लढा वडिलांच्या हक्कांसाठी : नको वर्चस्ववाद, हवी समानता - रोशनी मथन परेरा
मुखपृष्ठ >> लेख >> लढा वडिलांच्या हक्कांसाठी : नको वर्चस्ववाद, हवी समानता - रोशनी मथन परेरा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लढा वडिलांच्या हक्कांसाठी : नको वर्चस्ववाद, हवी समानता - रोशनी मथन परेरा Bookmark and Share Print E-mail

भारती भावसार ,शनिवार, २०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अनेक घटस्फोटित पुरुषांना केवळ ते वडील आहेत म्हणून मुलांचा ताबा मिळत नाही. मुलांना आईइतकीच वडिलांचीही गरज असते. म्हणूनच पुरुषांचा वडीलपणाचा हक्क अबाधित राहावा आणि मुलांना अस्थिर बालपण मिळू नये म्हणून लढणाऱ्या तसेच घटस्फोटित दांपत्यांच्या मुलींना त्यांचे हक्क मिळवून देणासाठी ‘ऑल इंडिया डॉटर्स प्रोटेक्शन फोरम’ची स्थापना करणाऱ्या बंगळुरूच्या रोशनी परेरा यांच्या लढय़ाची ही गोष्ट..
‘‘पस्तिशीचे बोपन्ना माझ्यासमोर बसले होते, ‘फादर्स डे’ असून आपल्या मुलाला भेटता येणार नसल्याचा सल त्यांच्या मनात होता. त्यापुढचं ते काय बोलले हे मला कळालंच नाही, फक्त इतकं समजलं की तीन वर्षांचा असताना रोहनला त्यांनी शेवटचं पाहिलं होतं. आणि गेल्याच महिन्यात रोहनचा नववा वाढदिवस होऊन गेला होता. बोपन्ना बळी आहेत न्यायालयीन लढाईतले. पत्नीबरोबरच्या घटस्फोट प्रकरणात त्यांच्या मुलाचा ताबा त्यांच्या पत्नीकडे गेला आणि आपल्या मुलाला पाहणंही मुश्कील झालं. आज त्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे.’’
  बंगळुरूच्या रोशनी मथन परेरा यांच्याकडे समुपदेशनासाठी आलेला हा एक पालक. अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला घडताना त्यांनी पाहिली आणि कायद्याचा गैरवापर थांबवला पाहिजे, स्त्रियांवरचा अन्याय रोखण्यासाठी पुरुषांना लक्ष्य करून चालणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आणि सुरू झाला प्रवास लिंगभेदरहित समानतेच्या दिशेने लढण्याचा..
रोशनी परेरा यांनी उभारलेली चळवळ आहे कौटुंबिक कायद्यांमध्ये सुधारणा व्हावी यासाठीची. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा कोणत्या पालकाकडे जाईल, याचा न्यायनिवाडा लवकर व्हावा यासाठीची. त्यामध्ये  वडिलांच्या भावनांचा आदर करत त्यांनाही आईइतकाच अधिकार मिळाला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. कोणत्याही कारणाने विभक्त झालेल्या नवरा-बायकोच्या कलहात मुलांचा नाहक बळी जाऊ नये व पर्यायाने कौटुंबिक व सामाजिक संतुलन राखले जावे, हा उदात्त हेतू त्यामागे आहे.
कुटुंबाच्या चौकटीत मुलांना आर्थिक, सामाजिक व भावनिक संरक्षण मिळते. पण दुर्दैवाने ज्या मुलांना उमलत्या वयात आई-वडिलांच्या विभक्त होण्याचे भयाण वास्तव स्वीकारावे लागते, त्यांच्या भावविश्वावर होणाऱ्या जखमा फार गहिऱ्या असतात. त्यांचे परिणाम दूरगामी होतात. ज्यांना यातून जावे लागते त्यांच्यासाठी, त्यांची झालेली कुचंबणा  त्यावर आपलेपणाची फुंकर घालण्यासाठी आतापर्यंत संघटित स्वरूपात लढणारी संस्था नव्हती. २००८ मध्ये बंगळुरूमध्ये कुमार जहागीरदार यांच्या पुढाकाराने क्रिस्प (Children's Rights Initiative for Shared Parenting) ही एनजीओ सुरू झाली. त्यात समुपदेशक म्हणून त्या कार्यरत आहेत.
रोशनी म्हणतात, ‘आपल्या देशातील बहुतेक कायदे स्त्रियांच्या बाजूने असतात. पालक विभक्त झाल्यानंतर बहुतांशी खटल्यांमध्ये मुलांचा ताबा आईलाच दिला जातो. कोवळ्या वयातील मुलांना आईची माया गरजेची असतेही. पण अनेकदा तर वडिलांना मुलांना भेटण्याचीही परवानगी नाकारली जाते. न्यायालयाने ती मंजूर केली असली तरी प्रत्यक्षात अनेक आया त्यात आडकाठी आणतात. या साऱ्यात अनेक वर्षे लोटतात. मुलांचे वाढदिवस, त्यांची काही तासांची भेट, अपत्यांचा काही तासांचा सहवास या साध्या गोष्टींसाठीही त्यांच्या वडिलांना मुकावे लागते. त्यांची ही भावनिक कोंडी फोडण्यासाठी ‘क्रिस्प’ कार्यरत आहे.’ डॉक्टर्स, इंजिनीअर, वकील, अध्यापक अशा व्यावसायिकांनी मिळून क्रिस्पची स्थापना केली. मात्र त्यापूर्र्वीपासून म्हणजे २००० पासूनच रोशनी या प्रकारची प्रकरणे हाताळत होत्या. आज त्या पुरुष पालकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहेत. त्यांचे मागणे एकच, लिंगभेदरहित समानता हवी. म्हणूनच रोशनी यांचा लढा रूढार्थाने व्यवस्थेविरोधात नाही, पण समानता नाकारणाऱ्या प्रक्रियेविरोधात आहे. हा लढा कायदेशीर मार्गानेच जिंकता येईल हे खरे असले तरी त्यातून खूप मोठे सामाजिक हित जोपासले जाणार आहे.
रोशनी यांच्या कार्यालयात एक वाक्य लिहिलंय, ‘१०० शिक्षकांहून एक वडील केव्हाही श्रेष्ठ’ यावर रोशनी यांचाही विश्वास असल्याने त्या सहभागी पालकत्वाचा (शेअर्ड पॅरेंटिंग) पुरस्कार करतात. यासाठी त्यांनी काही शास्त्रीय निरीक्षणं मांडली आहेत, त्यातून या समस्येचं गांभीर्य अधोरेखित झालं. एकेरी पालकत्वाच्या छायेत मोठी झालेली मुलं मानसिकदृष्टय़ा अस्थिर असतात. त्यांच्या मनात असुरक्षितपणाची जाणीव खोल रुतलेली असते. म्हणूनच त्यांच्या वागण्यात अनेकदा संभ्रम दिसून येतो, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेखही अनेकदा समाधानकारक नसतो, शिवाय दोन्ही पालकांशी त्यांचं नातं काहीसं तणावपूर्ण असतं.
एकत्र कुटुंबांची परंपरा असणाऱ्या आपल्या संस्कृतीत घटस्फोटाच्या वादळाने कशी लथापालथ होते आहे, याची दाहकता किती, घटस्फोटानंतर विभक्त झालेल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न, त्यांचा ताबा या प्रश्नाचे गांभीर्य किती आहे, याचा अंदाज घ्यायचा असेल तर अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या पाहणीतील निरीक्षणे जरूर विचारात घ्या, असे रोशनी यांनी लक्षात आणून दिले. अमेरिकेत केलेल्या एका पाहणीतील निष्कर्षांनुसार, वडिलांशिवाय असलेल्या घरातील मुले-आत्महत्येला प्रवृत्त होण्याची शक्यता ५ टक्के अधिक असते, घरातून पळून जाण्याची  शक्यता ३२ टक्के अधिक असते, इतकेच नाही तर बलात्कारासारखा पाशवी गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होण्याची शक्यता १४ टक्के अधिक असते.
म्हणूनच त्या म्हणतात,  ‘‘यांसारख्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी आपल्या विकसनशील भारताने केली आहे का? एकटय़ा बंगळुरूमध्ये गेल्या पाच वर्षांत दाखल झालेले १७ हजार घटस्फोटाचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यांची मुलं वर उल्लेख केलेल्या परिस्थितीतून जातील. तेव्हा भलेही तुमचं चौकौनी कुटुंब म्हणून तुम्ही आता बेफिकीर असाल, पण उद्या तुमच्या मुलांच्या बरोबरीने ही मुलं शाळा, कॉलेजेस्मध्ये एकत्र येतील तेव्हा काय? या मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या मुलांच्या एखाद्या दुष्कृत्याला तुम्ही बळी पडायची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच प्रश्न फक्त घटस्फोट घेणाऱ्या दांपत्यांपुरता किंवा कुटुंबापुरता नाही तर उद्याच्या नागरिकांचा आहे. भारत लवकरच ‘तरुणांचा देश’ होणार आहे. मग शंभरातले २० जण एकेरी पालकत्वाचे शिकार, काही अपंग, काही शारीरिक व्याधींनी त्रस्त असे चित्र असेल, तर मग सशक्त समाज बनेल? घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडणार आहे, ते जपण्यासाठी मी लढतेय. आता दृश्य परिणाम भलेही अस्पष्ट आहेत, धूसर आहेत, पण दूरगामी आहेत हे नक्की. म्हणून माझा लढा सामाजिक संतुलन टिकावे म्हणून आहे,’ रोशनी पोटतिडकीने सांगतात तेव्हा त्यांच्या आवाजातली तळमळ स्पष्ट जाणवते.
रोशनी आज ज्यासाठी लढतायत, त्यासाठी त्यांचा भूतकाळच कारणीभूत आहे. त्यांच्या आई-वडिलांचे संबंध खूपच तणावग्रस्त होते आणि यात होरपळली गेली ती रोशनी. पालक विभक्त झाल्याने मुलांची जी भावनिक, मानसिक व कौटुंबिक वाताहत होते, त्याच्या त्या साक्षीदार आहेत. म्हणूनच मुलांच्या जडणघडणीत दोन्ही पालकांची भूमिका महत्त्वाची असते, नव्हे आवश्यक असते. तो मुलांचा हक्कच असतो, असं त्या आता समुपदेशकाच्या खुर्चीत बसून सांगतात. पण त्यांनी स्वत: भोगलेल्या वेदनेमुळे या शब्दांना धार येते.
रोशनी संपूर्ण दिवस याच कामात व्यस्त असतात. त्यांनी बीएड केले असून पुढे ‘चाइल्ड एज्युकेशन’ हा विषय घेऊन एम.ए.ची पदवी घेतली. यानंतर शैक्षणिक व्यवस्थापन घेऊन त्यांनी एमबीए पूर्ण केलंय. त्यांना अध्यापनाचा दांडगा अनुभव आहे. बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय शाळेत त्या सहसंचालिका आहेत. यासह अनेक नामांकित शाळांच्या विश्वस्त मंडळाच्या त्या सदस्या आहेत.
शिक्षण क्षेत्रातील योगदानापेक्षा स्वत:ची ओळख समुपदेशक अशी सांगायला रोशनी यांना विशेष अभिमानास्पद वाटते.  रोशनी नमूद करतात, ‘‘आम्ही आमच्या एनजीओच्या माध्यमातून कायदेशीर बाबींमध्ये काही बदल आणू इच्छितो. काही बदल आम्ही सुचवले आहेत. विवाहित जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर ३० दिवसांच्या आत आई वा वडील यांना मुलांशी बोलण्याची त्यांना भेटण्याची परवानगी दिली पाहिजे. नवरा-बायको विभक्त होऊ शकतात, पण आई-वडिलांनी होता कामा नये. खरं तर मुलांसाठी दोन्ही पालकांचा सहवास बंधनकारक केला पाहिजे, असे त्या म्हणतात. यासह घटस्फोटानंतर मुलांचा ताबा मिळण्यासंदर्भातला प्रश्न अर्ज दाखल केल्यापासून ६ महिन्यांच्या आत निकाली निघाला पाहिजे. तसेच दोन्हीपैकी कुणाही पालकाला मुलांना भेटण्याची परवानगी नाकारता कामा नये. तसा न्यायालयाचा आदेश असेल तर त्याचा अवमान करणाऱ्याला कठोर शिक्षाही झाली पाहिजे.अनेक स्त्रिया घटस्फोटासाठी सबळ कारण म्हणून घरगुती हिंसाचार कायदा, तसेच हुंडाविरोधी कायद्याच्या नावाखाली त्यांच्या नवऱ्यांना अडकवतात. हेच कारण पुढे करून नवऱ्याला मुलांनाही भेटण्याची परवानगी मिळू नये म्हणून न्यायालयाकडे विनवणी करतात. अशा परिस्थितीला बळी पडलेल्या वडिलांना मी समुपदेशन करते.’’
रोशनी म्हणतात, ‘‘मी स्त्रियांच्या विरोधात नाही, पण स्त्री निसर्गत:च उत्तम संवादी आहे. न्यायालयापुढे पुरुषांच्या तुलनेत स्त्री तिचे म्हणणे चांगल्या प्रकारे मांडू शकते. तिच्या भावना, तिचा जाच किंवा त्रास समोरच्यापर्यंत तीव्रतेने पोचवण्यात ती अधिक सरस ठरते. त्यामुळे अशा प्रकरणात बाईला सहानुभूतीही लवकर मिळते. पण नवऱ्यांची किती चूक आहे याची शहानिशा करण्याआधीच त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यांची क्षमता, मुलांमधली गुंतवणूक याचा विचारही केला जात नाही.
समुपदेशक म्हणून रोशनी यांचं कार्य मोलाचं आहे. त्यांनी आतापर्यंत पाचशे प्रकरणं यशस्वीपणे हाताळली असून अनेकांना आशेचा किरण दाखवला आहे. ज्या तरुण वडिलांचं समुपदेशन त्या करतात त्यांच्यासह त्यांचे वृद्ध आई वडील, बहिणी अथवा भाऊ यांचंही समुपदेशन करावं लागतं. कितीही उच्चशिक्षित किंवा श्रीमंत घरातले असले तरी घटस्फोट व नंतर मुलांची ताटातूट या भावनिक आघाताने पुरुष वैफल्यावस्थेत जातात. कित्येकदा व्यसनांच्या आहारी जातात, क्वचित गुन्हेगारीकडेही वळतात. म्हणूनच धंद-आवडीनिवडी जपण्याचा आग्रह धरण्यापासून ते व्यसनमुक्ती केंद्र शोधण्यापर्यंत सगळी तजवीज रोशनी यांनाच करावी लागते.
कायद्याच्या कच्याटय़ात अडकलेल्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचा मुद्दा न्यायालयात अधिक चांगल्या प्रकारे कसा मांडता येईल, याबाबत चर्चा करणे, तसेच त्यांचा आवाज न्यायालयापर्यंत पोहोचेल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न रोशनी करतात. मुलांचे अधिकार, त्यांच्यासाठीच्या न्याय्य मागण्या यांची वकिली करण्यासाठी आतापर्यंत अनेक टीव्ही कार्यक्रमांत रोशनी सहभागी झाल्या आहेत. त्या वेळोवेळी मोर्चे व रॅली काढून आपल्या मागण्यांना जनाधार मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. स्त्रियांच्या संरक्षणासाठी असणारे कलम ४९८ ए किंवा घरगुती हिंसाचार यांचा वाढता गैरवापर थांबवून पुरुषांनाही कायद्याचा दिलासा मिळाला पाहिजे, हा त्यांच्या अजेंडय़ावरचा मुद्दा आहे. पण पुरुषांची बाजू उचलून धरल्याबद्दल अनेकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले आहे.
‘‘मी स्त्रीवादी आहेच, पण निरपराध पुरुषांनाही कायद्याचे अभय मिळाले पाहिजे, इतकेच मला वाटते. काहीच चूक नसताना केवळ निरपराधित्व सिद्ध करण्यात आयुष्यातली उमेदीची वर्षे खर्ची पडतात. त्यामुळे अनेक तरुणांच्या आयुष्याची घडी विस्कटते. हे वास्तव भयाण वाटतं मला. म्हणून ही वर्चस्ववादाची लढाई नसून समानतेसाठीचा लढा आहे, असे मी वारंवार सांगते.’’
घटस्फोटित दांपत्यांच्या मुलींच्या हक्कांबाबतही त्या कमालीच्या आग्रही आहेत. यासाठी त्यांनी ‘ऑल इंडिया डॉटर्स प्रोटेक्शन फोरम’ची स्थापना केली आहे. याशिवाय इंटरनेटवरील ब्लॉगच्या माध्यमातून त्या चळवळ व्यापक करू इच्छितात. त्यांनी आतापर्यंत हजारांच्या वर ब्लॉग लिहिलेत. समुपदेशनचा मार्ग असो वा ब्लॉगिंगचा, बदल घडेपर्यंत लढायचेच, अशी ‘भीष्मप्रतिज्ञा’ केलेली ही आधुनिक दुर्गा आहे.
मुलं मोठी होताना दोन्ही पालकांचा सक्रिय सहभाग त्यात असेल तरच मुलाची सर्वागीण वाढ होते. आजकाल आई-वडील दोघेही नोकरीवर असणाऱ्या जमान्यात तर दोन्ही पालकांची भूमिका आत्यंतिक गरजेचीच आहे. पाश्चिमात्य देशांनी शेअर्ड पॅरेटिंगची महती ओळखून त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. ज्यात घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्याला समुपदेशक तज्ज्ञांसह चर्चा केली जाते व मुलांचा ताबा, त्याची भवितव्याची तरतूद वगैरे गोष्टींवर आधीच चर्चा केली जाते, त्यामुळे पाणी वाहतं होतं.
आपल्या देशात असे बदल व्हायला वेळ लागेल, पण नक्की होतील याबाबत रोशनी व त्यांची संस्था कमालीच्या आशावादी आहेत.   
संपर्कासाठी- संकेतस्थळ  www.crisp-india.org
ई-मेल- This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो