बुक-अप : स्थलांतरितांचे संदर्भ
मुखपृष्ठ >> बुक-अप! >> बुक-अप : स्थलांतरितांचे संदर्भ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बुक-अप : स्थलांतरितांचे संदर्भ Bookmark and Share Print E-mail

 

गिरीश कुबेर - शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अमेरिकास्थित यहुदींच्या प्रभावी लॉबीमुळे अमेरिका इस्रायलचीच बाजू घेताना दिसते.. भारतीयांच्या मोठय़ा स्थलांतरामुळेही अमेरिकेचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.. स्थलांतरांचे संदर्भ अशा पुस्तकांमुळे कळून येतात.
आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी हेन्री किसिंजर, चित्रपट निर्माता स्टीव्हन स्पिलबर्ग, गोल्डमन सॅकचा संस्थापक मार्कस् गोल्डमन, याच बँकेचा दुसरा संस्थापक सॅम्युएल सॅक, सिटी बँकेचा प्रमुख रॉबर्ट रुबीन, फेडचे माजी प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन, विद्यमान प्रमुख बेन बर्नाके, विख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस, तितकाच विख्यात लेखक पत्रकार थॉमस फ्रिडमन, काल्विन क्लेन या लोकप्रिय ब्रॅण्डचा संस्थापक काल्विन क्लेन, लेवाईस जीन्सवाला लेवी स्ट्रॉस,

‘न्यूयॉर्क टाइम्स’चा मालक ऑर्थर सल्झबर्गर, मायक्रोसॉफ्टचा विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह बाल्मर, डेल कंपनीवाला मायकेल डेल, गुगलचा सहसंस्थापक लॅरी पेज, फेसबुक ज्याच्या डोक्यातनं निघालं तो मार्क झुकेरबर्ग, विकिपीडियावाले लॅरी सँगर आणि जिमी वेल्स, ई बे काढणारा जेफ्री स्कोल, फॉक्स सिनेमावाला विल्यम फॉक्स, वॉर्नर ब्रदर्स, लेखिका आयन रॅण्ड, ज्यानं वॉटरगेट प्रकरण काढलं त्यातला एक कार्ल बर्नस्टिन, दुसरा विख्यात पत्रकार सेमुर हर्ष, पॉल क्रुगमन, विद्यमान आर्थिक संकटाचा भविष्यकार नुरियल रुबिनी, एकमेवाद्वितीय आइन्स्टाइन, झालंच तर..
ही यादी कितीही लांबवता येईल. अगदी हवी तितकी, पण मुद्दा हा की, या सर्व नावांत समान काय आहे? एक तर ते अमेरिकावासी आहेत हे तर उघडच आहे. ते अर्थातच महत्त्वाचं नाही. महत्त्वाचा मुद्दा हा की, हे सर्वच्या सर्व.. यहुदी.. म्हणजे ज्यू धर्मीय आहेत. इतिहास असं सांगतो की, साधारण १८८०पासून अमेरिकेत ज्यू धर्मीयांचं स्थलांतर सुरू आहे. पूर्व युरोपात पुढे ठिकठिकाणी अशांतता निर्माण झाल्यावर यहुदी मोठय़ा प्रमाणावर अमेरिकेत येत राहिले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ही मंडळी राजकारणात सक्रिय भाग घेऊ लागली. हे अख्खं शतक यहुदी हे अमेरिकेच्या डेमॉक्रॅट्सचे मोठे समर्थक राहिलेले आहेत. तसे हे विचाराने डावे किंवा डावीकडे झुकणारे. त्यामुळे कामगार चळवळी, सामाजिक उद्योग आदींत या मंडळींचा मोठा वाटा. त्यांचं महत्त्व आणि अर्थातच आकार लक्षात आल्यावर रिपब्लिकन्सनीही त्यांना आपल्याकडे वळवायचा प्रयत्न सुरू केला. कधी त्यात यश आलं. कधी नाही. या यशापयशावर अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल ठरू लागला. मग यहुदींच्या मतदान पद्धतीवर अनेकांनी लक्ष केंद्रित केलं. या निवडणुकांचा इतिहास असं सांगतो की, १९१६ साली पहिल्यांदा यहुदींची एकगठ्ठा निवडणुकीय ताकद नोंदली गेली. त्या वर्षी व्रुडो विल्सन यांच्या

पारडय़ात ५५ टक्के यहुदींनी आपली मतं टाकली. पुढच्या दोन निवडणुकांत, १९४० आणि १९४४, ही मंडळी फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्या मागे उभी राहिली आणि १९४८ साली तर ७५ टक्के यहुदींनी हॅरी ट्रमन यांना आपला पाठिंबा दिला. हे वर्ष यहुदींसाठी अत्यंत महत्त्वाचं. कारण तिकडे पॅलेस्टिन परिसरात स्वतंत्र इस्रायलच्या प्रसवकळा ऐन भरात होत्या आणि बेन गुरियन वगैरेंनी जगभरातील सर्व यहुदींना पवित्र भूमीकडे कूच करायचं आवाहन केलं होतं. त्या वर्षीच्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत दोन्ही पक्षांनी इस्रायलच्या निर्मितीला पाठिंबा दिला होता. तरीही यहुदींनी डेमॉक्रॅट्स पक्षावर जास्त विश्वास ठेवला आणि त्यांना भरभरून मतं दिली. यात पुढे पुढे बदल होत गेला. म्हणजे कधी रिपब्लिकन्स, कधी डेमॉक्रॅट्स असं या मंडळींनी बरंच केलं. त्याचमुळे रोनाल्ड रेगन यांना नंतर यहुदींचा पाठिंबा मिळाला आणि त्यांच्या विरोधात फेरनिवडणूक लढवणारे जिमी कार्टर हरले. नंतर यहुदींचा पािठंबा पुन्हा डेमॉक्रॅट्सला मिळू लागला. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या मागे तर २००८ सालच्या निवडणुकीत ७८ टक्के यहुदी उभे राहिले होते. या सगळ्या काळात अर्थातच यहुदींना जगभरातून स्थलांतरणासाठी अमेरिका सोयीची वाटली असणार. स्थलांतरित आपल्या कर्मभूमीत एकमेकांना धरून असतात. अडीअडचणीला मदतीला येता येईल म्हणून संघटना करतात. म्हणजे आपली मराठी पोरं नाही का अमेरिकेत महाराष्ट्र मंडळं स्थापन करून नाटकं बसवतात आणि इंग्लंडमध्ये थेम्स नदीत गणपती विसर्जन करतात. मायभूमीपेक्षा परभूमीत गेलं की एकत्र येण्याची गरज वाटते. ही जिवांची आदिम गरज आहे. फक्त मनुष्यप्राणीच असं करतो असं नाही. प्राणी-पक्ष्यांचंही असंच होत असतं. फक्त त्यांच्यात निवडणुका, मतदान वगैरे असं काही नसल्यानं आणि त्यांची वर्तमानपत्रं वगैरे नसल्यानं काही प्रसिद्ध होत नाही इतकंच. तेव्हा आजमितीला एकटय़ा अमेरिका आणि कॅनडात मिळून यहुदींच्या तब्बल १५० संघटना आहेत. युनायटेड ज्युईश कम्युनिटी आणि द अमेरिकन इस्रायल पब्लिक अफेअर्स कमिटी या त्यातल्या दोन सर्वात मोठय़ा. राजकीयदृष्टय़ा सजग आणि सावध. स्थानिक राजकारणाचीही दिशा बदलू शकतील अशा.
हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे इस्रायलमधल्या एका मित्राचा परवा मेल आला. अमेरिकी निवडणुकीत यहुदी काय करणार. वगैरे वगैरे. मी २००२ मध्ये इस्रायलला होतो तेव्हा पॅलेस्टिनींचं इस्रायलविरोधातलं हिंसक युद्ध, इत्तेफदा, ऐन भरात आलं होतं. तेल अविवला जिथं मी राहत होतो तिथल्या जवळच्या एका मॉलमध्येच स्फोट झाला. पाचपंचवीस जण गेले. एके दिवशी शिमॉन पेरेस यांच्या कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी गेलो. आत प्रवेश केला. बाहेर, समोरच्याच रस्त्यावर ढुमकन प्रचंड स्फोट झाला. अख्खीच्या अख्खी शाळेची बस उडवून देण्यात आली होती. सगळी अश्राप पोरं गेली. हे करणारे आत्मघातकी बॉम्बर अर्थातच स्वत:ही मरायचे आणि जो स्वत:च मरायला तयार आहे, त्याला वाचवणार कसं? तर त्या वेळी या आत्मघातकी बॉम्बर्सची मानसिकता या विषयावर सीएनएन या बलाढय़ अमेरिकी वृत्तवाहिनीनं मालिकाच केली. ही आत्मविनाशी मुसलमान मुलं कसं अवघड आयुष्य जगतात, त्यांची आर्थिक परिस्थिती किती वाईट असते, त्यांना जगण्याच्या संधी कशा नाकारल्या जातात. वगैरे. थोडक्यात या आत्मघातकींचं एका अर्थानं उदात्तीकरण करणारी. त्यासाठी सीएनएनची बहुचर्चित पत्रकार ख्रिश्चियान अमॉनपुर ही जातीनं त्या परिसरात हिंडत होती. तिचा सगळा रोख इस्लामींच्या हलाखीवर होता. पण या हल्ल्यात जी माणसं हकनाक मरत होती, त्यांच्याबद्दल एक चकार शब्दही त्यात नव्हता. अर्थात आपल्याला हे नवीन नाही. आपलं भंपक पुरोगामित्व मिरवण्यासाठी आपल्याकडे अनेक सुमार विचारवंत असं करतच असतात. ११ ऑगस्टला रझा अकादमीनं काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांचं या मंडळींनी केलेलं समर्थन हे त्याचं ताजं उदाहरण. तसंच तेही. हिंसाचार एकाच बाजूनं वाईट असू शकत नाही. दोन्हीकडूनही तितकाच तो निंदनीय हवा याचं भान सीएनएनला राहिलं नाही. त्यामुळे त्या वृत्तवाहिनीच्या विरोधात इस्रायलमध्ये तीव्र नाराजी पसरू लागली. ती इतकी की इस्रायली सरकारनंच थेट ठरवलं सीएनएनवर बहिष्कार घालायचा.
झालं. तो खरंच घातला गेला. मी होतो त्या हॉटेलातलं सीएनएन बंदच झालं. तसं बघायला गेलं तर आकाराचा हिशेब केला तर यहुदींचा देश तो केवढा आणि त्यांच्या बहिष्कारानं होणार ते काय? पण तरीही त्यांचा जोर इतका की दोनच दिवसांत सीएनएनचे प्रमुख टेड टर्नर धावत जेरुसलेमला आले. इस्रायली पंतप्रधानांना भेटून माफी मागितली. अमॉनपूरची वृत्तमालिका थांबवली. पुढच्याच क्षणी इस्रायलनं बहिष्कार उठवला. सीएनएन तिकडे दिसू लागलं. त्या दिवशी तिथल्या यजमानानं घरी जेवायला बोलावलं होतं. गप्पांचा तिथे विषय हाच. त्याला म्हटलं, एवढा वीतभर देश तुमचा. पण किती आवाज करता? त्यावर त्यानं दिलेलं उत्तर सूचक होतं- तो म्हणाला- आम्ही लहान आहोत आकारानं. पण मोक्याच्या जागेवर बसून आहोत आणि इस्रायलमध्ये जेवढे यहुदी आहेत तितकेच जवळपास अमेरिकेतही आहेत. चांगली तालेवार जमात आहे आमची तिकडे. अध्यक्षीय निवडणुकीत आम्ही काय म्हणतोय याच्यावर जयापजय ठरतो.
काय तगडं, आत्मविश्वासी विधान होतं ते. कसला सणसणीत अर्थ होता त्यात. बोलताना बोलून गेला तो सहजपणे. पण त्याचे राजकीय मथितार्थ बराच काळ गप्पात येत राहिले. माझे प्रश्न फारच होतायत हे लक्षात आल्यावर तो म्हणाला. बास आता. जास्तच माहिती हवी असेल तर याचे एक पुस्तक वाच. ‘द लॉबी’.
अर्थातच लगेच मिळवून ते वाचायला घेतलं. त्याच्या नावातच काय ते कळतं. ‘द लॉबी: ज्युईश पोलिटिकल पॉवर अ‍ॅण्ड अमेरिकन फॉरिन पॉलिसी’. लेखक एडवर्ड तिवनान यानं यात प्रचंड मोठा कालपट घेतलाय. विषयपटही तितकाच मोठा. अमेरिकास्थित यहुदी मंडळी काय काय उत्पात घडवतात याचं सहजसोपं वर्णन त्यात आहे. ही अर्थातच कादंबरी नाही. पण मांडणी अत्यंत रोचक. म्हणजे अध्यक्षीय निवडणुकीत  उभ्या असलेल्या उमेदवारास आपण निवडून आल्यावर इस्रायलसाठी, यहुदींसाठी काय काय करू. त्याचा कार्यक्रमच कसा सादर करावा लागतो. अनेक यहुदी संस्थांत त्याला प्रत्यक्ष जाऊन स्थानिक यहुदींचं मत वळवावं कसं लागतं, असं केलं त्यानं की काय होतं. आणि मुख्य म्हणजे नाही केलं तर त्याचे राजकीय परिणाम काय होतात. प्रचंड आर्थिक ताकद असलेल्या वित्तसंस्थांत मोक्याच्या जागांवर यहुदी आहेत. अमेरिकी बँकिंग जवळपास यहुदींच्या हाती आहे. हे वाचल्यावर थोरले फोर्ड म्हणाले होते त्याची आठवण झाली. पहिलं महायुद्ध केवळ यहुदी बँकर्समुळे घडलं, असं थोरल्या फोर्ड यांचं मत होतं. असो. तर हे बँकर्स, वित्तसंस्था प्रमुख अमेरिकी निवडणुकांत धनपुरवठय़ात निर्णायक भूमिका बजावत असतात. तेव्हा त्यांना आपल्या बाजूला खेचणं हे ज्याला अध्यक्ष व्हायचंय त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. ते कसं केलं जातं वगैरे सगळा तपशील ‘द लॉबी’मध्ये आहे.
    विषय भलताच रंजक आहे. ज्यांना कोणाला अमेरिकी निवडणुका, जगाचं राजकारण, प. आशियातली शांतता वगैरेंत रस आहे त्या सर्वानी हे पुस्तक वाचायलाच हवं. या सगळ्याचा ऐतिहासिक तपशीलही त्यात आहे आणि अमेरिकन इस्रायल पब्लिक अफेअर्स कमिटी ही संघटना किती कडवी आहे आणि अत्यंत थंड डोक्याने आपला कार्यक्रम कसा राबवून घेत असते याचं सविस्तर चित्रण यात आहे.
ते वाचून झाल्यावर या विषयावर आणखी काही आहे का, हे शोधायला लागलो. दुसरं एक पुस्तक मिळालं. ‘द इस्रायल लॉबी अ‍ॅण्ड यूएस फॉरिन पॉलिसी’. हे अगदी ताजं. २००८ सालचं. जॉन मर्शायमर आणि स्टीफन वॉल्ट या लेखकद्वयींनी मार्च २००६ मध्ये ‘लंडन रिव्हय़ू ऑफ बुक्स’ यात एक निबंध लिहिला होता. त्यातील युक्तिवादामुळे तो तेव्हा चांगलाच गाजला होता. २००३ सालच्या इराकवरच्या हल्ल्याची गरज, सध्या इराणविरोधात सुरू असलेलं शड्डू ठोकणं, सीरियाला धमकावणं, लेबनॉनला घाबरवणं. हे सगळं इस्रायलच्या प्रेमापोटी कसं केलं जातं, ते या दोघांनी विस्ताराने मांडलंय. अमेरिकेतल्या यहुदींच्या बलवान प्रभावगटामुळे अमेरिकेचे एकंदर जगाबरोबरचेच संबंध कसे घडतात वा बिघडतात हे यातून लक्षात येतं. त्यात एके ठिकाणी एक यहुदी नेता म्हणतो. आम्ही किमान ७० सेनेटर्सच्या कायम संपर्कात असतो. साध्या रुमालावरसुद्धा एखादा ठराव मांडून तासाभरात यांचा पाठिंबा आम्ही मिळवून दाखवू.
वाचून थक्कच व्हायला होतं हे. सर्वसाधारणपणे लेखक मंडळी इस्रायलवर कसा सतत अन्यायच होत आलाय, त्यांना पाठिंब्याची कशी गरज आहे वगैरे भूमिका मांडत असतात. दुसरी बाजू माहीत नसल्यानं वा ती माहीत करून घ्यायची सोयीस्कर इच्छा नसल्यानं, ही कथा जास्त लोकप्रिय होते. या पुस्तकाचं वेगळेपण असं की या दोन्ही लेखकांनी अत्यंत धाडसीपणानं विषयाची मांडणी केली आहे. त्यांचा सिद्धांत असा की इस्रायलचा अतिरेकी अनुनय अमेरिकेसाठी फायद्यापेक्षा तोटय़ाचाच आहे.
अनेकांना हा प्रश्न पडत असतो की काहीही झालं तरी अमेरिका ही इस्रायलचीच बाजू का घेत असते. सर्वसाधारणपणे धोरणात्मक हितसंबंध असं गोलमाल उत्तर त्यावर दिलं जातं. परंतु अमेरिकेला इस्रायलचा पुळका नाही वा त्यांचे काही धोरणात्मक हितसंबंधही नाहीत. अमेरिकास्थित यहुदींच्या प्रभावी लॉबीमुळे हे होतं, हे या पुस्तकामुळे नीटपणे समजतं आणि ते समजून घेणं आवश्यकदेखील आहे. याचं कारण असं की आपण सर्वसाधारणपणे स्थितिवादी असल्यानं स्थलांतरांना आपला विरोध असतो. म्हणजे कोणी येऊही नये आपल्याकडे आणि आपणही कुठे जाऊ नये. पण भारतीय प्रचंड प्रमाणात अमेरिकेत गेल्यामुळेच त्या देशाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, हे आपल्या लक्षात येत नाही. तेव्हा स्थलांतरांचे संदर्भ हे आपण लक्षात घ्यायला हवेत.
अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक अवघ्या दोन आठवडय़ांवर आली आहे. त्यात काय होणार याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर इस्रायलला जाण्याची प्रथा पहिल्यांदा बराक ओबामा यांनी मोडली. ते गेले इजिप्तला. परत त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांच्या हडेलहप्पीला विरोध केला. अमेरिकेचे उपाध्यक्ष ज्यो बिडन यांचा इस्रायलनं जाहीर पाणउतारा केला. असं बरंच काय काय घडलं. या सगळ्याचा संबंध या निवडणुकीच्या निकालाशी असणार आहे, हे आपल्याला माहीत असायला हवं म्हणून..
द लॉबी : ज्युईश पोलिटिकल पॉवर अ‍ॅण्ड अमेरिकन फॉरिन पॉलिसी / लेखक- एडवर्ड तिवनान/ प्रकाशक- सायमन अ‍ॅण्ड शुश्टर / पृ. ३०४ / किंमत-१९.९५ डॉलर्स (हार्डबाऊंड, कापडबांधणी)
द इस्रायल लॉबी अ‍ॅण्ड यूएस फॉरिन पॉलिसी / लेखक- जॉन मर्शमायमर आणि स्टीफन वॉल्ट / प्रकाशक -फर्रार, स्ट्रॉस अ‍ॅण्ड गिरॉक्स / पृ. ४९६ / किंमत-१०.०८ डॉलर. (पेपरबॅक)
(वि.सू.- इच्छुकांनी संबंधित प्रकाशक वा ग्रंथविक्रेते यांच्याशी संपर्क साधावा. ही पुस्तके कोठे, कशी मिळवावीत आदी विचारणा लेखकाकडे करू नयेत.)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो