडण्याचा निर्णय करणे अपेक्षित होते. तसे न करता बैठकीत केवळ चर्चा घडवून आणून वादाला तोंड फोडले गेले. आता काँग्रेस, राष्ट्रवादी व सेना-भाजपच्या डझनभर आमदारांची आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांपुढे जाताना मोठी कुचंबणा होणार आहे. वास्तवाचे भान मंत्र्यांनी न ठेवता केवळ काडी टाकण्याचा उद्योग केला त्यातून पाण्याचा भडका तर उडेल पण प्रादेशिक वादाच्याही झळा बसतील.
प्रवरा व गोदावरी खोऱ्यात पाणी संघर्ष पेटला. श्रीरामपुरला लाठीमार तर कोपरगावला गोळीबार झाला त्यावेळी १९८६ साली शरद पवार यांनी सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख नेते, विरोधी पक्षाचे नेते यांच्या बैठका घेतल्या. तालुकानिहाय पाणीवाटप केले. कालवा सल्लागार समित्या स्थापन केल्या. या समित्या धरणातील पाण्याचे वर्षभराचे नियोजन करतात. नियोजन कोलमडले, एखाद्या नेत्याने सत्तेचा गैरवापर करून आपल्या भागात जादा पाणी नेले तर जलसंपदामंत्री व मुख्यमंत्री हस्तक्षेप करतात. वर्षांनुवर्षांची ही परंपरा आहे. ती मोडीत काढण्याचे काम राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांनी चालविले असुन त्यामागे मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा डाव आहे.
नाशिक शहराला ३ टीएमसीपेक्षा जास्त पाणी लागते. शेतीचे पाणी काढून शहराला पाणी दिले असे नाही, तर सिन्नरला इंडिया बुललाही पाणी दिले. तेव्हाही कालवा सल्लागार समितीला विश्वासात घेतले गेले नव्हते. मराठवाडय़ाचे पाणी कमी होत असताना आज काडय़ा टाकणारे नेते गप्प होते. शहरी भागात पाणी कपात न करता केवळ शेतीचे पाणी कमी केले जात आहे. जायकवाडीतील गाळ काढण्याची संधी यंदा आली होती. मेरीटाईम बोर्डाकडे ड्रेझर असून त्याच्या सहाय्याने गाळ काढणे शक्य होते.
गाळ काढून दोन महिन्यानंतर जायकवाडीत पिण्यासाठी पाणी सोडायला कुणाचीही हरकत नाही. पण मुळ प्रश्नाला बगल देऊन केवळ संघर्ष उभा कसा राहील, हेच पाहिले जात असुन दोन पक्षाच्या राजकारणात शेतकरी भरडला जाईल.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो