नवनीत : गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत : गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२ Bookmark and Share Print E-mail
नवनीत

इतिहासात आज दिनांक.. : ११ ऑक्टोबर

१७५८ जर्मन खगोलशास्त्रज्ञ- धूमकेतू व लघुग्रह संशोधक विल्हेल्म ओलबर्स यांचा जन्म. ७४ वर्षे आवर्तकाल असलेला १८१५ सालचा धूमकेतू त्यांनी शोधला, तो त्यांच्याच नावे ओळखला जाऊ लागला.
१९६२ भारताच्या ईशान्य सीमेवर चीनचा हल्ला.
१९६८ माणिक बंडोजी ठाकूर ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन. अमरावतीजवळील यावली गावी ३० एप्रिल १९०९ रोजी त्यांचा जन्म झाला, तर प्राथमिक शिक्षण चांदूर बाजारला झाले. कळत्या वयात त्यांनी रामटेक, ताडोबा, गोंदुडा येथील जंगलात तपश्चर्या केली. लोकांनी त्यांना देवबाबा अशी उपाधी दिली. पुढे त्यांना तुकडोजी महाराज म्हणू लागले. त्यांनी स्वरचित भजनांच्या व कीर्तनांच्या माध्यमातून विदर्भात केलेल्या जनजागृतीमुळे प्रभावित होऊन साक्षात महात्मा गांधींनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून गौरविले. १९४२ च्या छोडो भारत चळवळीत सक्रिय सहभाग घेतला म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात त्यांना ठेवले. १९४३ मध्ये बंगालमध्ये दुष्काळ पडला असता मदत केली.  समाजातील विषमता दूर करण्याचे अथक प्रयत्न त्यांनी केले. विनोबांच्या भूदान चळवळीत सामील होऊन शेकडो एकर जमीन भूदानात मिळवली. ‘ग्रामगीता’ ही त्यांची सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. जीवन कसे बदलवून टाकता येईल याचे दिशादर्शन त्यांनी या ग्रंथातून केले आहे.
प्रा. गणेश राऊत  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : हिप्पोक्रॅटिस
प्राचीन काळातला- इ.स.पूर्व पाचव्या शतकातला ग्रीक वैद्य हिप्पोक्रॅटिस कुठल्याही आजाराचे निदान चार तत्त्वांवर करी. रक्त, कफ, पीतपित्त व कृष्णपित्त असे चार शरीर धातू असून, त्यांच्या मिश्रणात बिघाड झाला किंवा प्रमाणबद्धता संपली म्हणजे प्रकृती नादुरुस्त होते, असे हिप्पोक्रॅटिसच्या रोगनिदानाचे सूत्र होते. बुद्धीचे केंद्र हे मेंदू असते, ही गोष्ट त्या काळी इतरांना न पटणारी त्याला माहीत होती. तो उत्तम शल्यचिकित्सकही होता. त्याने शस्त्रक्रियेवर बरीच माहिती चर्मपत्रांवर लिहिलेली होती. मानवी शरीरातील हाडे, स्नायू यासंबंधी थोडेफार ज्ञान त्याला होते. आधुनिक इस्पितळातील रोग्याच्या परीक्षेप्रमाणे त्याच्या दैनंदिन अवस्थेची नोंदही करण्याची त्याची पद्धत होती. आहाराबाबत आपण संयमी, शक्यतो एकदाच जेवावे, असे त्याचे सांगणे होते. वृद्धाने कमी जेवावे, हिवाळ्यात अधिक व उन्हाळ्यात कमी जेवण घ्यावे, इत्यादी कल्पनाही त्याने त्या काळात मांडल्या होत्या. प्लूरसीमध्ये फुफ्फुसात साचलेला पू छातीवर शस्त्रक्रिया करून त्याने काढला होता. हाडे मोडणे व सरकणे किंवा निखळणे यावरील त्याचे उपाय त्या काळाच्या मानाने बरेच आधुनिक होते. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या एका वैद्यकाची वैद्यकशास्त्रातील इतकी मोठी प्रगती विस्मयकारक होती.
हिप्पोक्रॅटिसचे सर्वात मोठे महत्त्व त्याने वैद्यकीय व्यवसायात नीतिमत्तेला जे अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे, त्यात आहे. हिप्पोक्रॅटिसच्या शिष्यांना शिक्षण घेतल्यावर व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एक शपथ घ्यावी लागे. ‘‘मी मानवतेच्या भूमिकेवरून माझा व्यवसाय करीन. रोग्याची गुपिते माझ्याजवळच ठेवीन. पैशासाठी रोग्याला ठार मारणे मी करणार नाही.’’ आजही जगातील वैद्यकीय विद्यार्थ्यांला अशी शपथ घ्यावी लागते. हिप्पोक्रॅटिसचे एक सुभाषित आहे, ‘‘युद्ध म्हणजे शस्त्रवैद्याला शिकण्याची एकमेव संधी आहे.’’
सुनीत पोतनीस  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : उत्तर भारतातील वीज गायब
ग्रीडच्या संचालनासाठी संपूर्ण देशात मिळून सहा केंद्रे आहेत. ही केंद्रे पॉवरग्रीड या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. राज्य भानिकेंद्रे राज्यातील ग्रीड व शेजारील राज्याबाहेरच्या प्रवाहावर निगराणी ठेवते तर क्षेत्रीय भानिकेंद्रे, क्षेत्रांना जोडणाऱ्या पारेषण वाहिन्या व केंद्र सरकारच्या/संयुक्त वीजनिर्मिती केंद्रातून होणाऱ्या वीज वाटपाची निगराणी करत राज्यांना सूचना देत असते. क्षेत्रीय भानिकेंद्राने दिलेले आदेश/सूचना या राज्य भानिकेंद्रास बंधनकारक असतात. दिनांक ३० व ३१ जुलै, २०१२ रोजी उत्तर भारतात वीज खंडीत झाली ती कशी? पश्चिम व उत्तर क्षेत्रांना जोडणाऱ्या   बिना-ग्वाल्हेर-आग्रा अशा दोन वाहिन्या आहेत. त्यापैकी एक वाहिनी काही कामासाठी बंद होती. एका वाहिनीवर तांत्रिकदृष्टय़ा ७०० मेगाव्ॉटपेक्षा अधिक भार असणे उचित नव्हते. परंतु उत्तरेत विजेची अधिक मागणी असल्याने त्यावर १००० मेगावॉटच्या वर भार होता. तो भार कमी करण्यासाठी उत्तर क्षेत्रीय भानिकेंद्राने उत्तरेतल्या राज्य भानिकेंद्रांना आदेश देऊनही त्यांनी उचित कार्यवाही केली नाही, असे सांगितले जाते. जेव्हा बिना-ग्वाल्हेर-आग्रा वाहिनी बंद पडली तेव्हा उत्तर क्षेत्रात विजेची आयात व त्यामुळे वारंवारता कमी झाली. या वेळी जर ‘अंडर फ्रिक्वेन्सी रिले’ योग्य प्रमाणात असते तर उत्तर क्षेत्रात अंशत: तरी ग्रीड चालू राहिले असते. जेव्हा बिना-ग्वाल्हेर-आग्रा वाहिनी बंद पडली तेव्हा पश्चिम क्षेत्रातील होणारी विजेची निर्यात कमी झाल्याने मागणीपेक्षा निर्मिती अधिक झाली. त्या वेळी वारंवारता वाढली. त्या वेळी जनरेटर संचातील गव्हर्नरच्या यंत्रणेमुळे वीजनिर्मिती कमी होणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता काही जनरेटर बंद पडल्याने निर्मिती कमी झाली व वारंवारता नियंत्रणात आली. वरील घटनेपूर्वी दक्षिण क्षेत्रास पूर्व क्षेत्रातून विजेचा पुरवठा होत होता. तो खंडित झाल्यावर दक्षिण क्षेत्रातील ‘अंडर फ्रिक्वेन्सी रिले’ योग्यरीत्या चालल्याने काही अंशी भार कमी झाला व पश्चिम क्षेत्रातूनही काही अंशी अधिक वीजपुरवठा होऊन दक्षिण क्षेत्र अबाधित राहिले.
श्रीनिवास मुजुमदार
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,   मुंबई २२  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. : कला, विज्ञान नि जिज्ञासा
थक्क करणारी, चकित करणारी किंवा स्तिमित करणारी भव्यता त्या शिल्पात नक्कीच नव्हती. रोमच्या आर्ट म्युझियममध्ये फिरता फिरता अचानक ते दृष्टीस पडलं, मग कॅटलॉग बघून घुटमळलो नि जवळून न्याहाळलं तेव्हा थक्क झालो, चकित झालो आणि स्तिमित झालो ते त्या शिल्प विषयामुळे. पण अर्थातच शिल्पकाराच्या कौशल्यामुळे. शिल्प विषयातले सूक्ष्म तपशील आणि भावाविष्कार लक्षात आले. ‘डॉ. एडवर्ड जेन्नर मुलाला (देवीची) लस टोचताना’ असं त्याचं शीर्षक होतं. पुढे असा खुलासा होता की, मांडीवर घेतलेला तो मुलगा त्यांचा स्वत:चा! (या विषयावर दुमत आहे. तो जेम्स फिप्स, त्यांच्या माळ्याचा मुलगा होता; अर्थात, जेन्नर यांनी आपल्या मुलांवरही लस टोचण्याचा प्रयोग केला होता.)
शिल्पामधला सौंदर्यभाव रेखाटनात होता. जेन्नरच्या चेहऱ्यावरील एकाग्रता आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसतो. त्यांच्या हातांकडे पाहिलं की, त्या प्रसंगातलं धारिष्टय़, धडपड आणि संघर्ष दिसून येतो. जेन्नर यांच्या मांडीवरून मुलगा त्यांच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करतोय हे तिथे स्पष्ट दिसतं. त्यांनी डाव्या हाताने मुलाचं मनगट घट्ट पकडलंय. त्यांच्या बोटांचे स्नायू आक्रसलेले दिसतात. जेन्नर यांच्या कपाळावरही आठय़ांचे सूक्ष्म जाळे आहे. कारण आपल्या प्रयोगातून मुलाला देवी आल्या, मृत्यू आला; तर? याची चिंता असणार. तरी त्यांच्या एकूण आविर्भावातून निश्चयीपणा दिसतो. इतके सारे भावाविष्कार पाहून खिळून राहिलो.
कित्येक विचारांनी मनात गर्दी केली. जेन्नरने देवीची लस शोधून काढली, त्यावर अनेक प्रयोग केले. अशा प्रकारच्या कोरडय़ा माहितीमधून त्या सर्व प्रयोगांतलं नाटय़, उत्सुकता, भीती, जिज्ञासा उलगडता येत नाही. ते या शिल्पकाराने आपल्या कलाकृतीमधून अभिव्यक्त केलंय. कलाकाराच्या मर्मदृष्टीने कलाकृतीला जिवंतपणा येतो म्हणजे काय, याचा इथे प्रत्यय आला.
हे झालं शिल्पाविषयी. डॉ. एडवर्ड जेन्नर यांच्याविषयी लिहावं तेवढं कमीच आहे. जगात जास्तीतजास्त माणसांचे प्राण वाचविणारा आणि विद्रूपतेला आळा घालणारा हा वैद्यकीय संशोधक मानला आहे.
जेन्नर यांना कदाचित, त्या वेळी याची जाणीव नसेल, कारण ते खऱ्या अर्थाने जिज्ञासू संशोधक होते. वैज्ञानिक संशोधक प्रयोगाला सुरुवात करणाऱ्या आधी समाजातील घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करतो. ते निरीक्षण स्वत:च्या विवेक, तारतम्य आणि तर्काच्या आधारे तपासतो आणि मग प्रयोगाची आखणी, कार्यवाही आणि निष्कर्ष काढतो. गायींना होणाऱ्या ‘काऊपॉक्स’ रोगांचा आणि त्या गाईची राखण करणाऱ्या गवळणींचा त्यांनी अभ्यास केला. त्या गवळणींना ‘काऊपॉक्स’ होत नाही असं लक्षात आल्या. संशोधनाला सुरुवात झाली. संशोधनाला आधी नकार आणि मग स्वीकार व पुढे जयजयकार असा प्रवास लाभला. यातून जेन्नर यांनी इतिहास घडवला. आज ‘देवी’ रोगाचे जगातून पूर्ण उच्चाटन झालंय, ते केवळ एका व्यक्तीच्या जिज्ञासूपणामुळे, अथक परिश्रमामुळे आणि अंत:स्फूर्तीमुळे.. सगळंच विलक्षण. मन गुंग करणारं.. मनमोर रोमांचित करणारं.
डॉ. राजेंद्र बर्वे  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
व्ॉक्सिन ही संज्ञा ‘व्ॉका-गाईबैल’ या शब्दामुळे तयार झाली. रोग प्रतिकारशक्तीशास्त्र या संपूर्ण शाखेचं जनकत्व जेन्नर यांच्याकडे आहे.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो