‘ते स्मृतिभवन हे केवळ गुरुद्वारा !’
|
|
|
|
|
पीटीआय, अमृतसर ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाईत बळी पडलेल्यांच्या स्मृत्यर्थ सुवर्णमंदिरात उभारण्यात येणारे स्मृतिभवन म्हणजे केवळ गुरुद्वारा आहे, अन्य काहीही नाही, असे स्पष्ट करून पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांनी या भवनाच्या उभारणीवरून निर्माण झालेला वाद शमविण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसने या प्रश्नाचा बागुलबुवा निर्माण केला आहे, अन्यथा त्यामध्ये वादग्रस्त असे काहीच नाही. स्मृतिभवन म्हणजे केवळ गुरुद्वारा आहे, असे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी म्हटले आहे. भवन म्हणजे केवळ गुरुद्वारा असून तेथे भाविकांच्या दर्शनासाठी गुरू ग्रंथसाहिब ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.या स्मृतिभवनाच्या म्हणजेच गुरुद्वाराच्या एकाही भिंतीवर ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये बळी पडलेल्या एकाही व्यक्तीचे नाव लिहिण्यात येणार नाही. काँग्रेसला या गुरुद्वाराबाबत काही हरकत असेल तर त्यांचा हेतू चांगला नसल्याचे त्यावरून स्पष्ट होत असून त्याला शीख समाज सडेतोड उत्तर देईल, असेही बादल यांनी म्हटले आहे. |