मतिमंद मुलांच्या शाळेत पालकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मतिमंद मुलांच्या शाळेत पालकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मतिमंद मुलांच्या शाळेत पालकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न Bookmark and Share Print E-mail

खोपोली, १२ ऑक्टोबर
खालापूर तालुका विधीसेवा समिती व खालापूर तालुका वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त येथील शालोम एज्युकेशन सेंटर संचालित मतिमंद मुलांच्या शाळेत १० ऑक्टोबर रोजी खास मतिमंद मुलांच्या पालकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खालापूर तालुका विधी समितीचे अध्यक्ष तथा खालापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शे. म. गोडसे, सहदिवाणी न्यायाधीश भू. र. ठाकूर, म. सू. बुधवंत, खालापूर वकील संघटनेचे अध्यक्ष आर. एस. झरकर, सदस्या अॅड. मीना बाम, अस्थिरोग-शल्यरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत दळवी, अॅक्युप्रेशर व निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. अस्मी सावरेकर, शालोम एज्युकेशन सेंटरच्या संचालिका संगीता रावडे, मुख्याध्यापिका शुभलक्ष्मी पाटणकर, मान्यवर निमंत्रित, मतिमंद मुले व त्यांचे पालक उपस्थित होते.
शालोम एज्युकेशन सेंटरने २००५ साली दोन मतिमंद मुलांना घेऊन शाळा सुरू केली. मतिमंद मुलांचे पुनर्वसन व पालकांना मानसिक आधार देण्याच्या भूमिकेतून सुरू केलेल्या, विनामूल्य व विनाअनुदानित शाळेत आजमितीस ५१ मुले शिक्षण घेत आहेत. तालुक्यातील सुमारे ८० आर्थिक दुर्बल घटकातील मतिमंद मुले वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शाळेत येऊ शकत नाहीत. संस्था काही दानशूरांच्या सक्रिय योगदानातून कशीबशी वाटचाल करीत आहे. संस्थेने अर्ज-विनंत्या केल्या, पण शासनाकडून अनुदान उपलब्ध होत नाही. उर्वरित मतिमंद मुलांना स्वखर्चाने शाळेत आणून सोडण्यासाठी व त्यांना परत घरी पोहोचविण्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नाही, अशी खंत संचालिका संगीता रावडे यांनी, प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात बोलताना व्यक्त केली. मतिमंद मुलांच्या पालकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या विधी सेवा समिती व खालापूर वकील संघटनेने संस्थाचालकांची खंत दूर करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावा, अशी विनंती त्यांनी केली.
कायद्याने मतिमंदांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करणाऱ्या विधितज्ज्ञ मीना बाम यांनी आपण मतिमंद मुलांच्या पालकांना व्यक्तिश: सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही देताना, मतिमंदांचे व त्यांच्या पालकांचे हितरक्षण करणाऱ्या अनेक कायदेशीर बाबींचा ऊहापोह केला. मतिमंद व्यक्तीबरोबर कोणताही दिवाणी स्वरूपाचा करार करता येत नाही. फौजदारी खटल्यात कायद्याची भूमिका मतिमंद व्यक्तीकडे उदारमतवादी व मतिमंदांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारी असते, असे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
अस्थी व शल्यरोगतज्ज्ञ डॉ. दळवी यांनी वैद्यकीय शास्त्रानुसार मतिमंद व अपंगत्व यामधील फरक स्पष्ट केला. मतिमंद व्यक्तीच्या मेंदूची वाढ खुंटलेली असते. मतिमंद मुले अभ्यासात प्रगती करू शकत नसली तरी निसर्गत:च त्यांच्यामध्ये, आयुष्यात स्वावलंबी होऊ शकतील अशी कौशल्ये असतात. या कौशल्याच्या विकासासाठी पालकांनी न खचता मतिमंद मुलांना मतिमंद शाळेत आवर्जून पाठवावे, असा सल्ला त्यांनी दिला. जगात २० टक्केमानसिक आजाराचे रुग्ण आढळतात. सर्वसाधारण व्यक्ती आपल्या मेंदूची फक्त १० ते १५ टक्केशक्ती वापरते. हुशार व्यक्ती २५ टक्के, सापेक्षतावादाचा शोध लावणारा आइनस्टाइनसारखा बुद्धिमान शास्त्रज्ञ ४० टक्केमेंदूच्या शक्तीचा वापर करतो. त्यामुळे आपल्या मुलांतील मतिमंदता पाहून खचून जाऊ नका. समाजात मदतीचा हात देणारे अनेक लोक आहेत. त्यांची मदत घेण्यास संकोच करू नका. आपले मनोबल उंचावत ठेवा. आपल्या मतिमंद पाल्याच्या मेंदूतील सुप्त शक्ती कोणकोणत्या मार्गाने वृद्धिंगत व विकसित करता येईल त्यासाठी झटा, असा सल्ला त्यांनी शेवटी दिला. डॉ. अस्मी सावरेकर यांनी रिफ्लेक्शन अॅण्ड अॅक्युप्रेशर थेरपीने केलेले औषधोपचार मतिमंद मुलांमध्ये सकारात्मक बदल कसे घडवून आणतात, हे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा खालापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शे. म. गोडसे यांनी मानसिक आरोग्य सप्ताह व तद्अनुषंगाने खास मतिमंद मुलांच्या पालकांसाठी आयोजित केलेले कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर कसे सयुक्तिक ठरते हे सोदाहरण स्पष्ट केले. अपंग व मतिमंद गटातील मुलांना समान वागणूक देणाऱ्या शासनाने त्यांच्या हितरक्षणासाठी केलेले कायदे व स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. हसतखेळत मुलांना शिकवा, नैराश्यापासून दूर राहा, असा सल्ला शेवटी दिला.
प्रारंभी खालापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र झरकर यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका शुभलक्ष्मी पाटणकर यांनी केले होते. शेवटी संचालिका संगीता रावडे यांनी शिबीर आयोजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो