सफाईदार इव्हेंटद्वारे सुप्रियाताईंचा युवती दरबार
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सफाईदार इव्हेंटद्वारे सुप्रियाताईंचा युवती दरबार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सफाईदार इव्हेंटद्वारे सुप्रियाताईंचा युवती दरबार Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी  

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खास युवतींसाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा आज येथे झालेला जिल्हा मेळावा म्हणजे आधुनिक काळातील सफाईदार इव्हेंट मॅनेजमेंट आणि युवती दरबाराचा उत्तम नमुना ठरला. राज्यभरात आयोजित अशा प्रकारच्या जिल्हा पातळीवरील युवती मेळाव्यांचा अखेरचा टप्पा काल कोकणात सुरू झाला. सिंधुदुर्गातील मेळावा आटोपून खासदार सुप्रिया सुळे काल रात्री उशिरा रत्नागिरीत दाखल झाल्या. कोकणात त्या प्रथमच येत असल्यामुळे या दौऱ्याबद्दल विशेष उत्सुकता होती. आज सकाळी काही स्थानिक महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी, महिला पतसंस्थांच्या प्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्यांनी येथील स्वा. सावरकर नाटय़गृहात प्रेक्षकांमागील दरवाजातून थेट युवतींमध्ये नाटय़मय रितीने प्रवेश केला आणि उपस्थित काही हजार युवतींनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्या स्थानापन्न होताच ‘देऊ उभारी, घेऊ भरारी, राष्ट्रवादी लय भारी’ या गीताच्या ठेक्यावर रत्नागिरीतील युवतींनी दमदार नृत्य सादर केले आणि उपस्थितांना ठेका धरायला लावला. त्यानंतर या युवतींनी नाटय़गृहात पहिल्या रांगेत बसलेल्या सुप्रियाताईंना हाताला धरून व्यासपीठावर नेले आणि पुन्हा एकदा ‘देऊ उभारी-’चा उद्घोष सुरू झाला. राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री भास्कर जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, आमदार सामंत, निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम इत्यादी नेते मंडळीही त्यामध्ये सहभागी झाली. त्यामुळे संपूर्ण वातावरण भारून गेले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील काही युवतींनी मनोगत व्यक्त केल्यानंतर तटकरे आणि जाधव या मंत्रिद्वयांचीही भाषणे झाली. त्यानंतर सुप्रियाताई उभ्या राहिल्या आणि त्यांनी जणू संपूर्ण कार्यक्रमाचा ताबा घेतला. ‘इथली भाषणं बोअर झाली ना?’ असं त्यांनी अतिशय अनौपचारिक शैलीत विचारताच मुलींनी जोरदार होकार दिला. त्यामुळे व्यासपीठावरील मंत्रिद्वयांची टोपी उडवल्यासारखे झाले. त्यानंतर सुप्रियाताईंनी तरुणाईच्या खास जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालत सलमान, शाहरूख आणि आमिर खानची आठवण काढली. त्यामुळे उपस्थित युवती एकदम उत्साहित झाल्या. ‘तुम्हाला आपल्या जीवनात काय बदल व्हावा असं वाटतं,’ असं त्यांनी विचारल्यावर सुरुवातीला कोणीच फारसे बोलले नाही. मग सुप्रियाताईंनी आपल्या कॉलेज जीवनाची आठवण काढत आपणही असेच होतो, असे प्रांजळपणे सांगत, कॉलेजमध्ये तासाला अधूनमधून दांडी मारायला हरकत नाही, असा तारुण्यसुलभ सल्ला देत उपस्थित मुलींशी आणखी सलगी साधली. त्यानंतर मात्र एकेक मुलगी धीटपणाने उभी राहून आपल्या भवतालच्या जीवनात जाणवणाऱ्या समस्यांबाबत बोलू लागली. तलाठी, सरकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा, दारूधंदेवाले अशा विविध लोकांकडून होणाऱ्या उपद्रवाबाबत त्यांनी आपली कैफियत मांडली. काही युवतींनी शिक्षणातील सोयी-सवलतींचा योग्य विनियोग आणि प्रवेशासाठी उकळल्या जाणाऱ्या वारेमाप देणग्या आणि जातिभेदावरही  बोट ठेवले. या सर्व मुद्यांची नोंद व्यासपीठावर उपस्थित मंत्रिगण, आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांना घ्यायला सांगत राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी या युवतींना दिली. हा ‘युवती दरबार’ इतका रंगत गेला की, सुरुवातीला काहीशा कंटाळलेल्या मुलींना अखेर बोलणे आवरते घेण्याची विनंती करावी लागली.
मंत्र्यांच्या भाषणांवर ‘बोअर’ असा शेरा कदाचित जाहीरपणे प्रथमच मारला गेलेल्या या कार्यक्रमात सावर्डे येथील रुबीना साबळे नावाच्या मुलीने मात्र युवती व महिलांच्या समस्या इतक्या पोक्त शैलीत आणि सभाधीटपणे मांडल्या की तिला वन्समोअर मिळाला.
या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नाटय़गृहाची आसनव्यवस्था अपुरी पडेल, हे लक्षात घेऊन बाहेरच्या दोन्ही बाजूंना मंडप घालण्यात आले होते. त्याचप्रमाणे नाटय़गृहातील मोकळ्या जागांमध्ये आणि रंगमंचावरही दोन्ही बाजूंना युवतींना बसण्यासाठी खास व्यवस्था केली होती, पण तीही अपुरीच पडली.
मेळाव्यासाठी प्रमुख पाहुण्यांचे आगमन होण्यापूर्वी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या स्थापनेमागील भूमिका विशद करणारी चित्रफीत आणि ‘देऊ उभारी-’ या गीताने उपस्थितांना खिळवून ठेवले.
यानंतर येत्या सोमवारी रायगड जिल्ह्यात रोहे येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस मेळाव्याद्वारे राज्यभर घेण्यात आलेल्या जिल्हा मेळाव्यांचा समारोप होणार आहे. त्यानंतर औरंगाबाद येथे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यातून या संघटनेच्या भावी वाटचालीची दिशा आणि कार्यक्रमपत्रिका स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
आरोपांना किंमत देत नाही
या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना, लवासा प्रकल्पाच्या व्यवहाराबाबत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या आरोपांना आपण किंमत देत नाही, असे खासदार सुळे यांनी सांगितले. माजी पोलीस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता त्या पुढे म्हणाल्या की, पवार कुटुंबावर आरोप केल्यामुळे प्रसिद्धी मिळते. म्हणून काही मंडळी अधूनमधून तसे बोलत असतात. पण आम्ही दिवसभर लोकांमध्ये, कार्यक्रमांमध्ये असतो. ही मंडळी वाहिन्यांवर काय बोलतात हे मी कधी ऐकत नाही आणि त्याला किंमतही देत नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो