नवनीत : शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत : शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२ Bookmark and Share Print E-mail
नवनीत

इतिहासात आज दिनांक.. : १९ ऑक्टोबर
१७८१ अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंडच्या सैन्याचे प्रमुख लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना जॉर्ज वॉशिंग्टन यांनी शरण आणले. इंग्लंडने शरणागती पत्करल्याने वसाहतींच्या स्वातंत्र्याचा, एकत्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला.
१८८२ हंटर कमिशनपुढे साक्ष देताना महात्मा फुले यांनी सक्तीच्या मोफत शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला.
१९२० समाजहितेच्छू पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म. ते मूळचे कोकणातील रोहे गावचे. मातोश्री पार्वतीबाई आणि वडील वैजनाथशास्त्री यांचे हे अपत्य. त्यांचे बालपणीचे शिक्षण गावातील मेहंदळे हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे चरित्रकार राजेंद्र खेर यासंदर्भात लिहितात. ‘समष्टीउत्थानाचे अस्तर जोडलेल्या कर्मप्रधान भक्तीचा संदेश घराघरांत पोहोचविणाऱ्या ‘स्वाध्याय परिवारा’चे प्रणेते : मानवामधील ईश्वरतत्त्व जागविणाऱ्या या स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून अतिशय मूलगामी अशी मूल्यात्मक क्रांती पांडुरंगशास्त्री यांनी घडवून आणली. वृक्षमंदिर, मत्स्यगंधा, योगेश्वर कृषी अशा अपूर्व प्रयोग उपक्रमांची जणू मालिकाच या प्रबोधन प्रयोगातून साकारली. सामुदायिक शेती तसेच स्वावलंबी ग्रामविकासाच्या त्यांनी रुजविलेल्या विकासप्रणालीतून दारिद्रय़निर्मूलनाचा अभिनव पर्याय साकारला.. .. ..  (त्यांनी उभारलेले)‘तत्त्वज्ञान विद्यापीठ’ म्हणजे पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या समष्टीप्रधान, लोकाभिमुख आणि कर्मप्रधान भक्तियोगाचे तत्त्वज्ञान प्रसृत करणारे जणू अक्षय स्मारकच.’
प्रा. गणेश राऊत  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : म्हैसूरचे वैभवशाली वोडियार राज्य
विजयनगरच्या साम्राज्यात म्हैसूर हे छोटेसे गाव असताना विजय वोडियार याने तिथे आपले छोटे राज्य स्थापन केले. इसवीसन १३९९ ते इ. स. १५६५ या काळात म्हैसूरचे हे वोडियार घराण्याचे राजे विजयनगर साम्राज्याचे मांडलिक म्हणून कार्यरत होते. या काळात प्रथम राजा म्हणून यदुराज याने इ. स. १३९९ ते १४२३ अशी कारकीर्द केली. त्यानंतर चामराज वोडियार, तिम्मराज वोडियार पहिला, चामराज वोडियार दुसरा व चामराज वोडियार तिसरा असे राजे होऊन गेले. १५६५ मध्ये विजयनगर राज्याचा अस्त झाल्यावर राजा नरसराज वोडियार याने विजयनगरचे मांडलिकत्व झुगारून स्वतंत्र राज्य जाहीर केले. त्याने मदुरा, इक्केरी, नागमंडल येथील शत्रूंवर विजय मिळवला. टांकसाळ सुरू करून स्वत:ची नाणी पाडण्यास सुरुवा्रत केली. देवराज वोडियार (१६५९ ते १६७३) याने चामुंडा टेकडीच्या शिखरापर्यंत एक हजार पायऱ्या बांधून त्या टेकडीवर पाषाणातून कोरून तयार केलेला भव्य नंदी आजही सुस्थितीत आहे. चिक्कादेवराजा (कारकीर्द १६७३ ते १७१४) या एक कर्तबगार वोडियार राजाने म्हैसूर संस्थानाला चांगले प्रशासन दिले. प्रशासकीय व्यवस्थेसाठी त्याने आपल्या राज्याचे १८ विभाग (चावडी) केले, राज्याचा विस्तार बंगलोपर्यंत केला. चिक्कादेवराजाने १२ हजार विणकर बंगलोरमध्ये आणून वसविले. साऱ्या राज्यभर डाक नेण्या-आणण्याची व्यवस्था केली. शिवाजी महाराजांनी १६७७ साली व नंतर मराठय़ांनी १६८२ मध्ये म्हैसूरवर स्वाऱ्या केल्या. पण त्या चिक्कादेवराजाने परतविल्या. औरंगजेबाकडे त्याने प्रतिनिधीमंडळ पाठवून मोगल दरबारी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे चिक्कदेवराजाचे म्हैसूर राज्य परकीय आक्रमणापासून भयमुक्त झाले होते. राज्याची आर्थिक स्थिती भक्कम केल्यामुळे देवराजाला नवकोट नारायण असे गौरविण्यात येईल. चिक्कदेवराजाचा मृत्यू इ. स. १७१४ मध्ये झाला.
सुनीत पोतनीस - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : आगगाडीतले अपघात

आगगाडीच्या प्रवासात नाना प्रकारचे अपघात होताना आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो. यातील जे अपघात मुद्दाम दरवाजात उभ्या असलेल्या लोकांना आकसाने बाहेर ढकलले जाते ते अपघात आपण सोडून देऊ, कारण आजघडीला त्यासाठी रेल्वेकडे उत्तर नाही. परदेशात आगगाडय़ांना दारे असतात व प्रत्येक डब्याचे दार एकाच वेळी ड्रायव्हरकडे असलेल्या नियंत्रणाने बंद झाल्यावरच गाडी सुरू होते, अशी यंत्रणा भारतीय रेल्वेकडे मेट्रो सोडता इतर गाडय़ांना नाही. त्यामुळे जोवर आगगाडय़ांच्या डब्यांचे दरवाजे उघडे आहेत तोवर कोणी कोणाला मुद्दाम ढकलून देण्याचे अपघात टाळता येणार नाहीत आणि असे होऊ शकते हे ओळखून लोकांनीही गाडीत एकमेकांशी न भांडण्याएवढा संयम ठेवावा; परंतु मुंबईच्या लोकल गाडय़ांत हवा खाणारे लोक काही कमी नाहीत. गाडीत जागा असली तरी काही लोक हवा खाण्यासाठी दरवाजात उभे राहतात. अशा वेळी ते गाडीबाहेर हातवारे करतात, समोरच्या गाडीतल्या लोकांशी मोठमोठय़ाने ओरडून बोलतात. अशा वेळी तोल जाऊन ते खाली पडतात किंवा रेल्वे लाइनीतील खांबांना धडकतात. हे सगळे टाळण्यासाठी गर्दी असली तरी जेवढे डब्यात राहता येईल तेवढे राहिले पाहिजे अथवा गर्दीमुळे दरवाजात उभे राहावे लागले तरी हातवारे करणे वगैरे करू नये. तरुण मुलांच्यात हवा खाण्याचे प्रकरण आणखी एक पाऊल पुढे जाते. ते म्हणजे ते सरळ लोकलच्या टपावर जाऊन बसतात. त्यातही टपावर ते पेंटोग्राफच्या जवळ बसतात. पेंटोग्राफ हा लोकलच्या डोक्यावरून जाणाऱ्या विजेच्या तारांतून वाहणारा उच्च दाबाचा विद्युतप्रवाह गाडी चालविण्यासाठी वापरत असतात. त्यामुळे टपावर बसलेल्या लोकांना पेंटोग्राफमुळे विजेचा अपघात होण्याची दाट शक्यता असते व तसे वारंवार झालेले आपण पाहतो. काही वर्षांपूर्वी बडनेरा स्टेशनात सहलीला गेलेली महाविद्यालयीन मुले थांबलेल्या गाडीच्या टपावर चढून प्लॅटफॉर्मवरच्या मुलांचा फोटो काढत होती. त्या वेळी कॅमेऱ्याचा फ्लॅश होताच रेल्वेची वीज खेचली जाऊन ही मुले मेली. तेव्हा वीज आणि रेल्वे या दोन गोष्टींबाबत कधीही वाह्य़ातपणा करू नये, तो भोवल्याशिवाय राहत नाही.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,  मुंबई २२  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. : झेन कमळ..
मित्रा, इथे सांगतोय, त्या दोन कवितांमागे एक छोटीशी गोष्ट आहे. गोष्ट नसून एक साधा प्रसंग आहे..
बोधीधर्मानं बुद्धविचाराचं बीज हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये नेलं आणि त्यांच्या आश्रमाची प्रतिष्ठापना केली या आद्य गुरूच्या पाचव्या पिढीतल्या झेन मास्टरच्या अंतिम दिवसातला हा प्रसंग आहे.
झेन तत्त्वज्ञानामध्ये, पाठांतराला महत्त्व नसून त्यानुसार जगण्यात सार्थकता मानली जाते. जीवनातला नि:संगपणा आणि प्रसंग, व्यक्ती, भूत-भविष्य-वर्तमान व स्वत: यांना चिकटून न राहता आनंदाने जगणं म्हणजे झेनमय जीवन. मनातल्या आसक्तीमुळे सुखसंवेदना होतात खऱ्या, पण त्यातच दु:खाचं मूळ असतं, हवंहवंसं वाटण्याचा हव्यास आणि नको-नकोसं वाटणाऱ्या प्रसंगाचा अव्हेर हे दु:खाचं मूळ आहे. याची जाणीव कागदोपत्री न राहता, जीवनाला भिडते. प्रत्येक श्वासाबरोबर त्याची जाणीव होत राहते. म्हणजे असं तत्त्वज्ञान पुढे शिकविण्यासाठी तितकाच बुद्धिमान, जागृत आणि करुणाकर गुरू हवा तो शोधण्यासाठी ‘हुंग जे’नं आपल्या शिष्यांना आवाहन केलं. तुमचं तत्त्वज्ञान थोडक्या शब्दांत काव्यरूपात मांडा. त्यांच्या ज्येष्ठ शिष्याने ‘शेन शू’ने कविता लिहिली.
हुंग जे यांना कविता आवडली, पण ‘शेन शू’ला अजून अंतज्र्ञान झालेलं नाही, असं वाटलं. शेन शूने प्रयत्न केला, पण प्रगती झाली नाही.
त्या आश्रमात ‘हु नेंग’ नावाचा साधासुधा भिक्षु होता. अनपढ पण ‘कुशल.’ त्याच्या लक्षात आलं की शेन शूमध्ये अजून जागृती झालेली नाही. झेन तत्त्वज्ञानाचं पूर्ण आकलन झाल्याचं प्रतीत होत नाही. त्याच्या कवितेत आणि जीवन व्यवहारात त्याला ‘शेन’ची प्रतीकं आवडली. त्यानं कविता पुढे नेली.
झेनमास्टरना या सर्वसामान्य भिक्षूची कविता समर्पक वाटली आणि पटली. वृक्ष, दर्पण, माणूस आणि मन या सर्वच गोष्टी अनित्य, त्यांच्यावर कसलेच आरोप न करता, त्यांच्याकडून अपेक्षा न करता, त्या जशा आहेत तशा स्वीकारणं आणि जगणं म्हणजे झेनजीवन. जीवनाकडे ते ‘आहे तसं’ पाहता येणं म्हणजे ‘तथात ्! याची अनुभूती, साक्षात्कार आणि प्रत्यक्ष आचरण म्हणजे ‘झेन’ मार्ग. ‘हू नेंग’ची झेनमास्टर म्हणून नेमणूक झाली आणि सारे ‘झेन’वासी झाले.
मित्रा, कठीण, हायफंडा, अंतरंगी, विचित्र अनाकलनीय म्हणून सोडून देऊ नकोस प्लीज. चिंतन कर. हळूहळू उमललेलं झेन कमळ.. मला त्याच्या पिसाऱ्यातल्या पाकळ्या दिसल्या, त्या इथे दाखवल्यात..  
डॉ. राजेंद्र बर्वे  -  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मूळ कवितांचा स्वैर अनुवाद. संदर्भ : डायमंड सूत्र अ‍ॅण्ड सूत्र ऑफ हू नेंग, शम्बाला प्रकाशन

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो