आकांक्षापूर्ती
मुखपृष्ठ >> लेख >> आकांक्षापूर्ती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आकांक्षापूर्ती Bookmark and Share Print E-mail

सुलभा आरोसकर ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्या अंधत्वावर मात करीत  इकॉनॉमिक्स आणि ‘स्टॅटिस्टिक्स’मध्ये यश मिळवणारी, विद्यार्थ्यांच्या  देवाणघेवाण-अंतर्गत कॅनडात जाणारी, नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन आता पीएच.डीचा अभ्यास सुरू करणारी सिद्धी देसाई. तिच्याविषयी..
आयुष्यात आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे ज्या व्यक्तीला कळतं ती व्यक्ती कधीच मागे पडत नाही. देवाने एखादं दान कमी दिलं असलं तरी ती कमतरताच तिला खंबीर बनवते. सिद्धी देसाई ही अशीच एक जिद्दी मुलगी. ३-४ वर्षांची असताना अपघाताने तिला अंधत्व आलं. अचानक कोसळलेल्या या जीवघेण्या संकटातून सावरणं सर्वानाच फार कठीण जात होतं. घरी आई, शाळेत शिक्षिका, तिच्याबरोबरच अभ्यासाचे धडे गिरवत होती. घरातील सकारात्मक व सुदृढ वातावरणामुळेच निराशाजनक परिस्थितीवर मात करून नेटाने अभ्यास करून ‘सेंट झेविअर्स’मधून ‘इकॉनॉमिक्स’ व ‘स्टॅटिस्टिक्स’ हे विषय घेऊन ती बी.ए. झाली. एम.ए. करण्यासाठी पुण्याच्या ‘गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स व इकॉनॉमिक्स’ (GIPE) मध्ये तिने प्रवेश घेतला. तेथेच तिच्या करिअरला कलाटणी मिळाली.
आँटॅरिओ, महाराष्ट्र, गोवा (OMG) तर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांची देवाणघेवाण होते व त्या अंतर्गत कॅनडातील १६ विद्यापीठांमध्ये पदवीधर विद्यार्थ्यांना जाता येतं. या संधीचा पाठपुरावा करायचं सिद्धीने ठरवलं, सर्व तयारीअंती मुलाखत घेण्यासाठी कॅनडाहून प्राध्यापक आले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे तिला कॅनडातील कार्टन (carleton) विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला. चार महिने म्हणजे एक सेमिस्टर तिथे राहता येणार होतं. पण या सगळ्या सोपस्कारांना खूप उशीर झाल्याने विद्यापीठाच्या वसतिगृहात जागा मिळाली नाही. तिथेच खडतर प्रवासाला सुरुवात झाली..
शोधमोहीम सुरू झाली. होय-नाहीच्या हिंदोळ्यावर आशा-निराशेचा खेळ सुरू होता. २९ ऑगस्टचं तिकीट आणि १२-१३ तारीख आली तरी राहायची सोय होत नव्हती. शेवटी १५ ऑगस्टला इझाबेल गली या इटालियन बाईने होकार दिला आणि तयारी सुरू झाली. अगदी स्वयंपाक शिकणंसुद्धा. तिच्याबरोबरच निवड झालेल्या दिल्लीच्या मुलाने मदतीचे आश्वासन दिलेच होते.
केबिन बॅग, लॅपटॉप, सर्व कागदपत्रं पर्स, पैसे, स्वेटर सर्व सांभाळण्याची कसरत करत ती एकदाची विमानात चढली व सुखरूप ओटाव्हाला पोहोचली. घरी येताच, घराची सवय करून घे हे सांगतानाच, ‘तू रुळेपर्यंत दोन आठवडे तुझी सर्व सोय व खर्च मी करणार आहे.’ असं सांगून इझाबेलने तिला चकित केलं हे सांगताना सिद्धीचा कंठ दाटून आला होता.
ठरल्याप्रमाणे विद्यापीठाचे लोक येऊन विद्यापीठ दाखवायला घेऊन गेले. तेथील अपंगांच्या विभागात १५०० विद्यार्थी होते. त्यातील ५ अंध होते. सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा छानच होत्या. खुर्ची व टेबलदेखील प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे बनवले होते. हाताच्या स्पर्शाने चालणारा कॉम्प्युटर, मोठा स्क्रीन, सर्वच उत्तम. मदतनीसही होते. अभ्यास सुरू झाला. चार महिन्यांत तीन विषयांचा अभ्यास करायचा होता. एक प्राध्यापक अगोदर नोटस् देत नव्हते. विषय तर खूपच कठीण. तीनही विषय गणिताशी निगडित. ते कशा पद्धतीने हिला समजतील याचा अंदाज येत नव्हता. फळ्यावरचं दिसणं नशिबातच नाही. या सर्वामुळे प्रत्येक दिवस कठीण जात होता. पहिली परीक्षा जवळ येऊन ठेपली तरी प्रगती कमीच. तासाला पैसे देऊन मदतनीस घेता येत होता, पण पैशाची चणचण.
विचारांचं काहूर माजलं होतं. काय करावं सुचत नव्हतं भारतात, आपल्या देशात मदतीला भरपूर लोकं होती. आई, आजी, काका, मित्र-मैत्रिणी ओळखीचे सर्व जणच खूप जपत असतात, जीव अगदी रडकुंडीला आला होता. सांगणार तरी कोणाला? पण एकटेपणानेच खूप बळ दिलं. भावनिक, मानसिकदृष्टय़ा ती अगदी स्वावलंबी व्हायला लागली. आल्या आल्या दुसऱ्याच दिवशी एकटीला दिवसभर घरात राहावं लागलं होतं, तो अनुभव गाठीशी होताच. तिने अभ्यासावरचं लक्ष थोडं कमी करून इतर गोष्टी करायचं ठरवलं. तिने तिकडच्या कम्युनिटी सेंटरला फोन लावला. तेथेही पदरी निराशाच आली. कारण त्यांच्या नियमाप्रमाणे ते फक्त त्यांच्याच नागरिकांना मदत करतात, पण खचली असती तर ती सिद्धी कसली?
अखेर तिने ‘कॅनेडियन नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर ए ब्लाइंड’ (CNIB) येथे संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या काही मदतनीसांशी संपर्क साधून सांगितलं , ‘मला कॅनेडियन संस्कृती समजावून घ्यायची आहे तसंच तुमचे खाद्यपदार्थही शिकायचे आहेत,’ असं सांगून स्वयंपाकघरात प्रवेश मिळवला. तिचा हा निर्णय एवढा परिणामकारक ठरला की, पदार्थ शिकवणाऱ्या एका मुलीने तिला ५६ वर्षांची एक बाई व मोनिका नावाची एक मुलगी मदतीला दिली. त्या दोघींच्या मदतीने तिने ६-७ म्युझियम्स पालथी घातली. तेथील म्युझियम्स बंदिस्त नसल्याने प्रत्येक गोष्ट हाताळता आली. तसेच कर्मचारीवर्ग एकदम निष्णात असल्याने अ‍ॅग्रीकल्चर म्युझियम, कॅनेडिअन कल्चरल म्युझियम ‘पाहताना’ अनेक गोष्टींचं ज्ञान आणि देशाच्या संस्कृतीचं दर्शन झालं. या दोघींच्या मदतीने थँक्स गिव्हिंग, ख्रिसमस हे सणही साजरे करायला मिळाले हे ती आवर्जून सांगते. हे सर्व करत असतानाच ती पोहायला शिकली. कॅनडात सतत बर्फ असल्याने पोहून बाहेर पडायचा मार्ग भुयारातूनच जातो. एकदा रात्री १० वाजता पोहून ती निघाली आणि रस्ता चुकली. काहीच समजेना. फोनही बंद. एकही माणूस नाही. त्यामुळे कितीही ओरडलं तरी फक्त प्रतिध्वनी ऐकू येत होता. मदतीचे मार्गच खुंटले होते. साडे दहाची शेवटची बस पकडायची होती. सर्व पंचप्राण तिने कानात साठवले आणि पाण्याचा आवाज ऐकत पुन्हा तलावाजवळ आली. बर्फातूनच चालत शेवटी वाट सापडली आणि  एकदाची बस पकडली. हा अनुभव सांगताना तिच्या अंगावर अजूनही काटा येतो. मनात आलं, आपल्या सारख्यांचीही अशावेळी पाचावर धारण बसली असती. मग सिद्धीच काय झालं असेल? अर्थात कितीही कठीण प्रसंग असला तरी न डगमगता मार्ग काढण्याचं बाळकडू तिला मिळालं होतं.
प्रचंड इच्छाशक्तीच तिच्या जीवनाचा गाभा असल्याने इतर सर्व गोष्टींचा आनंद लुटता, लुटता तिच्या मनाने परत उभारी धरली आणि नव्या जोमाने अभ्यासाला लागली. परीक्षेत चांगली ग्रेड मिळाली, त्यामुळे आत्मबळ तर वाढलंच आणि कॅनडाचा हेतूही साध्य झाला.
‘‘माझ्या पीएच.डी. करायला येण्याच्या विचारांची रुजुवात येथेच अंकुरली.’’ हा सगळा अनुभव एवढा संस्मरणीय होता की, खरंच आपण आठ महिन्यांसाठी तरी यायला इथं हवं होतं, अशी रुखरुख तिला लागून राहिली. ‘‘या माझ्या संपूर्ण वास्तव्यात इझाबेल माझ्या पाठीशी खंबीर उभी होती. तिचा सर्व व्याप सांभाळत मला प्रोत्साहन देत होती. कधी आईच्या मायेने माझी समजूत काढायची. इतकंच नव्हे, मला एकदा ताप आल्यावर माझ्या उश्याशी सतत बसून होती. खरंच, ना ओळख ना पाळख; पण माझं कॅनडातील वास्तव्य तिने किती संस्मरणीय केलं. ’’ डोळ्यांत पाणी व चेहऱ्यावर कृतज्ञता अशा हळुवार मन:स्थितीत सिद्धी सांगत होती. अशा प्रेमळ दिवसांचा व हृद्य आठवणींचा खजिना गाठीशी घेऊन ती भारतात परत आली तीच पीएच.डी.साठी अमेरिकेत जायचंच हे स्वप्न उराशी बाळगूनच.
प्रचंड ध्येयासक्तीने झपाटलेल्या या मुलीचे जी.आर.ई.साठी अथक प्रयत्न सुरू आहेत. तिला ‘पब्लिक पॉलिसी मेकिंग’ या विषयात अमेरिका किंवा कॅनडा जेथे प्रवेश मिळेल तेथे ती जाईल, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अभ्यासाबरोबरच तिने नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (एनईटी) देऊन त्यातही उत्तम यश मिळविले. ते ऐकून तर मी सर्दच झाले. तिला म्हटलं, ‘‘अगं काय कमाल आहे. ‘नेट’मध्ये यशस्वी होणं सोपं नाही. आता तू संपूर्ण देशात कोणत्याही कॉलेजमध्ये प्राध्यापक होऊ शकशील नाही का? तसा तुझा विचार आहे का?’’ ‘‘हो, ते खरं आहे. संधीचा एक मार्ग मला खुला झाला. जाईपर्यंत सहा-सात महिने शिकवायला मिळालं तर ते माझं भाग्यच. त्याचबरोबर इकॉनॉमिक्सचं आणखी सखोल ज्ञान मिळविण्यासाठीही या परीक्षेचा उपयोग झालाच.’’ एखाद्या विषयाचा अभ्यास करुन आपलं जीवन तेजोमय करण्यासाठी चाललेली तिची दृढनिश्चयी धडपड पाहून भारावलेल्या मनाने मी तेथून बाहेर पडले आणि वाचलेल्या ओळी माझ्या मनात रुंजी घालू लागल्या-
Blindness gives vision
Vision gives dream
Anybody can fulfil it
If there is a will.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो