सो कुल : इंग्लिश विंग्लिश
मुखपृष्ठ >> सो कुल >> सो कुल : इंग्लिश विंग्लिश
 

व्हिवा

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सो कुल : इंग्लिश विंग्लिश Bookmark and Share Print E-mail

सोनाली कुलकर्णी, शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

खूप दिवस आपल्यात रुतलेली कमीपणाची जाणीव जडशीळ करून सोडते आपल्या ‘स्व’ला. पण तो कमीपणा झडण्याची प्रक्रिया आपल्याला कितीतरी पटींनी नितांतसुंदर करून सोडते. हे मोठं तत्त्वज्ञान हा सिनेमा अगदी हळुवारपणे मांडतो. तिला पाहिल्यावर एकच शब्द सुचतो- ‘व्हायव्हॅशिअस!’ तिच्यात प्रचंड उत्स्फूर्तपणा आणि आत्मविश्वास आहे. ती तशी माझी ‘चुलत-मैत्रीण’. म्हणजे माझा फास्ट फ्रेंड- नीलेश कुलकर्णी- त्यांची ती मैत्रीण.

गौरी शिंदे. नेहमी उडतउडत तिची खबरबात कानावर यायची. दोन वर्षांपूर्वी कळलं- की आता ती तयार आहे. कशाला- तर सिनेमा दिग्दर्शित करायला! ह्य़ापूर्वी अ‍ॅडव्हरटायझिंग क्षेत्रात काम करत असताना तिनी जवळपास शंभर जाहिराती दिग्दर्शित केल्या होत्या. बाल्कीला- तिच्या नवऱ्याला ‘चिनी कम’ आणि ‘पा’ बनवताना भक्कम आधार दिला होता. कानावर आलं, गौरीची स्क्रिप्ट लिहून झाली. आता शूटिंगची जुळवाजुळव आणि कास्टिंग. मुख्य भूमिकेसाठी तिनी कुणाकडे जावं. तर डायरेक्ट श्रीदेवी! गौरी नुसतीच त्यांना गोष्ट ऐकवायला गेली नाही. तर श्री'जींचा होकार घेऊनच परत आली. मला प्रचंड कुतूहल वाटायला लागलं. म्हटलं काहीतरी जबरदस्त नृत्यप्रधान सिनेमा असणार. मी स्वत: ‘श्रीदेवी’ नावाच्या पडद्यावरच्या झंझावाताची वेडी चाहती आहे. चांदनी, लम्हे, चालबाज, सदमा, मिस्टर इंडिया हे माझे प्रचंड आवडते! ह्य़ातला त्यांचा अभिनय, सौंदर्य आणि नृत्यनिपुणता शब्दात वर्णन करणं शक्य नाही.
कितीही उत्सुकता वाटली. तरी घुसून सिनेमाबद्दल जास्त काही विचारणं बरं दिसणार नाही म्हणून मी जरा अंतर राखून होते. नाही म्हटलं तरी मी गौरीची ‘चुलत-मैत्रीण’ आणि श्री'मॅमची लाखोंमधली एक फॅन. तोवर सिनेमाचं नाव जाहीर झालं- इंग्लिश विंग्लिश. नावावरून काहीच बोध होईना. म्हटलं असेल बुवा काहीतरी ढिनचॅक. दर महिन्याला नवनवीन डान्स-फॉर्म येतायत. जॅझ-वॉल्टझ जुने झाले आता. काहीतरी इंग्लिश नाच असेल किंवा निर्मात्यांचं इंडो-ब्रिटिश कोलॅबरेशन असू शकेल. सिनेमा पूर्ण झाल्यावर पोस्टर झळकायला लागली. टीव्हीवर प्रोमो दिसायला लागले. तरी गोष्टीचा अंदाज येईना. पण गेल्या आठवडय़ात सिनेमा पाहिला. आणि तुम्हाला सांगितल्याशिवाय राहवेना.
आजच्या आज बघा ही फिल्म. कुठलाही ‘कॉज’ किंवा अभिनिवेश नाही. कसलाही झेंडा, नारेबाजी नाही. एक साधी गोष्ट आहे. हृदयाला भिडणारी. आपल्या आसपास घडणारी. मला ती माझी, माझ्या आईची, मावशीची, मैत्रिणींची. alt

कितीतरी जणींची गोष्ट वाटली. काहीतरी वादळ होईपर्यंत आपण स्वत:ची किंमत ओळखणं का टाळतो? काहीतरी चमत्कार घडल्यावरच सोबतची माणसं आपली दखल घेतात का? ज्ञान ही गोष्ट पदव्यांपेक्षा आत्मविश्वास आणि अभिमान देते. भावना पोचवण्यासाठी भाषेपेक्षा इच्छा जास्त महत्त्वाची असते आणि अनोळखी शब्द समजण्यासाठीसुद्धा भाषा कळण्यापेक्षा सहृदयता, संवेदनशीलता असली पाहिजे. बहुताशांची अमुक एक भाषा आपण स्टाईलिश अ‍ॅक्सेंटमधे बोलू शकतो. ह्य़ाचा टेंभा मिरवण्याऐवजी. आपल्या माणुसकीची, कर्तृत्वाची मोहोर उमटवणाऱ्या माणसाची कदर करायला शिकलं पाहिजे. त्याचबरोबर आपली आवड जोपासणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. मनात अंकुरणाऱ्या एखाद्या स्वप्नाला आपण उमलण्याचा वाव दिला पाहिजे. अशा कितीतरी अत्यंत मूलभूत गोष्टींचं भान ह्य़ा चित्रपटामुळे पुनरुज्जीवित होतं.
आपलं सर्वस्व असणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी आपण किती झटत असतो, त्याग करत असतो. कुटुंबीयांना जाणीव असते का त्याची? हा सिनेमा, ही गोष्ट फक्त स्त्रियांचीच आहे असं नाही. ही माणसांची गोष्ट आहे. कपडे, चपला-बूट-भाषा ह्य़ावरून आपल्याला जोखलं जातं. का? स्टाईलिश नसणाऱ्या/मातृभाषेत बोलणाऱ्या माणसाचं हसं होऊन बसतं. अशी माणसं नापसंती आणि कीव ह्य़ाची धनी होतात. एखाद्या भोळ्या माणसावर आपण मारलेले शेरे पुढे जाऊन आपलीच लायकी दर्शवतात. खरंतर आपल्या कुटुंबाकडून आपल्याला स्वीकृती आणि आधार हवा असतो. फक्त गृहीत धरणं नाही.
मला तर गौरीला घट्ट मिठी मारायची आहे. हा सिनेमा बनवल्याबद्दल. आणि शशी'ला पण. म्हणजे श्रीदेवी नावाच्या सुपरस्टारला पण. किती किती सहजसुंदर अभिनय. किती गोडवा. किती साधेपणा वाटला शशीमध्ये! तिच्यात काटे नहीं कटते मधली धुंद अदा किंवा मिस्टर इंडियामधली तंतरलेली खुन्नस कणभरही जाणवली नाही. इतकी वर्षे मधे गेल्याचा मागमूस नाही. हे श्रेय गौरीचंही आहे. दिग्दर्शकात तेवढा ठामपणा असेल तर कलाकार खरंच ते पात्र वाटतात. त्यांचा अभिनय जाणवत नाही. जोडीला असणारे बाकीचे कलाकार, त्यांचे कपडे, संवाद, गाणी, संगीत, लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी.. सगळंच चपखल आणि अप्रतिम!
बोगस मार्केटिंग, धक्कातंत्र, कॉन्ट्रोव्हर्सी. ह्य़ा कशाच्याही वाटेला न जाता गौरी आपल्यासाठी एक तरल, प्रेमळ, सज्ञान करणारा सिनेमा घेऊन आली आहे. थँक यू प्रोडय़ुसर बाल्की आणि अभिनंदन मिस यंग डिरेक्टर. तुझ्या संपूर्ण टीमचं पण. हॅट्स ऑफ इंग्लिश विंग्लिश!
ता. क. : वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे ह्य़ा सिनेमाला सबटायटल्स नाहीत. ही धमक- हा विचार फार स्तुत्य आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो