इस्रायलमध्ये लवकरच निवडणुका
|
|
|
|
|
पीटीआय , जेरुसलेम गेले अनेक महिने चर्चेचा विषय ठरलेल्या इस्रायलमधील राष्ट्रीय निवडणुकांबाबत पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आपले मौन सोडले आहे. सत्ताधारी लिकद पक्षाला अनुकूल वातावरण असण्याच्या पाश्र्वभूमीवर या देशात ‘शक्य तितक्या लवकर’ राष्ट्रीय निवडणुका घेण्याचा मानस नेत्यानाहू यांनी व्यक्त केला.
सामान्यपणे निवडणुका म्हटल्या की, राष्ट्रीय हितसंबंधांपेक्षा पक्षीय हित जपण्याला प्राधान्य मिळते. त्यामुळे जवळ येत जाणाऱ्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अर्थसंकल्प मांडल्यास तो तुटीचाच असण्याची किंवा राष्ट्रीय तूट वाढविणारा ठरण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी इस्रायलमधील राष्ट्रीय निवडणुका लवकरच घेण्याचा मनोदय इस्रायली नेत्यानाहू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला. गेल्या दशकभरातील सर्वात स्थिर आणि वचनपूर्ती करणारे सरकार चालवीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आखाती देशांमधील वातावरण प्रतिकूल असताना इस्रायलला संरक्षण पुरविणे आणि इस्रायलच्या अर्थव्यवस्थेस बळकटी देणे ही दोन्ही आश्वासने आपल्या सरकारने पाळल्याचे त्यांनी नमूद केले. |