विदर्भातील शो-रूममधील चोरीच्या वाहनांची विक्री
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> विदर्भातील शो-रूममधील चोरीच्या वाहनांची विक्री
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विदर्भातील शो-रूममधील चोरीच्या वाहनांची विक्री Bookmark and Share Print E-mail

* आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांना कारवाईचा धाक, * पोलीस अधिकाऱ्यांनी उकळले पंधरा लाख रुपये
प्रतिनिधी , चंद्रपूर
वरकमाईचे वखार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवून तपास पथकातील अधिकाऱ्यांनी आतापर्यंत पंधरा लाख रुपये उकळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत.
विदर्भातील शो-रूममधील वाहनांची चोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याची विक्री करणारी टोळी अमरावती येथे पकडल्यानंतर त्याचा थेट संबंध येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात असल्याचे तपासात समोर आले. त्याच आधारावर अमरावती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास रामनगर पोलिसांकडे वळता केला. या प्रकरणी आतापर्यंत दलाल, शो-रूम व्यवस्थापक, आरटीओ कार्यालयातील लिपीक, अशा नऊ जणांना अटक करण्यात आलेली आहे, मात्र तपास पथकातील अधिकारी केवळ पैसे उकळण्यासाठी परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याची माहिती आता समोर आली आहे. या तपास पथकातील एक परिविक्षाधीन अधिकारी, रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व कॉस्टेबलचा समावेश आहे.
आरटीओ कार्यालय म्हणजे वरकमाईचे वखार, असे म्हटले जाते. त्यामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवला तर चांगले पैसे उकळता येतील, ही कल्पना तपास पथकातील अधिकाऱ्यांना सुचली. त्याच आधारावर सहायक उपप्रादेशिक अधिकारी, वाहन निरीक्षक, सहायक वाहन निरीक्षकांना तपासात सहकार्य करा अन्यथा कारवाई करू, अशी तोंडी धमकी पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईचा धाक दाखवून आतापर्यंत या पथकाने १५ लाख रुपये उकळले आहेत. केवळ अधिकारीच नाही, तर कार्यालयीन लिपीक लक्ष्मण तामडे यांना अटक केल्याने कर्मचाऱ्यांच्या वर्तुळातही खळबळ उडाली आहे. नेमका त्याचाच फायदा तपास पथकातील घेत आहेत. तपासी अधिकारी एकेका अधिकाऱ्यांना व्यक्तिगतरित्या गाठून तुमचेही नाव यादीत आहे, असे म्हणून घाबरवत आहेत. त्यामुळे परिवहन कार्यालयातील अधिकारी बेचैन आहेत. आपले नाव आले तर कसे, त्यामुळे नाव येण्यापूर्वीच तपास अधिकाऱ्यांना मॅनेज करण्यासाठी म्हणून संपर्क साधत आहे. नेमका त्याचाही फायदा या पथकातील अधिकारी घेत आहेत.
या तपास पथकाने आतापर्यंत सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदे, वाहन निरीक्षक तुकाराम सपकाळ, दिलीप कुकडे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या तिघांनाही तुमचे नाव आघाडीवर असल्याने यातून सुटका करायची असेल तर आर्थिक वजन खर्च करा, असा अप्रत्यक्ष निरोपही तपास पथकाने दिला. याच आधारावर कार्यालयातील इतरही अधिकाऱ्यांना अशाच प्रकारे तोंडी आदेश देऊन चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र काही अधिकारी तपासाला समोरच गेले नाही, तर दोघे जण रजेवर गेले आहेत. परिवहन कार्यालयातील हा अनागोंदी कारभार बघून परिवहन अधिकारी प्रकाश गुंडावार त्रस्त झाले आहेत. आठवडय़ाभरापासून गुंडावार सकाळी कार्यालयात येत असले तरी बैठकीच्या नावावर दिवसभर कार्यालयातून बेपत्ता राहत आहेत. तपासी अधिकाऱ्यांनी आता गुंडावार यांनाही धमकावणे सुरू केले आहे. दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा, निर्दोष अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, असे गुंडावार यांनी यापूर्वीच पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले, परंतु केवळ वरकमाईसाठीच गुंडावार यांनाही पथकातील अधिकारी त्रास देत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे लवकरच तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दोघांना अटक
वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करण्याप्रकरणी युनायटेड टेलिकॉम लि. या कंपनीच्या दोन लिपिकांना पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कंपनीकडे वाहन परवाना देण्याचे काम आहे. या कंपनीचे लिपीक दीपक खाडीलकर, रवी नेवलकर आरटीओ कार्यालयात बसतात. या दोघांचाही बनावट कागदपत्रे प्रकरणात सहभाग असल्याचा तपासी अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे मासे अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो