नेतृत्वक्षमता जोपासा
मुखपृष्ठ >> लेख >> नेतृत्वक्षमता जोपासा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नेतृत्वक्षमता जोपासा Bookmark and Share Print E-mail

प्रशांत दांडेकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
alt

नेपोलियन बोनापार्ट याचे प्रसिद्ध वचन आहे- ‘अ लीडर इज अ डीलर इन होप.’ याचा अर्थ जो मनुष्य आपली स्वप्ने इतरांना त्यांचीच स्वप्ने आहेत, हे पटवून देऊ शकतो, तोच खरा नेता. उदाहरण द्यायचे झाले तर शिवाजींचे स्वराज्याचे स्वप्न, गांधीजींचे स्वातंत्र्याचे स्वप्न जेव्हा त्यांचेच न राहता सर्व जनतेचे झाले तेव्हा या दोघांच्या नेतृत्वगुणांवर शिक्कामोर्तब झाले.
करिअरच्या एव्हरेस्टवर पोहोचण्यासाठी नेतृत्वगुणांची शिडी आपल्याकडे असणे नितान्त गरजेचे असते. नेतृत्वगुण म्हणजे नेमके काय, हे आपण आज जाणून घेऊया.
दूरदृष्टी : नेतृत्वगुण असणाऱ्या व्यक्तीमध्ये दूरदृष्टी असते आणि जो नेता   ती प्रत्यक्षात/ वास्तवात रूपांतरित करू शकतो तो यशस्वी नेता बनतो. उदा. रतन टाटांचे छोटय़ा, मध्यमवर्गीय लोकांना परवडणाऱ्या कारच्या- नॅनोच्या प्रत्यक्षात उतरलेल्या स्वप्नामुळे यशाचा एक आगळा मापदंड निर्माण केला.
सृजनशीलता, वेगळ्या धाटणीचा विचार : नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्या व्यक्तीची सृजनशीलता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अ‍ॅपल कंपनीचे स्टीव्ह जॉब्स. गमतीने असे म्हटले जाते की, अ‍ॅडम-ईव्हचे अ‍ॅपल, न्यूटनचे अ‍ॅपल व स्टीव्ह जॉब्सचे अ‍ॅपल या तिघांनी मनुष्याचे आयुष्यच पूर्णपणे बदलून टाकले.
शांततेने समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे : Listen आणि silent  हे दोन शब्द नीट पाहा. यातील अक्षरांची अदलाबदल केल्यास हे दोन शब्द तयार होतात. नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तीचे तिसरे वैशिष्टय़ म्हणजे तो शांतपणे भोवतालच्या व्यक्तींचे अथवा परिस्थितीचे निरीक्षण करत असतो आणि त्याचबरोबर लोकांच्या समस्या तसेच इच्छा ऐकत असतो. यामुळेच तो भोवतालच्या व्यक्तींची वा परिस्थितीची नस नेमकी पकडू शकतो. याच अतृप्त इच्छांना तो नेता मग स्वप्नांचे पंख देतो.
पूर्वानुमान काढण्याची क्षमता : नेत्याचे पुढील वैशिष्टय़ म्हणजे आपत्कालीन परिस्थिती ओढवण्याआधीच त्याला समस्येची चाहूल लागते आणि तो त्या समस्येचे निराकरण कसे करता येईल, यासंबंधी पावले उचलतो. म्हणजेच कोणताही हुशार नेता हा तहान लागल्यावर विहीर खणायला घेत नाही. संभाव्य धोक्याचे/ अडचणींचे पूर्वानुमान काढून लगेच त्यावर उपाययोजना करणारी व्यक्ती यशस्वी ठरते.
चारित्र्य, वर्तणूक : चारित्र्य हे त्या नेत्याचे महत्त्वाचे आयुध असते. म्हणतात ना, बुद्धिमत्ता असणे ही दैवाची देणगी असते, पण चारित्र्य हे मनुष्याने केलेली निवड असते. उत्तम नेता बनण्यासाठी तुमचं इतरांशी वागणं-बोलणं, नातेसंबंध या सर्व गोष्टी परिणाम करणाऱ्या ठरतात. तुम्हाला नेता मानणाऱ्यांची मने जिंकणे वा त्यांचा विश्वास जिंकणे हेही यामुळे शक्य होते. याउलट, एखाद्या नेत्याच्या चारित्र्याविषयीचे गॉसिप त्याला महागात पडू शकते. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीवरच याचे सावट पसरू शकते.  
करिश्मा : एखाद्या नेत्याचा जेवढा करिश्मा अधिक, तेवढा तो जास्त यशस्वी, असे सोपे सरळ समीकरण असते. तो करिश्मा हा त्या नेत्यामध्ये असलेल्या अजोड गुणांमुळे असतो. तो गुण म्हणजे त्याचे बलस्थान असते. त्या गुणावर इतर लुब्ध असतात. स्वत:मध्ये असलेला असा विलक्षण गुण ओळखणे आणि तो जोपासण्याची जबाबदारी त्या नेत्याला निभावावी लागते.
आपल्यावर सोपवलेल्या कामाशी बांधिलकी(Commitment) : हे  नेतृत्वगुण अंगी असलेल्या व्यक्तीचे आणखी एक वैशिष्टय़ असते. या कमिटमेन्टमुळे प्रत्यक्ष कृती करणारे आणि नुसताच वाचाळपणा असणारे यांच्यातील फरक जाणवतो. कार्यकुशल नेता हा त्याच्या कामात नेहमी चोख असतो.
संवादकौशल्य : नेत्याला आपले विचार, स्वप्न, ज्ञान इतरांसमोर व्यक्त करता येणं आवश्यक आहे. त्यासाठी नेत्याकडे संवादाचे कौशल्य असणे आवश्यक असते. संवादाद्वारे तो नेमकेपणाने आपले विचार समोरच्याकडे व्यक्त करू शकतो आणि त्याद्वारेच तो अनुयायांमध्ये जोश, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण करू शकतो. अनेक राजकीय नेत्यांच्या भाषणामध्ये अशा प्रकारचे भावनिक आवाहन करण्याचे कौशल्य असते आणि त्याला भाळून लोक त्या नेत्याच्या वळचणीला जातात.
औदार्य : अलीकडेच एका चर्चच्या फलकावर लिहिलेले वाक्य वाचनात आले. त्यावर लिहिले होते- Your candle loses nothing when it lights another. या उक्तीनुसार नेत्याचे आचरण असेल तर समोरून तशीच प्रतिक्षिप्त क्रिया त्याला अनुभवता येते. इतरांच्या अडअडचणीत त्यांच्या मदतीला धावून गेल्याने तुम्ही इतरांना उपयोगी पडताच, त्याचबरोबर तुमचीही पत वाढते. जेव्हा तुम्ही इतरांना/ समाजाला काही देता, ते नेहमीच लोकांच्या मनात रुजू होत असतं.
पुढाकार घेणे : ‘लीडरशिप इज अ‍ॅक्शन अ‍ॅण्ड नॉट अ पोझिशन’ असे म्हटले जाते. याचाच अर्थ असा की, केवळ हुद्दा आहे, म्हणून कोणीही नेता बनत नाही, तर तुमच्या कृतीतून, एखाद्या निर्णयातून, प्रकल्प राबवताना घेतलेल्या पुढाकारातून तुमचे नेतृत्व दिसून येत असते.
नि:स्पृहता : नेत्याने नेहमीच रामशास्त्रींसारखे नि:स्पृह असावे. अजाणतेपणेही कोणावर अन्याय होणार नाही, पक्षपात केला जाणार नाही, यासाठी दक्ष असणे हे नेत्याचे आद्यकर्तव्य असते.
निर्णयावर ठाम राहणे : आणखी एक गुण अंगिकारणे नेत्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. तो असा की, नेत्याने आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहावे. हिटलरचे प्रसिद्ध वचन आहे- ‘निर्णय घेण्याआधी हजारवेळा विचार करा. मात्र एकदा निर्णय घेतला की हजारो अडचणी आल्या तरी तो निर्णय बदलू नका.’ घेतलेल्या निर्णयाबाबत धरसोडवृत्ती नसावी, हेच यशस्वी नेत्याचे वैशिष्टय़ असते.
आपण खरोखरच नेता होण्यास पात्र आहोत का, यासाठी खालील लिटमस टेस्ट तुम्हाला स्वत:च्या मनाशी करता येईल- जर तुमची कृती ही इतरांना स्वप्नं बघण्याची, नवं काहीतरी शिकण्याची वा, नवं काहीतरी करण्याची प्रेरणा देत असेल, तर अर्थातच तुम्ही नेते असता.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो