नवनीत : शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत : शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२ Bookmark and Share Print E-mail
नवनीत

इतिहासात आज दिनांक.. : १२ ऑक्टोबर
१८७२ ख्यातनाम फ्रेंच इतिहासकार व मुत्सद्दी फ्रांस्वा प्येअर गीयोम गोझी यांचे निधन. १८४० ते ४८ या काळात ते पंतप्रधान होते. साहित्य, इतिहास, राज्यशास्त्र, शिक्षण यात त्यांचे योगदान आहे.
१८८० महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी एडन तुरुंगात तुरुंग फोडून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
१९६७ ख्यातनाम समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निधन.  २३ मार्च १९१० रोजी उत्तरप्रदेशातील अकबरपूर येथे त्यांचा जन्म झाला. मुंबई व कलकत्ता येथून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केले. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांनी काँग्रेसच्या गोहत्ती अधिवेशनात भाग घेतला होता. पुढे अर्थशास्त्र विषयातील उच्च शिक्षण घेण्यासाठी बर्लिनला गेले आणि बर्लिन विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांनी मिळविली. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर ते जर्मनीत असल्याने त्यांनी हिटलरचा उदय व विकास पाहिला. त्यामुळे हिंसेचा मार्ग त्यांनी कायमच त्याज्य मानला. १९३६ मध्ये काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाचे चिटणीस, काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीच्या गटाचे नेतृत्व व काँग्रेस सोश्ॉलिस्ट पत्राचे संपादन त्यांनी केले. भारत छोडो चळवळीत सक्रिय सहभाग. बिटिश, नेपाळी, पोर्तुगीज, अमेरिकन, भारत सरकारने एकूण २२ वेळा कैदेत ठेवले. आठ भारतीय भाषा व जर्मन, फ्रेंच, इंग्रजीवर प्रभुत्व होते. विश्वलोकसभा व विश्वसरकारचे ते खंदे पुरस्कर्ते होते. पु. ल. देशपांडेलिखित ‘लोहिया : एक रसिक तापस’ हा लेख महत्त्वाचा आहे.
प्रा. गणेश राऊत  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : आठवा हेन्री व अ‍ॅन बुलिन

इंग्लंडच्या इतिहासात राजा आठवा हेन्री (१५०९-१५४७) याची कारकीर्द बरीच गाजली ती त्याच्या लग्नांमुळे. त्याने लग्न केले, पण अपत्य होत नव्हते. गादीला वारस हवा म्हणून त्याच्या मृत भावाच्या पत्नीशी म्हणजे कॅथेरीनशी लग्न केले, पण कॅथेरीनपासून जन्मलेले सर्व मुलगे जन्मताच मृत झाले. त्यामुळे परत एका लग्नाची गरज भासू लागली. कॅथेरीनपासून त्याला एक मुलगी होती. हेन्रीने एक विधवा अ‍ॅन बुलिन हिच्याशी लग्न करायचे ठरविले. इंग्लंडच्या राजेपदावर असलेल्या व्यक्तीला लग्नासाठी पोपची परवानगी लागते. पोपने हेन्रीला पाहिजे असलेल्या दोन्ही परवानग्या दिल्या नाहीत. एक म्हणजे कॅथेरीनशी घटस्फोटाला व अ‍ॅन बुलिनशी लग्न करावयास. हेन्रीने पोपचा हुकूम धाब्यावर बसवून प्रथम कॅथेरीनला हद्दपार केले व १५३३ मध्ये अ‍ॅनशी गुप्तपणे लग्न केले.
लंडनच्या धर्मगुरूंनी हेन्रीला याचा जाब विचारल्यावर त्यांनाच टॉवर ऑफ लंडनमध्ये कारावासात टाकले. १५३३ च्या अखेरीस अ‍ॅन प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. एवढा खटाटोप करून अ‍ॅनशी लग्न करूनही परत मुलगीच झाल्यामुळे हेन्री मुलीचे तोंडही न पाहता दुसरीकडे राहावयास गेला. अ‍ॅनच्या मुलीचे नाव एलिझाबेथ. हीच पुढे राणी एलिझाबेथ पहिली झाली. राजा हेन्रीच्या या धर्मविरोधी धोरणामुळे त्याला इंग्लंडच्या राजेपदावरून बरखास्त केले आहे, असे फर्मान रोमच्या पोपने काढले. अ‍ॅनला सोडून हेन्री आता जेन सेमूर या सौंदर्यवतीकडे आकर्षित झाला. अ‍ॅनला सोडण्यासाठी तिच्यावर दुर्वर्तनाचा खोटा आरोप ठेवून तिचा शिरच्छेद करण्याचा त्याने हुकूम दिला. अ‍ॅन बुलिनने ही क्रूर शिक्षा शांतपणे ऐकून घेतली. तिने एवढीच इच्छा व्यक्त केली की, इंग्लंडच्या पद्धतीने आपला शिरच्छेद कुऱ्हाडीने न करता फ्रेंच पद्धतीने तलवारीने करावा.
सुनीत पोतनीस  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : वैशिष्टय़पूर्ण वंगण तेले
आतापावेतो खनिज तेलाचे शुद्धिकरण करून मिळणाऱ्या बेसऑइल्सपासून वंगण तेले तयार केली गेली. त्यात पुढे सिन्थेटिक तेलांची भर पडत गेली. वाहनासाठी वापरात असलेली ऑटोमोटिव्ह तेले आणि औद्योगिक क्षेत्रात वापरली जाणारी औद्योगिक तेले अशी ढोबळमानाने वंगण तेलांची वर्गवारी होते. वाहनांची डागडुजी करताना आपण इंजिन तेल, गीअर तेले बदलतो, पण ब्रेकफ्लूइड आणि कूलंट या महत्त्वाच्या तेलांना विसरत असतो. वास्तविक गाडय़ांच्या सुरक्षेसाठी ही वंगण तेले आवश्यक असतात. गाडी चालू असताना इंजिनातील रेडिएटरला थंड करण्याचे कार्य कूलंट करीत असते. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असला तरीही गाडीचा ब्रेकदेखील सुस्थितीत असावा लागतो. अन्यथा अपघाताला स्वत:हून आमंत्रण दिल्यासारखे होईल. ब्रेकच्या नियमित कार्यासाठी ब्रेकफ्लूइड लागते.
ही दोन्ही वंगण तेले पेट्रोलियम स्वरूपाची नसतात. ती इथिलीन ग्लायकोल या सेंद्रीय रसायनापासून बनलेली असतात. शिवाय त्यात अन्य रासायनिक पूरकेदेखील असतात. उष्णता शोषून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. गतिशील गाडय़ांच्या इंजिनांना थंड ठेवणे आणि ब्रेकमध्ये घर्षण न होऊ देणे ही त्यांची महत्त्वपूर्ण कार्ये होत. बाजारात उपलब्ध असलेली कूलंट तेले चकाकत्या हिरव्या रंगाची तर ब्रेकफ्लूइड लाल रंगाची असतात. कूलंट तेले निसर्गमित्र असावीत म्हणून त्यात अमाईन आणि फॉस्फेटसारखी रसायने वज्र्य असतात. त्यांचा वापर करण्यापूर्वी त्यात पाणी मिसळावे लागते. त्यासाठी कठीण पाण्यात टिकू शकणारी कूलंट तयार करावी लागतात. ब्रेकफ्लूइडचा उत्कलन बिंदू उच्च असावा लागतो. त्याची कमी तापमानाला वाहकता आणि स्थिरतादेखील महत्त्वाची असते.
जोसेफ तुस्कानो
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,   मुंबई २२  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. : सप्रेम नमस्कार विनंती आग्रहाची..
प्रिय मित्र प्रदीप यास,
सप्रेम नमस्कार आणि विनंती आग्रहाची
मायना वाचून दचकलास ना? तुझी-माझी पिढी पत्र लिहायला शिकली ती ‘स. न. वि. वि.’ असा मायना खरडून. मायन्यातला बदल नुसता शाब्दिक नाहीये. मुद्दामहून आग्रहाची विनंती करतोय. तुझं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, वयाची सत्तरी गाठलीस म्हणून. मीही तुझ्यापाठोपाठ आहेच. तर परवाच्या वाढदिवसाच्या छानदार सोहळ्यात विरजण नको म्हणून दोन दिवसांनी पत्र लिहितोय. प्रदीप म्हणजे पद्या, तुला हे पत्र लिहायला चांगलाच उशीर झालाय. केव्हापासून तुला सांगावंसं वाटत होतं, पण मला धीर झाला नाही. कोणीतरी तुला हे सांगायलाच हवं होतं. खरं पाहता, आधीच, आपल्या तरुणपणी आता ज्येष्ठ नागरिक झाल्यामुळे आपल्याला सांगणार कोण? आपल्याला शहाणपणा शिकवायचं कोणी? असे प्रश्न पडतात. त्यामुळे, आता या उतारवयात आपणच एकमेकांना सुज्ञपणाचे बोल ऐकविले पाहिजेत.
आतापर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल की, नमनाला घडभर तेल घालतोय म्हणजे नक्कीच काहीतरी कडू उपदेश असणार!
पदय़ा, हा उपदेश नाही तर तुला जाणीव करून द्यायची आहे. या क्षणी तर असं वाटतंय की तुझी माझी ५०-५५ वर्षांची मैत्री तुटली तरी बेहत्तर पण तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचे सूर जुळले पाहिजेत. ‘आमचं उत्तम चाललंय’ असं म्हणू नकोस. वरवर पाहता, सगळं ठीक वाटतंय पण प्रत्यक्षात तसं  नाहिये. कारण तुझे कुटुंबीय अतिशय सहनशील आहेत. त्यांना श्रेय दे.
प्रदीप, तू मात्र तुझ्या कुटुंबाचा खूप मानसिक छळ करतोस. लोकांसमोर पत्नीशी गोड बोलतोस, ‘मी तिच्या आज्ञेत आहे’ असं म्हणतोस पण लोकांच्या नजरेआड तिला कस्पटासमान वागवतोस. माझ्यासमोरही वहिनींवर डाफरतोस. तुझ्या पत्नीने तुझ्यासारख्या हट्टी आणि हेकट माणसाशी संसार केला, मुलांना माया दिली म्हणून तुझा प्रपंच टिकून आहे, हे विसरू नकोस.
प्रदीप, तुझे कुटुंबीय तुझ्यावर कसे प्रेम करू शकतील? तू त्यांना कधी प्रेमानं वागवलंस? त्यांच्यावर तू कधी विश्वास टाकलास? मुलगा उत्तम इंजिनीअर झाला. देशी-परदेशी फिरतो, पण तू आजवर त्याच्यावर विश्वास टाकला नाहीस. त्याने चांगले मार्क मिळवले, यश मिळवलं तर त्या वेळी ते ‘यश टिकवायला हवं, मिलिंदा!’ असं कुजकट बोलायचास मुलीला अभ्यास करण्यावरून, मैत्रिणीशी गप्पा मारण्यावरून किती ओरडलास?  ‘असं वागलीस तर वाया जाशील’ हे शब्द मधुरेनं किती वेळा ऐकले असतील तिचं तिलाच ठाऊक! हे माझ्यादेखत घडलं तेव्हा मीच तुझा कान धरायला हवा होता, पण धाष्टर्य़ केलं नाही. आजही, रोज उठून मुलाला सतत उपदेश करतोस, ते त्याचं भलं व्हावं म्हणून नाही तर त्याच्यावर अविश्वास आहे म्हणून. वहिनींच्या डोळ्यांत तर मला आज अनेक र्वष विझलेपण दिसतंय. आता या वयात अविश्वासाबरोबर असुरक्षितपणा तुझ्या मनाला छेडतोय, हे कळतंय मला. मित्रा, अरे विश्वासाची देवाण-घेवाण झाली तर सुरक्षित वाटेल. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना! आता तरी जागा हो, ही आग्रहाची विनंती आणि हे पत्र तुझ्या कुटुंबीयांच्या सांगण्यावरून लिहीत नाहीये, नाही तर पुन्हा डाफरशील..
कट्टय़ावर संध्याकाळी भेटशील तेव्हा बोलू.. तुझा जिवलग मित्र..
डॉ. राजेंद्र बर्वे  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो