तेलबिया, डाळींच्या दरात ४० टक्क्यांनी घसरण
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> तेलबिया, डाळींच्या दरात ४० टक्क्यांनी घसरण
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

तेलबिया, डाळींच्या दरात ४० टक्क्यांनी घसरण Bookmark and Share Print E-mail

प्रदीप नणंदकर , लातूर

ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचे भाव वधारले. बाजारात सोयाबीनची आवक सुरू होण्यापूर्वीच भावात ४० टक्क्यांपर्यंत घसरण झाली. सध्या बाजारात सोयाबीन २ हजार ८०० रुपये क्विंटल भावाने विकले जात आहे. ऑगस्टमध्ये हा दर ५ हजार ६५ रुपये होता. अशीच स्थिती उडीद, मूग, तूर, आदी डाळवर्गीय मालाची झाली आहे.
जगात सोयाबीनचे सर्वाधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन भारतात होते. भारतातील सोयाबीन ‘नॉन जेनेटिक’ नाही. येथील सोयाबीनमधील प्रोटीनचे प्रमाण तब्बल ५२ टक्क्यांपर्यंत आहे. बहुतांश देशात हे प्रमाण ३८ ते ४० टक्केच असते. त्यामुळे भारतातील सोयाबीनचा भाव सर्वत्र वाढता असतो.

जगाच्या बाजारपेठेत प्रथमच सोयाबीनचे भाव अन्य देशांच्या तुलनेत कमी झाले आहेत. शेअर बाजारातील चढउतार १० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास त्याची कारणमीमांसा केली जाते. भाव कोणत्या कारणामुळे कमी झाले, जाणीवपूर्वक चढउतार केला आहे का, याची तपासणी होते. खाद्यान्नाची फॉरवर्ड मार्केटिंगद्वारे खरेदी-विक्री सुरू झाल्यानंतर ती मूठभर मंडळींसाठीचा जुगार आहे, अशी टीका होऊ लागली. देशांतर्गत अनेकांना याचा मोठा फटकाही बसला होता. त्यानंतर फॉरवर्ड मार्केटिंगवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने फॉरवर्ड मार्केट कमिशन स्थापन केले व त्याला सेबीसारखेच अधिकार दिले.
ऑगस्टमध्ये सोयाबीनचा फॉरवर्ड मार्केटिंगमधील भाव ५ हजार ६५ रुपये होता. ऑक्टोबरमध्ये तो २ हजार ९५०, नोव्हेंबर २ हजार ९५० व डिसेंबरमध्ये २ हजार ९८० एवढा घसरला.मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सोयाबीन उत्पादकांनी आम्ही इतक्या कमी भावात आमचा माल विकणार नाही म्हणून बाजारपेठ बंद करण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. ऑगस्टमध्ये सोयाबीनचे भाव वाढल्यामुळे भाव स्थिर ठेवण्यासाठी आयात कर कमी केला गेला. आता भाव कमी झाले आहेत, त्यामुळे भावातील तफावत दूर करण्यासाठी तातडीने आयातकर का लावला जात नाही? निर्णय घेईपर्यंत दोन-तीन महिने उलटतात, तोपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांची ससेहोलपट होते. डाळींचे उत्पादन जगभर वाढते आहे. मूग व हरभऱ्याचे भाव वाढल्यामुळे जगभरात मसूर, मूग, हरभरा याचे उत्पादन घेतले जात आहे. भारत मोठी बाजारपेठ असल्यामुळे जगातील माल येथे येतो. तीस रुपये किलोने बर्माचा उडीद भारतात येतो. सरकार त्याला अनुदान देते. सरकारने या वर्षी शेतीमालाचे हमीभाव वाढवले आहेत व खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, या केंद्रांवर योग्य गुणवत्तेचा माल नाही हे कारण सांगून खरेदी केला जात नाही. साहजिकच या हमीभावाचा उपयोग काय, असा प्रश्न विचारला जात  आहे.
केवळ सप्टेंबर महिन्यातच तूर, हरभरा, मूग, उडीद या भावात एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. ५२०० रुपये तुरीचा भाव होता, तो आता ४२०० वर आला आहे. ५३०० हरभऱ्याचा भाव होता, तो ४३००वर पोहोचला आहे. ५५०० मुगाचा भाव होता, तो ४४००वर आला आहे, तर ४५०० वरील उडदाचा भाव ३५०० वर पोहोचला आहे. हरयाणा व पंजाबमध्ये गहू, तांदूळ हमीभावाने खरेदी केला जातो. कारण तेथील शेतकऱ्यांचा दबाव आहे. तामिळनाडूमध्ये डाळी शासनाच्या वतीने खरेदी करून स्वस्त धान्य दुकानातून कमी भावात लोकांना पुरवल्या जातात. ही पद्धत अन्य राज्यात का राबवली जात नाही, असा प्रश्न जाणकार विचारत आहेत.    
असे घसरले दर
सोयाबीनचा दर ऑगस्टमध्ये प्रती क्विंटल ५ हजार
सप्टेंबरमधील दर  प्रती क्विंटल २ हजार ८००
तूर, हरभरा, मूग, उडीद आदी डाळींमध्ये सप्टेंबरमध्ये क्विंटलमागे हजाराची घसरण    
का होते घसरण?
खुल्या बाजारपेठेमुळे वेगवेगळय़ा देशांतील उत्पादन वाढले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत भाव पडले आहेत ,अशी कारणे देत भाव पाडले जातात. भाव पाडताना ठरवून तसे केले जाते. बहुराष्ट्रीय कंपन्यांची गोदामे भरली की पुन्हा बाजारातील भाव वाढतात. यात केंद्र सरकारमधील मंत्री व मोठे अधिकारीही सामील असतात. एकदा बाजारातील मालाची खरेदी झाली, की व्यापारी हिताची धोरणे आखली जातात. त्यातूनच शेतकऱ्यांचा खिसा कायम नरम व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा खिसा गरम, अशी स्थिती निर्माण होते.
घसरण थांबविण्याचे काही उपाय
भारताच्या चुकीच्या धोरणामुळे टांझानिया, श्रीलंका, बर्मा आदी देशांत नव्याने डाळ मिल सुरू झाल्या आहेत. तेथे तयार झालेला माल भारतात येतो. डाळींचे उत्पादन हा प्रक्रिया उद्योग गृहीत धरून आयात डाळीवर कर लावला पाहिजे. मात्र, तो लावला जात नसल्याने त्याचा लाभ विदेशातील उद्योजक व शेतकऱ्यांना मिळतो. दरवर्षी सुमारे ११० लाख टन तेल भारत आयात करतो, त्यात ८० लाख टनांपर्यंत पामतेलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत नसतो, तेव्हा आयात मालाला भाव असतो. देशातील तेल बाजारपेठेत येण्यापूर्वीच भाव नीचांक पातळी गाठतात.  सोयाबीन बाजारपेठेत येते त्या काळात म्हणजे सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान विदेशातून येणाऱ्या तेलावर आयात कर लागू केला तर प्रतिक्विंटल ४०० रुपयांनी सोयाबीनचे भाव वाढू शकतात. तसेच विदेशातून येणाऱ्या स्वस्त, हलक्या तेलावर बंधन आणले तरी त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो