सो कुल : वाढ-दिवस
मुखपृष्ठ >> सो कुल >> सो कुल : वाढ-दिवस
 

व्हिवा

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सो कुल : वाढ-दिवस Bookmark and Share Print E-mail

alt

सोनाली कुलकर्णी, शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दूरवरून आकाशगंगा तटस्थ वाटली तरी अवकाशात कितीतरी बदल होतात. आपापल्या गती आणि स्वभावानुसार सगळे ग्रहगोल मार्गस्थ असतात. ह्य़ा सूर्यमंडळामध्ये पृथ्वीसुद्धा आहे. स्वत:भोवती फिरत ती सूर्याला प्रदक्षिणा घालते. ती सुद्धा बदलते आहे.
अगदी रोज.
नवा लेख लिहून झाला. थोडा फेरफार बदल केला, दुरुस्त्या झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा लेख तपासायला घेतला. वाचताना लक्षच लागेना. काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागलं. गप्प बसून विचार केल्यावर लक्षात आलं. अरे! हा ऑक्टोबरचा दुसरा आठवडा. म्हणजे आपल्या ‘सो.कुल’चा वाढदिवस आला की. गंमतच वाटली मला. काय भराभर दिवस उडून जातात. आत्ता लिहायला सुरुवात केली असं वाटतंय. तर चक्क ह्य़ा पर्वाला आकडय़ांमध्ये आख्खी दोन र्वष पूर्ण होत आली! गाडीत बसल्यासारखं वाटतंय मला. म्हणजे आपण एकाच जागी बसलेले असतो. पण गाडी आपल्याला वेगवेगळ्या गावांना नेत असते. एक मिनिट गाडीतून उतरून जरा थांबावंसं वाटलं मला ह्य़ा लेखाच्या निमित्तानं. केवढा प्रवास झाला ना.!
काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं सारखं. किंवा नव्यानी काहीतरी ‘रिअलाईझ’ होत असतं. मागच्याच लेखातली शेवटची ओळ- ‘समंजसपणे मोठं होणं किती विदारक असतं ना.’ आता ह्य़ातला ‘विदारक’ हा शब्द मला इतका सतावतोय. कशाला मी इतका तीव्र शब्द वापरला? त्या क्षणी एवढं हरल्यासारखं का वाटत होतं मला.? खरं तर ‘आव्हानात्मक’ चाललं असतं. ‘परीक्षा घेणारं’, ‘कोडय़ात टाकणारं’. असं कुठलंही विशेषण चाललं असतं. किंवा अगदी सोपा म्हणजे- ‘अवघड’ हा साधा शब्दसुद्धा चालला असता. एकूणात मोठं होणं म्हणजे काय- तर प्रवास करणं. किंवा प्रवासात असणं. आपण ठरवलंच, तर प्रवासाला कितीही त्रासदायक मानू शकतो. पण प्रवास/ जगणं. ही आपली निवड आहे. तिचे स्वाभाविक पाठीराखे सोबती-आनंद आणि कुतूहल. अनुभव असणारच वैविध्यपूर्ण. आणि त्यातच मजा आहे.
शिवाय प्रवासात/ जगण्यात- बदल फक्त इतरच गोष्टींमध्ये होतात असं नाही. आपल्या स्वत:तही होतात- आणि ते होऊ दिले पाहिजेत. मला कळतंय मीही बदलत चालले आहे. मला ‘मी’ असणं मिळत चाललंय. आधी आपण अनेक गोष्टी भीडमधल्या भेडियोंकी तरह करतो. पण आता काही करण्यापूर्वी मी एक शांत श्वास घ्यायला शिकले आहे. आपण चांगलंच वागायचं हे न्यायप्रिय असणं खरंच आहे. पण काही ठिकाणी- आपण गुंतण्याची, वेळ देण्याची, भावना खर्च करण्याची गरजच नसते- हे आता मला कळायला लागलंय.
माझ्या एका मैत्रिणीला रुसायला फार आवडतं. ती वाटच पाहात असल्यासारखी वाटते निमित्तासाठी. जर कुठे खट् झालं. की झालीच ही खट्टू. मग तिच्या मित्र आणि परिवाराचं- तिला मनवण्याचं सत्र सुरू होतं. तिचा ईगो काचेइतका नाजूक असतो. पाहावं तेव्हा ती क्रोधागृहात निघायच्या तयारीत असते. मग भांडणं, समजुती घालणं, ऊहापोह. ह्य़ा सगळ्यात तिचं चांगलं मनोरंजन होतं. पण बाकीच्यांच्या वागण्यात सतत एक धास्तावलेपणा असतो. मला तर आता ‘लांडगा आला रे.’सारखा कंटाळा आलाय तिच्या रुसण्याचा. त्यामुळे अलीकडेच मी तिच्या ह्य़ा खेळातून हलकेच अंग काढून घेतलंय. मलाच इतकं बरं वाटायला लागलंय. थोडक्यात, मोठं झाल्यासारखं वाटतंय.
दुसरी एक मैत्रिण कॉलेज संपल्यावर काही वर्षांतच परदेशी जाऊन बसली. आम्ही मायदेशी उरलेले मित्रमैत्रिणी सतत हळवे व्हायचो. तिचं नाटय़मय लग्न, तिच्या अडचणी, ओढाताण. ह्याबदद्दल फार फार वाईट वाटून घ्यायचो. आठवणीच्या प्रत्येक क्षणाला/ दिवसाला पैशाची पर्वा न करता- तिला फोन/ एसएमएस/मेल करायचो. डोळ्यातलं पाणी आवाजात जाणवू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत बरी हायेस ना. विचारायचो. काही लागलं तर सांग. परत कधी येशील.चा धोशा लावायचो. पण अलीकडे मला जाणवलं, चांगलं एक तप झालं की तिला परदशी स्थायिक होऊन! ती तिथे घरं, नोकऱ्या बदलते आहे, घरच्यांना  सुट्टीला बोलवते, फेसबुकवर तिथल्या फ्रेंडसबरोबरचे नवी गाडी घेतल्याचे फोटो टाकते.. ती तिथे रुळली आता. परदेशी जाण्याचा निर्णय तिचा होता. तिच्या निर्णयाला- मित्र म्हणून आपण कुठेतरी काही अंशी अपराधी का वाटून घ्यायचं? आणि किती दिवस.! ती सुजाण झाली. आपण आपलं मोठं होणं कशाला थोपवून धरायचं? बरं दिसणार नाही म्हणून? यंदा मला अर्थातच तिची आठवण आली. पण फोनपाशी गेलेल्या उजव्या हाताला, मी डाव्यानी थोपटलं. म्हटलं, असू दे गडय़ा. हेतू चांगला आहे तुझा. पण ठेव जरा तुझ्याच मुठीत, तुझ्याचसाठी. हृदयातली कळ आणि डोळ्यातलं पाणी ह्य़ांची किंमत तुझी तुलाच मोजावी लागणार आहे. नकळत लागलेल्या भाबडय़ा सवयींना थांबवूया आता.
तर हे आकलन वाढणं मला खूप सुखावह आणि ‘एनरिचिंग’ वाटायला लागलंय. चीअर्स ऑन-मोठं होणं. ‘सो-कुल’च्या पाठोपाठ माझ्या बाळाचा- कावेरीचा पहिला वाढदिवस येतोय. मावणार नाही इतका आनंद व्यापून राहिलाय आयुष्यात. मग खुळ्यासारखं हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे का लागायचं? तुम्ही सगळे आहात की एवढे माझ्यासाठी. मग हट्टीपणाचंच काय एवढं अप्रूप वाटून घ्यायचं? खरं अप्रूप आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी. ते सुंदरपणे व्यक्त होऊ दे. ‘मुला रुश’ ह्य़ा सिनेमात एक अप्रतिम वाक्य आहे- ‘व्हॉट आय हॅव लन्र्ट. इज टू लव्ह इन रिटर्न.’ तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, प्रेम ह्य़ासाठी पुरे पडण्याचं बळ मला मिळो. थँक यू ऑल. माझी कृतज्ञ भावना तुमच्यापर्यंत पोचतील ना? लॉटस् अ‍ॅण्ड लॉटस् ऑफ लव्ह.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो