करमणुकीच्या मात्रेची आचारसंहिता..!
मुखपृष्ठ >> बातम्या >> करमणुकीच्या मात्रेची आचारसंहिता..!
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

करमणुकीच्या मात्रेची आचारसंहिता..! Bookmark and Share Print E-mail

प्रशांत मोरे
साधारणपणे सहामही किंवा वार्षिक परीक्षा महिन्याभरावर आल्या की घरोघरी अखंड करमणूक आणि माहिती प्रसविणाऱ्या टी.व्ही.ला काही प्रमाणात का होईना लगाम घालण्याची भाषा सुरू होते. डॉक्टर आजारी माणसांना जसे काही पथ्ये सांगतात, तसे परीक्षा तोंडावर आलेल्या मुलांनी टी.व्ही. पाहू नये, त्याऐवजी तो वेळ त्यांनी अभ्यास करण्यात घालवावा, असे सल्ले वडिलधारी मंडळी देत असतात. काही घरांमध्ये केबलची जोडणी तात्पुरती खंडीत करून टी.व्ही.ला परीक्षेच्या काळात विश्रांती दिली जाते. काही घरांमध्ये मात्र याबाबत मतभेद असतात. ‘मुलांच्या परीक्षेमुळे आम्हाला का शिक्षा?’ असा युक्तिवाद करून मोठी माणसं मुलांना दुसऱ्या खोलीत अभ्यासाला बसवून दिवाणखान्यात आपापल्या नेहमीच्या आवडीच्या मालिका पाहत असतात. आपल्या अपरोक्ष मुले टी.व्ही. पाहतील म्हणून काही चॅनल्स लॉकही करून ठेवली जातात. काही कुटुंबे अधिक उदार असतात. ते परीक्षेच्या काळातही मुलांना त्यांच्या नेहमीच्या सवयीच्या मालिका पाहण्याची मुभा देतात. ‘आम्ही मुलांवर कोणतेही दडपण आणत नाही. त्यांनी त्यांचा अभ्यास जबाबदारीने केल्यावर ठराविक वेळी टी.व्ही. पाहिला तर काय हरकत आहे,’ असा त्यांचा सवाल असतो. एकेकाळी श्रीमंतीचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण असणारा टी.व्ही. आता घरात वेळ घालविण्याचे एक अत्यावश्यक साधन झालेले आहे. आवडता कार्यक्रम आणि जेवण दोन्ही साधण्यासाठी दिवाणखान्यातच पंगत मांडणारेही अनेकजण असतात. एकीकडे धावपळीच्या जीवनात फारसे निवांत क्षण मिळत नाहीत, अशी तक्रार करणारे दिवसभरातून मिळणारा तुटपुंजा फुरसतीचा वेळ टी.व्ही.समोर बसून वाया घालवीत असतात. प्राइम टाइममध्ये भारनियमनामुळे वीजपुरवठा खंडीत झाला किंवा केबलदोषामुळे प्रक्षेपणात खंड पडला की अनेकजण अवस्थ होतात. मात्र या परिस्थितीतही काही कुटुंबांनी मात्र अगदी जाणीवपूर्वक अहोरात्र मनोरंजनाचा रतीब थोपविला आहे.

* वाचन-चिंतन आणि मनन
संघर्षांच्या काळात टी.व्ही. पाहण्याइतकी फुरसत नव्हती. पुढे लग्न झाल्यावरही आमच्या घरी टी.व्ही. नव्हता. मात्र गावावरून आई आल्यावर तिच्या करमणुकीसाठी म्हणून एका परिचितांकडून टी.व्ही. आणला. त्याच वेळी महाभारत मालिका सुरू होती. ती मालिका संपल्यावर टी.व्ही. बंद केला. पुढे फक्त काही वर्षांपूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मालिका सुरू होती, तेवढय़ापुरता आम्ही टी.व्ही. सुरू ठेवला होता. माझ्या मुलीने-राजलक्ष्मीने पाहिलेली ती एकमेव मालिका. आता ती दहावीला आहे. मला पहिल्यापासूनच वाचनाची आवड आहे.  पत्नी स्मिता, मुलगी राजलक्ष्मीही उत्तम वाचक आहेत. नवे काही वाचले की आम्ही ते एकमेकांमध्ये शेअर करतो. एक डीव्हीडी प्लेअर आहे. दर रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी एखादा चांगला सिनेमा आम्ही आवर्जून पाहतो.
विजयराज बोधनकार,  चित्रकार
अभासी जगापासून दूर
अंबरनाथमधून १५ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा ठाण्यात राहायला आलो, तेव्हापासून आमच्याकडे टी.व्ही. नाही. पत्नी अंजली आकाशवाणीवर वृत्तनिवेदिका आहे. मुलगी मानसी सध्या एम.ए.च्या दुसऱ्या वर्षांला आहे. घरात विविध विषयांवरची पाच हजार पुस्तके आहेत. आम्ही नियमितपणे रेडिओ ऐकतो. दररोज चार आणि रविवारी आठ वर्तमानपत्रे आमच्या घरी येतात. घरातील डीव्हीडी प्लेअर्सवर नियमितपणे अभिजात सिनेमे पाहतो. महिन्यातून एखाद-दुसरे व्यावसायिक नाटक पाहतो. वर्षभरातून दोनदा पर्यटनासाठी घराबाहेर पडतो. काही वर्षांपूर्वी आमची मानसी टी.व्ही. मालिकांमध्ये भूमिका करीत होती. एकाच वेळी तिच्या तीन मालिका प्रसारित होत होत्या. तरीही आम्ही घरी टी.व्ही. घेतला नाही. कारण चित्रीकरणाच्या वेळीच तिचे काम आम्ही पाहून घेतले होते.  
मिलिंद आमडेकर, लेखक
* तीन वर्षांपासून टी.व्ही.ला सोडचिठ्ठी  
एकाग्रता भंग होऊन उलट तणाव वाढताहेत, हे लक्षात आल्यानंतर तीन वर्षांपूर्वी नव्या घरात येताना आम्ही टी.व्ही.ला कटाक्षाने दूर ठेवले. सुरुवातीला थोडे चुकल्या चुकल्यासारखे वाटले.  पत्नी दीपाली बँकेत नोकरी करते. इतर अनेक महिलांप्रमाणेच तिलाही सासू-सुनांच्या मालिका पाहण्याची सवय होती. मोठय़ा मुलीचा-दिशाचाही- बराचसा वेळ टी.व्ही. पाहण्यात जात होता. अर्थात टी.व्ही. नसला तरी आम्ही मनोरंजनासाठी दृकश्राव्य माध्यमाचा आवर्जून वापर करतो. संगणक अथवा लॅपटॉपवर चांगल्या चित्रपटांच्या डीव्हीडीज् पाहतो. मोठय़ा मुलीला आयपॉड घेऊन दिला आहे. महिन्यातून एकदा मल्टिफ्लेक्समध्ये सहकुटुंब जाऊन चित्रपट पाहतो. एकंदरीत टी.व्ही.शिवाय आमचे ठीक चालले आहे.
देवेंद्र जैन, - सी.ए.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो