खालापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींतील ६८ जागांसाठी ५४८ उमेदवार निवडणूक रिंगणात
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> खालापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींतील ६८ जागांसाठी ५४८ उमेदवार निवडणूक रिंगणात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

खालापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींतील ६८ जागांसाठी ५४८ उमेदवार निवडणूक रिंगणात Bookmark and Share Print E-mail

खोपोली,
खालापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ११६ जागांसाठी घोषित करण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत एकूण ३२१ अर्ज दाखल झाले. छाननीमध्ये १५ अर्ज अवैध ठरले. मुदतीत ११७ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. ४८ उमेदवारांचे त्यांच्या प्रभागात एक-एक अर्ज आले आहेत. मतमोजणीनंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा होणार आहे. निवडणूक रिंगणात ६८ जागांसाठी १४१ उमेदवार उभे आहेत. रविवार, २१ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी होनाजी जावळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), विठ्ठल इनामदार व खालापूरचे तहसीलदार दीपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती खालापूरचे निवासी नायब तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी दिली.
खालापूर तालुक्यातील नडोदे,देवन्हावे, साजगाव, हाळखुर्द, चावणी, गोरठण-बुद्रुक, वडवळ, टेंभरी, खरिवली, वावंढळ, माडप, वावोशी, होराळे, आपटी या १४ ग्रामपंचायतींबरोबर मांजगाव, नंदनपाडा, वरोसे, वावर्ले, वासांबे, माणकिवली (प्रत्येकी एक जागा), कलोते-मोकाशी (तीन जागा) या ग्रामपंचायतींतील रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी पोटनिवडणुका घेण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. पोटनिवडणुकीत माजगाव, नंदनपाडा, वरोसे, वावार्ले या ग्रामपंचायतींतील रिक्त असलेल्या (प्रत्येकी एक) जागेसाठी एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज न भरल्यामुळे या जागा पुनश्च रिक्त राहिलेल्या आहेत. कलोते-मोकाशी ग्रामपंचायतीतील रिक्त असलेल्या तीन जागांसाठी, तसेच वासांबे, माणकिवली या ग्रामपंचायतींतील रिक्त असलेल्या एक-एक जागेसाठी, एक-एक नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत उभे असलेले कलोते- मोकाशी, वासांबे, माणकिवलीचे सर्व उमेदवार (५) बिनविरोध निवडून आल्याची अधिकृत घोषणा मतमोजणीनंतर होणार आहे.
१४ ग्रामपंचायतींपैकी ९ सदस्य असलेल्या गोरठणबुद्रुक व ७ सदस्य असलेल्या वावंढळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक-एक अर्ज आल्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींतील सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. देवन्हावा ग्रामपंचायतींतील तीन प्रभागांतील ९ जागांपैकी ६, हाळखुर्दच्या ९ जागांपैकी ३, चावणीच्या ७ जागांपैकी २, खरिवलीच्या ९ जागांपैकी ३, आपटीच्या ७ जागांपैकी ५ जागांवर एक-एक नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे या ५ ग्रामपंचायतींमधील १९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. वावंढळ ग्रामपंचायतीतील ७ जागांपैकी ६ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. एका प्रमाणात एकही नामांकन पत्र दाखल न झाल्यामुळे वावंढळ ग्रामपंचायतीची एक जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे अखेर १२ ग्रामपंचायतींतील ६८ जागांसाठी १४१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा खुलासा निवासी नायब तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी केला.
१४ ग्रामपंचायतींसाठी ४४ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. गोरठण व वावंढळ या दोन ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झालेल्या आहेत. आपटी, खरिवली, हाळखुर्द, देवन्हावे, चावणी या ५ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध आहेत. त्यामुळे आता ३१ मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे. रविवारी (२१ ऑक्टो.) सकाळी ७.३० ते ५ या कालावधीत होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ६५६७ महिला व ७१८२ पुरुष असे एकत्रित १३७४९ मतदार आपल्या पवित्र मतदानाचा हक्कबजावणार आहेत. सोमवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता पंचायत समिती खालापूरच्या छत्रपती शिवाजी सभागृहात कडेकोड पोलीस बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी सात निवडणूक निर्णय अधिकारी, सात साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, राखीवसह ३६ केंद्राध्यक्ष १०८ मतदान अधिकारी, ३६ शिपाई, ३६ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना रीतसर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. निवडणुकीतील मतदानासाठी ईव्हीएम मशीन्स तथा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स पुरेशी उपलब्ध करण्यात आलेली आहेत. मतदान व मतमोजणी प्रक्रिया कालावधीत कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, या दृष्टीने पोलीस यंत्रणेने दक्षता घेऊन सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा असे सक्त आदेश तहसीलदार दीपक आकडे यांनी दिले आहेत, असे निवासी नायब तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया शांततेने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल, असा आत्मविश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो