लालकिल्ला : जहन्नुम से जन्नत तक!
मुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : जहन्नुम से जन्नत तक!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लालकिल्ला : जहन्नुम से जन्नत तक! Bookmark and Share Print E-mail

सुनील चावके, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पृथ्वीतलावरील काश्मीरच्या नंदनवनाने गेल्या वीस वर्षांत नरकयातना भोगून ‘जहन्नुम’ काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. आज क्षणिक का असेना, तिथे पुन्हा ‘जन्नत’ अवतरली आहे. ती टिकवून ठेवण्याचे आव्हान राज्यकर्त्यांपुढे आहे..
राहुल गांधी यांच्या पुढाकाराने श्रीनगरमध्ये काश्मीर विद्यापीठाचे सुमारे दीड हजार निवडक उच्चविद्याविभूषित विद्यार्थी रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला, दीपक पारेख, राजीव बजाज, अशोक रेड्डी यांच्यासारख्या आघाडीच्या उद्योजकांशी काश्मीरच्या आर्थिक विकासाविषयी संवाद साधत असताना जुम्म्याच्या नमाजाचा मुहूर्त साधत फुटीरवादी गटांनी अस्वस्थ व बेरोजगार तरुणांना उत्तेजित करून सभागृहाबाहेरचा माहोल तापविण्याचा प्रयत्न केला.


पण पाकिस्तान, मुल्ला उमर आणि सईद अली शाह गिलानींच्या समर्थनार्थ त्यांनी दिलेल्या घोषणांचा कवडीचाही परिणाम झाला नाही. दोन वर्षांपूर्वी याच श्रीनगरमध्ये असंतोषाची छोटीशी ठिणगी पडायचाच अवकाश की फुटीरवाद्यांच्या इशाऱ्यावरून रस्त्यांवर उतरून सार्वजनिक मालमत्ता नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुण बेभानपणे दगडफेक आणि जाळपोळ करीत सुटायचे. १९९० पासून पाकपुरस्कृत दहशतवादातून सुरू झालेला उग्र िहसाचार सप्टेंबर २०१० मध्ये असा भीषण उग्रवादाचा कळस गाठत असताना काश्मीर खोऱ्याचे भवितव्य अंधकारमय झाले होते. पण अवघ्या दोन वर्षांमध्ये परिस्थिती नाटय़मयरीत्या बदलली. परिस्थिती चिघळण्यास कारणीभूत ठरलेले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि सात लाख सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तैनातीने काश्मीरवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्र सरकारने सकारात्मक आणि वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारून तत्परतेने ‘फुंकर’ घालणारी पावले उचलली. बेरोजगार तरुणांना उग्र व िहसक निदर्शनांसाठी भडकविण्याचा उद्योग अंगलट येऊ शकतो, याची जाणीव झाल्याने फुटीरवाद्यांना त्यांची बारमाही असंतोषाची दुकाने तात्पुरती का होईना, बंद करणे भाग पडले. या परस्पर ‘सामंजस्या’मुळे २०११ च्या मोसमात काश्मीर खोऱ्यात दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली आणि शापित नंदनवनात शांततेची ‘पुनस्र्थापना’ झाल्याचा जगाला संदेश दिला. त्यापाठोपाठ यंदा काश्मीर खोऱ्यात पर्यटनाचा मोसम अक्षरश: हाऊसफुल्ल ठरला. मोसम शिगेला पोहोचला असताना श्रीनगर, पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्गमध्ये तर हॉटेल्स आणि अतिथिगृहांमध्ये पर्यटकांना पाय ठेवायलाही जागा नव्हती. सलग वीस वर्षांपासून दहशतवाद आणि फुटीरवाद्यांच्या हिंसाचारात होरपळणाऱ्या काश्मीर खोऱ्याला आपल्या अमर्याद क्षमतेचा गेल्या दोन वर्षांपासून नव्याने परिचय घडला. चालू वर्षांत काश्मिरात दाखल झालेल्या पर्यटकांचा आकडा वीस लाखांवर पोहोचल्याचे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यंदाच्या मोसमातील पर्यटकांची संख्या आणि पर्यटन उद्योगाने केलेली कमाई ही गेल्या ५० वर्षांतील विक्रम ठरल्याचा त्यांचा दावा आहे. जिथे स्थानिक निवासीही दहशतवाद आणि िहसाचारामुळे भयकंपित व्हायचे, त्या श्रीनगरच्या रस्त्यांवर आज रात्री अकरा-बारा वाजता देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले पर्यटक बिनधास्तपणे फिरताना दिसतात. दोन वर्षांपूर्वी दगडफेकीच्या घटनांचे उगमस्थान असलेल्या जुन्या श्रीनगरच्या गल्ल्याबोळांमधील घरे अनोळखी पर्यटकांसाठी स्वस्त दरातील अतिथिगृहे म्हणून सजू लागली आहेत. गालिचे व हस्तकलेच्या असंख्य आकर्षक दुकानांनी जुन्या श्रीनगरमधील रस्ते गजबजले आहेत. दोन वर्षांपूर्वी याच रस्त्यांवर सईद अली शाह गिलानी आणि उमर फारुक यांच्या इशाऱ्यावर दगड घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या अर्धशिक्षित बेरोजगारांच्या हातांना आज रोजगार मिळाला आहे. त्यांच्यापैकी अनेकांच्या हातात आज दगडांऐवजी मोबाइलचे संच आहेत. केंद्राच्या ‘उडान’ आणि ‘हिमायत’ योजनांमुळे तरुणांपुढे तुटपुंजे का असेना, रोजगाराचे नवे पर्याय उपलब्ध होत आहेत. ८० टक्के अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असलेल्या काश्मीरमध्ये सर्वपरिचित पर्यटनस्थळांव्यतिरिक्त खोऱ्यातील कानाकोपऱ्यांमधील आणखी ३० नव्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी उमर अब्दुल्ला सरकार सरसावले आहे. श्रीनगरमधील अपुऱ्या पायाभूत सुविधांचा विस्तार करून हॉटेल्स आणि अतिथिगृहांची संख्या वाढविण्यावर विचार केला जात आहे. काश्मीरकडे पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे हिमाचल प्रदेशवर पुन्हा गरिबांचे काश्मीर होण्याची पाळी ओढवणार आहे.
गुलाम नबी आझाद मुख्यमंत्री असताना विकासकामांना चालना देण्यासाठी दोन शिफ्टमध्ये रस्त्यांसह पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली. काश्मीर खोऱ्यातील या चकचकीत रस्त्यांवर स्थानिकांना चारचाकी वाहनांचा ‘लुत्फ’ उठविता यावा म्हणून सरकारच्या प्रोत्साहनानुसार जम्मू आणि काश्मीर बँकेसह विविध बँकांमध्ये वाहनांसाठी कर्ज देण्याची स्पर्धाच लागली आहे. श्रीनगरसह विविध शहरांमध्ये अरुंद रस्त्यांवर होणाऱ्या ट्रॅफिक जाममधून स्थानिकांचा वाढता चंगळवाद अधोरेखित होत आहे. मुफ्ती मोहम्मद सईद आणि गुलाम नबी आझाद यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यात शाळा, महाविद्यालये आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आल्यामुळे सुशिक्षितांची संख्या वाढून त्यांच्या आशाआकांक्षा उंचावल्या आहेत, तर थंड हवामानात तब्येतीशी झगडणाऱ्या बुजुर्गाना दिलासा मिळाला आहे. ब्रॉडबँड इंटरनेटमुळे तरुणांना लाभलेल्या ‘व्हच्र्युअल आझादी’पुढे फुटीरवाद्यांच्या ‘आझादी’ची संकल्पना हळूहळू पुसट होऊ लागली आहे. सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तालिबानी हैदोसामुळे फुटीरवाद्यांना अभिप्रेत असलेल्या आझादीशी जम्मू आणि काश्मिरातील स्वातंत्र्याची नकळत तुलना होत असते. या नकळत तुलनेतूनच उमर अब्दुल्ला सरकारपेक्षा मुफ्ती सईद किंवा गुलाम नबींचे शासन अधिक संवेदनशील आणि प्रभावी होते, असा सूर सर्वसामान्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. सदैव पाकिस्तानची आसक्ती बाळगणाऱ्यांची ही बदलती भावना महत्त्वाची आहे. टप्प्याटप्प्याने होणारा हा सकारात्मक बदल जम्मू आणि काश्मीरच्या गेल्या दोन विधानसभा निवडणुकांतील मतदानाच्या वाढत्या टक्केवारीतूनही ठळकपणे दिसून आला आहे. इंग्लंडच्या इसेक्समध्ये जन्मलेल्या आणि कामचलाऊ काश्मिरी बोलणाऱ्या उमर अब्दुल्लांना काश्मीर खोऱ्याच्या खऱ्या समस्यांची जाणीवच झालेली नाही, अशी भावना तरुण आणि बुजुर्ग व्यक्त करतात. आज काश्मीर खोऱ्यातील जनता उमर अब्दुल्ला सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे संतप्त आहे. लहानसहान कामे लाच दिल्याशिवाय होत नाहीत म्हणून काश्मीर खोऱ्यातील जनता संतप्त आहे. केंद्र सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडर्सची संख्या सहावर आणल्यामुळे हिवाळ्यात पारा उणे दहावर पोहोचल्यानंतर थंडीशी कसा सामना करायचा हा ज्वलंत प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे आणि हिवाळा उंबरठय़ावर पोहोचल्यानंतरही उमर अब्दुल्ला सरकारला त्यावर केंद्राशी चर्चा करून उत्तर शोधता आलेले नाही. उलट अनुदानित सिलिंडर्स मिळविण्यासाठी ग्राहकांना नव्याने नोंदणी करण्याचे फर्मान काढून उमर अब्दुल्लांनी भ्रष्टाचाराचे नवे दालन उघडले आहे. हा प्रश्न नीट हाताळला नाही तर ऊर्जेची गरज भागविण्यासाठी काश्मीर खोऱ्यातील जैववैविध्याने समृद्ध पर्वतराजी बोडकी होण्याची भीती आहे. ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती करून पंच आणि सरपंचांना पूर्ण अधिकार मिळू नयेत म्हणून त्यांच्यावर नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांचा दबाव आहे. काश्मीर दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधींनी उमरच्या मैत्रीखातर स्व. राजीव गांधींच्या या आवडत्या विषयाला जाणीवपूर्वक बगल दिली. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊनही धड नोकरी मिळत नाही म्हणून सुशिक्षित तरुण वैफल्यग्रस्त आहे. काश्मीरमध्ये १८ ते ३५ च्या वयोगटातील बेरोजगारीचे प्रमाण ५० टक्क्यांच्या वर आहे. सरकारी नोक ऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक ग्रामीणांना प्राधान्य दिले जाते किंवा त्या मुद्दाम रिक्त ठेवल्या जात असल्यामुळे शहरी सुशिक्षितांचा उमर अब्दुल्लांवर विशेष रोष आहे. अनेकांना पदव्युत्तर शिक्षणानंतर ड्रायव्हर, रिसेप्शनिस्ट, शिकारा चालविण्याचे व्यवसाय करावे लागतात आणि तीन ते दहा हजारांच्या कमाईवर समाधान मानावे लागते. देशातील अन्य राज्यांमधील तरुणांना एवढय़ाच शैक्षणिक पात्रतेवर चाळीस-पन्नास हजारांच्या नोक ऱ्या मिळतात, हे बघून वा ऐकून त्यांचे वैफल्य अनावर होते. स्थानिक सुशिक्षितांचे फुटीरवादी किंवा दहशतवाद्यांशी साटेलोटे असेल या भीतीपोटी बहुतांश बँकांमध्ये बाहेरूनच नोकरभरती केली जाते. माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगार देताना संशयाने बघितले जाते. आपला मुलगा डोळ्यापुढेच असावा या मातापित्यांच्या प्रेमातून उद्भवणाऱ्या अपरिहार्यतेतून नोकरी-व्यवसायासाठी परप्रांतात जाता येत नाही. मोबाइलवरून दिवसाला चार-पाचपेक्षा अधिक एसएमएस पाठवता येत नाहीत. इंटरनेटवरील ‘आझादी’मधून राज्य शासनाने यूटय़ूब आणि फेसबुकला वगळलेले असते.
शेवटी या मर्यादित स्वातंत्र्याच्या मुळाशी काश्मीर प्रश्नाइतकीच विकासाची भूकही दडली आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या काळात मिळालेली मोबाइल आणि इंटरनेटची मुभा आणि उमर अब्दुल्लांच्या काळात मिळणाऱ्या कर्जातून खरेदी केलेल्या वाहनांचे अप्रूप संपण्याआधी काश्मिरी तरुणांच्या क्षमतेला पूर्ण वाव मिळून त्यांच्या आशाआकांक्षा फलद्रूप होतील, यासाठी पावले उचलताना केंद्र आणि राज्य शासनाला कल्पकता दाखवावी लागेल. काश्मीर खोऱ्याच्या पर्यावरणाला धक्का न लावता माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, कृषी उत्पादन, फळबागायती, हस्तकला, जलविद्युत निर्मितीसारख्या उद्योगांना चालना देण्यासाठी टाटा, बिर्ला आणि अन्य उद्योजकांना पुढाकार घेता येईल. पण त्यापूर्वी गुंतवणुकीला पोषक वातावरण तयार करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनांना घ्यावी लागणार आहे. खोऱ्यातील पन्नास टक्के बेरोजगार तरुण भरकटणार नाहीत, याची खबरदारी बाळगताना सरकारने त्यांना तातडीने आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची तत्परता दाखवली तरच राहुल गांधींनी उद्योजकांसोबत घडवून आणलेला संवाद सार्थकी ठरेल. अन्यथा उमर अब्दुल्लांप्रमाणेच राहुल गांधींविषयीही काश्मिरी तरुणांच्या मनात नफरत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो