वातानुकूलित यंत्रणेचा थंडावा
मुखपृष्ठ >> Drive इट >> वातानुकूलित यंत्रणेचा थंडावा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वातानुकूलित यंत्रणेचा थंडावा Bookmark and Share Print E-mail

अंतर्गत सौंदर्याचा आकार
रवींद्र बिवलकर - गुरूवार, १८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतीय बाजारपेठेत सध्या मोटारीच्या ताकद व इंजिन क्षमतेबरोबर ग्राहकांकडून अधिक पारखण्यात येते ते म्हणजे मोटारीचे अंतर्गत सौंदर्य, त्यातील सुविधा व त्यांचा दर्जा, किंबहुना यामुळे बहुतांश मोटार उत्पादक कंपन्या आपल्या मोटारी अधिक खपाव्यात यासाठी अंतर्गत सौंदर्य वाढविण्यासाठीच मोटारीला ग्राहकांसमोर त्या रूपात मांडत असतात. किमतीच्या तुलनेत मोटारीचे हे अंतर्गत सौंदर्य, तिची रचना व त्यांचा दर्जा, त्यांची गरज हे आवश्यक किती आहे हे ठरविण्याचा मान मात्र ग्राहकाचा आहे, हे जरी मान्य केले तरी मोटारीच्या अंतर्गत रचनेचे, तिच्या सुविधादायी, आरामदायी, सौंदर्यपूर्ण आविष्काराचे रूप किती गरजेचे आहे, आवश्यक कसे आहे, कोणत्या अंगाने त्यांची ही रचना केली गेली आहे हे नक्कीच पडताळून घ्यायला हवे. त्याअंतर्गत सौंदर्याचा आविष्कार समजून घेतला गेला तर त्याची आवश्यकता किती प्रमाणात आहे, ही बाब प्रत्येक ग्राहकाला गरजेनुसार व खिशानुसार ठरविता येऊ शकेल. मोटारीच्या अगदी प्रारंभापासून अंतर्गत रचनासौंदर्यामध्ये विविध प्रकारची वाढ करण्यात आलेली दिसते. त्यात झालेली वृद्धी ही कालानुसार बदलत गेलेली दिसते. मोटारीचे उत्पादन समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचले आहे. युरोप-अमेरिकेसारख्या देशांपर्यंत आज मोटार या वस्तूची गरज मर्यादित राहिलेली नाही, तर जगभरात पोहोचली आहे. यामुळे देशोदेशीच्या शैलींनुसार, आवश्यकतेनुसार मोटारीच्या अंतर्गत रचनेचा विचारही केला गेला. अंतर्गत भिन्न भिन्न देशांमध्येही अंतर्गत रचना व सौंदर्य यांचे साम्य आज निर्माण झालेले दिसते. भारतात आलेल्या परदेशी मोटार कंपन्यांच्या अस्तित्वामुळे नवनव्या अंतर्गत सुविधांची भर परदेशात जशी पडत असते, तशी ती भारतातही आता दिली जात आहे. त्या प्रकारचा ग्राहक भारतातही आहे, हे परदेशी मोटार उत्पादक कंपन्यांच्या चांगलेच ध्यानात आले आहे. काही असले तरी अंतर्गत सुविधांची ही रेलचेल भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेला भावणारी ठरली आहे.
मोटारीच्या अंतर्गत सुविधा व सौंदर्यनिर्मितीमध्ये आसन व्यवस्था, आसनांवरील वस्त्र, लेदर, अंतर्गत प्रकाशयोजना, मॅट, पॉवर विंडो, वातानुकूलित यंत्रणा, छोटय़ा वस्तू ठेवण्यासाठी असणारे कप्पे, चांगले प्लॅस्टिक, रंगसंगती, म्युझिक सिस्टम, लेग व हेड रूम (पायांची हालचाल बसल्यानंतर नीट व्हावी यासाठीची आसन व्यवस्था, डोक्यावर कमी अंतरावर छत येऊ नये यासाठीचे आरेखन), बूट स्पेस म्हणजे चालकामागील आसन रांगेमागे असणारी जागा, डिकीची रचना व त्यातील जागा, लॉकिंग सिस्टम, एअरबॅगसारखी सुरक्षा व्यवस्था आदी विविध बाबींचा समावेश होतो. कोल्ड स्टोरेजसाठीही खास कप्पे सध्या काही मोटारींमध्ये ठेवले जातात, काही एसयूव्ही वा मोठय़ा व्हॅनसारख्या मोटारींमध्ये रेफ्रिजरेटरची सुविधाही दिली गेली आहे. नव्या काळानुसार स्टीअरिंगवर म्युझिक सिस्टमच्या नियंत्रण कळाही देण्यात येतात. जीपीआरएस पद्धतीद्वारे प्रवासात रस्ता चुकू नये, योग्य ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन मिळावे यासाठी नकाशा एलईडी पडद्यावर मिळू शकतो, मोबाइल फोन संलग्न व्यवस्थेद्वारे मोटारीच्या अंतर्गत ध्वनिक्षेपकावर ऐकता येतो व त्याला उत्तर देण्यासाठी असणारी माइकची यंत्रणा ब्ल्यू टूथद्वारे जोडलेली असते. काही विशिष्ट ध्वनिआदेशाद्वारे मोटारीचे दरवाजे लॉक व अनलॉक करा, संगीताचा आवाज कमीअधिक करा, एफएम चालू करा आदी प्रकारची सुविधाही आता मोटारींमध्ये काही कंपन्यांनी बसविलेली आहे. या विविध प्रकारच्या सुविधा, सौंदर्यवृद्धिंगत करणारी रचना मोटार ग्राहकाला गरजेची आहे, त्या त्या ग्राहकाच्या आवश्यकतेप्रमाणे व त्याच्या आर्थिकतेनुसार अवलंबून असते. ती घेताना त्याला ती परवडते की नाही, ही बाब ज्याची त्याने ठरवायची असते. अनेकदा यातील बऱ्याच बाबी या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे तयार केलेल्या असतात. यामुळे ती यंत्रणा बसविणे व तिची देखभाल करणे वा बिघडल्यास दुरुस्त करणे स्वस्तातलेच नव्हे तर किफायतशीर कामही नसते, ही बाब अनेकदा सर्वसामान्य ग्राहकाच्या लक्षात येत नाही. मोटारीकडे अशा प्रकारे लक्ष ठेवण्यासाठी वेळही अनेकांना देता येत नाही. त्यासाठी शोफरही पुरेसा नसतो. या सर्व स्थितीत मोटारीसारख्या दैनंदिन वापर असलेल्यांना दोन मोटारी ठेवणे परवडते त्यांचे एक वेळ ठीक आहे, पण ज्यांना हे शक्य नाही त्यांनी नक्कीच या बाबींचा विचारही मोटार घेतानाच करायला हवा.
वातानुकूलित यंत्रणा ही १९३३ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात प्रथम अस्तित्वात आणली गेली. आरामदायी व आलिशान अशा मोटारींच्या ग्राहकांसाठी तर कंपनीने ही यंत्रणा उपलब्ध केली. अर्थात ही मोटार घेतलेल्या लोकांसाठी नंतर ही वातानुकूलित यंत्रणेची सुविधा देऊ करण्यात आली होती. १९३९ च्या अखेरीस व १९४० च्या सुरुवातीला पॅकार्ड मोटार कार कंपनीने सर्वप्रथम मोटारीमध्ये ही वातानुकूलित यंत्रणेची सुविधा उपलब्ध करून दिली. वातानुकूलित यंत्रणेचा हा पर्याय त्या वेळी २७४ अमेरिकी डॉलर इतक्या किमतीला उपलब्ध होता. ही पद्धत बरीच जागा खाणारी होती. ही सुविधा आपोआप  बंद व चालू होण्याची सुविधा नव्हती किंवा थर्मोस्टॅट पद्धत त्यात नव्हती. १९४१ मध्ये हा पर्याय बंद करण्यात आला. कॅडिलॅक कंपनीच्या मोटारीत १९४१ मध्ये ही सुविधा देण्याचे प्रयत्न झाले होते, पण ते खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरले नाहीत. त्यानंतर १९५३ मध्ये ख्रिसलर इम्पिरिअलने एअरटेम्प या पद्धतीतून वातानुकूलित यंत्रणा मोटारींमध्ये बसविली. त्यानंतर नॅश अ‍ॅम्बेसेडरने १९५४ मध्ये वातानुकूलित यंत्रणेमध्ये अधिक अत्याधुनिकपणा आणला. नॅश इंटीग्रेटेड सिस्टमने आणलेला हा वातानुकूलित यंत्रणेचा प्रकार त्यांच्या नॅश-कॅल्व्हिनेटर या रेफ्रिजरेटर कंपनीच्या अनुभवातून साकार केलेला होता. हवा थंड करणे, गरम करणे, एक्स्झॉस्ट करणे अशा परिपूर्ण पद्धतीची ही यंत्रणा प्रभावी होती. ‘ऑल वेदर आय’ या नावाने ती प्रसिद्ध होती. त्यानंतर ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ही पद्धत अस्तित्वात आली. उत्तरोत्तर ही यंत्रणा व्यवस्था विकसित होत गेली. आज मोटारीत वातानुकूलित यंत्रणा ही सर्वानाच आवश्यक झाली आहे.
वातानुकूलित यंत्रणेमुळे मोटारीतील वायुविजन नीट तर राहते, त्याचा फायदा व आराम प्रवासात जाणवतो, पण त्याचबरोबर त्यामुळे मोटारीच्या इंधन वापरावरही मोठा परिणाम होत असतो. ही यंत्रणा कशी वापरावी यालाही तंत्र असते ते लक्षात घेणे गरजेचे आहे.
वातानुकूलित यंत्रणेतून मोटारीत दिला जाणारा थंडगार वाऱ्याचा शिडकावा चालकाच्या पुढील डॅशबोर्डला असलेल्या छोटेखानी झरोक्यातून येत असतो. आता हे झरोके मागील आसनस्थ लोकांनाही काही मोटारींमध्ये देण्यात येतात. साधारणपणे डॅशबोर्डमध्ये असणारे हे झरोके छोटेखानी हॅचबॅकला वा मध्यम सेदान मोटारीला पुरेसे आहेत मात्र मोठय़ा मोटारींमध्ये मागील आसनांवरील प्रवाशांनाही या शीतलतेचा लाभ व्हावा म्हणून छताकडील बाजूने किंवा दरवाजाच्या अंतर्गत भागातून वा मध्यभागातून झरोके देण्यात आले आहेत. अर्थात सर्व मोटारींना ही सोय नसते. वातानुकूलित यंत्रणेबरोबरच हीटरही देण्यात येतो. या हीटरमुळे अति थंडीमध्ये छान उबदारपणा मोटारीतील प्रवाशांना मिळतो. वातानुकूलित यंत्रणा ही आजच्या मोटारींमधील शान बनली आहे. अर्थात त्यामुळे इंधन वापर अधिक होत असतो. तो टाळण्यासाठी चढावावर मोटार जात असताना, सिग्नलला मोटार उभी असताना वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवणे उत्तम. चढावावर वातानुकूलित यंत्रणा चालू असेल तर इंजिनावर अधिक ताण येत असतो. मोटार चालू केल्यानंतर ही यंत्रणा मग चालू करावी. प्रथम कमी मापकावर व नंतर आवश्यक वा मध्यम मापकावर वाऱ्याचा झोत स्थिर करावा. उन्हामध्ये मोटार असेल व आत गरम वातावरण असेल तर प्रथम आतील अतिगरमपणा कमी होऊन द्यावा, त्यासाठी खिडक्या काही काळ उघडून मग वातानुकूलित यंत्रणा चालू करावी. त्यानंतर काचा बंद करून घ्याव्यात म्हणजे थंडपणा चांगला तयार होईल.
एकंदरीत या वातानुकूलित यंत्रणेमुळे इंधन वापरावर होणारा ताण पाहता आता काही काळाने थर्मल सिस्टम इंटीग्रेशन फॉर फ्युएल इकॉनॉमी हे (टीआयएफएफई) तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. लवकरच ते मोटारींमध्ये बसविलेही जाईल, पण तोपर्यंत वातानुकूलित यंत्रणेचा लाभ घेताना योग्य रीतीने घ्यावा व त्यामुळे पैशाचा अनावश्यक व्यय टाळावा इतकेच.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो