मावळची शिर्काई!
मुखपृष्ठ >> Trek इट >> मावळची शिर्काई!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मावळची शिर्काई! Bookmark and Share Print E-mail

alt

अभिजित बेल्हेकर, This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘मावळ’ म्हटले की, दरी-खोरी, शिवरायांचे गड-कोट, या बारा मावळांच्या साक्षीने त्यांनी गाजवलेला पराक्रम असे सारे एका क्षणात पुढे येते. अशा या साऱ्या मावळची देवी म्हणजे शिरकोलीची शिर्काई!
पुण्याच्या पश्चिमेला वेल्हे-मुळशी तालुक्यांच्या मधोमध मोसे खोरे आहे. ८४ गावांचा हा मुलुख. इतिहासातील पासलकर, शिर्के, पडवळ, कदम, मानकर, केळदकर आदी घराण्यांची ही कर्म आणि कर्तृत्वभूमी. अशा या मावळातच पानशेत धरणाच्या अगदी शेपटीकडे शिरकोली नावाच्या छोटय़ाशा गावात साऱ्या मावळाची कुलदेवता शिर्काई वसली आहे. नवरात्र सुरू झाल्याने जागोजागीची शक्तिपीठे  आता फुलून जातील. याच पाश्र्वभूमीवर आपण आज आडवाटेवरील, अनोख्या शक्तिस्थळाच्या भटकंतीला जाऊयात.
alt
शिरकोलीला जायचे असेल तर आधी पुण्याजवळच्या पानशेतला पोहोचावे लागते. इथून डोंगर-दरीतून एक रस्ता थेट या गावापर्यंत गेला आहे. अंतर २२ किलोमीटर. कधीकाळी शासनाच्या धडक योजनेतून तयार झालेल्या या ‘बेधडक’ रस्त्यावरून जाणे मात्र दिव्य आहे. पुण्यातील स्वारगेट स्थानकावरून दुपारी साडेतीनच्या दरम्यान या शिरकोलीसाठी एक एसटी बस सुटते. पण प्रवास आणि शिरकोलीचे दर्शन याचा विचार करता ही बस गैरसोयीचीच ठरते. यापेक्षा स्वत:च्या वाहनाने जात नाहीतर एसटीने पानशेतला पोहोचत धरणाच्या आतील गावांसाठी सुटणारी एखादी लाँच पकडली की आपण तासाभरात थेट शिरकोलीच्या दारात उतरतो. घिवशी, वडघर, आंबेगाव खुर्द-बुद्रुक, गोंडेखेल, कोशीमघर अशा निसर्गसंपन्न गावांचे दर्शन घडवत जाणारा हा प्रवास वेगळ्याच जगात घेऊन जातो. सोबतीला निळाशार जलाशय आणि त्याच्या दोन्ही तीरावरची हिरवाईही मनाला सुखावत असते.
पूर्वी शिरकोलीसाठी आंबी नदीकाठाने सरळ वाट होती. १९६० साली या आंबी नदीवर पानशेत धरण साकारले आणि या भागाचा सारा भूगोलच बदलला. उणीपुरी २३ गावे या धरणात बुडाली. शिरकोली वाचले पण साऱ्या मावळचे भूषण असलेल्या गावालगतचे प्राचीन शिर्काईचे मंदिर आणि तिच्यालगतचा घाट मात्र बुडाला. मंदिर, तट, तटाला दरवाजे, सोबतीला नदीकिनारी घाट आणि भोवताली देवराई! अशी या शिर्काई मंदिराची रचना होती. हा परिसर पाण्याखाली जाणार म्हणून गावक ऱ्यांनी इथल्या सर्व देवतांची वर गावात नव्या मंदिरात स्थापना केली. शिरकोलीत शिर्काईच्या दर्शनासाठी आपण येतो ते या नव्या मंदिरातच! नवे मंदिर आणि प्राचीन मूर्ती असा विरोधाभास पाहताना जरा गोंधळल्यासारखे होते. पण यातही नजर खिळून राहते ती त्या शिर्काईवर! एका अद्भुत-अलौकिक देवतेचेच ते दर्शन!
महिषासुरमर्दिनी
alt
अष्टभुजांची ही महिषासुरमर्दिनी! यापैकी सात हातांमध्ये अनुक्रमे शंख, चक्र, धनुष्य, गदा, खङ्ग, परशू आणि बाण ही आयुधे आहेत, तर आठव्या हातात एका दैत्याला उचललेले आहे. दुसरीकडे पायाखाली महिषासुर आहे. मूर्तीचा ताल-तोल, कलाकुसर, रेखीवपणा हे सारे थक्क करून सोडणारे. मूर्तीभोवतीची वेलबुट्टीतील नक्षी, मध्यभागीचा कीíतमुख, डोक्यावरचा मुकुट आणि प्रभावळ हे सारेच या कलेची श्रीमंती प्रगट करणारे आहे.
या मूर्तीचे कोरीव काम जेवढे सुंदर तेवढीच त्यासाठी वापरलेली शिळाही निराळी. बहुधा ती अन्य ठिकाणहून आणून त्यावर ही मूर्ती कोरलेली असावी. पण या मूर्तीवरही भंजकांची वक्रदृष्टी पडल्याचे दिसते. भंगलेली ही मूर्ती सध्या तांब्याच्या पट्टीने सांधली आहे. या शिर्काईसमोरच वाघावर स्वार वाघाई (महालक्ष्मी) आणि मोरावर स्वार मानाई (सरस्वती)चीही प्राचिन मूर्ती आहे.
प्राचीन मंदिर
शिर्काईचे दर्शन झाल्यावर नदीकाठच्या तिच्या प्राचिन मंदिराकडे वळावे. रायगडावरची गडदेवता शिर्काई साऱ्यांच्याच परिचयाची आहे. त्या देवीचेच हे मूळस्थान! धरणाच्या काठावर आलो की मुख्य मंदिर आणि काही प्रमाणात तग धरून असलेला तट समोर येतो. साधारण मार्चनंतर मंदिराचा हा भाग पूर्णपणे उघडा पडतो.
मंदिर हेमाडपंती. पंधराव्या शतकाच्या आसपास कधीतरी निर्माण झालेले. एका बाजूला बांबूची देवराई तर दुसऱ्या हाताला धरणाचा निळाशार जलाशय! खरेतर ऐतिहासिक बांधकामापेक्षा त्याच्या भोवतालचा हा निसर्गच सुखावून टाकतो.  
alt
हा सारा परिसर धरणात जाण्यापूर्वीचे, म्हणजे १९६० सालचे, या मंदिरासंबंधीचे एक वर्णन मिळते. ते असे.. ‘आंबी नदीच्या काठावर हे देवस्थान. जिथे शिरकाई, मानाई आणि वाघाईची मंदिरे. यातले शिरकाईचे रेखीव. तिचे शिखर तर साऱ्या मावळात अद्वितीय. संपूर्ण मंदिराला तट. या तटालाच उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना दरवाजे. मंदिराभोवती घाट, बगाडाचा खांब, देवरहाटी! भोवताली भातखाचरे आणि आंबी नदीचे खळाळते पाणी. भाविकांपासून आल्या-गेल्या पांथस्थांपर्यंत साऱ्यांनाच प्रसन्न करणारे..दोन घटका थांबायला लावणारे!’
आज पन्नास वर्षे झाली पण शिरकोलीच्या रहाळात आलो आणि बांबूच्या देवराईत झाकलेले मूळ मंदिर पाहिले, की आजही हाच अनुभव येतो.
दरवर्षी हे मंदिर धरणात बुडते आणि त्या जलाभिषेकातून नितळ होत पुन्हा बाहेरही येते. शिरकोली आणि या मंदिराच्या जुन्या आठवणी काढत अनेकजण या वेळी गावाकडे धाव घेतात. पुन्हा हे सारे वैभव डोळे भरून पाहतात.
सण-उत्सवांच्या निमित्ताने त्या-त्या देवांच्या स्थळी भक्तांची गर्दी नेहमीच उसळत असते. पण अनेकदा अशा ठिकाणी या गर्दीने तिथला देवही पळून गेल्यासारखा वाटतो. मग अशावेळी या रुळलेल्या वाटांवरील यात्रेत अडकण्यापेक्षा शिरकोलीसारख्या आडवाटेवर गेलो की, तिथल्या निसर्गशिल्पात या देवतेचे खऱ्या अर्थाने दर्शन नक्की घडते!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो