नवनीत :मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत :मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२ Bookmark and Share Print E-mail
नवनीत

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
इतिहासात आज दिनांक..
९ ऑक्टोबर
१८९२ लोकहितवादी ऊर्फ गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. त्यांचा जन्म पुणे येथे १८ फेब्रुवारी १८२३ रोजी झाला.  मराठी, इंग्रजी, फारसी, गुजराती, हिंदुस्थानी भाषा त्यांना चांगल्या अवगत होत्या. १८४४ मध्ये ते ‘दि एजंट फॉर द सरदार्स इन द डेक्कन’ या कचेरीत क्लार्क म्हणून तर १८५२ मध्ये ते वाईला फर्स्टक्लास मुन्सफ म्हणून नोकरीत होते. निवृत्त होताना ते स्मॉल कॉजेज कोर्टाचे न्यायाधीश होते. या सगळ्या काळात पुणे, वाई, सातारा, अहमदनगर, सुरत, मुंबई, अहमदाबाद, नाशिक, ठाणे येथे त्यांनी नोक ऱ्या केल्या. कामाचा व्याप सांभाळून ग्रंथलेखन, प्रकाशन, रुग्णसेवा विधवांचा उत्कर्ष, धर्मसुधारणा प्रांतिक सभा काम, मुंबई कायदे कौन्सिल सहभाग, शाळा व वाचनालये स्थापनेस प्रोत्साहन, व्याख्याने, वृत्तपत्रांमधून लेखन अशी कामे त्यांनी केली. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मुंबईतील ‘प्रभाकर’ पत्रातून लेखन करण्यास सुरुवात केली. १९ मार्च १८४८ रोजी ‘लोकहितवादी’ या टोपणनावाने त्यांनी पहिले पत्र लिहिले. त्यांनी एकूण १०८ शतपत्रे लिहिली. या पत्रांमधून त्यांनी सामाजिक दोषांची चर्चा केलेली आहे. राजकारण, समाजकारण, धर्मकारण व अर्थकारण यांवर त्यांनी पुस्तके लिहिली.
१९३४  युगोस्लाव्हियाचे राजे अलेक्झांडर यांची हत्या.
१९८० जम्मू-काश्मीरच्या विधानसभेची इमारत आगीत भस्मसात झाली. राज्याचे अतोनात नुकसान. सरकारकडून कारण शोध सुरू.
प्रा. गणेश राऊत  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची
सोफिस्ट विद्वान
ग्रीसमध्ये इसवी सनापूर्वी पाचव्या शतकात तत्त्वज्ञानाचा एक नवीन पंथ सुरू झाला. त्यांना ‘सोफिस्ट’ असे म्हणत. ग्रीसमध्ये प्राचीन काळी वकील वर्ग नव्हता. आरोपीला ज्युरीपुढे स्वत:लाच बचाव करावा लागे. असे बचावाचे भाषण कित्येक श्रीमंत लोक धंदेवाईक व्यक्तींकडून लिहून घेत. तशी प्रथा पडल्यामुळे वक्तृत्वाकडे लक्ष जाऊन वक्तृत्व शिकविण्याचा धंदा सोफिस्टांनी सुरू केला. ग्रीसमधील इतर तत्त्वज्ञ धर्म व नीती यांचा विचार करीत. सोफिस्टांनी आपले लक्ष मानव व मानवी संस्कृती यावर केंद्रित केले होते. मानवाला अनुषंगून भाषा, कला, काव्य, राजकारण यात झालेली प्रगती याबाबतचे शिक्षणविषयक कार्य मुख्यत: सोफिस्ट करीत.
माणसाला आपला खासगी संसार उत्तम रीतीने चालविता यावा, नगरराज्याच्या प्रश्नात त्याला उत्तम बोलता यावे, त्याच्याजवळ उत्तम वक्तृत्व, व्यवहारज्ञान, कर्तृत्व असावे यावर सोफिस्टांचा भर होता. ग्रीक लोक पुराणमतवादी असल्याने प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल यांसारख्यांनी सोफिस्टांना विरोध केला. सोफिस्टांच्या विचारसरणीमुळे ज्ञानप्राप्ती, मानवी जीवनाचे निश्चित ध्येय यासंबंधीचे प्रश्न विचारी लोकांत उत्पन्न होऊ लागले. त्यामुळे तत्त्वज्ञ सॉक्रेटिस व त्याचे अनुयायी यांना त्यांच्या वैचारिक कार्यात प्रोत्साहन मिळाले. ‘बळी तो कान पिळी’ हा विचार प्रथम सोफिस्टांनीच निर्माण केला.
सोफिस्ट शब्दाचा अर्थ बुद्धीच्या जोरावर सत्याचे असत्य व असत्याचे सत्य करणारा मनुष्य. सोफिस्ट शिक्षक शिकविण्याबद्दल पैसे घेत म्हणून पुढे ते अप्रिय झाले. ग्रीकांचे मत असे होते की, शिकविण्याचे कार्य हे एक पवित्र कर्तव्य आहे, त्याबद्दल शुल्क घेणे वाईट आहे. प्लेटो सोफिस्ट शिक्षकांबद्दल म्हणे की, ‘‘सोफिस्ट शिक्षक श्रीमंत तरुणांचा पगारी शिकारी होय.’’ अ‍ॅरिस्टॉटलही स्वार्थासाठी खोटय़ाचे समर्थन करणारा सोफिस्ट म्हणून त्यांचा धिक्कार करीत असे.
सुनीत पोतनीस  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल
विजेची वारंवारता
जेव्हा विजेच्या मागणी व निर्मितीत संपूर्ण संतुलन असते, तेव्हा विजेची वारंवारता (फ्रीक्वेन्सी) प्रति सेकंद ५० सायकल (हर्टझ)इतकी बरोबर असते. जेव्हा मागणी ही निर्मितीपेक्षा अधिक असते, त्या वेळी वारंवारता ५० हर्टझपेक्षा कमी होते. त्याउलट मागणी निर्मितीपेक्षा कमी झाल्यास वारंवारता ५० हर्टझपेक्षा वाढते. सध्या सुमारे २५०० मेगावॉटने मागणीत फरक पडला की वारंवारता एका हर्टझने बदलते. प्रचलित पद्धतीनुसार वारंवारता ४९.५ ते ५०.२ हर्टझच्या दरम्यान असावी लागते. त्याशिवाय जनरेटरबरोबरच्या टर्बाईनच्या सुरक्षेसाठी ५० हर्टझपेक्षा कमी वारंवारता असताना टर्बाईनचे संचालन करणे अनिष्ट असते. यावर उपाय म्हणजे निर्मिती व मागणी यात संतुलन साधणे. त्यासाठी पर्यायांचा विचार करणे जरूर असते. ज्या ठिकाणी वीजनिर्मिती पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते, तेथे प्रत्येक जनरेटरमध्ये साधारणत: ५० टक्के वीज राखीव ठेवतात. जेव्हा मागणी वाढेल त्या वेळेला वारंवारता कमी झाली की, राखीव वीज वापरात येऊन वारंवारता योग्य राखली जाते. यासाठी जनरेटर संचात ‘गव्हर्नर’ची तरतूद केलेली असते. गव्हर्नर वारंवारतेच्या बदलानुसार निर्मितीत बदल घडवून आणतो. त्याशिवाय वीज वितरण यंत्रणेत ‘अंडर फ्रीक्वेन्सी रिले’ बसविले जातात. जसजशी मागणी वाढत जाईल तसतशी वारंवारता कमी होते व अधिक वीज उपलब्ध नसल्यास रिलेच्या साहाय्याने काही प्रमाणात भारनियोजन आपोआप केले जाते. भार कमी झाल्याने निर्मिती व मागणी यात संतुलन झाल्याने वारंवारता ५० हर्टझ होते. ही पद्धत जेथे पुरेशा प्रमाणात वीजनिर्मिती क्षमता उपलब्ध नसते तेथे आवश्यक ठरते. वर उल्लेख केल्याप्रमाणे उपकेंद्रे, वीजनिर्मिती केंद्र किंवा राज्याराज्यांमधील ग्रिडची जोडणी पारेषण वाहिन्यांनी होत असते. काही कारणांनी पारेषण वाहिनी बंद पडून एखादे राज्य किंवा राज्याचा काही भाग हा राष्ट्रीय ग्रिडपासून विभक्त होतो. अशा परिस्थितीत विभक्त झालेल्या भागातील निर्मिती व भार लक्षात घेऊन योग्य प्रमाणात निर्मिती व/वा भार कमी/जास्त करून विभक्त भागात अंशत: ग्रिड चालू राहते. या प्रकारास ‘आयलँडिंग’ असे म्हणतात. मुंबईत टाटा किंवा कोलकात्यात ‘सीईएससी’ यांच्याकडे अशा यंत्रणा आहेत.
श्रीनिवास मुजुमदार
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,मुंबई २२  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा..
‘ते’ सुधारतच नाहीत..
मानस, मानस, प्लीज एक प्रश्न विचारायचाय. तो प्रश्न आहे की ती सिच्युएशन आहे हे नीट कळत नाहीये. तुझ्याशी बोललं ना की विचार स्पष्ट होतात. तू खूप छान सांगतोस आणि तुझ्याशी बोलायला लागल्यापास्नं ना सगळे म्हणतात की, मी खूप सुधारलोय! माझ्यात खूप होकारात्मक बदल झालाय, मला शांत वाटतं आणि फुकटची चिडचिड होत नाही. मी आता चिवटपणे काम करतो. ‘आय डोण्ट गिव्ह अप इझीली!’ तरी मनातल्या शंका संपत नाहीत रे. प्रश्न सुटत नाहीत. आधी तुला मी एक जनरल निरीक्षण सांगतो. म्हणजे माझी मैत्रीण आहे. तिला सॉलिड प्रॉब्लेम आहेत. तिला खूप त्रास होतो, फरफट होते रे तिची. मी तिला समजावतो, तू नीट वाग, उलट आत्मविश्वास वाढव. तू असं वागत राहिलीस तर उलट सगळे स्वत:चा फायदा करून घेतात. तू आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीबद्दल ठाम मत व्यक्त कर ना. आणखी एक जण आहे, तो सगळ्यांना काही तरी टोचून बोलतो आणि सगळ्यांना त्रास देतो रे. त्या दोघांना मी खूप समजावलं, ते म्हणतात, ‘हो, तू म्हणतोस ते बरोबर आहे!’ पण ते सुधारतच नाहीत. गंमत बघ ना मानस माझ्या मैत्रिणीला तिची आई सारखी बडबडून त्रास देते, तर मित्र चिडचिड करून इतरांना त्रास देतो. दोघेही ‘हो’ ‘हो’ करतात, पण बदलत नाहीत, असं का होतं रे! म्हणजे लोकांना सत्य पटलं तरी ते सुधारत नाहीत, असं का? मानसनं त्रासिक चेहऱ्यानं पाहून म्हटलं, ‘‘एकदा बडबडायला लागलास की थांबत नाहीस हं!’’ ‘‘मानस, उगीच फिल्मी पॉज मारू नकोस. रोखठोक उत्तर दे. लोक सुधारायला हवं, हे कबूल करूनसुद्धा का सुधारत नाहीत?’’
मानस, गोड हसून म्हणाला, ‘‘तू सुधारलास ना? मग झालं तर. तू सुधारलास याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय? तर आपण बिघडलो आहोत, हे मुळातून मान्य केलंस म्हणजे स्वीकारलंस. सुधारण्याच्या मार्गातल्या या दोन पायऱ्या आहेत. कबूल करणं म्हणजे मान्य करणं आणि स्वीकारणं, अ‍ॅडमिट आणि अ‍ॅक्सेप्ट. त्यामुळे आपल्यातला बिघाड दुरुस्त करण्याच्या मार्गाला लागलास. तुझ्या मित्रमैत्रिणींनी ‘आपण सुधारायला हवं’ असं म्हटलं खरं; परंतु आपण बिघडलेले आहोत, हे स्वीकारलं नाही. माणसं जेव्हा कबूल करून, अ‍ॅडमिट करूनदेखील सुधारत नाहीत, तेव्हा त्यांना बिघडलेलं राहण्यातच स्वारस्य असतं. बिघडलेलं असण्याचे फसवे फायदे त्यांना हवे असतात. तुझ्या मित्रमैत्रिणींशी नीट बोल म्हणजे तुझ्या लक्षात येईल की, ते बिघडलेलेच राहिले तर त्यांना कसली ना कसली तरी तक्रार करता येते. तुझ्या मैत्रिणीला दुसऱ्याबद्दल सतत गाऱ्हाणं गाण्याची सवय लागली असावी. लोक आपल्याला ‘कित्ती त्रास देतात’ याचं रसभरीत वर्णन इतरांना सांगायला आवडतं. तक्रारखोर माणसाला काही वेळा जबाबदारी दुसऱ्यावर ढकलायची असते. एकदा आपण सुधारण्याचा स्वत:त बद्दल करण्याचा निश्चय केला की द बॉल इज इन देअर कोर्ट. लोक चुकतात, माझं बरोबर असतं असंही ते हळूहळू म्हणू लागतात.
तुझ्या चिडचिड करणाऱ्या मित्राचे एक धोरण आहे. आपण सुधारायला तयार आहोत, पण लोकच वाईट वागतात, त्याला मी काय करू? लोक मला चिडचिडायला लावतात, लोकांनी बदलावं.. असे मूलभूत विचार त्यांच्या डोक्यात असतात, म्हणून ते सुधरत नाहीत, तुझ्या डोक्यात चुका सुधारण्याची तयारी होती म्हणून तू सुधारलास.. ’’ आम्ही दोघे हसलो.
डॉ. राजेंद्र बर्वे  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो