लातूरची व्यापारी ओळख लयास जाण्याची भीती
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> लातूरची व्यापारी ओळख लयास जाण्याची भीती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

लातूरची व्यापारी ओळख लयास जाण्याची भीती Bookmark and Share Print E-mail

हमालांच्या आडमुठेपणामुळे आडत बाजार बंद
प्रदीप नणंदकर
लातूर
शेतीमाल शंभर किलो वजनाच्या पोत्यातून बाजारपेठेत उतरवणार नाही, या हमालांच्या संघटनेच्या आडमुठय़ा धोरणामुळे बुधवारी लातूर आडत बाजारपेठ बंद पडली. देशभरात कच्च्या मालाच्या बाजारपेठेत सरसकट १०० किलोच्या पोत्यात शेतीमाल आणला जातो. मात्र, येथील हमाल संघटनांनी घेतलेल्या भूमिकेमुळे लातूरची बाजारपेठ बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
लातूर शहराची मूळ ओळख व्यापारी शहर अशी आहे. गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून ही ओळख पिढय़ानपिढय़ा जपण्याचा प्रयत्न झाला. राज्यातील धान्य बाजारपेठेत लातूर बाजारपेठेचा क्रमांक वरचा आहे. शेतक ऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे त्याच दिवशी देणारी बाजारपेठ म्हणूनही लातूरची ख्याती होती. बँकांचे जाळे वाढल्यामुळे ही सोय आता तालुक्याच्या बाजारपेठेतही उपलब्ध आहे. हमालांना जास्त ओझे वाहणे हे त्यांच्या शारीरिकदृष्टय़ा धोक्याचे असल्यामुळे ५० किलो वजनाच्या पोत्यातच त्यांनी मालाची वाहतूक करावी, असा कायदा आहे. दुर्दैवाने या कायद्याची अंमलबजावणी केवळ पक्क्या मालासंदर्भात होते. मात्र, बाजारपेठेत जो कच्चा माल येतो तो १०० किलोचाच येतो. गेल्या वर्षभरापासून लातूर बाजारपेठेत हमाल, आडते, शेतकरी यांच्यात धुसफूस सुरू आहे. हमाली वाढवण्यासाठी गतवर्षी पंधरा दिवस बाजारपेठ बंद होती. या वर्षी हमाल संघटनांतर्फे शेतक ऱ्यांनी १०० ऐवजी ५० किलो वजनाचे पोते बाजारपेठेत आणावे, असे आवाहन करण्यात आले होते. शेतक ऱ्यांकडे १०० किलोचा बारदाना शिल्लक असल्याने त्यांनी बाजारपेठेत १०० किलोचा माल आणल्यास तो हमालांनी आडतीवर उतरवून घ्यावा. खरेदीदार ५० किलोच्या बारदान्यातच खरेदी करीत असल्याने हमालांना नंतर अडचण नाही, अशी भूमिका अडत व्यापाऱ्यांनी घेतली. मात्र, हमाल आपल्या भूमिकेवर अडून राहिले. बुधवारी सकाळी बाजारपेठेत १०० किलोच्या पोत्यात शेतक ऱ्यांचा माल आल्यानंतर हमालांनी आक्रमक भूमिका घेत माल उतरवू दिला जाणार नसल्याचे जाहीर केले. गतवर्षी स्वत: १०० किलोचे पोते उतरवणाऱ्या शेतक ऱ्यांस हमालांनी मारहाण केली होती. त्यामुळे बुधवारी अडत व्यापाऱ्यांनीच बाजारपेठेत ५० किलोचे पोते आले तरच उतरू द्या, अन्यथा शेतक ऱ्यांना ज्या बाजारपेठेत माल विकणे सोयीचे आहे तेथे विकू द्या, अशी भूमिका घेतली. जिल्ह्य़ातील उदगीर, औसा, मुरूड, निलंगा तसेच उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील उमरगा, मुरूम या बाजारपेठेत सरसकट १०० किलोच्या पोत्यात मालाची खरेदी-विक्री होते. त्यामुळे शेतक ऱ्यांनी लातूर बाजारपेठेकडे माल आणणे कमी केले आहे. अगोदरच शेतमालाच्या भावात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घसरण झाल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. हमालांच्या भूमिकेमुळे शेतक ऱ्यांच्या त्रासात भर पडल्यामुळे तो बाजारपेठेकडे पाठ फिरवत आहे.
लातूर शहरातील एकूण उलाढाल शेतीमालाच्या बाजारपेठेतील आवकीवर अवलंबून असते. ही आवक मंदावल्यास सर्व बाजारपेठेवर त्याचा चांगलाच परिणाम जाणवतो. सणासुदीच्या दिवसात दरवर्षीप्रमाणे मालाची विक्री होईल म्हणून व्यापाऱ्यांनी माल भरला आहे. मात्र, धान्य बाजारपेठेत होणाऱ्या संपामुळे एकूण शहराची व्यापारी ओळखच संपण्याच्या मार्गावर आहे. बाजार समित्यांची स्थापना ही मुळात शेतक ऱ्यांच्या हितासाठी करण्यात आली होती. दुर्दैवाने यात शेतकरी सोडून सर्वाचेच हित जपले जात आहे. बाजार समित्या या राजकारण्यांचे अड्डे बनले आहेत. कोटय़वधीची उलाढाल बाजारपेठेत होते. बाजार समित्यांचे उत्पन्न वाढते. त्या उत्पन्नातून शेतक ऱ्यांच्या हिताची कामे केली जात नाहीत. प्रत्येक जण शेतक ऱ्यांची कोंडी करून आपला खिसा कसा भरता येईल, याकडेच लक्ष देत असतो. बाजार समितीचे पदाधिकारी लातुरात दरवर्षी बदलतात त्यामुळे मिळालेल्या वर्षभराच्या संधीचा अधिकाधिक लाभ स्वत:च्या स्वार्थासाठीच करण्याकडे पदाधिकाऱ्यांचा कल वाढतो आहे. बाजार समितीतील सभापतींना संपूर्ण कालावधी वापरण्यासाठी दिल्यास त्यातून त्यांचे राजकीय नेतृत्व वाढीस लागते. हा मागील अनुभव लक्षात घेऊन नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याच डावच आखला गेला आहे, त्यामुळे नेतृत्व नाही तर किमान आर्थिक लाभ तरी करून घ्यावा, हीच वृत्ती बळावत चालली आहे. कारणे काहीही असोत शेतक ऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी कोणी लक्ष घालत नाही, कोणाचा धाक नाही त्यामुळेही बाजारपेठेवरील संकट नजीकच्या काळात दूर होण्याची चिन्हे नाहीत.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो