नरेंद्र मोदींच्या व्हिसावर अमेरिका फेरविचार करू शकते
|
|
|
|
|
वाशिंग्टन, १२ ऑक्टोबर २०१२ योग्यता आणि अमेरिकेच्या कायद्याला धरून असलेल्या व्हिजा अर्जांवर फेरविचार करण्यात येईल, असं गुजरातचे मुख्यमंत्री यांचा नामोल्लेख न करता अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिका-याने म्हटले आहे.
आम्ही कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या व्हिजा अर्जाच्या प्रक्रियेमध्ये न पडता, त्या व्यक्तीची योग्यता आणि अमेरिकेच्या कायद्यांनुसारच त्यावर निर्णय घेतो, असं अमेरिकेच्या लोककल्याण विभागाचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री माईक हॅमर यांनी प्रसारमाध्यमाना सांगितले. ब्रिटनने नरेंद्र मोदी यांच्या व्हिसा अर्जाबाबत भूमिका बदलल्यानंतर अमेरिकेनेही ब्रिटनच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे दिसून येत आहे. ब्रिटनने मोदींबाबच्या भूमिकेत बदल केल्यासंदर्भात विचारलेले असता हॅमर म्हणाले की, एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या व्हिसासंदर्भातील प्रश्नांना उत्तरे दिली जात नाहीत. परंतु, अत्यावश्यक बाबी आणि कायद्याला अनुसरून असलेल्या व्हिसा अर्जांवर फेरविचार केला जाईल. या व्यतिरिक्त माझ्याकडे नेमकी माहिती नाही. दहा वर्षांपूर्वी झालेल्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने मोदींशी कोणताही संपर्क न ठेवण्याचे धोरण अवलंबले होते. परंतू त्याबाबत आता फेरविचार करण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. भारतीय प्रकरणांचे नवे ब्रिटिश मंत्री ह्यूगो स्वायर म्हणाले की, ‘‘मी नवी दिल्लीतील वरिष्ठ ब्रिटिश अधिका-यांना गुजरातमध्ये जाऊन तेथील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची भेट घेण्याचे आदेश दिले आहेत’’. |