क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या पाच बुकींना अटक
|
|
|
|
|
प्रतिनिधी मुंबई श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या २०-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी सट्टा लावणाऱ्या पाच जणांना चारकोप पोलिसांनी अटक शनिवारी अटक केली.
कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर येथील वसंत आराधना इमारतीमध्ये क्रिकेट स्पर्धेवर सट्ट लावण्यात येत असल्याची माहिती चारकोप पोलिसांना मिळाली. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यासाठी सट्टा लावण्यात येणार होता. पोलीस उपायुक्त महेश पाटील यांचे विशेष पथक आणि चारकोप पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून या इमारतीबाहेर सापळा रचला होता. शनिवारी सकाळी पोलिसांनी या इमारतीमध्ये धाड घालून सट्टा लावणाऱ्या दिलेश दमाणी (३२), दिवेश नथवानी (३१), विवेक मेदिप्रसाद सिंग (२९), समीर मोहम्मद हुसेन शेख (३२) आणि मोहम्मद परवेझ हुसेन शेख (३) या पाच बुकींना अटक केली. आरोपिंकडून सात मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी कुख्यात बुकी धर्मेश व्होरा येथे हजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र उपायुक्त महेश पाटील यांनी या वृत्ताचा इन्कार केला. |