‘आर्थिक सुधारणा अटळ’
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> ‘आर्थिक सुधारणा अटळ’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘आर्थिक सुधारणा अटळ’ Bookmark and Share Print E-mail

आर्थिक संपादकांच्या संमेलनात चिदम्बरम यांचे प्रतिपादन
विशेष प्रतिनिधी ,नवी दिल्ली ,८ ऑक्टोबर २०१२
alt

जागतिक आणि विशेषत: युरोपातील आर्थिक मंदीच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेपुढे उभी ठाकलेली गंभीर आव्हाने परतावून लावण्यासाठी आर्थिक सुधारणा करण्यावाचून सरकारला गत्यंतरच नव्हते, असे प्रतिपादन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज येथे दोन दिवसांच्या आर्थिक संपादकांच्या संमेलनाचे उद्घाटन करताना केले. मंदीच्या गर्तेत ढकलले जायचे की मंदीला थोपविण्यासाठी आर्थिक सुधारणा करायच्या, असे दोनच पर्याय सरकारपुढे होते. अवघड टप्प्यातील आर्थिक सुधारणा हाताळणाऱ्या यूपीए सरकारला विरोधी पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.


विरोधकांचे मन वळविणार
प्रत्येक सरकारला आपली धोरणे निश्चित करण्याचा अधिकार आहे. सरकारच्या धोरणांना होणारा विरोधही रास्तच आहे. पण त्यात अडथळे निर्माण करणे योग्य नाही, अशी भूमिका मांडत सरकारने घेतलेल्या आर्थिक सुधारणांच्या सर्वच निर्णयांवर संसदेत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा चिदम्बरम यांनी व्यक्त केली. विमाक्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी ५ ते ६ अब्ज डॉलरच्या भांडवलाची तात्काळ गरज असल्यामुळेच विमा क्षेत्रात ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली असून या मुद्दय़ावर हिवाळी अधिवेशनापूर्वी भाजपसह सर्व विरोधी पक्षांचे मन वळविण्याचा आपले प्रयत्न असतील, असे संकेत त्यांनी दिले.
भारतीय अर्थव्यवस्था भक्कम
देशातील बचत आणि गुंतवणुकीचे प्रमाण पूर्ववत झाल्यास आर्थिक विकासदर ८ टक्के किंवा ९ टक्क्यांवर जायलाही वेळ लागणार नाही, असा विश्वास चिदम्बरम यांनी व्यक्त केला. भारताचा विकासदर चालू वित्तीय वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ५.५ टक्क्यांवर घसरला असला तरी पुढच्या तीन तिमाहींमध्ये तो ५.५ पेक्षा कमी होणार नाही. २०१२-१३ मध्ये विकासदराने ७.६ टक्क्यांचे अपेक्षित लक्ष्य गाठले नाही तरी आमची अर्थव्यवस्था प्रगत देशांच्या विकासदरांच्या तुलनेत चारपटीने आणि जागतिक विकासदराच्या तुलनेत किमान दुपटीने वाढेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. २०१० साली जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर ५.३ टक्के होता. २०११ साली तो ३.९ टक्क्यांवर घसरला आणि २०१२ मध्ये हा दर ३.५ टक्क्यांवर घसरेल, असा अंदाज आहे. प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थांचा विकासदर ३.२ टक्के होता. तो २०११ साली निम्म्याने गडगडून १.६ टक्क्यांवर आला आणि २०१२ सालात १.४ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे, याकडे चिदम्बरम यांनी लक्ष वेधले.
महागाई नियंत्रणासाठी पुरवठय़ात वाढ आवश्यक
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वाढवून, तसेच अनुत्पादक सरकारी खर्चाना कात्री लावून महागाई नियंत्रणाखाली आणली जाऊ शकते.  मागणी आणि पुरवठा यांच्यातील अंतर भरून निघेपर्यंत महागाई नियंत्रणाखाली येऊ शकणार नाही. गहू, तांदूळ, साखर, दूध यांच्या दरात वाढ झाल्याने त्यांच्या उत्पादनवाढीला प्रोत्साहन लाभणार असून त्यांचा पुरवठा वाढल्याने महागाई घटेल, असा दावा चिदम्बरम यांनी केला. किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीमुळे ते शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला वाढीव भाव मिळेल आणि ग्राहकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू मिळतील, असा युक्तिवाद चिदम्बरम यांनी केला. किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीवरून उद्भवलेला वाद अनावश्यक असल्याचे सांगून किरकोळ क्षेत्रासह नागरी उड्डयन आणि एफएम रेडिओमधील थेट विदेशी गुंतवणुकीने देशाला आणि अर्थव्यवस्थेला लाभच होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘गार’साठी अर्थसंकल्पाची प्रतीक्षा नाही
आयकर कायद्यात पूर्वलक्षी प्रभावाने दुरुस्त्यांच्या मुद्दय़ाचे निराकरण करण्यासाठी सरकार पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा करणार नसल्याचे चिदम्बरम यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी शोम समितीच्या अहवालावर भूमिका घेतल्यानंतर संसदेत शक्यतितक्या लवकर दुरुस्त्या मांडण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे चिदम्बरम म्हणाले.    
वढेरा-डीएलएफ चौकशी नाही
सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा आणि डीएलएफ यांच्यातील कथित आर्थिक देवाणघेवाणीची सरकारकडून चौकशी होऊ शकत नाही, असे चिदम्बरम यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत भ्रष्टाचाराचा नेमका आरोप केला जात नाही, तोपर्यंत सरकार अशा खासगी व्यवहारांची चौकशी करू शकणार नाही, असे चिदम्बरम यांनी सांगितले. ज्यांनी आरोप लावले त्यांनी तसेच आरोप झालेली व्यक्ती आणि संबंधित कंपनीने आपले म्हणणे मांडलेले आहे. या प्रकरणी आपण सरकारकडून उत्तर देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो