नवनीत : बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत : बुधवार, १० ऑक्टोबर २०१२ Bookmark and Share Print E-mail
नवनीत

इतिहासात आज दिनांक.. : १० ऑक्टोबर
१७३१ जन्माने फ्रेंच, पण कर्मभूमी इंग्लंड असणारे ब्रिटिश भौतिकरसायनशास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेंडिश यांचा फ्रान्समधील नाईस प्रांतात जन्म. हवा, पाणी, हैड्रोजन यासंबंधी त्यांनी मोलाचे संशोधन केले. हवा ही हायड्रोजन आणि कार्बन डाय ऑक्साईडपासून बनलेली आहे हे कॅव्हेंडिश यांनी सांगितले. हायड्रोजन व ऑक्सिजन हे पाण्याचे घटक आहेत हे सिद्ध करणारा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. नायट्रिक अ‍ॅसिडचा शोध लावण्याचे श्रेय त्यांचेच . १७९८ मधील पृथ्वीची घनता मोजण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. तो कॅव्हेंडिश प्रयोग म्हणून ओळखला जातो.
१९६४ ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि अभिनेते गुरुदत्त यांचे निधन. गुरुदत्त पडुकोण यांचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी बंगलोरजवळ झाला. चित्रपटाच्या ओढीतून ते पुण्याला प्रभात स्टुडिओत आले. देव आनंद यांच्या ‘बाझी’ चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनाचा श्रीगणेशा केला. ‘आरपार’, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘चौदहवी का चाँद’ हे त्यांचे लक्षणीय चित्रपट. छायाप्रकाश व कॅमेऱ्याच्या तंत्रावर विलक्षण हुकमत असणाऱ्या या संवेदनशील दिग्दर्शकाला वैफल्याने मरण जवळ करावेसे वाटले आणि त्यांनी आत्महत्या केली.
१९८८ ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक माधव वाटवे यांचे निधन.
प्रा. गणेश राऊत  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : प्राचीन ग्रीक वैद्यकशास्त्र

प्राचीन एजियन संस्कृतीपासून ग्रीकांना वैद्यकशास्त्राचे उत्तम ज्ञान प्राप्त झाले होते, असे दिसते. प्रथम उपचाराचे स्वरूप मांत्रिक पद्धतीचे असे. रोग्याला पडलेल्या स्वप्नावरून रोगनिदान केले जाई. इ. स. पूर्व सातव्या शतकात नीडस् येथे एक वैद्यकीय अध्यापन शाळा सुरू झाली. या शाळेत आजाराच्या लक्षणावरून रोगनिदान कसे करायचे हे शिकविले जाई. पुढे पुढे रोगनिदान करून उपचार करणारे व मांत्रिक पद्धत हे वेगळे निघाले. नंतर पुढे कॉस या ग्रीसच्या बेटावरही वैद्यकीय विद्यालय निघाले. नीडस् आणि कॉस अशा दोन वैद्यकीय पद्धती ग्रीसमध्ये होत्या. हिप्पोक्रॅटिस हा प्राचीन जगतातील सर्वश्रेष्ठ वैद्य कॉस बेटावरचा राहणारा होता. हिप्पोक्रॅटिसच्या पूर्व एस्क्युलियस या आरोग्याच्या देवाचा कोप झाल्यावर रोग होतात व मर्जी झाल्यावर ते बरे होतात, असा समज होता. या देवाच्या मंदिरात पुजाऱ्याच्या स्पर्शाने किंवा नवसामुळे रोग बरे होतात, असे समजत असत. हिप्पोक्रॅटिसने वैद्यकशास्त्राच्या जुन्या कल्पना खोडून काढून प्रत्यक्ष निरीक्षणाने व प्रयोगाने रोगनिदान व उपचार सुरू केले. हिप्पोक्रॅटिसची पद्धत अत्यंत शास्त्रीय असल्याने तो युरोपातल्या वैद्यकशास्त्राचा जनक समजला जातो. हिप्पोक्रॅटिस हा पाचव्या शतकात होऊन गेला. शरीरज्ञानाची माहिती होण्यासाठी त्याने इतर प्राण्यांची चिरफाड करून हाडांची व इतर शरीररचनेची माहिती करून घेतली.
आपल्या देशात प्राचीन काळचे आर्य वैद्यक कफ, वात, पित्त यांच्या विविध चिकित्सेवर आधारलेले होते. त्याचप्रमाणे हिप्पोक्रॅटिसही रोगाचे निदान चार तत्त्वांवर करी. माणसाच्या शरीरात चार द्रव असून, त्यांच्या कमी-जास्त प्रमाणावर माणसाची प्रकृती अवलंबून असते, असे त्याचे मत होते.
सुनीत पोतनीस  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : ग्रीडच्या सुरक्षिततेसाठीच्या यंत्रणा
भारनियमन केंद्रात (भानिकेंद्र) त्याच्या कार्यक्षेत्रातील निर्मिती केंद्रे, उपकेंद्रे व पारेषण वाहिन्या यांवर सतत निगराणी ठेवावी लागते. त्यासाठी भानिकेंद्रात संगणक यंत्रणा असते. त्या यंत्रणेस त्याच्याशी संबंधित निर्मिती केंद्रे व उपकेंद्रेही संगणकीय उपकरणांनी जोडलेली असतात. त्यांच्यामार्फत भानिकेंद्रास सतत त्या केंद्राचा भार, विद्युत दाब, वारंवारता इत्यादीची माहिती दर ४ ते १० सेकंदाच्या अवधीने पुरवली जाते. या यंत्रणेस स्काडा (सुपरवायजरी कंट्रोल अ‍ॅण्ड डेटा अ‍ॅक्विझिशन) सिस्टीम असे म्हणतात. याच्या साहाय्याने संपूर्ण कार्यक्षेत्राची माहिती अद्ययावत होत असते. स्काडा यंत्रणेमार्फत ४ ते १० सेकंदाने माहिती उपलब्ध होते. मात्र ग्रीड संचालनाच्या दृष्टीने हा काळ जास्तच आहे. एखाद्या वाहिनीवर किंवा उपकरणावर अचानक काही बिघाड झाला तर त्याच्या सुरक्षा यंत्रणेमार्फत सुमारे १०० ते १२० मिली सेकंदाच्या काळात संबंधित उपकरणाचा वीजपुरवठा बंद होतो. ही कालावधीची गरज लक्षात घेऊन गेल्या        २-३ वर्षांत ‘वाइल्ड एरिया मेजरमेंट सिस्टीम’ उपयोगात आणली जात आहे. या यंत्रणेस अतिदूर-संचार यंत्रणा लागते. याच्या साहाय्याने दर   ४० मिली सेकंदाच्या अवधीने ग्रीडची माहिती उपलब्ध होते. यामुळे त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येते. ही यंत्रणा भारतात प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आली आहे. ग्रीडच्या संचालनासाठी योजल्या जाणाऱ्या प्रमुख यंत्रणांची माहिती वरील विवेचनावरून स्पष्ट होईल. अर्थात या यंत्रणा म्हणजे संचलनातील शिस्तीला पर्याय नाहीत. प्रत्येक उपकेंद्र, निर्मिती केंद्र किंवा पारेषण वाहिनी ही राष्ट्रीय ग्रीडमधील घटक असते. त्यामुळे कोणतेही उपकेंद्र किंवा पारेषण वाहिनी देखभालीसाठी/ दुरुस्तीसाठी बंद करताना सर्व संबंधित संस्थांशी विचारविनिमय करूनच तसे करता येते. केंद्र शासनाच्या वीजनिर्मिती केंद्रातून राज्यांना विजेचा कोटा ठरवून दिला असतो. त्याचे काटेकोर पालन करणे, निर्मिती केंद्रांनी वेळेनुसार ठरवलेली निर्मिती करणे या सर्व बाबींचे पालन करावे लागते. तसेच भानिकेंद्राच्या सूचना/आदेशांचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य असते आणि तरीही उत्तर व पूर्व भारतात ३० व ३१ जुलै, २०१२ ला संपूर्ण काळोख झाला होता. हे का व कसे घडले ते शोधले जात आहे.
श्रीनिवास मुजुमदार
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,  मुंबई २२  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. : स्मरणशक्तीची स्टोरी
मित्रा, स्मरणशक्तीचं टॉप सिक्रेट सांगायचंय. हळूच सांगतो, फक्त तुला. लक्ष आहे ना? ती फेसबुकची विंडो बंद कर बघू. हातातला फोन खाली ठेव, डोअरबेल वाजतेय का त्याकडे लक्ष देऊ नकोस, हिंदी सिनेमात म्हणतात त्याप्रमाणे कान खोलकर सुनो.. पतेकी बात बोल रहा हूँ. तू कोणतीही गोष्ट १०० टक्के लक्षपूर्वक आणि उत्सुकतेने ऐकलीस नि पाहिलीस ना तर ती पाठांतर न करता लक्षात राहते. का-य-म-ची. आता मुंडी हलवून म्हणतोयस ना, ‘नही समझा!’
मग ऐक, एक उदाहरण देतो,
तुझ्या लग्नाला कोण कोण आले होते?
जरा पेपर खाली ठेवून आठवलं ना, तर यादीच करायला बसशील..
बघ म्हणजे चेंबूरचे काका एकटेच आले. कारण काकीच्या चुलत बहिणीचं बडोद्याला लग्न होतं. नि नाशिकची बेबी आत्ये? ती तर दोन दिवस आधी आली होती आणि सुभाष मामा, नि रेखा मामी. अशी नावं झरझर आठवतील. आता मला सांग, तुमच्या लग्नाला आलेल्या माणसांच्या नावांची यादी कधी पाठ केली होतीस का? त्यांनी केलेली थट्टा-मस्करी, घ्यायला लावलेला उखाणा, वहिनींच्या डोळ्यात टचकन आलेलं पाणी. सगळं आठवलं ना. आता यावर वर्कबुकमध्ये गाळलेल्या जागा भरा, जोडय़ा लावा, चूक बरोबर सांगा असे गृहपाठ करून घेतं का कोणी? नाही, ना! तरी हे कसं काय लक्षात राहिलं सांग? आणि याचंही उत्तर दे की, वहिनींनी संध्याकाळी घरी येताना वाणसामानाची यादी दुकानात द्यायला सांगितली होती, ते विसरलास त्याचंही कारण सांग!
उत्तर एकच, एखादी गोष्ट घडत असताना तू तिथे १०० टक्के हजर असशील, कानांनी नि मनाने तर तुला कोणतेही श्रम न करता लक्षात ठेवता येते.
म्हणजे, ‘स्मरणशक्ती’ ही गोष्ट दैवदुर्लभ नाहीये रे. ते कौशल्याचं काम आहे. बुद्धीला प्रशिक्षण दिलंस की, आपोआप तो उत्तम सव्‍‌र्हिस देतो. आणखी एक मुद्दा सांगतो. लग्न वाढदिवस किंवा असलाच कुठलाही बरा-वाईट प्रसंग याचादेखील स्मरणशक्तीच्या वापरात संबंध येतो. तेव्हा मानसशास्त्रामध्ये अशा विशेष केंद्रबिंदूला स्मरणशक्तीचा ‘पेग’ (प्यायचा नाही रे. भिंतीला ठोकतात तसा मोठा खिळा - खुंटी!) म्हणतात. स्मरणशक्तीचा उपयोग करताना, त्या मुख्य केंद्रावर माहिती टांगली जाते किंवा गुंडाळली जाते. अशा केंद्राभोवती माहिती साचवून ठेवताना, त्या माहितीचं आपोआप सुसूत्रीकरण होतं. ती माहिती नुसतीच यादी राहत नाही तर तिची आपोआप एक ‘स्टोरी’ तयार होते. माहिती एकात एक सुसूत्रपणे गुंफली की संपूर्ण एकसंध असं संकलन होतं. अशा माहितीला एकत्र गुंडाळायला आपण भावनेचा धागा बांधतो. म्हणजे लग्नाला आलेल्या माणसांमध्ये आपलं मन गुंतलं होतं म्हणून ती माहिती विनासायास लक्षात राहिली.
स्मरणशक्तीची ही गोष्ट मुद्दाम थोडा हास्यविनोद करून सांगितली. आता लक्षात राहील..
१) १०० टक्के लक्ष
२) शंभर टक्के उत्सुकता आणि माहितीच्या संकलनाकरिता एखादी गोष्ट, चुटका किंवा कसली तरी गोष्ट.. आता विसरणार नाहीस. आता चहा पी नि कामाला लाग बघू. लग्नाला कोण कोण आले होते यावरून वहिनींशी संध्याकाळी भांड.. ओके!
डॉ. राजेंद्र बर्वे  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो