दसऱ्याच्या मुहूर्ता, घर सजले सजले..
मुखपृष्ठ >> लेख >> दसऱ्याच्या मुहूर्ता, घर सजले सजले..
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

दसऱ्याच्या मुहूर्ता, घर सजले सजले.. Bookmark and Share Print E-mail

प्रणोती प्रकाश, शनिवार २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा..   या दसऱ्याला आपलं घर अधिक नाविण्यपूर्ण पद्धतीनं सजविण्यासाठी हा खास लेख..
दसरा-दिवाळी हे सण जवळ यायला लागले की सगळं वातावरण चतन्यमय होऊन जातं. बाजारपेठा नावीन्यपूर्ण वस्तूंनी सजतात, तर घराघरात खरेदीचे बेत आखले जातात. सणासुदीचा हा आनंद आणखीनच द्विगुणित करायचा असेल तर आपलं घरसुद्धा छान, आकर्षक पद्धतीनं सजवलेलं असलं पाहिजे. कारण सणासुदीच्या दिवसांत घरात सुरेख सजावट केलेली असेल तर आपला उत्साही मूड टिकून तर राहतोच, शिवाय घरात येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटतं. अर्थात यासाठी संपूर्ण घराची पुनर्सजावट करून घेण्याची किंवा महागडं फíनचर, वस्तू आणण्याची गरज नाही. थोडीशी कल्पकता, सौंदर्यपूर्ण दृष्टी यांचा वापर केला तर तुम्ही तुमच्या घराला एक वेगळा फेस्टिव्हल लूक देऊ शकता. त्यासाठी गरज आहे ती बाजारात कोणकोणत्या नावीन्यपूर्ण वस्तू आल्या आहेत आणि त्यांचा आपण आपल्या घरात कल्पकतेने कसा वापर करू शकतो याचा आकर्षक मेळ साधण्याची!
तसं बघितलं तर सणासुदीच्या दिवसांत बाजार, विविध मॉल्स, दुकानं अनेक वस्तूंनी अक्षरश: बहरलेली असतात. त्यातही जुन्या-नव्याचा संगम आढळतो, काही वेगळ्या वस्तू दृष्टीस पडतात. त्यांच्या वापराने आपण आपलं घर सुरेख सजवू शकतो. तर मग घराच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात करूया. घराचं दार किती आकर्षक आहे यावरून घराचं आतील रूपडं कसं आहे, याचा अंदाज बांधता येतो. म्हणूनच तेदेखील व्यवस्थित सजवलेलं असावं. आपण एरवी दाराला ताज्या फुलांचं किंवा लोकरीपासून बनवलेलं तोरण तर लावतोच. पण याला छेद देऊन मण्यांची, कापडापासून बनवलेल्या फुलांची तोरणं लावता येतील. हल्ली लोकरीच्या तोरणांनासुद्धा मणी, रंगीबेरंगी स्टोन्स, कवडय़ा, मोती, घुंगरू लावलेले असतात. ही तोरणंदेखील खूप सुरेख दिसतात. तुमच्याकडे कमी उंचीची एखादी चौरंगी बठक असेल किंवा चौरंग असेल तर तो दाराच्या जवळ ठेवून त्यावर एखादं पसरट सुरेख मातीचा माठ ठेवावा. त्यात पाणी घालून खरी अथवा प्लॅस्टिकची फुलं, फ्लोटिंग कॅन्डल्स यांची सुरेख मांडणी करता येईल. असा चौरंग दाराच्या बाहेर ठेवायचा नसेल तर तो घरात दिवाणखान्यात ठेवू शकता. किंवा मग पसरट मातीचा माठ हे सेंटर टेबल किंवा साइड टेबलवर ठेवता येईल.
कोणताही सण असो, तो रांगोळीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. या वर्षी रांगोळीतही भरपूर वैविध्य पाहायला मिळतंय. अतिशय सुरेख आकारात कापलेल्या लाकडावर ऑइल पेंट लावून त्यावर रंगीबेरंगी मणी, खडे चिकटवून ही अप्रतिम तयार रांगोळी सजली आहे. यातलाच आणखी एक प्रकार म्हणजे इलेक्ट्रिक रांगोळी. यात इलेक्ट्रिक तोरणांना वापरतात तसे छोटे दिवे लावलेले असून लाकडाच्या मागच्या बाजूस बॅटरी आहे व तिथेच याचे ऑन-ऑफचे बटन आहे. या बीड्स, स्टोन्सने सजलेल्या रांगोळ्यांमध्ये पारदर्शक पीव्हीसी पेपरवरसुद्धा अशाच प्रकारची कल्पकता वापरून मोहक रांगोळी तयार केलेली आहे. फक्त ही रांगोळी पाच ते सात तुकडय़ांमध्ये असून ती आपण एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर मांडू शकतो. घट ज्या ठिकाणी स्थापले आहेत त्या ठिकाणी अशी रांगोळी मांडलीत तर खूपच छान दिसेल.
पडदे, कुशन कव्हर्स या वस्तूसुद्धा सजावटीत खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. म्हणून मग नेहमीचे वापरातले पडदे, कुशन कव्हर्स सणांच्या दिवसांत न वापरता वेगळे, आकर्षक रंगांचे पडदे, कुशन कव्हर्स वापरावीत. यामुळे तुमची बठकीची रचना अधिक उठून दिसेल. या दिवसात अनेक ठिकाणी वेगवेगळी हस्तकलेची, हॅण्डलूमची प्रदर्शनं भरतात. तिथे फेरफटका मारला तर अनेक सुरेख वस्तू मिळू शकतात. पडदे, कुशन कव्हर्समध्येही येथे काहीतरी युनिक मिळून जातं. पण जर का यातला तोचतोपणा टाळायचा असेल तर चटईच्या पडद्यांची निवड करा. कोलकाता राज्याची खासियत असलेले हे पडदे अशा प्रदर्शनातून तुम्हाला हमखास मिळतील. याची खासियत ही की, कोलकातामध्ये मॅट ग्रास नावाचं पीक मोठय़ा प्रमाणावर घेतलं जातं. यातील तयार पात्यांमधील चांगल्या दर्जाच्या पात्यांपासून हे मॅट ग्रासचे पडदे बनवलेले असतात. यामध्ये तुम्हाला पडद्यांबरोबरच टेबल मॅट, पंगतीसाठीच्या लांब चटया, छोटी आसनं असे प्रकारही पाहायला मिळतील. शिवाय प्रदर्शनातून सॅटिनचे पडदे, कुशन कव्हर्स सर्रास मिळतात. यांचा वापरसुद्धा करता येईल. पोकळ बांबूच्या गोल गोल रिंगांपासून बनवलेले पडदेसुद्धा खूप छान दिसतात, लक्ष वेधून घेतात. फक्त ते मिळण्यासाठी प्रदर्शनांमधून थोडी जास्त पायपीट करावी लागेल. लाकडापासून बनवलेली छोटी आरामखुर्ची, आसनंसुद्धा या ठिकाणी विक्रीस असतात. अशी एखादी आरामखुर्ची तुमच्या दिवाणखान्यातील किंवा बेडरूमच्या खिडकीशेजारी ठेवलीत तर क्या बात है!
पितळी समया, पणत्या, निरांजन, लामण दिवा यांचाही सजावटीत वापर करून बघा. आकाराने मोठी सुंदर समई लख्खं करून दिवाणखान्यातील सेंटर टेबल किंवा साइड टेबलवर ठेवा. त्याखाली सुरेख ब्रोकेडचा रुमाल किंवा क्रोशाचा विणलेला रुमाल ठेवून त्या बाजूने रंगीत प्लॅस्टिक किंवा शक्य असल्यास झेंडूची खरी फुलं गोलाकार सजवा. ही रचना खूपच सुंदर दिसते. किंवा मग वेगवेगळे लॅम्प्स, हॅण्डमेड पेपरपासून बनवलेले लॅम्प्स, मातीपासून बनवलेले लोंबकळणारे दिवे यापकी कोणत्याही वस्तूची तुम्ही निवड करूशकता. पेंटिंग्ज, फ्रेम्स यांचा वापर करूनसुद्धा एखादी भिंत उठावदार करता येईल. बरं, हे सगळं फक्त दिवाणखान्यातच ठेवलं पाहिजे असं काही नाही. बेडरूम, देवघर असेल तर तिथेसुद्धा या वस्तू छान पद्धतीने मांडता येतील.
दरीज्, छोटी कारपेट्स यांचाही सुरेख वापर सजावटीसाठी करता येतो. तसंच अनेक दुकानांमधून सिरॅमिक, फायबरपासून बनवलेल्या अनेक वस्तू असतात. जसं की, फ्लॉवर पॉट, एखादा मोराच्या आकारातला सेंटर पीस, म्युरल्स, वॉल हँगिंग्ज अशा वस्तूंचासुद्धा खूप कल्पकतेने वापर करता येऊ शकतो. फक्त कल्पकतेने अशा वस्तूंची रचना करता आली पाहिजे. कुठे कोणती वस्तू उठून दिसेल हे समजलं पाहिजे. बरं, या वस्तू काही फुकट जाणाऱ्या नाहीत. प्रत्येक सणासुदीला यांचाच वापर आलटूनपालटून करता येतो.  फक्त गरज आहे ती सौंदर्यपूर्ण कल्पकता प्रत्यक्षात आणून घर खऱ्या अर्थाने सणांसाठी सजवण्याची..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो