संजय उवाच : ‘नवरात्र’
मुखपृष्ठ >> संजय उवाच >> संजय उवाच : ‘नवरात्र’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संजय उवाच : ‘नवरात्र’ Bookmark and Share Print E-mail

डॉ. संजय ओक ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गणपती गेले की ‘चैन पडेना आम्हाला’ या आपल्या मन:स्थितीतून बाहेर येऊन आपल्याला नवरात्रीचे वेध लागायला लागतात. हिंदू परंपरांमधल्या या सणांचे मला भारी अप्रूप आहे. ते कधी आम्हाला मोकळे-ढाकळे ठेवत नाहीत. एक सरतो तर दुसरा पुढे सरकतो. स्टेशनवर ‘जानेवाली गाडीचा’ शेवटचा डब्बा पुढे गेल्याक्षणी त्याच रुळावर पुढच्या गाडीचा ‘एमु’ (EMU) दिसल्यावर जसा आनंद होतो तसाच हा प्रकार.

त्यामुळे ‘बाप्पा मोरया’ संपतो न संपतो तोच गरबा घुमायला लागतो.
माझ्या लहानपणचं पुण्यातलं नवरात्र आणि आजचं यात मला जमीन-अस्मानाचा फरक जाणवतो. तेव्हा गरब्याचा घुमवटा नव्हता. आमच्या बंगल्यातून चतु:श्रृंगीचे दिवे दिसायचे आणि ते दिवे पाहून आई दिवसाच्या रहाटगाडग्याला प्रारंभ करायची. आता मात्र महिषासूरमर्दनिचा हा उत्सव सण न राहता मॅनेज करायचा एक इव्हेन्ट झाला आहे. तेव्हा फुलांचे हार, देवीचा नवेद्य (कधी कधी तर चक्क सामिष! जय हो देवी), पूजेचं तबक, निरांजन, आरती संग्रह आणि घंटा यांची सत्ता होती. आता डी.जे., कॅराओके, मंडप, इलेक्ट्रिकच्या माळा आणि चणिया-चोळीचे राज्य आहे. फुलवाले, इलेक्ट्रिशियन, डी.जे., रेडिओ जॉकी, लेडीज टेलर, साडी दुकानदार, मॅचिंगवाले, घागरा स्पेशालिस्ट आणि गायनॅकॉलॉजिस्ट यांना नवरात्रीच्या दिवसांत आणि नंतर काही दिवस बोलायलाही फुरसत नसते असे ऐकिवात येते. ऐकावे ते नवलंच. बरं देवी अंबामाता; संतोषी मातेपासून; आई जरी-मरी; जाखादेवी; विंध्यवासिनी आणि बंगाली बाबूंची, जीभ बाहेर काढून त्वेषाने असुरनि:पात करणारी महिषासूरमर्दनि कोणत्याही रूपात शोभूनच दिसते. त्यामुळे देखाव्यात व्हरायटीला स्कोप. तिला रोज नव्या रंगाची साडी आणि तो रोजचा बदलणारा रंग वृत्तपत्रातून ‘उद्याचा रंग’ म्हणून आज जाहीर झाला की सर्वत्र त्या रंगाची पखरण होते. हॉस्पिटल्स आपली हिरवी शिस्त बाजूला ठेवतात. शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील खाकी रंगही दहा-अकरा दिवसांच्या ‘ई.एल.’ वर जातो आणि वर्तमानपत्रातून तांबडय़ा- निळ्या- पिवळ्या- हिरव्या- मोरपंखी- चंदेरी रंगांची इंद्रधनुष्यी ल्यायलेली पाने लागू लागतात. मरगळ झटकली जाते; मनाला मोहर येतो आणि सण साजरा होतो. पण मला मात्र आज नवरात्रीचा वेगळ्या अंगाने विचार करायचा आहे.
या नऊ रात्रीत मला नव्या नऊ शपथा घ्यायच्या अन् द्यावयाच्या आहेत..
१) गर्भधारणा स्त्रीवर लादणार नाही. तिची मान्यता आणि मानसिक तयारीशिवाय मातृत्वाचे ओझे तिच्यावर टाकणार नाही.
२) वंशाला केवळ दिवाच नाही तर दिव्याला एक ‘वात’ लागते हे विसरणार नाही.
३) स्त्री गर्भ अव्हेरणार नाही, तर त्याचा सन्मानच करीन.
४) मुलगी झाली म्हणून सुतकी चेहरे दाखविणार नाही. त्यांची नावे ‘नकोशी’, ‘वंचना’, ‘विखारी’, ‘कर्मजली’, ‘अवदसा’, ‘अमावस’ अशी ठेवणार नाही.
५) तिला परक्याचं धन न मानता स्वत:च्या मर्मबंधाची ठेव मानेन.
६) तिला सुदृढ, सुशिक्षित, सुसंस्कारित, सुगृहिणी आणि सुजाण स्वावलंबी नागरिक बनवेन.
७) स्त्री-पुरुष भेदाभेद झालाच तर 'Ladies first' हे केवळ सद्वचनात न राहता सदाचरणात आणेन.
८) स्त्री ही केवळ माता-पत्नी-वहिनी-कन्या एवढीच नसते तर ती कार्यालयातली सहचरी; ऑपरेशन थिएटर्समधली सहयोगी; पदश्रेणीतील सीनिअरही असू शकते हे लक्षात ठेवेन.
९) स्त्रीलाही स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा हक्क आहे. अविवाहित, घटस्फोटित, विभक्त, विधवा आणि सिंगल पेरेंट ही समाजाने स्वत:च्या सोयीसाठी लावलेली विशेषणे आहेत हे उमजून घेईन.
शांती, तृप्ती, मर्यादा, सातत्य, सहनशीलता, समजूतदारपणा, सौजन्य, क्षमाशीलता आणि शक्ती म्हणजे नवरात्राचे नऊ गुण ल्यायलेलं स्त्री रूप होय. अलंकार आणि आक्रमकता दोन्हीही गोष्टी सहजतेने वागविणे स्त्रीलाच शक्य आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत उत्सव साजरा करताना स्त्रीला खऱ्या अर्थाने समजून घेऊ या आणि घरोघरच्या मातेश्वरींपुढे नतमस्तक होऊ या.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो