कसाबच्या सुरक्षेचा खर्च २७ कोटी !
|
|
|
|
|
सागनिक चौधरी, सोमवार ८ आँक्टोबर २०१२ मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींच्या मंजूरीसाठी प्रतिक्षेत असताना आर्थर रोड कारागृहामध्ये ठेवण्यात आलेल्या कसाबवर राज्य सरकारने आत्तापर्यंत २७ कोटी रूपये खर्च केले आहेत.
कसाबच्या सुरक्षेवर १ आँक्टोबर पर्यंत एकूण २७.३२ कोटी खर्च झाला आहे, पण अजून त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. या बाबतीत केंद्रीय गृह खाते आणि राज्यसरकार यांच्यात संबंधीत खर्चाचा व्यवहार होणार असून यात आमचा प्रत्यक्ष सहभाग नाही, असं मुंबईत कसाबच्या सुरक्षेचे प्रमुख इंडो-तिबेटीयन सीमा पोलिसांच्या (आय.टि.बी.पी) अधिका-यांनी दिल्लीतहून स्पष्ट केले. कसाबची सुरक्षा काढून घेण्याचा आय.टी.बी.पी. चा कोणताही इराद नसून आम्ही योजलेल्या सुरक्षा रक्षकांना तेथे कोमताही त्रास होत नसल्याचंही ते पुढे म्हणाले. कसाबच्या सुरक्षेचा खर्च केंद्र सरकार उचलेल अशी राज्य सरकारला आशा आहे. गृहखात्याच्या प्रमुख सचिव मेधा गाडगीळ म्हणाल्या की, "आम्हाला आय.टी.बी.पी. कडून सुधारीत खर्चाचे बिल मिळालेले नाही. कसाबची सुरक्षा हा राष्ट्रीय पातळीवरील विषय असल्याने आम्ही याआधी केंद्राला आय.टी.बी.पी. च्या बिलाची पूर्तता करण्याबाबत विचारले होते पण त्यावर अद्याप केंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही." आय.टी.बी.पी च्या सुरक्षा संघात दोनशे सुरक्षारक्षकांचा समावेश आहे आणि २८ मार्च २००९ ते ३० सप्टेंबर २०१० पर्यंतच्या खर्चाचे ११ कोटींचे बिल राज्यसरकारला देण्यात आल्यानंतर त्यांना प्रचंड धक्का बसला होता. |