हस्ताची साथ!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> हस्ताची साथ!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

हस्ताची साथ! Bookmark and Share Print E-mail

*  सोलापुरातील दुष्काळ ‘धुतला’  
*  कोल्हापुरात रिमझिम  
*   सांगलीत मुसळधार
*  बीडमधील प्रकल्प मात्र कोरडेच

मुंबई, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
हस्त नक्षत्राच्या परतीच्या पावसाने दुष्काळी सोलापूर जिल्ह्य़ाला रविवारी चांगलाच हात दिला. या पावसामुळे जिल्ह्य़ातील दुष्काळ धुऊन निघण्यास मदतच होणार आहे. मात्र सोलापूरकरांच्या आनंदाला या पावसाने एक काळी किनारही लावली. सोलापूरनजीक घराची भिंत कोसळून पती-पत्नीसह त्यांच्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही दुर्घटना घडली.

कोल्हापूर, सातारा, सांगलीतही रविवारी दिवसभर पावसाने चांगलीच हजेरी लावली. दुष्काळाच्या गंभीर छायेत सापडलेल्या बीड जिल्ह्य़ातही गेल्या चार दिवसांपासून पावसाने धार धरली आहे. मात्र तरीही जिल्ह्य़ातील प्रकल्प कोरडेच आहेत.
सोलापुरात आनंदवर्षां
गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हय़ातील बहुतांशी भागात हजेरी लावली असून, विशेषत: पंढरपूर, अक्कलकोट, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर, करमाळा आदी भागांत पावसाने सर्वाना दिलासा मिळाला आहे. उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यांत प्रत्येकी ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर अक्कलकोट तालुक्यात दोन दिवसांत ४७ मिमी. पाऊस पडल्याने त्या भागात आनंदाचे वातावरण पसरले आहे. याशिवाय पंढरपूर (५८), मंगळवेढा (३४), सांगोला (२७), मोहोळ (२६) आदी तालुक्यांत पावसाने जोर धरल्याचे दिसून येते. या पावसाने शेतकरीवर्गात उल्हास दिसून येतो. या पावसाने जिल्हय़ातील दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे.
कोल्हापुरात सुटीवर पाणी    
दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे रविवारच्या सुटीवर पाणी पडले. शहरासह ग्रामीण भागांत रविवारी दिवसभर चांगला पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत जिल्हय़ामध्ये सरासरी १३ मिमी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ८० मिमी. पाऊस झाला. पाठोपाठ शाहूवाडी ३० मिमी., शिरोळ १६, राधानगरी ११ व हातकणंगले ९ येथेही मध्यम दर्जाचा पाऊस झाला. चंदगड ३, पन्हाळा २, आजरा १, करवीर १ येथे पाऊस केवळ हजेरी लावून गेला. कागल व गडहिंग्लज या तालुक्यांवर पाऊस रुसल्याचे दिसून आले. पावसाचे प्रमाण चांगले असल्याने काही बंधाऱ्यांतील पाणीपातळी वाढली आहे. पूरस्थितीमुळे पंचगंगा नदीतील राजाराम, इचलकरंजी व रुई हे तीन बंधारे, तर वारणा नदीवरील चिंचोली हा बंधारा पाण्याखाली गेला आहे.
बीड अर्धा कोरडाच
बीड जिल्ह्य़ात परतीच्या पावसाने मागील चार दिवसांपासून चांगली हजेरी लावली आहे. मात्र परळी, अंबाजोगाई तालुके वगळता इतर ठिकाणी पाऊस पडूनही पाणीसाठय़ात मात्र वाढ झाली नाही. पावसाळा संपत आला तरी १४० लघु प्रकल्प कोरडेठाकच आहेत.
खरिपाचे पीक पूर्णपणे गेले आहे. परळी, अंबाजोगाई व माजलगाव तालुक्यांतील काही भाग वगळता जिल्ह्य़ातील इतर आठ तालुक्यांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न कायम आहे.
पावसाचा फायदा काय?
रब्बी हंगामाच्या पिकांच्या पेरण्यांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. चारा व पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास या पावसाने साहाय्य केले आहे.    

कोयना भरत आले :  कोयना धरण परिसरात पावसाची दिवसा उघडीप तर रात्रीचा जोर आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात ५५ एकूण ४१५७, नवजा विभागात १८ एकूण ४९७७, तर महाबळेश्वर विभागात ४१ एकूण सर्वाधिक ५१९५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणाचा पाणीसाठा सुमारे १०३.५१ टीएमसी म्हणजेच ९८.३५ टक्के असून, गतवर्षीपेक्षा यंदा कोयनेचा पाणीसाठा सुमारे साडेनऊ टीएमसीने ज्यादा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याखेरीज धरणातून पाणी सोडण्यात येणार नसल्याचे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

सोलापूरमध्ये चार बळी
 हस्त नक्षत्राच्या मुसळधार पावसामुळे जुन्या पडक्या घराची भिंत शेजारच्या घरावर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत पती-पत्नीसह त्यांची दोन चिमुकली मुले मृत्युमुखी पडली. रविवारी पहाटेच्या सुमारास शहरानजीक दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे ही दुर्घटना घडली. दीपक थावरू पवार (वय २८) व त्याची पत्नी प्रियंका (वय २४) आणि त्यांची मुले राकेश (वय ४) व दीपा (वय २) अशी या दुर्घटनेत बळी गेलेल्यांची नावे आहेत. लमाण समाजातील दीपक पवार हा मूळचा पुण्याचा रहिवासी होता. तो आपल्या पत्नीसह मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.

साताऱ्यात पिकांचे नुकसान
सातारा जिल्ह्य़ात सलग पाचव्या दिवशीही परतीच्या पावसाचा मुक्काम राहिला असून, दुष्काळी माण, खटावसह सर्वत्र कमीअधिक प्रमाणात हा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन, काढणी झालेल्या सोयाबीनचे ढीग, हायब्रीड यासह खरिपाच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. काही ठिकाणी भात पिकाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो