विजय दर्डा यांना गंडा घालणाऱ्या ठकसेन पोलिसांच्या ताब्यात
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> विजय दर्डा यांना गंडा घालणाऱ्या ठकसेन पोलिसांच्या ताब्यात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विजय दर्डा यांना गंडा घालणाऱ्या ठकसेन पोलिसांच्या ताब्यात Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, सोलापूर
मोबाइलद्वारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा हुबेहूब आवाज काढून खासदार विजय दर्डा यांना तब्बल ३४ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी अक्कलकोटच्या दिगंबर ऊर्फ बाळासाहेब खैरे-पाटील (वय ३६) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. हा फसवणुकाचा प्रकार पुण्यात घडला असून याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तथापि, खैरे यास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन पुणे शहर पोलिसांच्या हवाली करीत असताना त्यास फिट्ससह अन्य दुर्धर आजार असल्याचे आढळून आल्याने त्याला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खैरे-पाटील याने खासदार दर्डा यांनाच नव्हे तर अन्य काही बडय़ा राजकीय पुढाऱ्यांनाही ज्येष्ठ नेत्यांचे हुबेहूब आवाज काढून फसविल्याचे आढळून आले आहे. यात काही ज्येष्ठ मंत्र्यांचाही समावेश असल्याचे बोलले जाते. अशाच एका गुन्ह्य़ात त्यास यापूर्वी उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी अक्कलकोट येथे त्यास पकडल्यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सात लाख ६० हजारांची रोकड व ११ लाखांचे सोने हस्तगत केले. तथापि, खैरे-पाटील याने आपल्या गुन्हेगारी कारवायातून सहीसलामत सुटण्यासाठी अगोदरच पळवाटा शोधून काढल्या असून आपला मोबाइल पंधरा दिवसांपूर्वी हरविल्याची तक्रार त्याने केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या गुन्ह्य़ाची उकल करताना पोलीस यंत्रणेची कसोटी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नवी दिल्ली येथे
मोबाइल संपर्कावरून अक्कलकोट येथे खैरे-पाटील यास सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले.
त्यावेळी त्याच्या घरातून सात लाख ६० हजारांची रोकड व ११ लाखांचे सोने हस्तगत करण्यात आले. मात्र त्यास ताब्यात घेऊन पुण्याच्या पोलिसांचे पथक निघण्यापूर्वी खैरे-पाटील यास फिट्स व अन्य दुर्धर आजार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यास फिट्सचा आजार असल्याचे निदान झाले. त्याच्यावर आणखी दोन-तीन दिवस उपचार केले जातील, असे रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. व्ही. एन. धडके यांनी सांगितले.
खैरे-पाटील याने मोबाइल व फोनवरून ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांचे हुबेहूब आवाज काढून समोरच्या बडय़ा व्यक्तींना संकटकाळात मदतीच्या नावाखाली फसविल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वी त्याने ओरिसाचे तत्कालीन मुख्यमंत्री जे. बी. पटनायक यांच्या नावाने हुबेहूब आवाज काढून राज्यातील एका ज्येष्ठ व उच्चपदस्थ नेत्याशी संपर्क साधून आर्थिक मदत मागितली होती. त्यासाठी उस्मानाबादजवळ कर्नाटकात हुमनाबाद येथे आपल्या कार्यकर्त्यांचा वाहन अपघात झाला असून त्यासाठी तातडीने १८ लाखांची मदत पाठविण्याची गळ घातली होती. उस्मानाबादमधील राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांना संशय आल्याने खैरे-पाटील याची गुन्हेगारी उघडकीस आली होती. त्याने आता पुन्हा आपल्या गुन्हेगारीच्या कारवाया चालूच ठेवल्याचे खासदार दर्डा यांच्या फसवणूक प्रकरणावरून स्पष्ट झाले.     
काय होते प्रकरण ?
खासदार दर्डा यांच्या घरी खैरे-पाटील याने आपण स्वत: दिगंबर कामत बोलतोय, असे सांगून फोन केला व हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांना निवडणुकीच्या अनुषंगाने आर्थिक मदत द्यायची आहे. त्यासाठी ३४ लाखांची रक्कम आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या हातात द्यावी. ही रक्कम नंतर परत करू, अशी थाप मारली. त्यावर विश्वास ठेवून दर्डा यांनी पुण्यातून ३४ लाखांची रोकड उपलब्ध करून दिली. नंतर दर्डा यांनी कामत यांना संपर्क साधून रक्कम पोहोच झाल्याबद्दल चौकशी केली असता कामत यांच्या नावाने हा फसवुणकीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पुण्यात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात हा गुन्हा निष्पन्न झाला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो