इन्फोसिसला आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत २,३६९ कोटी रूपयांचा शुध्द नफा
|
|
|
|
|
मुंबई, १२ ऑक्टोबर २०१२ ‘इन्फोसिस’च्या नफ्यातील आकडेवारीने शुक्रवारपासून चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाही निकालांच्या हंगामाला खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आयटी क्षेत्रातील अग्रणी कंपनी इन्फोसिसला ३० सप्टेंबर २०१२ च्या आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत २,३६९ कोटी रूपयांचा नफा झाला असून तो मागील वर्षाच्या याच काळातील आकडेवारीनुसार २४.२९ टक्के अधिक आहे.
मागील आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबरमध्ये कंपनीला १,९०६ कोटी रूपयांचा शुध्द नफा झाला होता. कंपनीने आज मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार त्यांचा नफा २१.७ टक्के वाढून ९,८५८ झाला आहे, मागील वर्षी याच कालावधीत तो ८,०९९ कोटी रूपये होता. मागील सहा वर्षांपासून कंपनीचे सीएफओ असणारे वी. बालाकृष्णन हे ३१ ऑक्टोबरला आपले पद सोडणार आहेत. असं असलं तरी, ते कंपनीचे संचालक मंडळात राहणार असून इन्फोसिस बीपीओ, फिनैकल आणि इंडिया बिजनेस यूनिटची जबाबदारी सांभाळतील. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रबंध संचालक एस डी शिबुलाल यांनी सांगितले की, ‘‘आजही या उद्योगाला जागतिक अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. परंतू पुर्वीपेक्षा या उद्योगात आमची स्थिती मजबूत आहे आणि भविष्यात यामध्ये आणखी सुधारणा होण्यास मदत होईल. सध्याचे उपाध्यक्ष राजीव बंसल हे १ नोव्हेंबर २०१२ रोजी सीएफओचा कार्यभार सांभाळणार आहेत. |