विदर्भातील हजारो विणकर पर्यायी व्यवसायाच्या शोधात
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> विदर्भातील हजारो विणकर पर्यायी व्यवसायाच्या शोधात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विदर्भातील हजारो विणकर पर्यायी व्यवसायाच्या शोधात Bookmark and Share Print E-mail

मोहन अटाळकर, अमरावती

विणकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने विदर्भातील विणकर त्यांच्या व्यवसायापासून दुरावत चालले असून केंद्र सरकारच्या अनेक योजनांपासून ते वंचित आहेत. विदर्भात सध्या १ हजार ७४३ हातमाग विणकर कसाबसा उदरनिर्वाह चालवित आहेत. अनेक विणकरांनी आता दुसऱ्या रोजगाराचा शोध चालवला आहे. राज्यात सुमारे ३ हजार ४१८ हातमाग विणकर आहेत, तर १ हजार ८४९ हातमाग आहेत. त्यात विदर्भातील ७११ हातमाग आणि १ हजार ७४३ विणकरांचा समावेश आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी आणि इतर योजनांचा फायदा विणकरांना मिळू शकला नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.  
सुरुवातीच्या काळात विणकरांच्या सहकारी संस्थांकडून लुगडी आणि धोतर मोठय़ा प्रमाणात खरेदी केले जात होते, पण विणकरांना लागणाऱ्या सुताच्या किमतीत वाढ आणि सूतपुरवठय़ातील अनियमितता यामुळे या संस्था डबघाईला आल्या. अडचणीत सापडलेल्या प्राथमिक विणकर सहकारी संस्था आणि खाजगी हातमागावर वैयक्तिक काम करणाऱ्या विणकरांसाठी केंद्र सरकारची ‘हातमाग उद्योग पुनरुज्जीवन, सुधारणा आणि पुनर्रचना योजना’ महाराष्ट्रात लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने गेल्या वर्षी घेतला, पण अजूनही अनेक विणकर या योजनेपासून वंचित आहेत. सरकारने १९७६ मध्ये जनता कापड योजना सुरू केली, तेव्हा मोठय़ा संख्येने विणकरांनी ही योजना यशस्वी करण्यासाठी हातभार लावला, पण १९९८ मध्ये ही योजना बंद करण्यात आली आणि विणकरांच्या हाताला काम मिळेनासे झाले. हातमाग महामंडळ आणि वस्त्रोद्योग विभागाने हातमाग आणि इतर विणकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, परिणामी विणकर हे त्यांच्या व्यवसायापासून दूर गेल्याचे दिसून आले आहे.
विदर्भात विणकरांची सर्वाधिक संख्या भंडारा जिल्ह्य़ात होती. सुमारे २० वर्षांपूर्वी हातमाग महामंडळाने भंडारा जिल्ह्य़ात दोन ठिकाणी उत्पादन केंद्रे सुरू केली होती. हातमागावर विणकाम करणाऱ्यांना लुगडी आणि धोतराच्या उत्पादनासाठी सुताचा पुरवठा करण्यात आला. लुगडी आणि धोतर जमा केल्यानंतर हातमाग महामंडळाने ठरवलेल्या दरानुसार मजुरी दिली जात होती. २००१ मध्ये या केंद्राशी जोडल्या गेलेल्या विणकरांची संख्या ही ३ हजार ९७० एवढी होती. विणकरांची उत्पादने ही हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील विभागीय केंद्रात जमा होऊन त्याची विक्री केली जात होती. आधुनिक स्पध्रेत विक्री कमी होत गेली आणि सुताचा पुरवठा देखील कमी होत गेला. हाताला काम मिळणे बंद झाल्याने शेकडो विणकरांनी रोजगाराच्या शोधात बाहेर पडणे पसंत केले. अशीच स्थिती पूर्ण विदर्भात होती. विदर्भातील बहुतांश विणकर हे सूरत येथे स्थलांतरित झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार सध्या भंडारा जिल्ह्य़ात हातमाग विणकरांची संख्या ४०८ एवढी आहे. नागपूर जिल्ह्य़ात ९६१, अकोला जिल्ह्य़ात १९२, अमरावती ९३ आणि वर्धा जिल्ह्य़ाात ८९ विणकर आहेत.
विदर्भातील हातमाग बंद होत आहेत. काही विणकरांनी कोसा कापड आणि साडय़ांचे विणकाम सुरू केले आहे. केंद्र सरकारने विणकरांसाठी एकात्मिक हातमाग विकास योजना (आयएचडीएस), हातमाग विणकर कल्याण योजना (एचआयएस), महात्मा गांधी बुनकर बिमा योजना, विपणन व निर्यात प्रोत्साहन योजना (एमईपीएस) अशा अनेक योजना सुरू केल्या असल्या, तरी अनेक योजना या समूहगटांशी संबंधित आहेत. विणकरांना अनेक योजनांची माहितीच नसल्याने योजनेच्या लाभापासून अनेक विणकर वंचित आहेत. हा व्यवसाय टिकून रहावा, यासाठी विणकरांसाठी एकत्रित योजना आखली जावी, अशी मागणी केली जात आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो