रविवार विशेष : कष्टकरी समाजाचा साहित्यिक
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> रविवार विशेष : कष्टकरी समाजाचा साहित्यिक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार विशेष : कष्टकरी समाजाचा साहित्यिक Bookmark and Share Print E-mail

सायमन मार्टिन, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२

प्रसिद्ध साहित्यिक शंकर सखाराम यांचे नुकतेच निधन झाले. ‘गावदरणी’ आणि  ‘घरपरसू’ या ललित निबंधांच्या पुस्तकात त्यांनी आपला समाज, बोलीभाषा, त्यांच्या चालीरीती आणि एकूण संस्कृती शब्दबद्ध केली आहे, जी यापूर्वी कधीही मराठी साहित्यात इतक्या टोकदारपणे आली नव्हती.‘सेझ’ ही कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखनप्रवासातला महत्त्वाचा टप्पा होता. शंकर सखाराम यांची आठवण याचसाठी ठेवायची की, त्यांनी आपल्या लोकांना आवाज दिला..


लेखक शंकर सखाराम मागील वीस वर्षांपासून माझे मित्र होते. मात्र त्यांच्या मृत्यूची बातमी वृत्तपत्रात वाचली. आम्ही फारच कमी वेळा भेटलो. भेटल्यावर ते म्हणायचे, ‘अरे, इतक्या जवळ राहतो आपण, पण वर्षांनुवर्षे भेट नाही.’ त्यांच्याशी झालेली पहिली भेट आठवते. वयाने ते माझ्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी वडील होते. तरीही पहिल्या भेटीतच आम्ही एकेरी नावाने संबोधू लागलो. त्यामुळे असेल कदाचित, पण आमच्यातले मैत्रीचे बंध पहिल्या दिवसापासून घट्ट झाले.
अलिबागमधील कोपर हे त्यांचे मूळ गाव. चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी आपल्या लेखनात नष्ट होत जाणाऱ्या समाजाचं चित्र रेखाटलं. शंकर सखाराम हे आगरी समाजातून आले होते. समाजाला लेखक हवे असतात, कारण ते भविष्यात येणाऱ्या संकटांची जाणीव करून देतात. लेखक समाजाला मागे वळून पाहायला लावतात. लेखकाच्या हातात जो आरसा असतो त्यात डोकावून पाहिल्याने आपलं खरं चित्रं दृष्टीस पडते.
लेखनासंबंधी बोलताना शंकर सखाराम एकदा म्हणाले होते, ‘आपला कष्टकरी समाज. आपल्याला लेखनाची परंपरा नाही, पण आपण नाही लिहिलं तर लिहिणार कोण?’ त्याच ऊर्मीतून त्यांनी आपल्या समाजाची सुखदु:खे शब्दबद्ध केली. ‘गावदरणी’ आणि  ‘घरपरसू’ या ललित निबंधांच्या पुस्तकात त्यांनी आपला समाज, बोलीभाषा, त्यांच्या चालीरीती आणि एकूण संस्कृती शब्दबद्ध केली आहे, जी यापूर्वी कधीही मराठी साहित्यात इतक्या टोकदारपणे आली नव्हती. ज्यांचे पाय आपल्या मातीत, संस्कृतीत घट्ट रोवलेले असतात तेच वैश्विक सत्य मांडू शकतात. प्रत्येक समाजाची काही बलस्थाने असतात, काही वैगुण्येही असतात. शंकर सखाराम यांनी आपल्या लेखनात ते सारं आणलं. धर्म अनेक आहेत व जातीउपजातीत आपण विभागलेलो आहोत. या विविधतेतच आपलं महावस्त्र विणलेलं आहे. त्यात सौंदर्य आहे. मात्र आपल्या वेगळेपणाचा वापर इतरांना कमी लेखण्यासाठी किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्यासाठी होऊ नये. तसे जेव्हा होते तेव्हा समाजाच्या चिरफळ्या उडालेल्या असतात. ‘भूक’, ‘कोसलन’, ‘सायादान’ आदी लेखनांतून त्यांनी त्यांच्या आजूबाजूचा परिसर शब्दांकित केला. ‘आगरी- कोळी समाजातील दुर्मिळ वस्तूंचा कोश’ हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले.
एक समाज, एक भाषा, एक संस्कृती करण्याचा कट पद्धतशीरपणे राबवला जात आहे. कुठलाही चेहरा नसलेला, केवळ ग्राहक असलेला असा हा समाज आहे. आज मानवसमूहात जी असुरक्षितता व भय व्यापून राहिलेलं आहे, त्याचं कारण त्यांची मुळं कापून टाकण्याचा जो प्रयत्न होत आहे त्यात आहे. याचा परिणाम म्हणून जातीची बंधनं घट्ट होताना दिसत आहेत. ज्ञातीच्या स्नेहसंमेलनात वाढ होत असून माणसांचा प्रवास जातीयवादाकडे, असहिष्णू होण्याकडे होत आहे.
राजकीय पक्ष स्वार्थ साधण्यासाठी जातीपातीच्या अस्मितांना पद्धतशीरपणे खतपाणी घालत आहेत. परिणाम एवढाच झाला आहे की, एक मानवसमूह म्हणून आपण जो पल्ला गाठायचा तेथपर्यंत आपली वाटचाल होऊ शकत नाही. आपण वेगवेगळ्या वळणांवर अडकून पडलेलो आहोत. गाडीचे रूळ समांतर धावत असतात, पण ते कधीच एकमेकांना भेटत नाहीत. तसं माणूस म्हणून आपलं भेटणं थांबलं आहे. आपलं असं दुभंगलेपण, आपलं छिन्नविच्छिन्नपण देशाला मागे घेऊन जात आहे. जुन्या प्रथा-पद्धतींचं पुनरुज्जीवन मोठय़ा प्रमाणात होत आहे. माणसाला गुलाम बनवण्याची ही प्रक्रिया आहे, हे समजण्याचं भान आपलं सुटलं आहे. गर्भातच मुलींना मारणारे पालक आणि ऑनर कििलगला पाठिंबा देणारा समाज ही विषारी फळं आपल्या अस्तित्वालाच नख लावत आहेत. लेखकाने हे सारे धोके ओळखले पाहिजेत. माणूसपण हिरावून घेणाऱ्या अरूपाविरोधात त्याचा लढा असला पाहिजे. एका मर्यादित अर्थाने शंकर सखाराम यांनी आपली भूमिका पार पाडली आहे.
आगारातली माणसं व बलुतेदार ही प्रकल्पग्रस्तांची शब्दचित्रे शंकर सखाराम यांनी अति संवेदनशीलतेने लिहिली, कारण एका महाप्रलयात या जमातींना लागलेलं ग्रहण त्यांनी पाहिलं आणि अनुभवलं.
१९८० नंतर देशभर नागरीकरणाची लाट आली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे लगतच्या ठाणे, रायगड जिल्ह्य़ांत जमिनीला सोन्याचे भाव आले. येथल्या कष्टकरी समाजाकडे विशेष शिक्षण नव्हतं आणि त्यांना या काळात मार्गदर्शन नव्हतं. ज्यांनी मार्ग दाखवायचा तेच जमिनीचे दलाल, त्यांच्याच हाती सत्तेच्या चाव्या. त्यामुळे कधी फसवणुकीने, तर कधी दमदाटी करून, उतारे फिरवून गोरगरिबांच्या जमिनी कवडीमोलाने विकल्या गेल्या, हडप केल्या गेल्या.
नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ातल्या अनेक गावांत तेव्हा गळ्यात सोन्याचे दोरखंड, हातात भलेमोठे कडे, प्रत्येक हातात एक अंगठी, डोळ्याला गॉगल, डोक्याचा चमनगोटा आणि संपूर्ण सफेद कपडय़ातले; जमिनी विकून आलेल्या पैशावर मौजमजा करणारे तरुण दिसायचे. तेव्हा ‘महिंद्रा’ कंपनीची आर्माडा ही जीप मार्केटमध्ये आली होती. ती अनेकांच्या दारापुढे उभी असायची. दिवसभर टवाळकी आणि संध्याकाळी गावातीलच टवाळांना गोळा करून गावालगतच भूछत्र्याप्रमाणे उभ्या राहिलेल्या बारमध्ये जलसा व्हायचा. रात्री दीड-दोन वाजेपर्यंत हंगामा चालायचा. तलाठी, सर्कल, महसूल खात्याचे अन्य कर्मचारी, पोलिसांतली मंडळी त्यात सामील असायची. हाती आलेला पैसा संपून गेला. दारापुढच्या गाडय़ा कधी लुप्त झाल्या हे कळलं नाही. गळ्यातले दागिने गहाण पडले. वेळ अशी आली की, बायकोचं मंगळसूत्रदेखील विकावं लागलं. दरम्यानच्या काळात काही एड्सने तर काही लिव्हर सिरॉसिसने अकाली गेले. बायका तरुण वयात विधवा झाल्या आणि मुलं अनाथ झाली. ही उलथापालथ साहित्यात चित्रित झाली का? उघडय़ा डोळ्याने एक शिक्षक म्हणून शंकर सखाराम हे सारं पाहात होते. त्यांनी आपल्या लेखनांत हा विनाश शब्दबद्ध केला.
‘जमिनी विकू नका, संपून जाल,’ असा सल्ला देणारा कोणी भेटला असता तर गावं वाचली असती आणि कुटुंबाची धूळदाण झाली नसती. वसईत आम्ही लोकचळवळीद्वारे अर्निबध नागरीकरण आणि भूमाफियांच्या विरोधात चळवळ उभारली. त्यामुळे येथल्या जमिनी काही प्रमाणात वाचल्या, झाडं जागेवर राहिली, सावली हरवली नाही. शंकर सखाराम भेटल्यावर म्हणायचे, वसईचा प्रयोग देशभर व्हायला हवा. ते स्वत: मात्र गप्प बसले नाहीत. त्यांच्या हातात असलेल्या लेखणीच्या साहाय्याने त्यांनी आपल्या गावाची दैना शब्दबद्ध केली.
आज गावागावांत पोस्टरपुरते जे लोकनेते उदयाला आले आहेत, त्यातील बहुतेकांच्या माथ्यावर पिढी गारद करण्याचा शाप आहे. जे घडलं, जे घडत आहे त्याचं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण होत नाही. लिहिणारे सावध भूमिका घेतात. पुन्हा साहित्य संमेलनाचे आयोजक असे लोकनेते असतात.
‘सेझ’च्या निमित्ताने रायगड जिल्हा धुमसू लागला होता. सर्वसामान्य शेतकरी आपल्या काळजाचा तुकडा असलेली जमीन हिसकावली जात आहे, म्हणून जिवाचा आकांत करीत होते. दुसरीकडे कॉर्पोरेट माफिया आणि त्यांचे पगारी दलाल विकासाची आवई उठवत होते. आंदोलन ऐन भरात असताना शंकर सखाराम यांनी ‘सेझ’ नावाची कादंबरी लिहिली. रायगडच्या आंदोलनाला त्याचा लाभ झाला. या कादंबरीचे इतर भाषांत अनुवाद झाले.
‘सेझ’ ही कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखनप्रवासातला महत्त्वाचा टप्पा होता. यालाच लेखकाचं पलीकडे जाणं म्हणतात. आपण छोटे लेखक असतो, आपलं लेखन मागे उरेल की नाही, हा प्रश्न गौण असतो, मात्र योग्य वेळ येते तेव्हा आपण जी भूमिका घेतो त्यामुळेच आपला कस सिद्ध होतो.
शंकर सखाराम यांची आठवण याचसाठी ठेवायची की, त्यांनी आपल्या लोकांना आवाज दिला, शब्द दिले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो