अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२३. तळमळ आणि कळकळ
मुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२३. तळमळ आणि कळकळ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२३. तळमळ आणि कळकळ Bookmark and Share Print E-mail

 

शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२
हाव आणि त्यातून होणारी धावाधाव ओसरली की जे आहे त्याकडेही लक्ष जाईल. माझ्या देहधारणेसाठी आणखी काय आवश्यक आहे, याचा विचार मग योग्यपणे करता येईल. कर्तव्यापोटी प्रारब्धानुसार मी पिता म्हणून पुत्रासाठी, पुत्र म्हणून माता-पित्यासाठी, भाऊ म्हणून भावासाठी, पती म्हणून पत्नीसाठी बांधील आहे. त्यांच्यासाठी माझी कर्तव्य काय, याचाही यथायोग्य विचार सुरू होईल. आजवर मोहामुळे मी अनावश्यक ते मिळविण्यासाठीही व्यर्थ धावत होतो, व्यर्थ शक्ती खर्च करीत होतो, हे उमगेल.

मग कर्तव्यकर्म करण्यासाठी जितके प्रयत्न आवश्यक आहेत ते अचूकतेने होऊ लागतील. तेव्हा ‘संतोष’ हे नियमाचे उपांग निष्क्रियता शिकवीत नाही तर आवश्यक त्या कृतीसाठी प्रेरणा देतानाच जे आहे त्यात समाधान मानायलाही शिकवते. जे आहे त्यात समाधान नसेल तर कितीही मिळालं तरी समाधान मिळणार नाही, हे निश्चित. एखादा कोटय़धीश मुलायम बिछान्यावर झोपतो आणि एखादा कफल्लक जमिनीवर अंग टाकतो. झोप लागेपर्यंतच आपल्या ‘सुखा’चं वा ‘दुखा’चं त्यांना भान असतं. एकदा गाढ झोप लागली की त्या निद्रेचं म्हणून जे काही सुख आहे, त्यात काय भेद आहे? पण कफल्लकानं विचार केला की, श्रीमंत झाल्याशिवाय मी झोपणारच नाही, झोपेत वेळ वाया जात असल्यामुळेच मी श्रीमंत बनत नाही, तर काय होईल? झोपेविना त्याची अंगभूत क्षमता आणि शक्तीही कमी होईलच पण नुसतं झोप टाळून तो श्रीमंतदेखील होणार नाही! उलट आवश्यक ती झोप घेतली तर जागं राहाण्याची शक्तीही टिकून राहील आणि ती शक्तीच प्रयत्नांना बळ देईल. ते प्रयत्न करतानाच जर भगवत्कृपेनं त्याच्यातील सद्सद्विवेकबुद्धी जागी झाली तर त्याला जाणवेल की ज्यांच्यात आसक्ती अपरंपार आहे, हांव अनिवार आहे, त्यांच्याइतका गरीब या जगात कुणीही नाही. असा जीव कितीही श्रीमंत झाला तरी तो गरीबाहून गरीबच राहाणार. तीन बंगले असताना जो चौथा बंगला होत नाही म्हणून कुढत आहे, तळमळतो आहे, दहा गाडय़ा असताना जो अकरावी गाडी नाही म्हणून झुरतो आहे त्याला तीन बंगल्यांनी आणि दहा गाडय़ांनी काय तृप्ती दिली? तळमळ आहे तोवर मळमळ आहे. तिथे स्वतच्या खऱ्या हिताची कळकळ कुठून उत्पन्न होणार? मग दुसऱ्याच्या दुखाबाबत कळकळ वाटणं तर फारच दूरची गोष्ट! मी अतृप्त असतो ते कायम मला काहीतरी मिळावं, यासाठी. दुसऱ्याला अमुक एक मिळावं, यासाठी मी अतृप्त कधीच नसतो. तेव्हा माझ्यातली अतृप्ती ही स्वार्थकेंद्रितच असते. जे आहे त्यात संतोष मानता येऊ लागला की मग आपल्यापेक्षा कितीतरी कमी असूनही संतुष्ट असणारे आणि आपल्यापेक्षा भौतिकाचा पसारा कितीतरी अधिक असूनही असंतुष्ट असणारे, यांच्याकडे प्रथमच लक्ष जाईल! मग भौतिक हे संतोषाचे मोजमाप नाही, हे उमगेल. त्यानं निष्क्रीयता वाढणार नाही उलट उद्दिष्टकेंद्रित कृतीशीलता वाढेल!
चैतन्य प्रेम   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो