बनवाबनवी
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बनवाबनवी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बनवाबनवी Bookmark and Share Print E-mail

शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

‘हकीम सूत्रा’नुसार झालेली रिक्षा-टॅक्सींची दरवाढ ही अन्याय्य तर आहेच; पण ती अंमलात आणण्यापूर्वी जे निकष पाळायला हवे होते त्यांची अजिबात अंमलबजावणी झालेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. सगळ्यात मोठा गोंधळ इलेक्ट्रॉनिक मीटर आणि मेकॅनिकल मीटरमधील फरकाचा आहे. इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये दाखविला जाणारा किमतीचा आकडा, ड्रायव्हर घेत असलेली प्रत्यक्ष रक्कम आणि मेकॅनिकल मीटरपोटी द्यावी लागणारी रक्कम तर वेगवेगळी असल्याचे दिसून आलेच; पण सारख्याच मार्गावर आणि अंतरात दोन्ही प्रकारच्या मीटरमध्ये अंतरही वेगवेगळे दाखविले जात असल्याचे दिसून आले.

‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व मेकॅनिकल मीटर असलेल्या रिक्षा आणि टॅक्सींनी प्रवास करून दिलेला हा ‘आँखो देखा हाल’!

फक्त मनस्ताप
गोविंद तुपे
‘हकीम सूत्रा’नुसार झालेली भाडेवाढ रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी ‘अवचित धनलाभ’ ठरली असली तरी प्रवाशांच्या पदरी मनस्तापाशिवाय अन्य काहीही पडलेले नाही. रिक्षाचालक मनमानी पैशाची मागणी करतात आणि नकार दिला की भांडणाला सुरुवात होते. पण शेवटी रिक्षावाल्यांच्या दादागिरीसमोर प्रवाशांना नमावेच लागते. रिक्षांची मीटर तपासण्यासाठी गोवंडी स्टेशन ते चेंबूर स्टेशनपर्यंत दोनवेळा रिक्षाने प्रवास केला. नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या एम.एच -०३, एके-४९१३ या रिक्षाने प्रवास केल्यावर ते अंतर भरले १७०० मीटर. आणि त्यासाठी रिक्षावाल्याने भाडे आकारले २० रुपये. त्याच मार्गावर मेकॅनिकल मीटर असलेल्या एमएच-०३ बीए-३३३५ या रिक्षाने प्रवास केल्यानंतर अंतर भरले २४०० मीटर. या रिक्षावाल्याने भाडे आकारले तब्बल २५ रुपये. एकाच अंतरासाठी एकदा २० रुपये तर एकदा २५ टक्के अधिक म्हणजे २५ रुपये. संतापजनक बाब म्हणजे तक्रार करण्यासाठी पोलीसही जागेवर नसतात. आणि कोणत्याही ‘तक्रारीला भीत नाही, जा कर तक्रार’ अशी मग्रुरीची भाषा सर्रास ऐकायला मिळते. प्रवाशांच्या तक्रारीवरून गेल्या १५ दिवसांमध्ये २३ रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल करून त्याच्यांकडून १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच त्यांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. तर १८००२२०११० या टोल फ्री क्रमांकावर ५५ तक्रारी आल्या असून संबधित रिक्षा चालकांवर कारवाई सुरू असल्याचे प्रादेशिक परीवहन अधिकारी विकास पांडकर यांनी सांगितले.

अंतराचे गौडबंगाल
प्रसाद मोकाशी
‘अंतर एकच आणि भाडे वेगळे’ ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. मेकॅनिकल मीटर आणि इ-मीटरमधील फरक आता भाडेवाढीनंतर अधिक स्पष्ट होऊ लागला आहे. किमान १० ते १५ रुपयांचा फरक या दोन मीटरमध्ये पडत आहे. कुर्ला रेल्वेस्थानक येथून भक्ती पार्क येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. भक्ती पार्कला रिक्षा जाणार नाही. तेथे रिक्षा नेण्यास परवानगी नाही, असे सांगत रिक्षाचलकाने रिक्षा आणिक आगापर्यंत नेईन. तेथून हवी तर दुसरी रिक्षा किंवा टॅक्सी पाहावी असा सल्ला दिला. ‘पण तेथे रिक्षा जाते’ असे सांगितल्यावर तेथे राहणारा असेल तर तो रिक्षा घेऊन जातो. अनेकजण जातात पण येताना वाहतूक पोलिसाला ५० रुपये हप्ता देतात आणि येतात, असे त्याने सांगितले. अखेर रिक्षाने आणिक आगारापर्यंत सोडण्यास तो तयार झाला. एमएच ०३ एम ९६३५ या क्रमांकाच्या या रिक्षाचालकाचे नाव होते प्रकाश नारायण गावडे. मॅकॅनिकल मीटरचे जुने आणि नवे भाडेपत्रक त्याच्याजवळ त्याने ठेवलेले होते. प्रियदर्शिनी पार्कजवळ काही काळ वाहतूक कोंडी असल्यामुळे रिक्षा थांबली. मात्र अर्धा मिनिट थांबून मार्गस्थ झाली. आणिक आगार येथे रिक्षाचे मीटर १.७० दाखवत होते. जुन्या दराप्रमाणे २५ रुपये भाडे होत होते तर नव्या भाडेपत्रिकेप्रमाणे ३४ रुपये झाले. गावडे शरद राव यांच्या संघटनेचे सदस्य असले तरी चालू वर्षांची वर्गणी भरली नसल्यामुळे आपण आता सदस्य नाही, असे त्यांनी सांगितले. परतीच्या प्रवासासाठी वडाळा परिवहन विभागाच्या कार्यालयाकडून येणारी रिक्षा आणिक आगार येथे मिळाली. इलेक्ट्रॉनिक मीटर असलेली एमएच ०३ एए ५७२२ या क्रमांकाची रिक्षा मिळाली. चालक होता लालजी पाल. रिक्षा प्रियदर्शिनीजवळच्या वडाळा पुलावरून आली असली तरी चौकामध्ये तिचा वेग मंदावला होता. कारण वाहतूक कोंडी! रिक्षा कुर्ला स्थानकाजवळ आली तेव्हा मीटरवर अंतर होते २.५. नव्या दराप्रमाणे त्याने २४ रुपये मागितले. अर्थात एक रुपया नाही म्हणून २५ रुपये घेऊन तो पुढच्या भाडय़ाकडे वळला. हाही शरद राव यांच्या संघटनेचा सक्रिय सदस्य आहे.

टॅक्सीचेही वेगवेगळे भाडे
शेखर जोशी
इलेक्ट्रॉनिक मीटर अचूक असल्याचे सांगितले जात असले तरी या मीटरवरही एकाच अंतरासाठी वेगवेगळे भाडे आकारले गेल्याचा अनुभव आला. दादर (पश्चिम) येथील कबुतरखाना येथे मारुती व्हॅन टॅक्सी (क्रमांक एम.एच. ०१ एटी ५०१०) मधून दूरदर्शन केंद्र, वरळीपर्यंत प्रवास केला. टॅक्सीचालकाने टॅक्सीमध्ये आपले नाव, छायाचित्र आदी माहिती असलेले कार्ड दर्शनी भागात लावलेले नव्हते. इलेक्ट्रॉनिक मीटर लावलेले असल्याने हा एकूण प्रवास ३. ५ किलोमीटर झाल्याचे तसेच ३९ रुपये ५० पैसे इतके भाडे दाखवले जात होते. चालकाने दरपत्रक दाखवून ४७ रुपये घेतले. हे भाडे जास्त वाटते, या प्रवासासाठी ४० ते ४२ रुपये होतात, असे सांगितल्यानंतर, ठिक आहे, ४० रुपये द्या, असे तो म्हणाला. दूरदर्शन केंद्राहून इलेक्ट्रॉनिक मीटर असलेली मारुती टॅक्सी (क्रमांक एम.एच.०१ जेए ३९९९) दादर येथे येण्याकरिता पकडली. परतीचे अंतरही ३.५ कि.मी. भरले. मात्र भाडे ३६ रुपये दिसत होते. टॅक्सीचालकाने ४० रुपये झाले असे सांगितले. मग त्याच मार्गावरसाधे मीटर असलेली टॅक्सी (क्रमांक एमएच ०१ एक्स ३५५२) पकडली. दूरदर्शन केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत या मीटरवर २.२० असा आकडा दर्शवला जात होता. टॅक्सी चालकाने नवे भाडेदरपत्रक दाखवून या प्रवासाचे ४२ रुपये भाडे घेतले.
इलेक्ट्रॉनिक मीटर सुधारित भाडय़ाप्रमाणे नाहीच!
रेश्मा शिवडेकर

रिक्षा-टॅक्सीत लागलेली इलेक्ट्रॉनिक मीटर अचूक भाडे दर्शवीत असावी, हा समज चुकीचा ठरविणारा अनुभव आला. गोराईची सुविद्या शाळा ते बोरिवली स्टेशनपर्यंतचा प्रवास इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल अशा दोन्ही प्रकारची मीटर असलेल्या दोन स्वतंत्र रिक्षाने केला. सुदैवाने दोन्ही रिक्षाचालकांनी या प्रवासासाठीचे भाडे प्रत्येकी ३४ रुपयेच आकारले. या अंतरासाठी पूर्वी २४ रूपये इतके भाडे आकारले जाई. दोन्हीपैकी ‘एमएच०३-एए८८०७’ या रिक्षाचे इलेक्ट्रॉनिक मीटर ३.२ किलोमीटर अंतर कापल्याचे दर्शवित होते. तर भाडय़ाच्या जागी २४.५० रूपये झाल्याचे दिसून येत होते. रिक्षाचालकाने मात्र ३४ रूपये झाल्याचे सांगितले. मीटरवर २४ रुपये दिसताहेत मग ३४ रुपये कशाचे, असे विचारले असता रिक्षाचा चालक मन्सूर आलम याने भाडय़ाचा तक्ता दाखविला. मीटर सुधारित भाडेवाढीनुसार ‘अपडेट’ झाले नसल्याने आम्हाला जास्त पैसे आकारावे लागत असल्याचे त्याने सांगितले. हे मीटर सुधारित भाडय़ानुसार कधीपर्यंत ‘अपडेट’ होईल, असे विचारले असता त्याने किमान महिना लागेल असे सांगितले. अपेक्षेप्रमाणे आलम यांच्याकडे ओळखपत्र नव्हते. याच मार्गाने ‘एमएच०३-व्ही.६२७८’ या रिक्षाचे मेकॅनिकल मीटर १.९० इतके अंतर कापल्याचे दर्शवित होते. इतक्या अंतराला नव्या भाडेवाढीनुसार ३४ रुपये भाडे या रिक्षाचे चालक सरबजीत यादव यांनी घेतले. यांच्याकडेही ओळखपत्र नव्हते. ‘तुमच्या रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर का नाही,’ असे विचारले असता त्यांनी रिक्षाच्या ‘पासिंग’नंतर बसवून घेणार असल्याचे सांगितले.
परिवहन आयुक्तही उत्तर देत नाहीत!

रिक्षा आणि टॅक्सींच्या दरवाढीनंतर निर्माण झालेल्या विविध समस्यांच्या पाश्र्वभूमीवर मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी परिवहन आयुक्तांना १५ ऑक्टोबर रोजी एसएमएसद्वारे एक घटना कळवून त्यावर त्यांचे स्पष्टीकरण मागितले होते. मात्र अद्याप त्यांना त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण परिवहन आयुक्तांकडून आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अ‍ॅड. देशपांडे यांनी १५ ऑक्टोबर रोजी विमानतळावरून त्यांच्या घरापर्यंतचा प्रवास केला. हा प्रवास ७.१ किमी होता. त्या टॅक्सीच्या मीटरप्रमाणे ६२ रुपये दाखविण्यात आले पण चालकाने त्यांच्याकडे ८७ रुपये मागितले. संबंधित चालकाकडे भाडेपत्रिका नव्हती. त्याला नेमके कसे भाडे घ्यायचे हेही ठाऊक नसल्याचे देशपांडे यांच्या लक्षात आले. देशपांडे यांनी त्यास योग्य मार्गदर्शन केल्याचे त्यांचे म्हणणे होते. हा सर्व प्रकार परिवहन आयुक्तांना त्यांनी तात्काळ कळविला. पण आयुक्तांनी त्यांना काहीही प्रत्युत्तर दिले नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले.  अ‍ॅड देशपांडे यांनी १६ ऑक्टोबर रोजी एमएच ०२ एसए ९६७० या क्रमांकाच्या रिक्षाने प्रवास केला. या रिक्षाला इ-मीटर लावण्यात आले होते. त्यांनी ३.१ किमी प्रवास केला. मीटरवर भाडे २६ रुपये दाखविण्यात येत होते. नव्या भाडय़ाप्रमाणे ३१.५० रुपये म्हणजेच ३२ रुपये होत होते. रिक्षा चालकाने त्यांच्याकडे ३६ रुपयांची मागणी केली. त्याच्याकडे भाडेपत्रिका असली तरी त्यात घोळ होत होता. परिवहन आयुक्तालयाकडून इ-मीटर असलेल्या रिक्षांसाठी वेगळी भाडेपत्रिका काढण्यात आली नसल्याचे देशपांडे यांना सांगण्यात आले. म्हणजेच रिक्षाचालकांकडे असलेली भाडेपत्रिका नेमकी कोणती आहे, याचा खुलासा कोणी करेल काय?
बनावट भाडेपत्रिकेद्वारे प्रवाशांची लूट
एकीकडे भाडेपत्रिकेतील घोळ संपत नसतानाच बाजारात बनावट भाडेपत्रिका वापरात आल्या असून त्याद्वारे प्रवाशांची लूट करण्याचा धंदा सुरू झाला आहे. या बनावट भाडेपत्रिकांमध्ये जुने भाडे दाखवून प्रवाशांचा गोंधळ वाढविण्यात येत आहे. परिवहन विभागाने रिक्षासाठी दोन भाडेपत्रिका (इ-मीटरसाठी आणि मॅकॅनिकल मीटर) प्रसिद्ध केल्या आहेत. त्याचप्रमाणे टॅक्सींसाठीही दोन भाडेपत्रिका काढल्या आहेत. काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठी एक आणि कूलकॅबसाठी एक अशी भाडेपत्रिका आहे. या सर्व भाडेपत्रिकांमध्ये जुने दर देण्यात आलेले नाहीत. मात्र बनावट भाडेपत्रिकेमध्ये अंतराऐवजी जुने भाडे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ वाढत असून नेमके भाडे घेताना जुन्या दरासाठी इतके होत होते म्हणून आता नवे भाडे इतके असल्याचे सांगून टॅक्सीचालक प्रवाशांची लूटमार करत आहेत. अशी बनावट भाडेपत्रिका कोणी वापरत असेल तर त्वरित परिवहन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर (मुंबईसाठी - १८००२२०११० तर कल्याण/डोंबिवलीसाठी- १८००२२५३३५) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो