नवनीत :बुधवार, १७ ऑक्टोबर २०१२
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत :बुधवार, १७ ऑक्टोबर २०१२ Bookmark and Share Print E-mail
नवनीत

बुधवार, १७ ऑक्टोबर २०१२
इतिहासात आज दिनांक..
१७ ऑक्टोबर  
१७२९ थोरले बाजीराव पेशवे यांनी गुजरातची व्यवस्था लावून अन्य कोणीही या प्रांतास उपद्रव दिल्यास संरक्षण करण्याची हमी घेतली.
१८६९ थोर गायक, अलौकिक प्रतिभेचे धनी, अभिजात भारतीय नाटय़संगीताचे प्रवर्तक भास्करबुवा बखले यांचा जन्म. सुरतजवळील कठोर गावी त्यांचा जन्म झाला. बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा केला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी त्यांना शिकवणी दिली. फैजमहंमद खाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडेही त्यांचे शिक्षण झाले. या सगळय़ा अथक मेहनतीमधून त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या गायकीवर प्रभुत्व प्राप्त केले. नाटय़गीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी, लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, ख्याल या सगळय़ावर त्यांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून ते ‘देवगंधर्व’ म्हणून ओळखले जाऊ लागले. भास्करबुवांनी शास्त्रीय संगीतातील हिंदी चिजांच्या चाली मराठी नाटय़संगीतांना दिल्या. किलरेस्कर व गंधर्व नाटक कंपनीत त्यांनी संगीत विषयाचे गुरू अर्थात प्रमुख म्हणून कार्य केले. त्यांचे संगीत क्षेत्राला सगळय़ात मोठे योगदान म्हणजे १९११ मध्ये भारत गायन समाजाची स्थापना. बालगंधर्व, मा. कृष्णराव फुलंब्रीकर, गोविंदराव टेंबे आदींना भास्करबुवांच्या मार्गदर्शनाचा लाभ घडला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफली त्यांनी गाजवल्या.
१९१५ ख्यातनाम अमेरिकन नाटककार आर्थर मिलर यांचा जन्म. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या मिलर यांना ‘ऑल माय सन्स’ या नाटकाने दिगंत कीर्ती मिळवून दिली.
प्रा. गणेश राऊत  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची
ज्यूंचा सण ‘पासोव्हर’
alt

‘पासोव्हर’ हा ज्यू लोकांचा सर्वात महत्त्वाचा सण. हा सण ते आठ दिवस पाळतात. ज्यूंचा युगपुरुष मोझेस याने इजिप्तचा राजा रामसेस दुसरा याच्या छळापासून ज्यूंची सुटका केली. त्यानिमित्ताने हा सण साजरा केला जातो. शाव्होत आणि सुकोत हे त्यांचे आणखी दोन महत्त्वाचे सण आहेत. इजिप्तच्या रामसेस या राजाने इजिप्तमधील सर्व ज्यूंना गुलाम करून टाकले होते. मोझेस या परमेश्वराचा वरदहस्त लाभलेल्या ज्यू माणसाने अनेक वेळा राजाकडे ज्यूंची सुटका करण्याची विनंती केली. राजाने प्रत्येक वेळी धुडकावून लावल्याने मोझेसने त्याला सुनावले, तू जर ताबडतोब ज्यूंची सुटका केली नाहीस तर इजिप्तच्या लोकांवर देवाचा कोप होईल व तो तुमच्यावर अनेक प्रकारचे प्लेग व इतर आरिष्टे आणील. त्यापैकी नऊ प्रकारचे प्लेग इजिप्तवर आले. बरीच हानी होऊनही इजिप्तचे लोक कसेबसे त्यातून वाचले.
देवाने मग दहावे आरिष्ट इजिप्तच्या लोकांवर आणले. ते म्हणजे नवजात इजिप्सिशियन अर्भकांचा मृत्यू होणे, देवाने मग मोझेसला सांगितले की, तू एक मेंढरू काप व त्याचे रक्ताचे डाग फक्त ज्यू लोकांच्या दरवाजावर लाव. त्यामुळे रक्ताचा डाग असलेल्या घरांमधील तान्ही मुले वाचतील. त्याप्रमाणे मोझेसने केल्यावर फक्त ज्यूंची घरे सोडून इतर घरातील मुलांना हा शाप लागून त्यांचा मृत्यू झाला. राजा रामसेसेने मग ज्यूंना इजिप्त सोडून जायला परवानगी दिली. या घटनेच्या स्मृतीसाठी पासोव्हर सण साजरा करतात. साधारणत: एप्रिलमध्ये पासोव्हर (हिब्रू पेसाच) हा सण येतो. वर्षांतून एकदा तरी विशेषत: पासोव्हरच्या सणाच्या दिवशी जेरुसलेमला जाणे हे जगभरातल्या ज्यूंसाठी मोठे पुण्यकर्म असते.
सुनीत पोतनीस  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल
कार्यालयातील फर्निचर
alt
कार्यालयात संगणक, फॅक्स, यंत्र, टेलिफोन, काही ठिकाणी रोकड ठेवण्यासाठी कॅश बॉक्स किंवा स्ट्राँग रूम, फायलिंग कॅबिनेट, फोटोकॉपिइंग यंत्र अशी नाना प्रकारची यंत्रे असतात. ही सर्व यंत्रे भिंतीशी ठेवलेली असली तर त्याच्या वायरी भिंतीवरून व्यवस्थित बसवलेल्या असू शकतात. पण जर ही यंत्रे सभागृहाच्या मध्ये मध्ये ठेवलेली असली तर वायरींचा गुंता न सुटणारा असतो आणि त्यावरून एरवीसुद्धा माणसे अडखळून पडतात. मग आपत्कालाच्या वेळी जेव्हा लोकांना धावत जाऊन सभागृहाबाहेर पडायचे असते तेव्हाची धांदल विचारायला नको. ही सर्व यंत्रे विजेवर चालणारी असल्याने ओव्हरलोडिंगमुळे प्लगमधून ठिणग्या पडण्याची शक्यता गृहीत धरून एका प्लगवर एकच उपकरण लावण्याची खबरदारी घेणे महत्त्वाचे असते. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपापल्या फायली आणि सुटे कागद आपापल्या टेबलावरच नीट रचून ठेवायला हवेत. ते जमिनीवर ठेवून इतरांच्या वाटेत अडथळा निर्माण करू नये. शिवाय फायली ठेवण्यासाठी भिंतीलगत रॅक्स बनवलेली असतात. त्यामध्ये फायली नीट रचून ठेवायला हव्यात. शिवाय फायलिंग कॅबिनेटमध्ये फायली नीट ठेवायला शिकले पाहिजे. फायलिंग कॅबिनेटला तीन किंवा चार ड्रॉवर्स असतात. यातील प्रत्येक ड्रॉवर एकावेळी एक असाच उघडावा व काम झाल्यावर दुसरा ड्रॉवर उघडण्यापूर्वी पहिला ड्रॉवर बंद करून ठेवला पाहिजे. सगळ्यात वरचा ड्रॉवर पूर्ण उघडून ठेवला तर कॅबिनेटला जरासा जरी धक्का बसला तरी कॅबिनेट उलटून जवळ उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याच्या अंगावर येऊन पडते. यामुळे कर्मचारी जखमी होऊ शकतो. टेबलावर असलेल्या कपाटांची दारे आतील फाईल काढल्याबरोबर बंद केली पाहिजे. अनेक वेळा कर्मचारी घाईघाईत खुर्चीवरून उठताना वरच्या कपाटाचा दरवाजा उघडा असेल तर त्याच्या डोक्याला लागतो. अशा छोटय़ा-मोठय़ा जखमा झाल्यावर कार्यालयात प्रथमोपचाराची पेटी असणे फार गरजेचे असते आणि त्यातील वस्तूंचा वापर कसा करायचा ते दोघा-तिघांना ठाऊक असावे. शिवाय दरमहाच्या एक तारखेला त्यातील वस्तू तपासून अगोदर खर्च केलेल्या वस्तू नव्याने आणून ठेवल्या पाहिजेत.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा..
शी सेल्स सी शेल्स
alt
मित्रा, भाषा ही फक्त सरकारी भाषेत सांगायचं तर संप्रेषणाचं माध्यम नसून, समाजजीवनाचं, विचार-संस्कृतीचं प्रतिबिंब असते. म्हणी, वाक्प्रचार आणि शब्दप्रयोगांतून समाजमानसातील विचार, रूढी नि परंपरा याचं मनोज्ञ आणि मनोरंजक दर्शन घडतं. उदा. ‘अडाण्याचा आला गाडा, वाटेतली विहीर काढा..’ ही म्हण ऐकली आहेस ना? समाजातले अडाणी लोक सापडणार नाहीत असं नाही पण ‘गाडा’ नावाचं वाहन आणि जलदुष्काळाच्या काळात ‘विहीर’ सापडणार नाही. खरं की नाही? कुठे ‘इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी’मधला इंद्र आपल्याला परिचित पण शामभट्ट कोण? कुठल्या गावचा? भट भिक्षुकाला गाय सोडून तट्टाणी कोणी दिली? तो हॉर्सरेसिंग करायला का लागला? भिक्षुकी चालली नाही का? असे रंजक प्रश्न उभे राहतात.
आपापल्या भाषेत आणखीही गमतीजमती असतात. उदा. काळा राम, गोरा राम, कच्चा पापड, पक्का पापड हे मराठीतले जिव्हावक्रक टंगट्विस्टर आहेत. यांची सुरुवात कशी, कोणी केली याचं रहस्य उलगडण्याची जिज्ञासा वाटते. असंच एक वाक्य- She sells, seashells on sea shore.. (शी सेल्स सीशेल्स ऑन सी शोअर) या वाक्याशी जिव्हावक्रतेचा खेळ खेळलो, ते वाक्य फास्ट बोलण्याची शर्यत लावून कधी जिंकलो कधी हरलो.
पण खूप उत्सुकता वाटली की समुद्रकिनाऱ्यावर शंखशिंपले विकणारी ‘ही’ कोण? ती अशी शब्दात अडकून अजरामर का झाली? कोणते शिंपले ती विकायची? कधी? कुठे? कोणत्या किनाऱ्यावर? जिज्ञासा! जिज्ञासा वाटली. फक्त. म्हणून मित्रा, या वाक्याचा उलगडा झाला. इथल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. तिचं नाव ‘मेरी अ‍ॅनिंग’ वय १३-१४ असेल, डॉर्सेट परगण्यातला, लिम रेजिस नामक किनारा . साल १८१२ म्हणजे दोनशे वर्षांपूर्वी.
मेरी दरिद्री कुटुंबातील साधीसुधी मुलगी. किनाऱ्यावर भटकून खाणेबल गोष्टी शोधणं इतकाच दिवसभरचा उद्योग. मेरीची बुद्धिमत्ता प्रखर आणि निरीक्षणशक्ती सूक्ष्मवेधी. हाताच्या बोटात लवचिकता. किनाऱ्यावर भटकताना तिला एक दिवस अचानक सतरा फूट लांबीचा (समुद्री मत्स्यरूपी राक्षसाचा) दगडवजा सांगडा, ‘फॉसिल’ सापडला. मेरीनं काळजीपूर्वक माती, वाळू दूर सारून तो ‘अश्म’ बाहेर काढला. नंतर तिला असले ‘अश्म’ शोधण्याचा छंद लागला. कोणतंही अवजार उपलब्ध नसताना केवळ बोटांचा वापर करून, पुढे पस्तीस र्वष मेरीनं समुद्रकिनाऱ्यावर उत्खनन करून फॉसिल्स शोधले. अशा शंख-शिल्पांची विक्री ती करू लागली. ‘शी सोल्ड सीशेल्स ऑन सी शोअर.’ लवकरच हे अश्म फार विशेष म्हणजे लाखो वर्षांपूर्वीच्या समुद्रातल्या राक्षसी माशांचे ‘दगड’ झालेले फॉसिल आहेत हे लक्षात आलं. मेरीने शेकडय़ाने फॅसिल जमा केले. १७ फुटांचा तो अश्म ‘इक्थीओसॉरस’ नामक समुद्री राक्षसमाशाचा आहे, असा शोध लागला. समुद्रामध्ये कशी उत्क्रांती होत गेली, याचा महाप्रचंड इतिहास शास्त्रज्ञांनी रचला. पृथ्वीवर डायनोसॉर्स होते, तसेच समुद्रात अवाढव्य मासे होते, त्यांचं जमिनीवरील प्राणी यांच्याशी शारीरिक नातं कसं होतं याचा उलगडा झाला. मेरीने उत्क्रांतीमधले निखळलेले दुवे शोधून काढले. मेरीकडे महत्त्वाच्या शक्ती होत्या. जिज्ञासा, निरीक्षण, परिश्रम आणि कौशल्य हे तिचं सामथ्र्य. आजही लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये तिच्या दालनात हे दगड नि धोंडे मांडले आहेत. विज्ञानाचा असा इतिहास वाचताना मन खिळून राहतं. आपल्याकडेही मेरी अ‍ॅिनग असतील? पण त्या आपल्या ‘घोका नि ओका’ शिक्षणपद्धतीत हरवून गेल्यात? खरं की नाही?
डॉ. राजेंद्र बर्वे  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
(ता. क. बिल ब्रायसनचं ‘अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ निअरली एव्हरीथिंग’ नक्की वाच! )

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो