सह्याद्रीचे वारे : नेतृत्वाची पुन्हा परीक्षा..
मुखपृष्ठ >> सह्याद्रिचे वारे >> सह्याद्रीचे वारे : नेतृत्वाची पुन्हा परीक्षा..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सह्याद्रीचे वारे : नेतृत्वाची पुन्हा परीक्षा.. Bookmark and Share Print E-mail

संतोष प्रधान, मंगळवार, १६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात परतले आहेत ते निवडणूक काळात या राज्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी घेऊन! मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आधीपासून असलेल्या मुंडे यांच्यासाठी ही संधी आहेच; पण त्यांच्या नेतृत्वाची परीक्षाही पुन्हा पाहिली जाणार आहे..
देशातील एकूणच राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर आहे. सार्वत्रिक निवडणुका नियोजित वेळेप्रमाणे म्हणजेच २०१४ च्या सुरुवातीला होतील की २०१३ मध्येच होतील याबाबतही सारेच अनिश्चित आहे. दररोज होणारे आरोप आणि उघडकीस येणाऱ्या घोटाळ्यांमुळे राजकीय वर्गाबद्दल सर्वसामान्यांमध्ये चिडीक वाढते आहे. महाराष्ट्रातही त्याला अपवाद नाही. सिंचन घोटाळ्यात आणखी भानगडी बाहेर येत आहेत. केंद्रातील यूपीएप्रमाणेच राज्यातील आघाडी सरकारमधील एकापाठोपाठ एकेका मंत्र्याची घोटाळ्यांची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. महागाई, गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमती यामुळे सामान्य किंवा मध्यमवर्गात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संतापाची भावना आहे. अर्थात ही नाराजीची भावना मतपेटीत उतरण्यासाठी विरोधकांना निवडणुकीपर्यंत ताणून धरावे लागणार आहे. राज्य विधानसभेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षांचा अवकाश आहे, पण निवडणुकांचे वारे आतापासून वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या विरोधात असलेल्या वातावरणाचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न भाजपने देशभर सुरू केला आहे. महाराष्ट्रातही भाजप आतापासूनच आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंत्र्यांच्या विरोधात सुरू केलेली आरोपबाजी ही त्याची सुरुवात आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यापासून राज्यात राजकीय परिस्थिती कशी असेल, याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे भांडण पेटलेले असताना विरोधक कमी पडतात, अशी टीका केली जाते. नेमकी हीच वेळ साधून भाजपने पक्षाची राज्याची सूत्रे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे सोपविली. मुंडे यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. गटातटाच्या राजकारणात मुंडे यांचे पक्षात मध्यंतरी पद्धतशीर खच्चीकरण करण्यात आले तरीही महाराष्ट्र भाजपचा मुंडे हा चेहरा आहे. इतर मागासवर्गीय समाजातील मुंडे यांना जनाधार चांगला आहे. निवडणूक फिरविण्याची क्षमता त्यांच्यात आहे. पक्षाने संधी दिल्याने मुंडे हे जोमाने रिंगणात उतरतील. लवकरच ते राज्यभर दौरे सुरू करणार आहेत.
पुढील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय चित्र कसे असेल? अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसमध्ये कोणाची लॉटरी लागेल याचा अंदाज बांधणे कठीण असते. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. राज ठाकरे यांनाही मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत असले तरी त्यांच्या पक्षाला मुंबई, पुणे, नाशिक या सुर्वणत्रिकोणाच्या बाहेर आधी हातपाय पसरावे लागतील. भाजपची सूत्रे आल्याने गोपीनाथ मुंडे हे थेट मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. तसे मुंडे हे १९९५ पासून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, पण तेव्हा भाजपला शिवसेनेला मागे टाकणे शक्य झाले नाही. पुढील लागोपाठ तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. एकूणच देशातील राजकीय बदलते संदर्भ लक्षात घेता विरोधकांना राज्यातही संधी मिळू शकते. अशा वेळी विरोधकांकडे मुख्यमंत्रिपदासाठी मुंडे यांचा तगडा पर्याय आहे. ही पाश्र्वभूमी असली तरी  मुंडे यांचे मुख्यमंत्रिपद सारे जर-तरवर अवलंबून आहे. १९८९ मध्ये शिवसेना-भाजप एकत्र आल्यापासून लोकसभेत भाजपला जास्त जागा तर विधानसभेत शिवसेनेला, हे सूत्र ठरलेले आहे. परिणामी, विधानसभेत शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आल्याने युतीचे नेतृत्व हे साहजिकच शिवसेनेकडे असायचे. राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडल्यावर त्याचा जसा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला तसाच लाभ भाजपलाही झाला. २००९च्या निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच विधानसभेत भाजपचे संख्याबळ युतीत जास्त झाले. शिवसेनेपेक्षा भाजपचे दोन आमदार जास्त असल्याने विरोधी पक्षनेतेपद भाजपच्या वाटय़ाला आले. १९९० नंतर प्रथमच भाजपपेक्षा शिवसेना मागे गेली. हाच वेग मुंडे यांना कायम ठेवावा लागणार आहे. शिवसेनेला ‘ब्रेक’ लावल्याशिवाय मुंडे यांना मुख्यमंत्रिपद मिळू शकणार नाही. मुंबई, ठाण्यापलीकडे लक्ष देत नाहीत, अशी टीका अलीकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर केली जाते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ४५ पैकी सर्वाधिक आमदार ग्रामीण महाराष्ट्रातून निवडून आले होते. पण जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका शिवसेनेच्या नेतृत्वाने फारशा गांभीर्याने घेतल्याच नाहीत. परिणामी, शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने काही ठिकाणी बाजी मारली होती. महायुतीत नेतृत्व करण्याकरिता भाजपला राज्याच्या सर्व भागांत यश मिळवावे लागेल. विदर्भात भाजपचा पाया चांगला आहे. काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक मोडून काढीत भाजपला मुसंडी मारावी लागेल. १९९५ मध्ये विदर्भ भाजपच्या मागे उभा राहिला होता. मुंडे हे स्वत: मराठवाडय़ातील असले तरी गेल्या निवडणुकीत मराठवाडय़ातच भाजपला धक्का बसला. मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले होते. मराठवाडय़ात मुंडे यांचा करिष्मा महत्त्वाचा ठरेल. खान्देशमध्ये भाजपची ताकद बऱ्यापैकी आहे. मुंबईत गुजराती आणि उत्तर भारतीय भाषकांच्या पाठिंब्यावर भाजपला यश मिळते. शिवसेनेपेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचे आव्हान मुंडे यांच्यापुढे असेल. काँग्रेस-राष्ट्रवादीची मंडळी स्वबळावर लढण्याच्या बाता करीत असली तरी उभयतांना परस्परांची गरज आहे. अगदीच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पार सफाया झाल्यास शरद पवार हे वेगळा विचार करू शकतात. अन्यथा दोघे एकत्रच लढतील.
काँग्रेसविरोधी पक्षांच्या सत्तासंपादनात मनसेची भूमिका निर्णायक ठरू शकते. भाजप-शिवसेना-रिपब्लिकन (आठवले) महायुतीत मुंडे हे नेते असल्यास  मनसेदेखील सत्तासंपादनासाठी पाठिंबा देऊ शकतो. मुंडे हे नेहमीच भाजप-शिवसेना-मनसे अशा महायुतीचा पुरस्कार करतात. तशी परिस्थिती निर्माण झाल्यास भाजप-शिवसेना-मनसे-रिपब्लिकन महायुतीचे सरकार राज्यात मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत येऊ शकते. अर्थात, त्याच वेळी मुंडे यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका लक्षात घ्यावी लागेल. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे युतीत दुय्यम भूमिका स्वीकारण्याची शक्यता फार कमी आहे. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा आटापिटा आहे. उद्या भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले तर शिवसेनेला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय उरणार नाही. यातूनच काहीही करून भाजपपेक्षा एक तरी जास्त आमदार निवडून यावा, अशीच शिवसेनेची रणनीती राहाणार हे निश्चित. १९९९ मध्ये मुंडे यांच्यामुळे युतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले नाही, अशी सल शिवसेना नेत्यांच्या मनात अद्यापही खदखदत असते.
शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडल्यावर विरोधी पक्षनेतेपद मिळालेल्या मुंडे यांनी १९९१ नंतर दौरे करून राज्य ढवळून काढले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना लक्ष्य केले व त्यांच्यावर आरोपांची राळ उठविली. आता पवारांचे पुतणे अजितदादा हे समोर आहेत. गेल्या १५ वर्षांत राजकीय परिस्थिती बदलली आहे. तेव्हाचे मुंडे आणि आजचे मुंडे यातही बराच फरक पडला आहे. फक्त अजित पवार यांना लक्ष्य करणार नाही हे मुंडे यांनी आधीच जाहीर करून टाकले. कारण फक्त राष्ट्रवादीला अंगावर घेऊन चालणार नाही. काँग्रेसवरही तुटून पडावे लागेल, कारण सध्या देशात काँग्रेसच्या विरोधात जनमत आहे. मुंडे यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाची ही शेवटची संधी आहे. पक्षांतर्गत कुरबुरींमुळे मुंडे हे राष्ट्रीय राजकारणात गेले तरी ते मनाने फारसे रमले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तापले असल्याने त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा मुंडे यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी १९९५ नंतर जवळपास दोन दशकांनंतर मुंडे यांना आपले नेतृत्व पुन्हा सिद्ध करावे लागेल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो