चंद्रपूरमध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यू
|
|
|
|
|
प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूर वन विभागांतर्गत येणाऱ्या चोरगाव वरवटच्या जंगलात पट्टेदार वाघाचा संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. दहा महिन्यात दहा वाघांचा मृत्यू झाल्याने आणि बहुतांश वाघांचे मृत्यू चंद्रपूर क्षेत्रातील असल्याने उपवनसंरक्षक कल्याणकुमार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चंद्रपूर वन विभागांतर्गत येत असलेल्या चोरगाव वरवटच्या जंगलात दुपारी दीड वाजताच्या सुमारास बांबू कामगार काम करीत असताना त्यांना परिसरात मृत जनावराचा वास येत होता. सुरुवातीला या कामगारांनी वासाकडे दुर्लक्ष केले. मात्र काही वेळाने आणखी दरुगधी येत असल्याने थोडे दूर जाऊन बघितले असता त्यांना एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत पडून असलेला दिसला. कामगारांनी या घटनेची माहिती चंद्रपूर वन विभागाला दिली. माहिती मिळताच चंद्रपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक कल्याणकुमार, एफडीसीएमचे संजय ठाकरे, सहायक उपवनसंरक्षक अरुण तिखे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बघितले असता कक्ष क्रमांक ५९० मध्ये वाघ मृतावस्थेत पडून होता. |