वाढणार उसाची गोडी अन् सट्टेबाजीचे आव्हानही!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वाढणार उसाची गोडी अन् सट्टेबाजीचे आव्हानही!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वाढणार उसाची गोडी अन् सट्टेबाजीचे आव्हानही! Bookmark and Share Print E-mail

साखर उद्योगातून नियंत्रणमुक्त शिफारशीचे स्वागत
दयानंद लिपारे, कोल्हापूर, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या शिफारशीचे ऊस ते साखरेपर्यंतच्या सर्व घटकांतून जोरदार स्वागत होताना दिसत आहे. देशात साखरेची उलाढाल ८० हजार कोटींची असली तरी जवळपास ५० हजार कोटींची उलाढाल एकटय़ा महाराष्ट्रात असल्याने ऊस-साखरेशी संबंधित घटकांची गोडी वाढविण्याचे काम ज्या शिफारशींनी केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्या उसाला चांगला दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना उसाची गोडी नव्याने चाखता येणार आहे.

लेव्हीच्या सक्तीचे संकट दूर झाल्याने साखर कारखानदारांना उद्योगाची मिठास समजू लागली आहे. साखर उद्योगाचे शेअर्सचे भाव वधारल्याने अशा गुंतवणूकदारांना दुधात साखर पडल्याचा आनंद झाला आहे. मात्र याच वेळी साखर उद्योग नियंत्रणमुक्त करून सट्टाबाजारातील व्यापारी व त्यांच्याशी छुपे संबंध असलेल्या नेत्यांचे उखळ पांढरे करण्याचा डाव यामागे असल्याचे कडवट स्मरणही करून दिले जात आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आर्थिक सल्लागार डॉ. सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला आहे. या अहवालातील शिफारशींचा तपशील उपलब्ध झाल्यानंतर ऊस व साखर या घटकांशी संबंधित अभ्यासकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. महाराष्ट्र साखर उत्पादनातील अग्रेसर राज्य असल्याने इथल्या साखरविश्वात शिफारशींच्या मुद्दय़ांवरून विचारमंथन होताना दिसत आहे. तर शेतकरीही उसाच्या फडात या मुद्दय़ांवरून फायद्या-तोटय़ाचे गणित घालताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, डॉ. रंगराजन समितीच्या शिफारशी सादर झाल्यानंतर काल शुक्रवारी लगेचच साखरेचे शेअर्स मार्केटही चांगलेच वधारल्याचे दिसून आले. उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या आणि अल्पावधीतच साखरविश्वात यशस्वी ठरलेल्या रेणुका शुगर्ससह उत्तर प्रदेश व अन्य राज्यांतील साखर उत्पादनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स वधारले होते. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांना बऱ्याच दिवसांनंतर एकाच दिवशी इतक्या मोठय़ा प्रमाणात शेअर्सचे भाव वाढल्याने आनंद झाल्याचे दिसून आले.
केंद्र शासनाकडे रंगराजन समितीच्या शिफारशी सादर झाल्यानंतर ऊस उत्पादक व साखर उत्पादक या नेहमी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणाऱ्या घटकांमध्ये कधी नव्हे तो समन्वयाचा भाग दिसून आला. दोन्ही घटकांकडून आम्ही केंद्र शासनाकडे ज्या मागण्या गेली अनेक वर्षे करीत होतो त्याला न्याय मिळाल्याची सुखद प्रतिक्रिया नोंदविली गेली आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने रंगराजन समितीच्या सर्व शिफारशी स्वागतार्ह आहेत. डॉ. रंगराजन यांच्या समवेत झालेल्या पहिल्या बैठकी वेळी आम्ही मांडलेल्या सर्व मागण्यांना मूर्त स्वरूप येताना दिसत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळण्यास सुरुवात होणार आहे. साखरेबरोबरच कारखान्यातील सहवीज निर्मिती, मोलॅसिस, स्पिरिट आदी उपउत्पादनांचाही शेतऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ होणार आहे. तथापि साखर कारखानदार उसाचा उतारा कमी दाखवून शासनाची कर बुडवेगिरी करतानाच शेतकऱ्यांचीही फसवणूक करण्याचा धोका असल्याचा उल्लेख करून खासदार शेट्टी यांनी याबाबत शासनाने दक्ष राहण्याची गरज व्यक्त केली आहे.
साखर उद्योगाकडून लेव्हीची सक्ती रद्द व्हावी, अशी मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती. रंगराजन समितीच्या शिफारशींमध्ये त्याचा उल्लेख केल्याने साखर उद्योगातील मधुरता वाढीस लागली आहे. या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यानंतर साखर कारखाने त्यांच्याकडील सर्वच उत्पादित साखर खुल्या बाजारातील दराने विकू शकणार आहे. शासनाला कमी दरात ठराविक टक्के साखर स्वस्तात विकण्याचे संकट पुढील काळात टळणार आहे. त्यामुळे साखर कारखाने सक्षम होण्यास मदत होणार असल्याने या शिफारशींचे स्वागत साखर उद्योगाच्या राज्यस्तरीय महासंघापासून ते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या राष्ट्रीय महासंघापर्यंत सर्वाकडूनच होताना दिसत आहे.
या निर्णयाबद्दल राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक, साखरतज्ज्ञ पी. जी. मेढे म्हणाले, सखार लेव्ही सक्तीचा निर्णय रद्द झाल्याने साखरेचा दर स्थिर होण्यास मदत होणार आहे. साखर कारखान्याच्या तोटय़ाचे प्रमाण कमी होण्याबरोबरच शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. ग्राहकांचेही यामध्ये हित होणार आहे.
रंगराजन समितीच्या शिफारशींचे स्वागत होत असताना याबाबत सावध प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत. केरळ राज्यात कॉफी उद्योगाचे धोरण मुक्त केल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या. हा संदर्भ देऊन अखिल भारतीय किसान सभेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. कॉ. ए. बी. पाटील यांनी साखर उद्योग नियंत्रणमुक्त झाल्याने साखर कारखानदारांचा व सट्टाबाजारातील व्यापाऱ्यांचा फायदा होणार असून शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लेव्हीची साखर रेशनवर पुरविण्याची व्यवस्था असतानाही त्याचे धिंडवडे निघताना दिसत आहेत. आता तर लेव्हीची साखर नसल्याने आणि साखरेची खरेदी राज्य शासनाकडून वेळेवर होण्याची कसलीच हमी नसल्याने गरिबांना यापुढे साखर केवळ चित्रातच पाहावी लागणार आहे. साखर महाग झाल्याने सामान्यांच्या जीवनातील गोडवा नष्ट होणार आहे. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यामागे सट्टेबाजारातील व्यापाऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवले गेले आहे. सट्टेबाजारातील व्यापाऱ्यांच्या मागे छुपेपणाने राजकीय नेते असल्याने त्यांचाच यामध्ये आर्थिक लाभ होणार आहे, हे वास्तव ओळखण्याची गरज व्यक्त करून प्रा. पाटील यांनी केंद्र शासनाने या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारल्या तर दूरगामी विपरीत परिणाम होणार असल्याच्या धोक्याकडे त्यांनी लक्ष वेधले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो